June 15, 2013
कृष्ण म्हणजे दिव्यत्व
कृष्ण म्हणजे सर्वस्व
साक्षात्कार कैवल्याचा
कृष्ण म्हणजे सर्वस्व
सदगुणांचा समुच्चय
सर्वोत्तमी प्रीतीतत्व
निर्मल हॄदयस्थ मैत्र
कृष्ण म्हणजे सर्वस्व
तो राधा, मीरा,सख्यांचा
सुदाम्याचा, अर्जुनाचा
सर्वांच्याच अंतरातला
कृष्ण म्हणजे सर्वस्व
दुष्प्रवृत्तिंचा कर्दनकाळ
सत्प्रवुत्तिंचा तारणहार
पावित्र्य, प्रेम, शुचिता
कृष्ण भव्य, दिव्य, देवत्व
कृष्ण ! भक्ती, सात्विकता
तो नित्य आचरणी यावा
मनामनातुनी अवतरावा
कृष्ण कृष्ण कृष्ण सर्वस्व
-- वि.ग.सातपुते ( भावकवी )
9766544908
रचना क्र. २०७
१८/८/२०२२
September 20, 2022
विसरण्यातच लपला आहे, आनंद जीवनाचा
आठवणीचे द्वार उघडता, डोंगर दिसे दु:खाचा...१
दृष्य वस्तूचे मिळता ज्ञान, असे जे बाह्य जगीं
आकर्षण त्याचे वाटत असते, सदैव आम्हां लागी....२
वस्तूच्या त्या होवूनी आठवणी, सुख देई आम्हांला
क्षणिक असती सारे सुख, दु:ख उभे पाठीला...३
उपाय त्यावरी एकची आहे, विसरून जाणे आठवणी
विसरूनी जातां त्या सुखाला, दु:खी होई न कुणी...४
एकाग्र मनाची स्थिती म्हणजे, दुसरे काही नसे
जाता विसरूनी स्वत:लाही, जगास विसरत असे ... ५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 2, 2021
पाऊस चिंब चिंबलेला
July 3, 2021
काळे दाट रेशमी कुंतले
पाहिले ज्यांनी ते गुंतले
कोण असेल रे ती ?
दिसते छान सुंदर किती
सुंदर डोळे नजर बोलकी
गाली खळया गोड खुलती
डौलदार चालतांना टाकते
पावले एका लयीत ती
कोण असेल रे ती ?
दिसते छान सुंदर किती
पाहाण्या मन भरूनी तिला
किती बहाणे करीती वेडे ते
डोळ्यासमोरूनी जाई जेंव्हा
नजरेचे त्यांच्या पारणे फिटते
कोण असेल रे ती ?
दिसते छान सुंदर किती
-- अरुण वि.देशपांडे-पुणे
9850177342
प्रकाशित - दिवाळी अंक- २०१८ -.दै.स्वतंत्र उज्वल भारत - धुळे .
January 10, 2019
जरी, मी नसलो मनकवडा
तरी मी सारे ओळखून आहे
समोरचे हास्य बेगडी नाटकी
मनभाव सारे ओळखून आहे
सत्य असत्य लोचनी तरळते
सद्भावनां! अंतरास सजविते
मन निर्मळ सुखानंदाचा झरा
सारेच मी शब्दात गुंफतो आहे
कां ? उगाच उणेदुणे उसवावे
जे छळते मनास, ते विसरावे
विवेके! सदा जगुनी जगवावे
एव्हढेच आपुल्या हाती आहे
मैत्र! लाभणे, भाग्य भाळीचे
निर्मळ! सुखाचेच प्रीतीप्रांगण
जीवाजीवा, सहजी बिलगावे
जीवनाची, हीच सांगता आहे
--वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
१४ - १ - २०२२.
January 30, 2022
भाळी नसता कुंकंम तुझ्या गे
विरचक्र हे हातीं आले
मरणोत्तर हा किताब मळतां
मन तुझे कां गहिवरले ?
शुर विराची अर्धांगिनी तू
युद्धभूमिवर त्यास धाडीले
ओवाळूनी निरोप देतां
मन तुझे कां गहिवरले ?
देश सेवेत कामी यावे
ब्रिद त्याचे मनी ठसविले
सांगत असतां हेच दुजांना
मन तुझे कां गहिवरले ?
सुर्वणाक्षरीं वाचून गाथा
आदर्शमार्गी पडतील पाऊले
तव रक्ताचे नाते उसळतां
मन तुझे कां गहिवरले ?
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
August 20, 2016
जीवन असावे गुलाबा सारखे
सहवासे ज्याच्या मिळताती सुखे....१,
सुगंध तयाचा दरवळत राही
मनास आमच्या समाधान होई....२,
नाजूक पाकळ्या कोमल वाटती
सर्वस्व अर्पूनी गुलकंद देती...३,
विसरूं नका ते काटे गुलाबाचे
बसती लपूनी खालती फूलाचे....४ ,
सुखाचे भोवती सावट दु:खाचे
जीवन वाटते झाड गुलाबाचे....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
October 24, 2018
धुळ साचते
पुस्तकावर,टि.व्ही.वर
खिडक्यांवर,दारावर
आणि
कुलुपावर
धुळ करते कब्जा सार्यांवर...
किती दिवस झालेत
माणसांचा घरात नाही वावर
घरमालक
मस्त गेलाय फिरायला
घर सोडून वार्यावर....
धुळ पसरते चादर
सार्या वस्तूवर
आणि
कुणी आलंच तर
ठसे उमटणार घरभर
ठेवते नजर चोरावर..
धुळंच सांभाळते
सारं घर तुम्ही घरी नसल्यावर...
-- श्रीकांत पेटकर
(मागील वर्षी आजच्या दिवशी.. १०/१०/२०१७ला केलेली कविता )
https://www.facebook.com/shrikant.petkar.5
October 25, 2018
वातावरणी वस्तू पडतां,
नाश पावते लवकर ती,
हवा पाण्याच्या परिणामानें,
हलके हलके दूषित होती ।।१।।
ठेवूं नका उघडयावरती,
वस्तू टिकते निश्चितपणे,
दूषितपणाला बांध घालता,
कसे येई मग त्यात उणे ।।२।।
बाह्य जगातील साऱ्या शक्ती,
आघात करती मनावरी,
दूषिततेचे थर सांचूनी,
मनास सारे दुबळे करी ।।३।।
देहामध्यें बंदीस्त ठेवून,
एकाग्रचित्त करा मनाला,
कांहीं न करता येते तेव्हां,
राग लोभादी बाह्य गुणाला ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 31, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti