
December 24, 2011
तूं सुखकारी, तूं विघ्नारी, तूं नियतीचा अधिपती
हे गुणदाता, पार्वतीसुता, आधार तूंच जगतीं ।।
जे खलबुद्धी, सरळ ना कधी, तूं ताडसि त्यां दुष्टां
पिडतात जनां अन् संतमनां, तूं गाडसि त्या कष्टां
तूं प्रेमरूप, करुनास्वरूप, तुजमुळेच सुखदीप्ती ।।
जोडुन हातां, टेकुन माथा, जनगण तुजला नमती
फुंकून शंख, गर्जून मंत्र, जग करी तुझी आरती
वाजे डंका, अन् आशंका मनिं कांहीं नच उरती ।।
मी हतभागी, अंधार जगीं, पुढला ना मार्ग दिसे
वाटेवरती काटे रुतती, दुर्भाग्यभुजंग डंसे
देइ अनंता धरुन हात आनंदमयी मुक्ती ।।
- -
- सुभाष स. नाईक
August 23, 2017
लक्ष आपले जात असते, सदैव प्रभूकडे
मार्ग सारे ठरलेले, जे मिळती तिकडे....१,
‘को S हं’ शब्दाचा निनाद होतो, प्रथम मुखातून
जन्मताच तो प्रश्न विचारी, “मी आहे कोण?”....२
मार्ग हा तर सुख दु:खाने, भरला आहे सारा
राग लोभ मोह अंहकार, याचा येथे पसारा...३,
वाटचाल करिता यातून, कठीण होवून जाते
जीवन सारे अपूरे पडून, अपूर्ण ज्ञान मिळते....४
आयुष्य तुमचे थोडे असूनी, काळ वेळीच जाणावा
मिळेल जो क्षण तुमचे हातीं, प्रभूसाठी तो असावा....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
October 1, 2018
एक ती झोप स्वप्न बघत राही
शिणवून शरीर ताप जीवास सुख देई
स्वप्न जाई विसरुन जाग येता मनां
जागे मन स्वप्नांत भासवी वेगळेपणा
एकाच मनाच्या दिसे ह्या दोन भुमिका
भिन्नता त्यांत भासे जाऊन दोन टोकां
स्वप्न आणि जागेपण देहाच्या दोन स्थिती
नाण्याच्या बाजू दोन एकमेका न मिळती
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmain.com
January 11, 2019
जाग येता पहिल्या प्रहरी
हळुवार डोळे उघडावे... १
मग पाहून हातांकडे
कुलदेवतेला स्मरावे... २
अंथरुणातून उठताक्षणी
धरतीला नमावे... ३
ध्यानस्थ होऊ भगवंताला
आठवावे... ४
सर्व आन्हिके झाल्यावर
देवाचरणी बसावे... ५
काही न मागता
त्यालाच सर्व अर्पावे... ६
घरांतून निघता बाहेर
आई वडिलांना नमावे... ७
येतो असा निरोप घेऊन
मगच घर सोडावे... ८
क्षणभर दाराबाहेर थांबून
वास्तूला स्मरावे... ९
समाधानाचे भाव आणून
मगच मार्गस्थ व्हावे... १०
चेहऱ्यावर स्मित हास्य
नेहमी बाळगून चालावे..११
येणाऱ्या जाणाऱ्यांकडे
आनंदाने पहावे... १२
जगात खूप भांडण तंटे
आपण शांत राहावे... १३
सतत तोंडात मध आणि
मस्तकी बर्फ धरावे... १४
जीवन हे मर्त्य आहे
नेहमी लक्षात असावे... १५
प्रत्येक क्षण हेच जीवन
हेच मनी ठसवावे... १६
सत्याने वागून नेहमी
जीवन आपुले जगावे... १७
September 19, 2017
हवाच मजला तोच चंद्रमा
तेच नभी चांदणें
गतकाळाच्या आठवणी शिकवती आनंदातील जगणें ।।धृ।।
आजीसंगे गच्चीवरती
फुलराण्यांच्या कथा ऐकती
बसुनी सारे एक वर्तुळी, टाळ्या पिटूनी गाती गाणें ।।१।।
गतकाळाच्या आठवणी शिकवती, आनंदातील जगणें
फुलले होते यौवन सारे
अंगी झोंबे शितल वारे
पुनव चांदणे धुंदी आणी, बघूनी तारांगणे ।।२।।
गतकाळाच्या आठवणी शिकवती, आनंदातील जगणें
सगे सोयरे मित्रमंडळी
परसदारी तुळशीजवळी
गप्पा टप्पा विनोंद बौधिके, रात्र घालवी करुनी भजने ।।३।।
गतकाळाच्या आठवणी शिकवती, आनंदातील जगणें
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४९७९८५०
October 21, 2019
असले जरी शिक्षण बेताचे
वागलो नाही कधी विचित्र,
चाळीतील मध्यमवर्गी आम्हीं
राहत होतो एकत्र !
चाळीने आम्हांला शिकविले
भेदभाव विसरायला,
प्रसंग कोणावर बिकट आला
शिकविले प्रथम मदत करायला !
चाळीत कॉमन नळाला
पहाटे पाचला पाणी,
सातवाजता पाणी गेल्यावर
मिळणार नाही थेंब पाणी !
ब्रशने दात घासता घासता
भरभर प्रातर्विधी उरकायचे,
दुधासाठी सेंटरवर धावायचे
मध्येच घुसून दुध आणायचे !
पाण्यासाठी सगळ्यांची लगबग
सकाळी भांडणं कायमची,
पाणी जायच्या आत
सगळी आन्हिके उरकायची !
चाळीतील कॉमन नळाने
शिस्त लावली लौकर उठायची
पाण्याची काटकसर करण्याची
पाणी जपून वापरायची !
थंडीचे दिवस म्हणून
उठलो नाही लौकर,
शाळेला उशीर होईल
म्हणून अंघोळी केली भरभर !
देवापुढे जोडून हात
घाईघाईत नाष्टा केला,
पँटीत शर्ट कोंबून
शाळेचा रास्त घराला !
आदल्या दिवशी विसरलो
दप्तरात पुस्तके भरायला,
पहिला तास गणिताचा
भलताच भारी पडला !
येउदे प्रसंग कोणावर काही
एकजुटीने लढणारच,
आमची चाळ आहे म्हंटल्यावर
त्यात वाचाळ काही असणारच !
चाळीतल्या गमतीजमती वेगळ्या
फॅल्याट सिस्टीम मध्ये कुठे दिसायला !
भांडलो जरी किती तरी
शेजारी येती सोडवायला !
-- जगदीश पटवर्धन
January 13, 2017
आपापल्या महालात
तुम्ही सर्वेसर्वा असता,
मग तुम्ही पेशवे असा किंवा हुजरे
सरदार असा किंवा शिलेदार.
बाहेर पडल्यावर मात्र
तुम्ही बनता
जगातील कुणीतरी,
लहानमोठे.
कुणापुढे तरी
तुम्हाला
झुकावं लागतं .
पण ,
आणखी कुणाला तरी
तुम्ही
स्वत:पुढे वाकायला लावता .
आणि त्यामुळे ,
फक्त त्यामुळेच ,
तुम्ही
मोठे मोठे
बनत जाता -
डोंगराएवढे
पर्वताएवढे .
पण ,
तें मोठेपण
केवळ दरबारातच असतं
केवळ देवडीवरच रहातं .
रणशिंग फुंकलं जातं
आणि
तलवारी भाले उंचावून
सारेजण
स्वत:ला
लढाईच्या धुमश्चक्रीत
झोकून देतात
तेव्हां ,
शिलेदार काय
अन् पेशवा काय
सारे सारखेच असतात .
पानपतावर
एखादा बारगीर पडतो
तसाच
एखादा विश्वासरावही पडतो,
कुणाची तरी
निनावी गोळी लागून .
एखादा भाऊ सापडतो
दुश्मनांच्या भाऊगर्दीत,
आणि धराशायी होतो
कुणा अनामिकाच्या
तलवारीच्या फटकाऱ्यानं .
रणधुमाळीत
नसतात शिलेदार , नसतात पेशवे,
नसतात हुद्दे , नसतात नावें ;
असतात फक्त -
पेशवे आणि हुजरे यांना
एकाच पातळीवर आणून सोडणारी
अस्ताव्यस्त पडलेली शवें .
बस्स .
हेंच एक चिरंतन सत्य आहे ,
आणि हेंच आपण
ध्यानीं ठेवायला हवें,
यशाची उत्तुंग शिखरें चढतांना ,
जीवनाच्या पानपतावर
प्राणपणानें लढतांना ,
आणि ,
हिरवा चुडा फोडून टाकून
धाय मोकलून रडतांना देखील .
-- सुभाष स. नाईक, सांताक्रुझ, मुंबई .
May 19, 2016
पाण्याच्या बिकट परिस्थितीचे वर्णन करण्याचा एक अपूरा प्रयत्न….
February 10, 2011
असतिल तेथे जिकडे तिकडे
विखरुनि पडली फुले
असतिल पक्षी झाडावरती
गोड गात बेसले
असेल तेथे वहात सुंदर
दुधासारखी नदी
असतिल डोलत हिरवी पिवळी
कमळे पाण्यामधी
घरे तेथली सुरेख असतिल
चमकत सोन्यापरी
आत लाविल्या असतिल
रंगी बेरंगी तसबिरी
झगमग झगमग करीत असतिल
तिथले सुंदर दिवे
विझतहि नसतिल ते वाऱ्याने,
जणु दुसरे काजवे
रोजच जत्रा भरत असावी
तिथे नदीच्या तटी
असतिल खाऊ देत घेऊनि
पैसे दाटुमुटी
पंख लावुनि हिंडत असतिल
वरती तिथली मुले
असतिल चालत ढगावरुनहि
टाकित हळु पावले
असतिल भारी रंगित कपडे
बाळांचे तेथल्या
शिवले असतिल शेवंतीच्या
गुंफुनिया पाकळ्या
खूप दागिने असतिल त्यांनी
अंगावर घातले
पुन्हा काढुनि नसतिल कधीही
पेटीमधि ठेवले
मनास माने तितुके भटकत
असतिल मेघांवर
स्वर्ग असा हा बघावयाला
मिळेल का लोकर
June 11, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti