(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मनमंदिर….

    सावळा विठ्ठल माझ्या घरी आला.
    रखुमाबाई सवे गाभाऱ्यात विसावला...
    माझ्या माय बाईची पुण्याई फळा आली.
    जणु पंढरपूर अवघी माझ्या घरीच दुमदुमली...
    गोजिरे साजिरे ते रुप सुंदर मनोहर.
    पाहताच विसरून गेले हे भवसागर...
    तू आहेस अनाथांचा नाथ पंढरीनाथ.
    शरण आले तुला जोडोनिया दोन्ही हात..
    तुम्ही येता दोघेही घर झाले माझे पवित्र मंदिर.
    घरच नाही तर माझे मनही झाले पवित्र मंदिर..

    सौ कुमुद ढवळेकर

    (यंदा वारीला जातांना एका परिचितांना भेटायला गेलेल्या जवळ आम्हाला एक विठ्ठल रखुमाबाईची मूर्ती दिली आहे. आज एकादशीला ती देवघरात ठेवून पुजा केली आहे त्यामुळे मी जणू पंढरपुरात आहे असे वाटले होते.)

      February 13, 2023


  • जीव रंगला तुझ्यात

    संथ निळेशार पाणी
    लाट खोल उसळली...
    जीव रंगला तुझ्यात
    ओढ अशीही लागली...

    थेंब थेंब बरसला
    घन ओथंबून आज...
    शहारली काया पुन्हा
    सागराची आर्त गाज..

    देह तुझाच राहिला
    मनोमनी दाटे हर्ष..
    किरणांची सोनछाया
    जाणवितो तुझा स्पर्श..

    मनामध्ये उतरावी
    छाया आठवांची दाट...
    बरसून मेघ आला
    पुन्हा पाहण्यास वाट..

    प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
    हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.

    किंमत : रु.८०/-
    सवलत किंमत : रु.५०/-

    https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/

      July 22, 2026


  • ओळख मूल्यांकाची – मूलांक ४

    कशास्त्र ही भविष्य कथनाची एक स्वतंत्र शाखा मानली जाते.ज्योतिष शास्त्रानुसार, ज्या प्रमाणे राशींनुसार (Zodiac Signs) माणसाचा स्वभाव कळतो. त्याचप्रमाणे, अंक ज्योतिष (Ank Shastra) शास्त्रानुसार, व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन त्याचा स्वभाव ओळखला जातो. त्या व्यक्तीचा स्वभाव नेमका कसा, व्यक्तिमत्व तसेच, आवडीनिवडी ओळखल्या जातात.

      February 28, 2026


  • ये रे ये घना । तोषवी तना

    माझी ही रचना, पुणे आकाशवाणीकेंद्रावरून प्रसारित झाली आहे, तसेच माझ्या काव्यसंग्रहामध्ये प्रसिद्ध झाली आहे.

    ये रे ये घना | तोषवी तना |
    तुझी ही धरा | करी प्रार्थना || ध्रु ||

    हाय ! त्या ग्रिष्माने, केली रे होळी |
    पुरे पुरे आता, राख-रांगोळी |
    सुकल्या माझिया देहावरी,
    जल शिंपना | ये रे ये घना | ये रे ये घना .....|| १ ||

    व्याकुळ मी ही, तरु-वेलीही |
    आटले सारे, नद्या-नालेही |
    वाट पाहुनी, तुज हाकारी |
    तुझी मेघना | ये रे ये घना | ये रे ये घना . || २ ||

    तापल्या तनुला, तुझीच आंस |
    तुझिया स्पर्शाचा, ओला सुवास |
    अधिर, आतुर, मिलन क्षणाची |
    भूक भागवना | ये रे ये घना | ये रे ये घना ... || ३ ||

    तुझ्यावाचुनी, कोंब ना उगे |
    पक्षी पाखरे, कोण रे जगे ?
    कैसे विनवू ? तूची सांग ना |
    पुरवी कामना | ये रे ये घना | ये रे ये घना .. .|| ४ ||

    केव्हांची तुला , साद घालते |
    ये रे ये झणी, तुज झेलते |
    रिमझिम त्या, तालावरी |
    करी नर्तना | ये रे ये घना | ये रे ये घना.... || ५ ||

    सखया अंबरी, कां रे थांबला ?
    लपंडाव हा, फार लांबला |
    विरह, वेदना, सोसू मी कशी ?

    सोसे न यातना | ये रे ये घना | ये रे ये घना ..|| ६ ||
    क्षमावंत तू, क्षमाशील तू |
    हाकेला देवा, धावशील तू |
    चुकला मानव, तो ही आळवी |
    हे दयाघना | ये रे ये घना | ये रे ये घना....... || ७ ||

    -- कवी : उपेंद्र चिंचोरे

      June 10, 2016


  • तारकांचे पुंज माळून

    तारकांचे पुंज माळून, वाटते तुझ्या कवेत यावे,
    दुःखांच्या आभाळीही,
    मुक्त बघ जरा हिंडावे,--!!!

    घायाळ जीव तो आंत आंत,
    तो कोणा कसा कळावा,-? आत्म्यानेच आत्म्याला,
    दिलासा कसा कुशीत द्यावा,--!!

    ओढ नसावी शरीरातून,
    असावी प्रीत मनामनांची,
    धागे एकमेकांत गुंफत,
    वीण गुंतावी काळजांची,--!!!

    तुझे दुःख माझ्या उरात सले,
    माझे व्हावे ना रे तुझे,
    अश्रू माझे गाली सांडताना,
    राजा,अंतर मात्र तुझे उले,--!!!

    बंबाळलेली दोन्ही हृदये,
    हाक परस्परांना देती,
    प्रेमावाचून संकेतांची,
    ताकदवान भाषा कोणती,--!!!

    दुनिया केवढी निष्ठूर असे, निरपराधास शासन मिळे,
    जो करतो काम प्रामाणिक,
    त्याची कदर ठेवत नसे,--!!!

    हुंदके दाबून ठेवलेले,
    तुझ्या मिठीतच सांडावे, सामर्थ्यशाली बाहू तुझे,
    वाटते मला भोवती असावे,-

    जग तूच केवळ माझे,
    तुझ्या सुखी जर आंच येते,
    टेकडीसमान खंबीर मी, कोसळल्यागत पाहत राहते,--!!!

    मिलन व्हावे दोन जिवांचे, एकरूपता अशी यावी,
    तुझ्या मिठीत मरण सुखे एकमेव आंस माझ्या हृदयी,--!!!

    शृंगाराची पूजा निव्वळ,
    वासनेचा लवलेश नसे,
    मुक्त त्या प्रणयक्रिडांत,
    प्रेम ओतप्रोत असे,--!!!

    तुझे भरले डोळे पुसुनी,
    त्यावर ओठ टेकत आपुले,
    दुःखच सारे घेईन पिऊनी,
    खुशाल जगास मग झिडकारले,--!!

    © हिमगौरी कर्वे

      October 6, 2019


  • स्वप्नात माझ्या येशील का?

    आज रात्री पुन्हा एकदा
    स्वप्नात माझ्या येशील का?
    पुन्हा एकदा तशीच मला
    आर्त साद घालशील का?

    जीवनाचा एक डाव
    माझ्या संगे मांडशील ना!
    अमोलिक आसवांना
    माझ्यासंगे देशील का?

    तुझ्या माझ्या बंधनांना
    भावनांत गुंफशील का?
    सांग माझ्या वेदनांना
    तू दिशा देशील का?

    काळजाची स्पंदने
    माझ्या तू होशील का?
    चांदण्यात वेचलेली
    फुले तू नेशील का?

    माझ्यासाठी आसवांना
    वाट मोकळी देशील का?
    ओघळणाऱ्या मोत्यांची त्या
    ओंजळ मला देशील का?

    थबकणारं पाऊल तुझं
    माझ्याचसाठी असेल ना?
    वळून पुन्हा पुन्हा मागे
    व्याकुळ-व्याकुळ बघशील ना!

    प्रिये तरल लाटांवरुन
    काव्य माझे होशील का?
    उद्या फिरुन पुन्हा एकदा
    स्वप्नात माझ्या येशील का?

    -- यतीन सामंत

      November 3, 2022


  • व्यक्तता

    शब्द थकले, मौनही आज थकले
    सांगा नां, आज व्यक्त कसे व्हावे
    भावनांचा श्वास आज गुदमरलेला
    सांगा नां, जगणे सुलभ कसे व्हावे
    कधीतरी सहज मनमोकळे करावे
    कां उगा ? सांजवेळी साशंक व्हावे
    अव्यक्ताचे, जीवनी अर्थ वेगवेगळे
    मनीचे सारे सत्य बोलुनी मुक्त व्हावे
    आज नां, कुठलीच याचना अपेक्षा
    तरीही, जीवनी निश्चिंत कसे व्हावे
    तड़जोड जीवनी, हीच मन:शांती
    हेची समजुनी, उमजुनी मुक्त व्हावे
    सत्य ! ओढ दिसते नेत्री तरळताना
    कां ? या वास्तवालाही पारखे व्हावे
    वि.ग.सातपुते. (भावकवी)
    9766544908
    रचना क्र. १३३.
    ९ - ५ - २०२२.

      June 2, 2022


  • ज्ञानेश्वराची चेतना

    जीवंतपणी घेई समाधी, ज्ञानेश्वर राजा ।
    दु:खी होऊनी हळहळली, विश्वामधली प्रजा ।।

    सम्राट होता बालक असूनी, राज्य मनावरी ।
    हृदय जिंकले सर्व जणांचे, लिहून ज्ञानेश्वरी ।।

    आसनीं बसत ध्यान लावता, समाधिस्त झाले ।
    बाह्य जगाचे तोडून बंधन, प्राण आंत रोकले ।।

    निश्चिष्ठ झाला देह जरी , बाह्यांगी दर्शनी ।
    जागृत आसती प्राण तयांचे, आजच्याही क्षणी ।।

    संचार त्यांच्या आत्म्याच्या , सदैव होत राही ।
    ज्ञान भुकेल्या भाविकाला, चेतना ते देई ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      January 26, 2019


  • माझा जन्म

    माझाच जन्म व्हावा
    म्ह्णून माझ्या आई-बापाचं मिलन झालेलं नव्हतं...

    माझ्या जन्माचं कोडं
    त्यांना आणि मलाही कधी उलगडलं नव्हतं...

    माझा जन्म आता
    मला, माझ्या आई-बाबाला आणि जगालाही ओझं ठरलं होतं...

    मला शक्य असतं तर
    या जगात जन्माला येणंच मी स्वतःहून नाकारलं असतं...

    किती बरं झालं असतं
    या जगात जन्माला येणं न येणं हे आपल्या हातात असतं...

    © कवी – निलेश बामणे ( एन.डी.)
    दिनांक – 9 मार्च 2016

      March 10, 2016


  • तुझ्या जाण्याच्या आधी

    तुझ्या इथून जाण्याआधी राहिलेलं सगळं पूर्ण करतो,
    अर्धवट राहिलेल्या श्वासांनाही आज मोकळं करतो.

    तू गेलीस तरी तुझी चाहूल घरभर रेंगाळते,
    रिकाम्या खोलीत बसून मी अजूनही तुझी वाट बघतो.

    काळाच्या ओघात बरंच काही मागे पडून गेलं,
    तरी एक जुना क्षण मी अजूनही मनाशी जपतो.

    “सोडून दे” म्हणालीस,
    शब्द शांत होते तुझे,
    पण सोडण्याआधीच्या प्रत्येक आठवणी
    मी पुन्हा पुन्हा आठवतो.

    आज निरोपाच्या टप्प्यावर उभा आहे एकटाच मी,
    स्वतःलाच समजावत,
    शेवटचं धैर्य गोळा करतो मी.

    •ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे

      June 12, 2026