(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • माझी मानस वारी…

    पडल्या पडल्या करते मी मानसवारी.
    निघाले सर्व पाश तोडुनी मी माझ्या माहेरी
    डोईवर आहे तुळशी आईचा मायेचा हात.
    करेन संकटावर विश्वासाने सहज मात...
    हातात नाही घेता येत मजला टाळ.
    पण गळ्यात आहे कायमची नाममाळ..
    नाही घडली संसाराच्या मोहात पायीवारी
    या पुढे तरी कायावाचामने घडो जपसेवा खरी....
    नाही घडली सेवा. नाही घडली पायीवारी.
    अपराधी आहे मी म्हणून या दीनाला क्षमा करी.
    एकदाच फक्त एकदाच धावून ये माझ्या साठी.
    घालीन कायमस्वरूपी तुझ्या पायाला मिठी..... ?
    जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल ?
    --सौ कुमुद ढवळेकर

      January 16, 2023


  • झेपेचं वय

    झोप कधीही घेता येते,
    थकल्या मनाला विसावा देता येतो…
    पण स्वप्नांना पंख देण्याची वेळ
    नेहमीच थांबून राहत नाही.

    वयाच्या एका टप्प्यावर
    धाडसाची उर्मी कमी होत जाते,
    उंच भरारी घ्यायची इच्छा असली
    तरी पावलं थोडी थबकतात.

    म्हणूनच वेळ हातात असताना
    आकाशाला स्पर्श करून घ्या,
    कारण झोप तर कधीही घेता येते…
    पण झेप घेण्याचं वय
    पुन्हा परत येत नाही.

    •ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
    मो:- 9011841212

      July 13, 2026


  • खरे सुख अंतरी

    सुख हे मृगजळ, फसविते सर्वांला

    खेळ चालतो त्याचा, चकविणे मनाला ...१,

    बाह्य वस्तूंचे सुख, क्षणिक असते,

    मोहून जाता सर्व, लक्ष्य तेच वेधते...२,

    खरे सुख अंतरी, परि शोधी बाहेरी,

    चुकीचा हा हिशोब, निराशा करी...३,

    अंतरातील सुख, नितांत असते

    एकाच अनुभवाने, जग विसरविते...४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      July 25, 2020


  • शब्दभावार्थ

    मी सारे ओळखूनी आहे
    तुही प्रीतभावार्थ जाणते
    जरी तू नि:शब्दी अबोल
    तव अव्यक्त मज उमजते
    मीच मन मोकळे करतो
    व्यक्त होतो, तुही जाणते
    सत्य उरि अबाधित आहे
    प्रीती, स्पंदनासवे वाहते
    कधीतरी न्याय देईल ईश्वर
    हीच भावनां अंतरी जागते
    प्रीत, निर्मळ, निर्मोही नाते
    निष्पाप लोचनांतुनी तरळते
    संकेत, तळहातीचीच रेषा
    वास्तवतेचे प्रतिबिंब दाविते

    -- वि. ग. सातपुते. (भावकवी)

    9766544908

    रचना क्र.१६२

    १२ - ७ - २०२२

      August 9, 2022


  • राधे, केवढा केशसंभार

    राधे, केवढा केशसंभार,
    जीव गुंतला त्यात फार,
    का असे ते मोकळे सोडशी,
    केसांची जादू मिरवशी, --!!!

    रक्षक की मी या विश्वाचा,
    दुसरा तिसरा नच" कोणता,
    असे असूनही बघ किती,---
    केशकलापां पडलो फशीं,--!!!

    केस तुझे मानेवरून रुळती,
    बटां -बटां वाऱ्यावर खेळती,
    बघावे तेव्हा मनसोक्त डुलती, ‌ अडके त्यात जीव, हीच भीती--!!!

    सुंदर काळेभोर कुंतल,
    खूप त्यात खोल गुंतती,
    त्यातच सुवासिक तेलगंध, रात्रं-दिन पाडे मोही,--!!!

    तुझ्या गोऱ्या मुखड्यावर,
    केसांची महिरप काळी,
    गोजिरवाणे रूप तुझे,--
    येते त्याला मादक झळाळी,--!!

    जीवघेणा मदनबाण मारा,
    कसे तुझे कुंतल, करिती,
    या माऱ्याने सर्वस्व हरलो
    तुजसाठी क्षणक्षण झुरलो,
    द्वैतातील अद्वैत साधुनी,--
    दोन जीव लागले प्रेमापाठी,--!!!

