(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • चाकोरी

    नव्हतो आम्ही आमचे कधींही बनले जीवन दुजामुळे ।
    कर्तेपणाचा भाव तरीही येतो कां मनी ? ते न कळे ।।

    कसा आलो या जगतीं ठाऊक नव्हते कांही मजला ।
    कसा वाढलो हलके हलके जाण आहे याची मला ।।

    जेंव्हा झालो मोठा कुणीतरी वाटू लागले कांही करावे ।
    काळाने परि दिले दाखवूनी जीवन प्रवाही वाहात जावे ।।

    परिस्थितीच्या काठामधूनी जीवन सरिता वाहात जाते ।
    वाहात असता त्याच दिशेनें इच्छीत ध्येय हातीं नसते ।।

    होते सारे अखेर तेचि आखून ठेवते नियती जे जे ।
    अज्ञानानें समजत राही हे केले मी, अन् हे माझे ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      July 23, 2016


  • होळीत जाळा दुष्ट भाव

    एकत्र येऊं सारेजण विसरुन जाऊ भेदभाव

    जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव //धृ//

    ऐष आरामांत राहून देह झाला मलीन

    शरीर सुखासाठी करती नाना खटपटी

    आज आहे सण होळीचा नष्ट करा ऐहिक भाव

    जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव //१//

    मन असे चंचल भारी सर्व दिशेने घेई भरारी

    राग लोभ अहंकार मनाचे तर हे विकार

    टाकता मलीनता मनाची पेटलेल्या होळीकडे, घे धांव

    जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव //२//

    विसरुनी चाललो मानवता प्रत्येक बघतो स्वार्थता

    विश्वासाचे आपले नाते विसरुन गेले सारे ते

    निस्वार्थी बुद्धीने आतां जाणा इतर मनाचे ठाव

    जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव //३//

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      March 11, 2021


  • जनटीका

    घोड्यावरती बसू देईना, चालू देईना पायी

    जगाची ही रीत , कशी समजत नाही ..१,

    सज्जनतेची वस्त्रे लेवूनी, निर्मळ जीवन आले

    आपण बरे नि काम बरे, तत्व अंगीकारले...२,

    मोठा झाला शिष्ठ समजोनी, वाळीत टाकीले मला

    दुष्कृत्यामध्ये साथ हवी, त्यातील कांहीं व्यक्तीला...३,

    जीवन जगणे कठीण होता, मार्ग तो बदलला

    आगळी धडपड करूनी, यश मिळाले मला....४,

    मिसळत होतो सर्वामध्ये, अतिशय प्रेमानी

    तरीही ऐकला ‘शिष्ट’ शब्द , माझ्याच कानानी..५,

    व्यक्ती तितक्या प्रकृती , असती येथे

    भिन्नतेचे स्वभाव तेंव्हा , निराशा मनी आणते ..६,

    चित्ती येईल तसेच करावे, जागृत भाव ठेवून

    इजा न होईल इतर जनाना, हे लक्षात घेवून...७

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      April 20, 2020


  • माझी पृथ्वी…

    माझी पृथ्वी माझी पृथ्वी अन् वर हे आकाश निळे

      July 12, 2026


  • प्रेम-स्वभाव

    प्रेम-स्वभाव असे ईश्वरी गुण
    मनीं ठसला हा आत्म्यांत राहून
    प्रेम करावे वाटे आंतरिक ही ओढ
    ज्याची मुळे खोल पडने अवघड

    आपसांतील प्रेम आत्म्यातील नाते
    न दिसता देखील बांधलेले असते
    सर्व जीवाविषयीं सहानुभूती भासे
    ह्रदयामध्ये ती सुप्तावस्थेत दिसे

    आमचे राग लोभ बाह्य संबंधामुळें
    षडरिपू विकार शारीरिक सगळे
    वाईट गुणधर्म देहाशीं निगडीत
    चांगले जे कर्म आंतरीक इच्छेत

    राग येऊन केंव्हां दुष्कृत्य घडते
    पश्चाताप वाटता मन शांत होते
    कितीही दुष्ट असो प्रेम भाव असतो
    आनंदाच्या प्रसंगीं उभारुन तो येतो

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

      May 6, 2019


  • ही माझी शाळा

    आहे ती लहान परि किर्ती महान,

    छोटे येऊन शिकले मोठे होऊन गेले ।।१।।

    आले घेऊन पाटी अ आ इ ई लिहिण्यासाठी,

    लिहून वाचून ज्ञानी बनले देशांत नांव कमविले ।।२।।

    शहर चालते, देश चालतो महान बनले लोकांमुळे ।।३।।

    बीजांचे वृक्ष झाले त्या केवळ शाळेमुळे ।।४।।

    कुणी बनला डॉक्टर काळजी घेई आरोग्याची,

    कुणी झाला इन्जिनियर देई बांधून सर्वा घर ।।५।।

    शिक्षक झाले कुणी केले सर्वा शहाणे,

    ज्ञान मार्ग अनेक शाळाच त्याचा पाया एक ।।६।।

    आईसम प्रेम करतो आपल्या शाळेवरी,

    जो कोण घडला ह्याची उकल शाळाच करी ।।७।।

    जन्म देते आई परी शाळा घडवी जीवन,

    कधीही न फिटे ह्या जन्मी तिचे ऋण ।।८।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      June 23, 2016


  • जीवन गुंता

    दोन रिळाचे दोन धागे, एकत्र ते आले
    एकमेकांत दोन्हीही, गुंफून परि गेले....१,

    गुंता झाला होता सारा, निर्मित नात्याचा
    शक्य होईल कसे आता, वेगळे होण्याचा....२,

    खेच बसता वाढत गेला, होता गुंता
    उकलून सुटणे शक्य नव्हते, त्याला आता.....३,

    दोनच पर्याय होते, त्याचे पुढती
    तुटणे वा एकत्र राहणे, ह्या जगती....४,

    वेगळे होतील दोन धागे, तुटून जाणारे
    अवशेष राहतील परि काही, जे न सुटणारे ...५,

    दोन मनांचा असाच होतो, गुंता ह्या जीवनी
    राग-लोभ प्रेमादी भावना, जाती गुंतूनी.....६

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      March 8, 2019


  • नेणिवांच्या पलीकडे जाणिवांच्या आधी

    नेणिवांच्या पलीकडे जाणिवांच्या आधी
    फुलले क्षण भाव विभोर मनात काही
    कसली चाहूल मनात काहूर का उठती
    मीच मला शोधते हरवले अंतरी गुज काही
    भाव कल्लोळ अंतरात मन ओढ कशाची
    न कळत लोचनात आपोआप दाटे पाणी
    मोगऱ्याचा घमघमाट अंतरात वेढून जाई
    हसले लाजून कुणी ते लाजणे हृदयस्थ होई
    स्पर्श मोहक खुणावतो निःशब्द काही
    वेळूच्या बनी मुरली मोहक वाजे मोहवुनी
    रंगाचे रंग खुलले भवताली रंगुन काही
    शुभ्र धवल रंग खुलून जाई पिसाऱ्यातुनी
    मनास काय हवे ते अलवार भाव टिपती
    हृदयात मिटे हृदयस्थ शब्द भाव मिटती
    स्त्रीच्या लाजेतही खुलतो गजरा सुकेशी
    हास्य अलगद मुखी विलसते मग गाली
    कोमल मधुर भाव अंतरात यावे उमलुनी
    बहरात चांदणे न्हावे आकाश चांदण्यांनी
    -- स्वाती ठोंबरे.

      November 12, 2021


  • भाताचे रोप

    चिमणे इवलाले बीज
    रम्य त्यात होती शेज.
    दीड वितीचे कुणि रोप
    घेत तिथे होते झोप ।।१॥।

    ऊन म्हणाले, 'ऊठ गड्या.'
    पाउस वदला, 'मार उड्या,
    जगात ये रे ह्या उघड्या.
    करी जळाच्या पायघड्या.' ।॥॥२॥।

    वायु बोलला, 'ऊठ कि रे,
    माझ्याशी धर फेर बरे.
    हसले जर आम्हा कोणी

    दावु वाकुल्या नाचोनी.' ॥३॥।
    भूमि म्हणाली, 'चल बाळा,
    वाजव पाण्याचा वाळा,
    अंगी हिरवी सोनसळा
    घालुनि ही दावी सकळा.' ।॥॥४॥।

    झोप झटकुनी ते उठले,
    नंदबाळ जणु अवतरले.

    पाउस, वारा, ऊन तसे
    जमले भवती गोप कसे. ॥५॥

    अदभुत ह्याचा खेळ अहा
    जरा येउनी पहा, पहा.
    उगवे, चमके, पहा तरी
    मोरपिसांचा तुरा शिरी. ।॥६॥

      July 1, 2026


  • जागतिक नकाब/ बुरखा/हिजाब दिन

    महिलांच्या अधिकारासाठी लढणाऱ्या काही महिला कार्यकर्त्यांचा बुरख्याबाबत दृष्टिकोन काहीसा वेगळा आहे. ज्या देशात बुरखा वापरणे सक्तीचे आहे अशा इराणमध्ये एक पत्रकार माशूकअली निजाद यांनी फेसबुकवर ‘माझे गुप्त स्वातंत्र्य’ या नावाने एक मोहीम सुरू केली होती. ज्यात काही इराणी महिला आपला पडदा काढताना दाखवले होते.

      February 1, 2022