(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • किती रंग या जीवनी पहावे

    किती रंग या जीवनी पहावे, कितीदा पुन्हा नव्याने जगावे,
    रोज रोज नवीन ताजे,
    दुःख जिवापाड सोसावे,--!!

    ठरवलेले नेहमी चुकते,
    विपरीत काही घडते,
    अगणित अपेक्षांचे ओझे,
    इवल्या हृदयाने पेलावे,-?

    जे विधायक, ते दूर राहते,
    नकारात्मक ते सारे घडते,
    आपल्याच जिवाचा बळी
    रोज नव्याने पहावे लागते,-!!

    मदतीचा हात करता पुढे,
    आरोपांना पेंव फुटते ,
    आंधळ्या निर्जन आयुष्याला ,
    रानावनीची वाट दिसते,--!!

    कुणाला आपले म्हणावे,
    मन एक ठरवून ठेवते,
    बघता बघताअगदी सारे,
    कुठेतरी बिनसलेले असते,--!!!

    गैरसमजांची तुफान वादळे,
    अवती भोवती घोंघावती ,
    अलगद घास टिपण्या,
    सभोवार तांडव करिती,-!!

    शांतता करुणा प्रेम
    सहकाराच्या सर्व भावना,
    का हरत राहती सारख्या,--
    मग जीवन कसे असावे क्षेम,-?

    हिमगौरी कर्वे.©

      May 29, 2019


  • पुण्याचा साठा

    खिशांत माझ्या पडली होती, सुटी नाणी काही

    वस्तूंची ती खरेदी करण्या, सर्व बाजार पाही....१,

    सराफ्याच्या दुकानी दिसला, एक हिऱ्याचा हार

    डोळे माझे चमकूनी गेले, फिरती गरगर...२,

    दाम विक्रीचे जाणूनी घेता, हताश मी झालो

    हातातील धनाचे मोजमाप, करू मी न शकलो...३

    दोन वेळची पूजा करूनी, जप माळ जपती

    खूप साचले पुण्य आपले, हे कांहीं समजती....४,

    कसा मिळेल ईश्वर त्यांना, तपोबलाच्या अभावी

    जन्मोजन्मीचे पुण्य साचता, दर्शन मिळे प्रभावी....५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      August 22, 2019


  • एक मालवणी कविता !!!

    चिंचो, आवळे, काजू आणि गरे,
    कोकणी माणूस लय लय बरे....

    शिवीगाळये घालतत खरे,
    मनांत त्यांच्या काय नाय बरे.....

    करवंदा खावची तर कोकणात
    जावचा,
    डोंगरातून फिरतांना, मजा लय
    गावता....

    नदी किनारी झाडा बघा
    नारळाची,
    पाणी पिता तेतूरला, स्वर्गच
    गावता.....

    हिरवी हिरवी गार आंब्याची
    तोरा,
    काजीचो रंग बघा लाली लाल
    जरा....

    जांभळाचो रंग जांभळो सगळ्यांका
    ठाऊक हा,
    पण डायाबिटीसवाल्यांका मात्र
    लय लय भावता......

    कापो आणि बरको, हे फणसाचे
    प्रकार,
    प्वॉटभर खाल्ल्यार वाढता
    पोटाचो आकार.....

    होडयेतून फिरतांना म्हणता,
    वल्हव रे नाखवा,
    मुंबईचो चाकरमानी इलो, त्येका
    कोकण दाखवा........इति
    -- मयुर तोंडवळकर.

      March 8, 2015


  • परदेश

    रुक्या टक्यात मोजावा
    तो काळ आता सरला
    डोलरात बाळ सांगे
    किती रुबाबे मजला
    आमी येडे नि बावळे
    करे त्याचा फुगीर आकडा
    रुपयात किती भेटे
    याचा हिशेब हा एवढा...
    तरी वाटे बरे आहे
    माझा लेक परदेशात
    सांगतो मी अभिमाने
    नाणं खणखणीत माझं
    पण खरं सांगू वाटे
    इथे हवे रे कुणी बाळा
    पैसा कामी येतं नाही
    पुरे क्षण तो जिव्हाळा
    तू लाख जरी बोलवे
    ही माती सांगे नाळ
    पाय अडकून राही
    उंबऱ्यात काही काळ
    आता सोड तुही हेका
    तू तिथे मी इथे आहे बरा
    उगा दोष देत नाही
    माझ्या गुणाच्या तू लेका
    कधी वाटे पुन्हा यावे
    परतुनी माय देशी
    एक ओंजळ वाहाशी
    आई बा च्या स्मृतीपाशी!!
    -- वर्षा कदम.

      May 2, 2022


  • हास ग घुमा कशी मी हसू

    या गावचा त्या गावचा पाहुणा नाही आला
    आमरस पुरीचा बेत नाही झाला
    कशी मी हसू
    या गावची त्या गावची लेक नाही आली
    साडी चोळी नाही केली
    कशी मी हसू
    या गावची त्या गावची सून नाही आली
    वाळवणंच नाही झाली
    कशी मी हसू
    याच गावाची मैत्रीण नाही आली
    पार्टी नाही झाली
    कशी मी हसू
    इथे तिथे नाही गेले पैसे खूप उरले
    आता काय करु त्याचे
    कशी मी हसू
    मेसेज कमेंट्स नाही आले रुसून बसले
    कुणाला आता सांगू
    कशी मी हसू
    या गावचे हे गेले त्या गावचे ते गेले
    तरीही रडू नाही आले
    तरिही म्हणतात सगळे
    हास ग घुमा कशी मी हसू
    धन्यवाद.
    -- सौ. कुमुद ढवळेकर

      February 15, 2022


  • वचन

    वाणी मधूनी शब्द निघाला, कदर त्याची करीत होते ।
    मुखावाटे बाहेर पडे जे, वचन त्याला समजत होते ।।
    दिले वचन पालन करण्या, सर्वस्व पणाला लावीत होते ।
    प्राणाची लावून बाजी, किंमत शब्दांची करीत होते ।।
    स्वप्नामध्ये दिले वचन, हरिश्चंद्र ते पालन करी ।
    राज्य गमवूनी सारे आपले, स्मशानी बनला डोंबकरी ।।
    प्राण आहूती देई दशरथ, वनी धाडूनी राम प्रभूला ।
    पालन केले तेच वचन, रणांगणी दिले जे कैकयीला ।।
    आज लोपूनी तेज वाणीचे, तुटले विश्वासाचे नाते ।
    बदलूनी जाती क्षणात सारे, घटकेपूर्वीचे शब्द जे होते ।।
    मित्र वा आप्त कुणी, आई-बाप वा भाऊ-बहीण ।
    स्वार्थीभाव अंगी मुरूनी, पाळीत नाही आपले वचन ।।
    अंतर्यामी बसला ईश्वर, जाण त्याची सदैव असावी ।
    ‘वचन’रूपे व्यक्त होई , हीच भावना मनी ठसावी ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      January 20, 2016


  • जीवन प्रभूमय

    जीवन काय आहे मला जे वाटत असे

    ते समजून घ्या तुम्हीं प्रभूमय ते कसे ....१

    मृत्यूचा तो विचार कधी न येई मनी

    मृत्यू आहे निश्चित माहीत हे असूनी...२

    भीती आम्हां देहाची कारण ते नाशवंत

    न वाटे मरूत आम्ही आत्मा असूनी भगवंत....३

    आत्मा आहेची अमर मरणाची नसे भीती

    जी भीती वाटते ती देहाची असती....४

    आत्मा नसे कुणी तो तर प्रभूच आहे

    साकारलेला सर्वत्र बाहेर व अंतरी राहे...५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      November 26, 2017


  • उगडा

      April 16, 2012


  • गरिबाघरचा पाऊस

    पावसात नेहमीच
    शोधू नका प्रेमाची हवा
    कधी वळून माज्या गळक्या
    छताकडेही पहा
    टपटप गळतंय आभाळ
    लावू कुठं कुठं ढिगळं,
    घर वाहतंय हो माझं जरा पहा
    यावेळी डांबर, सिमेंट कि ताडपत्री
    कसं नि काय परवडलं
    कि घेऊन जाईल समदं
    ही वादळी हवा
    भांड्यानी भरलं घर,
    ओघळ वाहती जागोजागी
    कशापायी येतो पाऊस
    सालाची बेगमी होई माती
    दरसाली असं होत
    पावसानी डोळ्यात पाणी येतं
    पावसाचा आनंद लोकं घेता
    मनातलं आभाळ वाहून जातं!!
    -- वर्षा कदम.

      November 8, 2021


  • योग्यतेनुसार यश

    उंचावून झेप, नको घेवू उडी

    खोल आहे दरी, पाय तुझा मोडी...१

    अंदाज घे तूं, खोलीचा प्रथम

    यश येई तुला, तया मध्यें ठाम...२

    अनुमान काढ, आपल्या शक्तीचे

    झेपेल का तें, विचार युक्तीचे...३

    निर्णय घ्यावेस, सदा विचारांनी

    निराश न होई, त्यामध्ये कुणी....४

    जाणून घे तूं, स्वत:ची पात्रता

    यश असे पाठी, ज्याची जी योग्यता...५

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      January 19, 2019