ग्यानबाची मेख....!!!
कुणी खाकी आडं,कुणी वर्दिआडं,
कुणी पैशा आडं,तं कुणी सत्तेपुढं,
कपडे काढायची अन फाडायची जणु,
चषकी स्पर्धाचं लागली आहे.....!!!
शयनगृहातले खेळ सार्वजनिक होतायेत,
शिखंडी पत्रकारिते आडुनं सत्तेतला भिष्म,
कॅमेर्यातुन धर्मनितीचं शरसंधान करतोय,
हतबलं कृष्णमात्र सगळं विवशपणे पाहतोय...!!!
आधुनिक महाभारतात धर्म अधर्म मिळालेतं...
कोण कौरव कोण पांडवं गणीतच बिघडलय,
पांचालीच्या वस्त्रहरणात कृष्णाचा हात रूतलाय,
न्यायी धर्मराजा मात्र नर-कुंजरातच फसलाय !!
कलीचाच साया,अन कलीचाच खौफ,
चाणक्यांच्या हाती सत्तेचा गोफ,
़़अनितीघरी निती काम करतेय चोख.
हिच तर खरी, ग्यानबाची मेख!!
ग्यानबाची मेख….!!!
कुणी खाकी आडं,कुणी वर्दिआडं,
कुणी पैशा आडं,तं कुणी सत्तेपुढं,
कपडे काढायची अन फाडायची जणु,
चषकी स्पर्धाचं लागली आहे…..!!!
शयनगृहातले खेळ सार्वजनिक होतायेत,
शिखंडी पत्रकारिते आडुनं सत्तेतला भिष्म,
कॅमेर्यातुन धर्मनितीचं शरसंधान करतोय,
हतबलं कृष्णमात्र सगळं विवशपणे पाहतोय…!!!
आधुनिक महाभारतात धर्म अधर्म मिळालेतं…
कोण कौरव कोण पांडवं गणीतच बिघडलय,
पांचालीच्या वस्त्रहरणात कृष्णाचा हात रूतलाय,
न्यायी धर्मराजा मात्र नर-कुंजरातच फसलाय !!
कलीचाच साया,अन कलीचाच खौफ,
चाणक्यांच्या हाती सत्तेचा गोफ,
़़अनितीघरी निती काम करतेय चोख.
हिच तर खरी, ग्यानबाची मेख!!