विसरण्यातील आनंद

विसरण्यातच लपला आहे, आनंद जीवनाचा

आठवणीचे द्वार उघडता, डोंगर दिसे दु:खाचा...१

दृष्य वस्तूचे मिळता ज्ञान, असे जे बाह्य जगीं

आकर्षण त्याचे वाटत असते, सदैव आम्हां लागी....२

वस्तूच्या त्या होवूनी आठवणी, सुख देई आम्हांला

क्षणिक असती सारे सुख, दु:ख उभे पाठीला...३

उपाय त्यावरी एकची आहे, विसरून जाणे आठवणी

विसरूनी जातां त्या सुखाला, दु:खी होई न कुणी...४

एकाग्र मनाची स्थिती म्हणजे, दुसरे काही नसे

जाता विसरूनी स्वत:लाही, जगास विसरत असे ... ५

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

विसरण्यातच लपला आहे, आनंद जीवनाचा

आठवणीचे द्वार उघडता, डोंगर दिसे दु:खाचा…१

दृष्य वस्तूचे मिळता ज्ञान, असे जे बाह्य जगीं

आकर्षण त्याचे वाटत असते, सदैव आम्हां लागी….२

वस्तूच्या त्या होवूनी आठवणी, सुख देई आम्हांला

क्षणिक असती सारे सुख, दु:ख उभे पाठीला…३

उपाय त्यावरी एकची आहे, विसरून जाणे आठवणी

विसरूनी जातां त्या सुखाला, दु:खी होई न कुणी…४

एकाग्र मनाची स्थिती म्हणजे, दुसरे काही नसे

जाता विसरूनी स्वत:लाही, जगास विसरत असे … ५

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Author