कवितेचा कवी
कविते
आहेस प्राण तू
या वेडया कविचा
कवितेविणा
चालेल कसा श्वास
या वेडया कविचा
कवितेसाठीच
आहे देह जगी
या वेडया कविचा
कवितेमुळेच
होतो कवितेचा कवी
म्ह्णोनी सन्मान कविचा !
© कवी – निलेश बामणे ( एन.डी. )
August 10, 2013
(आमच्या झोपायच्या खोलीच्या खिडकी समोर उंबराचे झाड आहे. त्यावर चिमण्या राहतात. पहाटे साडेचार पाच वाजल्यापासून त्यांची चिवचिव चालू होते. जाग आल्यावर वाटते झाडच जणू गात आहे. हे गाणे दोन-तीन तास चालू असते.)
उंबराच्या झाडाच्या गाण्याने
पहाटे जाग येते तेव्हा वाटते
जणू कोणी नर्तक
पायात बांधून घुंगरांचा साज
करतोय सुंदर पदन्यास
उंबराच्या झाडात म्हणे असतो
सद्गुरूंचा वावर
म्हणूनच काही चिमणी पाखरं
पहाटेच सुरू करतात
मधुर मंत्रजागर?
असेलही खरे
म्हणूनच म्हणतात का बरे?
चराचर सृष्टीतच
भरला आहे ईश्वर?
पहाटेच्या मंगल वेळी
गोड किलबिल मंजुळ वाणी
गाणारे झाड
अलौकिकाचा स्पर्श!
किमयागार तो
सृष्टीचा इश
जोडूनी दोन्ही कर
त्याला करू वंदन!
-- विनायक अत्रे.
July 14, 2022
खेळत होता बाळ अंगणीं इकडूनी तिकडे
मेघनृत्य ते बघत असतां दृष्टी लागे नभाकडे
उलटी सुलटी कशी पाऊले घनांची पडत होती
लय लागून हास्य चमकले त्याच्या मुखावरती
तोच अचानक गडगडाट झाला एक नभांत
दचकून गेले बाळ तत्क्षणी होऊन भयभीत
धावत जावून घरामध्यें आईला बिलगले
वाचविण्या त्या भीतीपासून पदराखालीं दडले
जरी थांबला गडगडाट भीती कायम होती
आवाजाचे नाद अद्यपि कानीं त्याच्या घुमती
भीतीने नजिक चिकटला आईच्या जवळीं
धडकन ऐकूं आली त्याला पुनरपि त्यावेळीं
गडगड धडधड आवाजाचा धसका घेवूनी मनीं
तोंड लपविले हळूंच जाऊन गादीमध्यें त्यानी
पिच्छा न सोडी आवाज अजूनी बसली ज्याची भिती
श्वास वाढूनी, स्वह्रदयाची धडकन होती ती
तगमग बघूनी बाळाची ती थोपटे मांडीवर आई
निद्रेच्या तो अधीन झाला ऐकून मधूर अंगाई
-- डॉ. भगवान केशवराव नागापूरकर
९००४०७९८५०
December 18, 2011
ज्याचे चिंतन आम्ही करतो
तोच 'शिव' चिंतन करतो
स्वानुभवे चिंतन करुनी
चिंतनशक्ति दाखवितो
जीवनाचे सारे सार्थक
लपले असते चिंतनात
चिंतन करुनी ईश्वराचे
त्यांच्यात एकरुप होण्यात
सारे ब्रह्मांड तोच असूनी
अंश रुपाने आम्ही असतो
जेव्हां विसरे बाह्य जगाला
तेव्हांच तयांत सामावतो
चिंतन असे निश्चीत मार्ग
प्रभूजवळ तो जाण्याचा
लय लागूनी ध्यान लागतां
ईश्वरमय होण्याचा
डॉ. भगवान नागापूरकर
९००५०७९८५०
e-mail – bknagapurkar@gmail.com
-- डॉ. भगवान केशवराव नागापूरकर
September 10, 2013
दिल्लीचा वारा
विषाहून विखार
जणू यमाचा पाश.
काळ्या-कुट्ट स्मागात
दिसला यमाचा चेहरा
कासावीस झाला प्राण.