    हिमगौरी कर्वे.©

      May 19, 2019


  • काजळी धरल्या वाती

    तेवत होती ज्योत दिव्याची, प्रकाश देवूनी सर्व जनां

    आनंदी करण्या आनंद वाटे, तगमग दिसे तिच्या मना,

    शांत जळते केंव्हां तरी, भडकून उठते कधी कधी

    फडफड करित मंदावते, इच्छा दाखवी घेण्या समाधी

    जगदंबेच्या प्रतिमेवरती, प्रकाश टाकूनी हास्य टिपते

    हास्य बघूनी त्या देवीचे, चरण स्पर्शण्या झेपावते

    अजाणपणाच्या खेळामधली, स्वप्न तरंगे दिसूनी येती

    दिव्यामधले तेल संपता, काजळी धरल्या दिसे वाती

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      December 10, 2020


  • माणसातल्या माणसाला मी शोधत होतो

    लढत होतो जीवनाशी जेव्हा गरिबीत उपाशी जगत होतो
    काम मिळेना पोटाले तेव्हा माणसातल्या माणूस शोधत होतो
    लेकर रडत होते लहान भूक त्यांची लयं मोठी
    दोन घासाच्या भाकरीसाठी वावरात राबराब राबत होतो

    जीव सोकुन जाई सारा अनवाणी नांगर हाकत होतो
    रगत गाळूनी घामाचे उन डोईवर झेलत होती
    सपान डोयात उद्याच्या चांगल्या दिसाच
    याच सुखाच्या सपनात मी रमून जात होतो

    दिस भराभर निघून उपाशीच घालवत होतो
    कर्जाचा सावकार रोज उंबरठ्यावर पायत होतो
    आज देतो उद्या देतो पैसा देऊ तरी कुठून
    आजचा दिवस फक्त उद्यावर टाकत होतो

    जगाच्या नजरीतला काय त मग मी पोशिंदाच होतो
    मायाच लेकरासाठी मी जवारी उधार मागत होतो
    पैश्यापायी मले कोणी दे ना जवरी
    आसवे पुसत मी माणसातला माणूस शोधत होतो

    -- अॅड विशाखा समाधान बोरकर
    . रा पातूर जी अकोला

      September 19, 2019


  • हिशेब

    सुखदुःखाचा , मी कधीच
    गणिती हिशेब नाही केला

    जीवा जगविता , जगविता
    कधी अट्टाहास नाही केला

    वेदनांतूनही शोधीता सुखा
    दुश्वास कुणाचा नाही केला

    सुखसमाधान, योग भाळीचे
    त्याचा हव्यासही नाही केला

    निर्मळी ! सहवासात लाभले
    संस्कारांचे रांजण सोबतीला

    आघातातही डगमगलो नाही
    विवेके , सावरले मनांतराला

    खेळ सारेच त्या अनामीकाचे
    ना कधी विसरलो दयाघनाला

    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र.१५२

    १४ - १२ - २०२१.

      December 21, 2021


  • स्वप्नातली अपूरी इच्छा

    दुपारचे भोजन करूनी, आडवा झालो थोडासा
    झोप लागूनी त्याच क्षणी, थंडावल्या साऱ्या नसा....१,

    वाम कुक्षीच्या आधीन जाता, जग विसरलो सारे
    स्वप्न पडूनी सुंदर मनी, वाटे आनंद देणारे.....२,

    पाटी-पुस्तक हाती घेवूनी, पोषाख घाली शाळेचा
    घेवूनी गेलो कन्येस माझ्या, नाद जिला शिकण्याचा....३,

    खूप शिकूनी मोठी होईन, बाबा तुमच्या एवढी
    खावू पुस्तक खेळणी आणा, बडबडीत तिच्या गोडी....४,

    आई नको, परि तुम्हीच या, माझी शाळा सुटताना
    टाटा करित गोड वदलि, शाळेमध्ये शिरताना....५,

    येत असता घरि परत, दुकानी एका शिरलो
    बराच खावू आणि खेळणी, घेवूनी मी परतलो....६,

    उत्सुकतेने बघत असता, कुणीतरी हालविले
    हाय वेड्या ! हे तर स्वप्न, तिनेच जे तोडले.....७,

    क्षणभर आवक् झालो मनी, स्वप्न भंग पावतां
    खंत वाटली उगाच एक, अपूरी इच्छा राहतां....८

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      April 23, 2017


  • निती मूल्ये विसरला

    विसरलास तू मानव पुत्रा,

    नीतिमूल्ये सगळी,

    काय दुर्दशा झाली तुझी, काय दुर्दशा झाली....।। धृ ।।

    स्वप्नामध्ये दिले वचन,

    पाळीले ते राज्य घालवून,

    हरिश्चद्रांची कथा आजही

    करीते मान ताठ आपुली....१,

    विसरला तू मानव पुत्रा नीतिमूल्ये सगळी,

    राजा साठी देई प्राण,

    दुजासाठी होते जीवन,

    ‘सिंहगड’ तो घेई जिंकूनी

    शिवरायाची शान राखली....२,

    विसरलास तू मानव पुत्रा नीतिमूल्ये सगळी,

    काळ असो तो पुरातन,

    वा आधुनिक शिवकालीन,

    पूर्वज सारे महान असता,

    आज पुण्याई अशी का आटली?....३,

    विसरलास तू मानव पुत्रा नीतिमूल्ये सगळी,

    विश्वासाचे नाते गेले,

    स्वार्थीपणाचे बीज अंकुरले,

    लुटतो मानव एकमेका,

    हीच चित्रे आज उमटली.....४,

    विसरलास तू मानव पुत्रा नीतिमूल्ये सगळी

      November 13, 2019