(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • हें माणसा !

    मानव योनी हीच महान नको करु हा वृथा अभिमान

    मानुनी प्राण्यांत श्रेष्ठ झालास तूं अतिगर्विष्ठ

    'विवेकशक्ति' असे ज्ञान हेच ठरविसी परिमाण

    हाच निर्णय चुकीचा पाया ठरे गैरसमजाचा

    उंच आकाशांतून घार पाही भक्ष्य जमिनीवर

    तुजला नसे तिक्ष्ण दृष्टी निसर्गे दिली ती पक्षिसृष्टी

    तंतुसी काढूनी मुखातूनी सुंदर विणी जाळे त्यांतूनी

    कोळी विणतो सुंदर जाळे वास्तूकला ती कुणा न कळे

    श्वास घेऊनी वस्तू शोधतो मानवाला चकीत करतो

    श्वानाचा तूं घेसी उपयोग हाच तुझा पराजयाचा भाग

    स्पर्शूनी आवाजांच्या लहरी नागराज चपळाई करी

    स्पर्शेंद्रियाचे हे गुढ ज्ञान मानसा न होई अकलन

    पक्षी सुंदर घरटी करती कौशल्याचे नमुने असती

    कोठून मिळे त्यांना शिक्षण विचार करुन तूं हे जाण

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    e-mail- bknagapurkar@gmail.com

      August 27, 2018


  • संकटातील चिमणी

    शांत होती रात्र सारी, आणि निद्रे मध्ये सारे

    खिडकी मधूनी वाहे, मंद मंद ते वारे....१

    तोच अचानक तेथे, चिमणी एक ती आली

    मध्य रात्रीचे समयी ओरड करू लागली....२

    जाग येता निद्रेतूनी, बत्ती दिवा पेटविला

    काय घडले भोवती, कानोसा तो घेतला....३

    माळावरती बसूनी, चिव् चिव् चालू होती

    बघू लागलो दूरूनी धडधडणारी छाती....४

    मध्येच उडूनी जाई, दारावरती बसे

    तगमग देखूनी तीची, कांहीं न कळत असे....५

    भाषा न कळली जरी, धडकन सांगत होती

    ‘संकटात आहे हो मी, ह्या भयाण मध्यरात्री’....६

    केवीलवाणी बघूनी, भूतदया ही आली

    काय हवे तिजला, या अवचित वेळी....७

    जेंव्हां बसे माळावरी, ओरड वाढत होती

    हालचालीतील बैचेनी, काही सूचवित होती....८

    आधार घेवूनी कसला, माळावरती चढलो

    विखूरलेल्या सामानी, निरखूनी बघू लागलो...९

    धस्स झाले मन बघूनी, एक लांब त्या सर्पाला

    छोट्या घरट्या पुढती, विळका घालूनी बसला..१०

    जीभल्या चाटीत होता, समोर बघूनी भक्ष्य

    चिव चिवणारी पिल्ले, होती तयाची लक्ष्य....११

    चाहूल माझी लागता, सावध परि झाला

    छलांग मारीत वेगे, झरोक्यामधूनी गेला...१२

    काळसर्प तो बघूनी, उडाली होती चिमणी

    घुटमळला जीव परि, पिल्लामध्ये अडकूनी....१३

    आघाद होता हृदयी, कळवळूनी ती गेली

    मातृत्वातील ओढीने, गहीवरूनी ती आली...१४

    भयाण असूनी संकट, चिमणीची बघता शक्ती

    यश मिळविले तिने, योजूनी केवळ युक्ती....१५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      July 11, 2019


  • विष्ठा

    विष्ठा बघूनी थुंकलो,
    घाण वाटली मजला,
    अमंगल संबोधूनी,
    लाखोली देई तिजला ।।१।।

    संतापूनी मजवर ,
    कान उघडणी केली,
    तुझ्याचमुळें मूर्खा मी,
    अमंगळ ती ठरली।।२।।

    आकर्षक रूप माझे,
    लाडू करंज्यानें युक्त
    कपाटातूनी काढूनी,
    केले सारे तूंच फस्त ।।३।।

    परि मिळतां तुझा तो,
    अमंगळ सहवास,
    रूप माझे पालटूनी,
    मिळे हा नरकवास ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      December 10, 2015


  • धरणीचा दूत म्हणुनी

    धरणीचा दूत म्हणुनी,
    उंच आभाळी जाशी,
    सतत पंख फैलावुनी,
    प्रवास सारा करशी--!!!

    दूरवरी खूप उडशी,
    घेऊन निरोप खालचा,
    वर अगदी जाऊन पोचशी,
    जिथे ना पोचे ऐहिक दृष्टी,--;
    आयुष्ये ज्यांची संपली,
    त्यांची खुशाली आणशी,-!!!

    त्यांच्याविना सारी पृथा,
    वंचित पोरकी,बापुडवाणी,
    नाती-गोती इथली सारी,
    मात्र एकदम केविलवाणी,--!!!

    भन्नाट रान वाऱ्यासारखा,
    काळ जाई पुढे पुढे,
    घेऊन जाई संगतीला,
    आपुले सख्खे परके,--!!!

    जीवन आहे त्यांच्यावाचुनी
    आतल्या आत भकास,
    कोण रडे कोणासाठी,
    जागवीत आपुली आंस,--!!!

    पाखरा गेले त्यांना,---
    दे आमुची ख्यालीखुशाली,
    आमच्यावाचून तिथे कसे ते,
    जगत असतील शंका निराळी,--!!!

    ऋणानुबंध आमच्यातले,
    असीम अमीट अतूट,
    देहांनी जरी केली असली,
    अगदी विलक्षण ताटातूट,--!!!

    पाखरां, ते जिवंत असती,
    आमच्या सर्वांच्या हृदयामध्ये,
    *एक प्रेमाची खूण दे,
    पटेल* त्यांना अंतरामध्ये*,--!!!

    हिमगौरी कर्वे.©

      August 20, 2019


  • अबोलीची केशरी वेणी

    अबोलीची केशरी वेणी,
    नेसले केशरी साडी,
    अस्सल सोन्याने मढले ग,
    जसा जाईचा जणू बहरच ग,

    केशरी सुंदर टिळा लाविते, मोगऱ्याचे फूल केशी ग,
    भोवती दरवळ भारते ग,
    टपोरे मोतीच पेडी गुंफते ग,

    हाती गुलाब घेऊन माझ्या,
    प्रियाची वाट मी पाहते ग,
    गुलाब प्रतिक ना प्रेमाचे,
    गुलाबी पाकळ्या गाली ग,--!!!
    लाजलाजूनी म्हणते मग,
    कोण त्यांचा खरा वाली ग,--!!

    तरल, मृदू ,कोमल पाकळी,
    तशीच गालावरची खळी ग,
    मनमोहक तारुण्य उमलते,
    अंगावर गुलाबी गेंद ग,--!!!

    स्पर्श करता काटा बोचे,
    सांभाळून रहा सारे,
    जखमी होईल तन, मन बरे,
    जुई सायली जशी नखरेल ग,

    सोनचाफे भरभरून,
    मी लुटते बाई ग,
    सौंदर्य आणि सुगंधाची,
    आज खरी लयलूट ग,--!!!

    हिमगौरी कर्वे.©

      May 27, 2019


  • प्रेम नाणे

    तसेंच वागा इतरजणांशी, वाटत असते ,तुमच्या मनीं ।

    अपेक्षा करता प्रेमाची, सदैव इतरांकडूनी...१,

    सहानूभुतीचा शब्द लागतो, दैनंदिनीच्या जीवनीं ।

    क्षणा क्षणाला भासत असते, जीवन तुमचे अवलंबूनी...२,

    प्रेम वाटतां इतरांना, परत मिळते तेच तुम्हांला ।

    प्रेम नाण्याचे मूल्य जाणूनी चलनांत ठेवा हर घडीला...३,

    याच नाण्यांनीं काम बनते, चटकन सारे बघा कसे ।

    दोन मनें सांधली जाऊनी, आनंद सर्वत्र दिसत असे...४,

    राग लोभ हे शत्रू आपले, घालऊनी द्यावे तुम्ही त्यांना ।

    प्रेम नाण्याची मदत घेता, सहज जमेल हे सर्वांना...५,

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      July 19, 2020


  • उमलत्या फुलांत गंध सारे

    उमलत्या फुलांत गंध सारे
    अलगद बेधुंद मन व्यापून आहे
    मोगऱ्याचे आल्हाद धुंद बहरणे
    जीव गुंतून हलकेच बावरुन आहे
    कळ्यांचे गाणे फुलांशी जोडले आहे
    नाजूक कळ्यांत श्वास वेढून आहे
    पानांत हिरव्या मन ओलं जपून आहे
    मोहक निशिगंध अंतरी फुलून आहे
    लाजून अबोली केसांत माळून आहे
    ओल्या स्पर्शात प्राजक्त गंधाळून आहे
    प्रियेचे लाजणे रातराणीत लपून आहे
    प्रेमाचे प्रतीक गुलाब मोहक सजले आहे
    प्रत्येक फुलांत सजून प्रीत हृदयी आहे
    केवड्याचा गंध केसात भरुन आहे
    अबोल प्रीत लाजरी प्रियेच्या स्पर्शात आहे
    फुलांचे गाणे अलवार चाफ्यात दरवळून आहे

    -- स्वाती ठोंबरे.

      November 10, 2021


  • रंग गुलाबी शराबी

    रंग गुलाबी शराबी,गाली तुझ्या फुलले,
    मदनबाण नयनातुनी, पाहता-पाहता निसटले,--!!!

    जाई जुई कोमलांगी,
    नाजूक तन साचे,
    अंगकाठी शेलाटी,
    सोनचाफ्याचे फूल नाचे,--!!!

    वर्ण तुझा केतकी,
    मिठास शब्द बोले,
    कुंदकळ्यां नाजूकही,
    दंतपंक्ती जणू भासे,--!!!

    वाटे चालते-बोलते,
    फूल तू सायली,
    गेंद टपोरे झेंडूचे,
    केशरवर्खी उरोजही,--!!!

    जाता तू जवळुनी,
    मनमोगरा फुलतसे,
    उमलत हरेक पाकळी,
    जिवाचे कमळ बहरतसे,--!!!

    मंजुळ स्वर ऐकुनी,
    भोवती सडा प्राजक्ती,
    फुलांचा सुगंध येई,
    सुंदरी तुझ्या सहवासें,--!!!

    हिरवा चाफा दडुनी,
    लज्जेत तुझ्या बसे,
    प्रीत फुले मात्र फुलती,
    काळजांची पर्वा नसे ,--!!!

    सौंदर्याचा मी पुजारी,
    विनवतो तुला प्रेमे,
    प्रसन्न हो ग देवी,
    भक्तकल्याणा कारणें,--!!!!

    © हिमगौरी कर्वे

      February 20, 2020


  • रामाची व्याकूळता

    सीतेकरीता व्याकुळ झाला

    अवतारी चक्रपाणी,

    अजब ही रामप्रभू कहाणी ।।धृ।।

    पत्नीहट्ट त्याला सांगे,

    कांचनमृग शोभेल अंगे,

    मृगयेच्या तो गेला मागे

    प्रसंग घेई रावण साधूनी ।।१।।

    अजब ही रामप्रभू कहाणी

    रावण नेई पळवूनी सीता

    दिसेना रामा कोठे आता

    तरुवेलींना पुसत होता

    वाहत होते अश्रू नयनीं ।।२।।

    अजब ही रामप्रभू कहाणी

    वाणी ज्याच्या शक्ती शिवाची

    ह्रदयामाजी दया सागराची

    त्यालाही दिसे नियती खेची

    सामान्यतेच्या मापी तोलूनी ।।३।।

    अजब ही रामप्रभू कहाणी

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      November 10, 2019


  • तुला लाभलेली निसर्ग देणगी

    खळी पडून गालावरी सुंदर तूं दिसते

    आनंदाचे भाव दर्शनी मधूर तूं हांसते ।।१

    इवले इवले ओठ फूलपाकळ्यांपरि

    लांब लांब केस काळे भुर भुर उडती मानेवरी ।।२

    मोत्यासारखे दांत भासे कुंदकळ्या

    बदामाचा आकार मिळे तुझ्या डोळ्या ।।३

    इंद्रधनुष्याचा बाक दिसे भुवयाला

    चाफेकळीची शोभा मिळाली नाकाला ।।४

    चमकते अंगकांती फाटलेल्या झग्यातूनी

    दिसते निसर्गाची देणगी तुझ्या गरीबीतूनी ।।५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      July 3, 2020