(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गरज

    शब्द उमजावेत, लागू नयेत हे खूप गरजेचं आहे.
    संबंध संभाळावे, मनं सांभाळावीत हे खूप गरजेचे आहे.
    कितीही पुढे निघून गेलो तरी वेळ असेपर्यंत
    परतून येणे हे खूप गरजेचे आहे.

      July 14, 2023


  • तर व्यर्थच ना

    तीला जर तुमच्या बोलण्याचा अर्थच नसेल कळत,
    तर शब्द उधळण्यात काय अर्थ ?
    ओठांवर येणारी प्रत्येक भावना,
    तिच्या मनापर्यंत पोहोचतच नसेल तर सगळं व्यर्थच ना?

    ती जर समजूनही न समजल्यासारखी वागते,
    खरे ऐकण्याऐवजी मौनाची भिंत उभी करते,
    तर समजावण्याचा आटापिटा कशाला?
    जेथे जाणीवच नाही, तेथे प्रयत्न तरी कशाला?

    शब्द थकतात, आशा झिजते,
    संवाद हळूहळू हरवून जातो,
    आणि उरते ती फक्त शांतता.
    जिथे समज नाही, तिथे बोलणं ही थांबते.

    म्हणूनच कधी कधी मौन स्वीकारलेलं बरं,
    ते किमान खोटं नसतं,
    कारण न समजणाऱ्या मनासाठी
    सर्वात ठळक उत्तर म्हणजेच शांतताच असते.

    •ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे

      July 4, 2026


  • भिकारीण

    मधूर आवाज मिळूनी,
    उपकार झाले तिजवर,
    सुंदर गाणे गाऊनी,
    आनंदीत करी इतर ।।१।।

    हातपाय दुबळे होते,
    दृष्टी नव्हती तिजला,
    कष्ट करण्या शक्ति नव्हती,
    कसा मिळेल घास तिला ।।२।।

    परि ती होती आनंदी,
    गाण्याच्या ओघांत,
    उचलित होती पैसे,
    पडता तिच्या पदरांत ।।३।।

    जरी झाला देह दुर्बल,
    जगण्याची होती आंस मनी,
    मिळालेल्या आवाजाला,
    समजे ती ऋणी ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      March 11, 2016


  • परावलंबी

    जीवन हर घडिला अवलंबूनी तू, आहे दूजावरी

    व्यर्थ मग कां अभिमान, बाळगतोस उरी

    नऊ मास होता गर्भामध्यें, जेंव्हा आईच्या

    शोषण केले अन्न सारे, रक्तामधूनी तीच्या

    माता पित्याच्या कष्टाचा तो, घाम गळत होता

    तुझे बालपण फुलविण्या, ओलावा देत होता

    घर गृहस्थीचे सुख भोवतीं, पत्नी मुला पासूनी

    समाधान ते मिळतां तुजला, गेला बहरुनी

    वृद्धत्वाला काठी लागतें, स्थिरावण्या तोल सदा

    हातभार तो देईल कुणी, विवंचना हीच अनेकदा

    मृतदेह जर तसाच पडला, किडे मुंग्या खाती

    त्याही क्षणी मदत लाभूनी, चिता-अग्नी देती

    जन्मापासूनी मृत्युपर्यंत, परावलंबी जीवन

    कुणी तरी दिले तुजसाठीं, हे घे जाणून

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    ४७४- २००४८५

      December 31, 2019


  • स्वातंत्र्य

    व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली मंदाकिनी पाटील यांची हि कविता

      December 8, 2023


  • तन्मयतेत’ आनंद – प्रभू

    सतत गुंतलो आहो सारे
    शोध घेण्यास त्या 'आनंदाला'
    युगानूयुगे प्रयत्न होतो
    मिळवण्यासाठींच प्रभूला...१

    बाह्य जगाचे सुख आगळे
    लागले सारे त्याच्या पाठीं
    'देह सुख' अंतीम वाटे,
    खरा 'आनंद' देण्यापोटी...२

    'ज्ञानामध्ये' भरला 'आनंद'
    समजूत झाली ही कांहींना
    लेखक, कवी, साहीत्यिक हे
    पाठ त्याची कांहीं सोडीना...३,

    साधू संत हे थोर महात्मे
    आनंद शोधूती 'विश्रमांत'
    'ध्यान' लावून एक मनानें
    शांत होवूनी डूबती त्यांत...४,

    आनंदची 'मोक्ष' असून
    ध्येय साऱ्यांचे त्याजकडे
    मार्ग सर्वांचे वेगळे असून
    'तन्मयता' खेची प्रभूकडे...५

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      February 27, 2019


  • आदिदेव श्री गणेशा !!

    महाबली बालेश अससी तूच दुरजा,
    महं महामती अंबिकेय श्री गणेशा,
    अवतरी सुरेख अंगमळी गौरीनंदन,
    शार्दुल मनोमया तुज साष्टांग वंदन...!!१!!

    ॠध्दी सिध्दी द्वि सुंदर पत्नी,
    पार्वती अलक्ष इष्ट जननी,
    पाश-परशु-अंकुश हे शस्त्र,
    आखूरथ वाहे, नेसे पितांबरी वस्त्र...!!२!!

    यशस्वीन तु, भासे हरिद्ररूपी,
    गोल लंबोदर, चतुर्भुज वाढवी किर्ती,
    अवनीश मोहक कनिष्ठ इशानपुत्र,
    शोभले पिता पुत्रासी नाव भालचंद्र...!!३!!

    शिवानंदन म्हणुनी रूप प्रकटले,
    वरद गजमुख, शुभ्र गजदन्त लाभले,
    अथर्व अवनेश आदिदेव जाहले,
    कवीश गणपती रूद्र प्रिय भावले...!!४!!

    -- कु. श्र्वेता काशिनाथ संकपाळ.
    (१४-०९-२०१९)

    (काही शब्दांचे अर्थ खालीलप्रमाणे :-

    बालेश :- दुष्टांचा नाश करणारा
    दुरजा :- ज्याचा कुणी विनाश करु शकत नाही असा
    महं : ईशाधिपती
    महामती :- बुध्दीची देवता
    अंबिकेय :- पर्वतावर निवास करणारे ईश्र्वर
    शार्दुल:- देवांचा महिपती
    मनोमया :- भक्तांचे ह्रदय जिंकणारा
    अलक्ष :- ईश्वर, देव
    इष्ट :- आवडती या अर्थाने
    आखूरथ :- मुषक (उंदिर) वाहन असलेला
    यशस्वीन:- आनंद आणि यश घेऊन येणारा ईश्वर
    हरिद्ररूपी :- सोनेरी त्वचा असलेला.
    चतुर्भुज:- चार हात असलेला.
    अवनीश:- सगळ्या जगावर राज्य करणारा.
    कनिष्ठ:- लहान
    इशानपुत्र:- शंकराचे नाव
    वरद :- तेजस्वी
    अथर्व:- सर्व अडथळे पार करणारा
    अवनेश :- धरतीचा अधिपती.
    आदिदेव:- ज्या देवतेची सर्वात आधी उपासना केली जाते असा
    कवीश :-श्री. गणेशाचे नाव.
    रूद्रप्रियं:- शिव प्रिय असा तो श्री गणेश ., ई.)

      September 19, 2019


  • असे जगावे, तसे जगावे

    असे जगावे, तसे जगावे,
    मला वाटते मुक्त जगावे,
    कधीही कुठले बंधन नसावे, ताणतणाव चिंता समस्या,
    अगदी त्यांना कोळून प्यावे,--!!!

    जीव टाकत स्वच्छंदाने,
    मुक्त विहरत मस्त रहावे, फुलपाखरू होऊन सगळे,
    जीवनाचे मर्म लुटावे,--!!!

    कधी कस्तुरी व्हावे वाटे,
    सुगंध फैलावण्या सारे,
    वाऱ्याने त्याचेच गान गावे,
    घेऊन जग तृप्त व्हावे,--!!!

    कधी वाटते डोंगरदरीत,
    हरणउड्या मारत हिंडावे,
    स्वैर आपुले आभाळचआपण, आपल्या हाते खाली आणावे,--!!!

    कधी वाटे गरुड व्हावे,
    ऐटदार पंख फैलावत,
    साऱ्या पृथेवर राज्य करावे,
    कधी वाटे कोकरू व्हावे,
    इकडून तिकडे उड्या मारत, पटकन कुणाच्या कुशीत शिरावे,--!

    कधी वाटे मधमाशी व्हावे, फुलांफुलातील मध चाखत, साठवण करत करत रहावे,
    कधी वाटते राजहंस व्हावे पाणियात डुंबत डुंबत,
    दिमाखाने झकास जगावे,--!!!

    नकोत सगळे प्रश्न हे,
    नकोशी ज्यांची उत्तरे,
    माणूसपण सोडून देऊन,
    थोडे जगून पहा बरे,--!!!

    हिमगौरी कर्वे.©

      August 16, 2019


  • गिरनार यात्रा (भाग – ४)

    काही तरी अद्भुत घडलंय अस वाटत होतं. कदाचित माझ्या ह्या भावना आईपर्यंत त्या आजू बाजूच्या तरल वातावरणाने पोहचवला असतील. आईला पहाटे पडलेल्या एका स्वप्नाने जाग आली.

      December 24, 2021


  • प्राण ज्योत

    दिवा होता छोटासा, एक मजकडे

    इन्धन मिळतां तेलाचे, प्रकाश तो पडे

    तळांत होती योजना, तेल सांठवण्याची

    शिरीं असूनी वात ती, क्रिया चाले जळण्याची

    छिद्र पडतां तळाला, व्यर्थ जाई इंधन

    मंदावली ज्योत दिव्याची, शक्ती ती जावूनी

    देह आहे दिव्यासारखा, चैतन्य तेज तयाचे

    प्रकाश फेकी आनंदाचा, इंधन मिळतां शक्तीचे

    केंद्रित होते देह उर्जा, नाभीच्या भोवतीं

    व्यय टाळून प्रवाही करा, तीच प्रभूवरती

    ऐहिक सुखाच्या जातां मार्गीं, गुरफटतो संसारीं

    तीच उर्जा प्राणास मिळतां, चेतवी ज्योत ईश्वरी

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      September 20, 2013