पाऊस

 



पाऊस धो – धो सारखा कोसळणारा

छत्री जवळ असतानाही भिजविणारा …

रस्त्याने चालताना मध्येच थांबवून

गरम – गरम भजी खायला लावणारा …

पायातील चपला काढायला लावून

पाय पाण्यात भिजवायला लावणारा ..

छत्री मानेखाली धरून पाऊस सरी

हाताच्या ओंजळीत झेलाया लावणारा ..

अचानक मोठ्यानाही लहान मुल

करून त्यांच्याप्रमाणे बागडाया लावणारा …

ती आणि तॊ सोबत असताना

अचानक छत्री उडवून लावणारा ….

प्रेमिकांना एकमेकांच्या कुशीत तो

शिरण्या चांगला बहाणा सहज देणारा …

असा हा पाऊस सर्वांचा लाडका

मित्र सर्वाना हवा हवासा वाटणारा …

कवी – निलेश बामणे

— निलेश बामणे

Author