November 15, 2018
रेशमाच्या लडीसारखे, नात्याचे पदर,
प्रत्येक नात्याचा वेगळा आदर
आईच्या गर्भात नात्याची रुजवात,
जन्माला आल्यावर गुंफायला सुरुवात
भावनांच्या धाग्यात गुंफली जातात नाती,
नात्यांच्या गोफात, ऋणानुबंधाच्या गाठी
आयुष्याच्या प्रत्येक, वळणावर एकेक
नात नव जुळत असतं,
जन्मभराच्या प्रवासात, ते आपली सोबत करतं
म्हणून तळहाताच्या फोडासारख,
जपाव लागत नात,
अन् कळीसारख अलवार,
फुलवाव ते लागत
नात्यामध्ये श्रेष्ठ, माणूसकीच नातं,
गरीब- श्रीमंत, जात-धर्म, बंधन त्याला नसतं
सरणावरती जळतो,
तरी जळत नसत नातं,
नावासारख मागे उरत
तेच खर नातं, तेच खर नातं
-- सौ. अलका वढावकर
January 12, 2016
कृष्ण कमळ-
..
January 25, 2014
मनी घोंगावते मोहोळ स्मृतींचे
जेंव्हापासूनी मज कळु लागले
मनहृदयी! ती सारीच ऋतुचक्रे
आज सारे सारे, आठवू लागले।।
वात्सल्य,प्रीत,मैत्र, सखेसोयरे
पुन्हा, या जीवा खुणावू लागले
क्षण सारे सारे, हृदयी कोरलेले
गुज अंतरी, आजला उकललेले।।
सुख, दुःख, आंनद, जिव्हाळा
भोग सारेच, जे प्राक्तनी लाभले
बंद पापण्यातुनी, सारे तरळलेले
अव्यक्त मनीचे, आज सांडलेले।।
रुजले, फुलले, गंधाळले जीवन
असाध्य, ते सारे दैवयोगे लाभले
खेळलो, बागडलो, मोठे झालो
वाटते, व्हावे ऋणातूनी मोकळे।।
-- वि ग सातपुते(भावकवी)
9766544909
रचना क्र ४२.
१० - २ - २०२२
February 26, 2022
आली मांगल्याची दीपदिवाळी
सुखसौख्याला सजवित आली
उत्सवांचा राजा, सण दिवाळी
दीपोत्सवी आत्मरंगी रंगरंगली...
स्वर्ग जणु अवनीवरी अवतरला
जणु वसुंधराच तारांगण जाहली
दिव्यत्वाचे, प्रकाशपर्व उधळीत
अमंगळ सारित मांगल्या आली...
सोहळा दीपोत्सवाचा ब्रह्मानंदी
अंगणी संस्कारांची सडारांगोळी
तेजाळीत वात्सल्यतेची नीरांजने
दीपोत्सवी पावित्र्य रुजवित आली...
वसूबारस,धनतेरस,नरकचतुर्दशी
बलिप्रतिपदा,भाऊबीज बंधुत्वाची
पंचदिनी, दीपोत्सवी ही दीपावली
चैतन्या! सजवित मढ़वित आली...
वि.ग.सातपुते.( भावकवी )
( 976654908 )
रचना क्र. २७०
२४/१०/२०२२
October 30, 2022
शब्दातुनी उमललो
शब्दासंगे रांगलो
खेळलो बागडलो
शब्दातुनी नाहलो...
स्पर्शता शब्दभावनां
अंतरातुनी दंगदंगलो
शब्दाशब्दांचा अर्थ
उलगडित राहिलो..
शब्दांचेच ब्रह्मांड
मी वेचित राहिलो
गुच्छय संवेदनांचे
मी माळीत राहिलो...
शब्दशब्द संजीवनी
प्रीतवात्सल्य प्राशिलो
भावशब्दात पावित्र्य
निष्पाप व्यक्त जाहलो...
जाणुनी शब्दार्थ सारे
अंतर्मुख होत राहिलो
शब्द कृतार्थी, सांत्वनी
गीतात गुंफित राहिलो...
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २८५
४/११/२०२२
November 14, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti