निसर्ग नियमें दया प्रभूची, सदैव बरसत असते ।
दयेचा तो सागर असता, कमतरता ही पडत नसते ।।
अज्ञानी ठरतो आम्हींच सारे, झेलून घेण्या तीच दया ।
लक्ष्य आमचे विचलित होते, बघून भोवती फसवी माया ।।
उपडे धरता पात्र अंगणीं, कसे जमवाल वर्षा जल ।
प्रयत्न सारे व्यर्थ जाऊनी, निघून जाईल वेळ ।।
भरेल भांडे काठोकाठ , केवळ धरता योग्य दिशेने ।
टिपून घ्या तुम्ही दया प्रभूची, अशीच केवळ शुद्ध मनानें ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
April 20, 2017
स्मृतीलहरींच्या हिंडोळ्यावरी
तनमन झुलते , हरिच्या गोकुळी।।धृ।।
ब्रह्म ! मुरलीधरी हरि सावळा
मधुरम , मंजुळ घुमवी बासुरी
प्रसन्न ! गोकुळी राधाच बावरी
छुमछुम , छुमछुम छंद गोकुळी।।१।।
नादब्रह्म ! चराचरी हरेगोविंद
हरे , हरेराम , रामकृष्णगोविंद
हरिकृपाच ! तोषवीते आगळी
देवकीनंदन यशोदेच्या गोकुळी।।२।।
प्राजक्त ! डुले सत्यभामा द्वारी
सडा फुलांचा रुक्मिणी अंगणी
प्रीतीच निर्मळ , देवत्व निर्मळी
साक्ष ! अनामिकाची ही आगळी।।३।।
पुण्यप्रदी , अगम्य भूलभुलैया
द्वैत , अद्वैताचे नि:सिम मिलन
त्रिलोकी ! स्वर्गानंदाची उधळण
कृपा ! सर्वेश्वराची हीच गोकुळी।।४।।
--वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. १४०
३० - १० - २०२१.
November 1, 2021
तू भेटलीस की
का बेचैन होते
वेडे मन माझे...
तू भेटलीस की
का होतात डोळे
ओलेचिंब माझे...
तू भेटलीस की
का काळीज होते
कासाविस माझे...
तू भेटलीस की
का व्यर्थच भासे
हे जीवन माझे...
तू भेटलीस की
का बेभान होते
सारेच ग माझे...
© कवी – निलेश बामणे ( एन.डी.)
दिनांक – 9 मार्च 2016
March 13, 2016
बराच काळ चिवचिव करीत एक दिसे चिमणीं
काय बरे तिज लागत असावे विचार आला मनी...१,
तगमग आणि उत्सुक दृष्टीने बघे चोंहिकडे
परि लक्ष वेधी ती हालचालींनीं आपल्याकडे....२,
शिकवतेस कां ? तूझी चिवचिव भाषा मजला
मदत करिन मी शक्तीयुक्तीने दु:ख सारण्याला...३,
बघूनी मजकडे चिमणी ओरडे मोठ्या रागानें
समर्थ आहे मी माझ्या परि ती नको मदत घेणे...४,
मानवप्राणी तूं एक असूनी बुद्धीमान आहे
मधूर बोलूनी इतरावरती छाप पाडीत जाये...५
शिकून घेशील हलके हलके माझी ती भाषा
पक्षावरती वर्चस्व गाजविण्या येईल तुज नशा...६,
जें जें कांहीं तुज नूतन दिसते ह्या जगते
धडपड करूनी सारे मिळवी प्रयत्न करूनी ते...७
मोठेपण मिळाले तुजला आपल्या बुद्धीने
दुरपयोग केलास त्याचा तूं आखूनी योजने...८,
तुला वाटते यश मिळविले आपल्या परिने
असहाय्य केलेस इतर जीवनां ह्या जगी जगणे...९,
पक्षी भाषा अवगत करणे साह्यासाठी नसे
भांडणे जुंपूनी आमच्यामध्ये गंमत बघत बसे....१०,
फसवे बोलत जवळीं घेवून आम्हा बंदी करी
विश्वासघात हा सहज स्वभाव दिसे तुझ्यापरी...११
कसा टाकूं मी दगड स्वत: माझ्या पायावरी
पक्षी होवूनी जर आलास तूं भाषा शिकवील सारी....१२,
भटकते पिल्लू तिच्या जवळीं दिसले मजला
शांत होवूनी चिमणी उडाली त्याच वेळेला....१३
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
October 2, 2018
विपरित वागूनी मन, नाश करीते शरीराचा ।
वासनेतील तफावत, काळ बनतो इंद्रियाचा...१,
उदर भरले असताना, अन्नाला विरोधते पोट ।
परि अतृप्तता जिभेची, घालते आग्रहाचा घाट....२,
मद्य सेवन करीता, झिंग ती येवून जाते ।
मेंदूतील चेतनेसाठीं, यकृत बिघडूनी जाते...३,
नाच गाणे देत असते, सूख नयनां – कर्णाला ।
शरीर वंचित होते, मिळणाऱ्या त्या विश्रांतीला....४
एक इंद्रियाची वासना, असती पूरक दुजाला ।
साध्य करण्यासाठीं हेच, जागृत ठेवावे मनाला...५
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
April 17, 2017
श्रीकृष्ण जयंतीचे दुसरे दिवशी हा साजरा केला जातो. याला काला, दही-हंडी अशीही नांवे आहेत. श्रीकृष्णांनी व्रजमंडलात गायी चरविताना सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून खाद्यपदार्थांचा काला केला व सर्वांसह भक्षण केले. या कथेला अनुसरुन हा काला व दही हंडी फोडण्याची प्रथा सुरु झाली असावी.
सध्या याला काही ठिकाणी विकृत स्वरूप येत आहे. कोणत्याही रंगाच्या हंड्या बांधतात, त्या फोडतात. त्यामुळे तो रंग एक-तर दोन-तीन दिवस जात नाही तर काही वेळा त्याचे नको ते परिणाम भोगावे लागतात.
-श्री करंदीकर गुरुजी
September 7, 2023
आई भाकर
थापते चार
खायला सारे
बेजार फार
-- माणिक (रुबी)
December 2, 2019
आली आली थंडी आली
बोबडी माझी वळाली।।धृ।।
स्वेटर ना नवा हवा
कानटोपी हवी बुवा
थंडी लगेच पळाली
बोबडी माझी वळाली ।।१।।
नको शाळा सकाळची
दांडी मला मारायची
आई-बाबा हो म्हणाली
बोबडी माझी वळाली ।।२।।
गोधडीत गुडीगुप
चिंचा खाल्या गुपचुप
खोकल्याची ढास आली
बोबडी माझी वळाली ।।३।।
प्रश्न एक माझा ऐका
शाळेचा कशास हेका
शक्कल माझी निराळी
बोबडी माझी वळाली ।।३।।
-- सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
December 17, 2019
ॐ गणपते, ब्रह्मणस्पते, हे गजमुखा
विघ्नेश्वरा, वर्धिष्णु कर अमुच्या सुखा ।।
जेव्हांकधी शुभकार्य कुणि आरंभतो
सर्वांआधी, मोरेश्वरा, तुज वंदतो
पहिलें तुझें अर्चन सदा गणनायका ।।
राहत उभी अरिसंकटें भक्तांपुढे
तीं नाशण्यां, हे मोरया, तुज साकडे
अनवत धरा पायावरी, सुखदायका ।।
हेरंब हे , सारे अम्ही पापी ज़री
अविलंब परि वर्षव कृपा अमुच्यावरी
लंबोदरा, पोटात घे अमुच्या चुका ।।
चालून थकलो या जगीं, शक्ती नुरे
अवतीर्ण हो, तव चरणरज कणभर पुरे
नरजन्म तुझिया दर्शनाविण हा फुका ।।
- - -
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
September 14, 2016
June 1, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti