-- स्वाती ठोंबरे.
November 25, 2021
सांज क्षितीजी थबकता
रंगले आभाळ भावनांचे
शिंपण, अंतरी अमृताचे
मनी भास ते अमरत्वाचे...
उजळलेली तिन्हीसांजा
आविष्कार, कृतार्थतेचे
जरी ही गात्रे पांगुळलेली
शांत मनात भाव मुक्तीचे...
जीव ! स्मृतीत गुंतलेला
नाद अंतरी टाळमृदुंगाचे
मन, सारे विठ्ठल विठ्ठल
संकीर्तनी सत्य शाश्वताचे...
यावीण दूजे सुख कोणते
अहोभाग्य जन्मोजन्मिचे
तोच सावळा एक कृपाळू
अंतरंगी सुर मुग्ध पावरीचे...
–वि.ग.सातपुते (भावकवी )
9766544908
रचना क्र. २०५
१७/८/२०२२
September 18, 2022
वाऱ्यावर झोके घेत,केस उडती धुंद हवेत
क्रिडतात जणू पवणाशी ते बटांचे क्रीडादूत
अदेत मद्य-मादकता लोचनात धुंद संकेत
ते मधुर लालस्य अन हास्य काय करी अभिप्रेत
उत्फुल देहावरी स्थिरावले अनामिक नेत्र
व्याकुळ कधीचे, झाले तृप्त गात्र नि गात्र
लेखणीतून परी कागदावर झिरपली प्रीत
मजबुरीने अन राहिले गीत मात्र ओठात
- महेश सूर्यवंशी
( पुणे,सासवड)
August 21, 2018
तू माझाच
श्वास तुच
ध्यास तुच
आस तुच
तू माझाच
आहे राम
घनश्याम
स्वप्नी शाम
तू माझाच
प्रियकर
युगे युगे
हा गिरधर
तू माझाच
गोकुळीचा
कृष्णसखा
मुरळीचा
तू माझाच
भेटतोस
वृंदावनी
रमतोस
तू माझाच
मी तुझीच
अलगुज
ही माझीच
अलगुज
ही माझीच
-- सौ. माणिक (रुबी)
नाशिक
December 6, 2019
उत्कट आषाढ ही प्रेम कविता आपल्यासाठी सादर करीत आहे. ही short poem असली तरी त्यातला अर्थ रसिकांना पूर्ण आस्वाद देईल एवढी सार्थ अपेक्षा....
कविता आवडल्यास like करा....नाही आवडल्यास dislike करा...सादरीकरण आणखी सुधारण्यास कृपया आपले मत अवश्य comment box मध्ये लिहा...आणि 'माझी डायरी' चॅनलला अवश्य Subscribe करा.
https://youtu.be/UNnDVjIFG3Y
June 23, 2018
घड्याळ होते भिंतीवरती
टिक टिक करुन चाले
सतत दिसली चाल काट्यांची
एकाच दिशेने हाले
धावत होता एक तुरु तरु
दुजा हळूच धांवे
छोटा जाड्या मंद असून
पळणे ना ठावे
पळत असती पुढे पुढे
समज देती काळ-वेळेचा
किती राहील शिलकीमध्ये
प्रवास आपुला जीवनाचा
जीवन चक्रापरि फिरती
घड्याळ्यामधले सारे काटे
जाणीव करुन देती सतत
आपण कोठे अन् जीवन कोठे
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
February 28, 2020
December 3, 2021
सुख हे मृगजळ, फसविते सर्वांला
खेळ चालतो त्याचे, चकविणे मनाला ...१,
बाह्य वस्तूंचे सुख, क्षणिक ते असते,
मोहून जाता सर्व, लक्ष्य तेच वेधते...२,
खरे सुख अंतरी, परि शोधी बाहेरी,
चुकीचा हा हिशोब, निराशा मग करी...३,
अंतरातील सुख, नितांत ते असते
एकाच अनुभवाने, जग विसरविते...४
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 1, 2019
जीवनांतले चित्र पालटूनी, रंग ते बदलले
जनी जनार्दन ठरविले, सारे काय मिळविले ।१।
सुंदर तसबीर एक आणली, देवी श्री लक्ष्मीची
श्रद्धेचे भाव गुंतविले, पूजा करूनी तिची ।२।
शिक्षण घेवूनी ज्ञान मिळविले, कष्टानें सारे
शरीर होते चैतन्यमय, आणि धडपडणारे ।३।
रंग बधितले जीवनांतील, विविध छटांचे
सजविण्यास लागते त्या छटांना, बळ संपत्तीचे ।४।
ज्ञान आणि प्रयत्न जेव्हां, एक ठिकाणी असे
प्रसन्न करण्या धन लक्ष्मीला, अडचण येत नसे ।५।
शक्ति, युक्ति, बुद्धी एकटवूनी, परिश्रम केले
धनराशीचे अल्प भांडार, त्याने जमविले ।६।
तेज चमकले त्याच्या जीवनीं, धन लक्ष्मीचे
समजूं लागला फार सुखी, क्षण कर्तृत्वाचे ।७।
माहीत नव्हते लक्ष्मी असते, चंचल स्वभावी
केव्हां येईल जाईल कशी, भंरवसा तो नाहीं ।८।
चालत असतो खेळ नियतीचा, गमतीनें सदा
कुणाचे फांस कसे पडतील, कळेना अनेकदां ।९।
कमाईस त्याच्या ओहोटी लागली, व्यवहारामध्यें ती
प्रयत्न सारे फोल ठरूनी, अपयश येती ।१०।
निराश बनले जीवन सारे, अंध:कार झाला
दु:खाच्या त्या चटक्यामध्यें, जीव होरपळला ।११।
मार्ग बदलले पूर्ण तयानें, आपल्या जीवनाचे
धन कमविणें लक्ष नव्हते, त्याच्या प्रयत्नांचे ।१२।
वाचन करूनी चिंतन केले, मन रमविण्या चित्ताला
ध्यान साधना देवूं लागली, आनंद त्याला ।१३।
विसरूनी गेला हलके हलके, दु:ख निर्धनतेचे
काव्य लेखनानें उघडले द्वार, नव जीवनाचे ।१४।
चकीत झाला एके दिवशीं, बघूनी तसबिरीला
श्री लक्ष्मीचे ठिकाणी सरस्वतीचा, बदल कुणी केला ? ।१५।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 2, 2019
जो जो येईल पाया खालती, तुडविला जातो त्याचक्षणी
कुणी मरावे अथवा जगावे, सारे प्रभूवर अवलंबूनी....१,
भक्ष्य शोधण्या किटक चाले, तसाच फिरतो प्राणी देखील
जगण्यासाठी फिरत असता, मृत्यूची येते त्याला चाहूल...२,
चालत असतो काळ सदैव, दाही दिशांनी घिरट्या घालीत
झडप घाली अचानक तो, जो जो येई त्याच्या टापूत...३,
जरी दिसे मारक कुणीतरी, करवूनी घेतो काळच सारे
विश्वाचा खेळ खेळविण्या, जन्म-मृत्यूचे चक्र फिरे....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
October 19, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti