दसरा सण आनंदाचा
सोनं द्या प्रेमाचं मोठं
देऊन पानं आपट्याची
नका देऊ सोनं खोटं
आलिंगन देऊन परस्परांना
सोनं म्हणून वृक्षबीज देऊ
झाडे जगवा झाडे वाचवा
वसा आज हा आपण घेऊ
हर्षाच्या या मंगल समयी
नका रडवू अबोल वृक्षा
रक्षण करती आपुले जीवन
आपण करूया त्यांची रक्षा
वृक्ष सदैव देतच असती
पाने-फुले किती संपदा
होऊ नकोस तू कृतघ्न
वृक्षाविन ओढवी आपदा
वृक्ष असती मित्र आपुले
आपटा, वड, पिंपळ, शमी
वृक्ष-मानव सहजीवनाने
करू साजरी विजयादशमी
- प्रा.अरूण सु.पाटील (असु)
October 8, 2019
नाहीं रे मी विसरलो देवा तुजलो
संसारात अडकलो, वेळ ना मिळाला ।।१।।
तूंच गुंतविले, लक्ष्य मोहांत
चित्त देण्या सांगितले, तुझ्याच खेळांत ।।२।।
तुलाची हवे यश, तुझ्या खेळांतले
माझ्या कौशल्यास, तूं मार्गदर्शन केले ।।३।।
तुझ्याच साठीं, गुंतविले मन
बनोनी सोंगटी, फिरे पटावरी ।।४।।
काय दोष माझा, न दिले लक्ष्य मी
खेळवण्यातील मजा, आलो तिला कामीं ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
November 30, 2014
आज सारे समजुनी चुकले
आता काहीच नकोसे वाटते
सुखदुःख ओसंडुनी वाहिले
आता काहीच नकोसे वाटते
जगणे सहजी जगुनी जाहले
भोग भोगणेही संपले वाटते
अर्थ, जगण्याचाही कळला
आता मात्र थांबावेसे वाटते
आकाशाला घातली गवसणी
मनीचे सारे सारे घडले वाटते
ऋणानुबंध ओळखुनी चुकलो
आज कुठे गुंतू नये असे वाटते
क्षणाक्षणाचाही झाला निचरा
आज काळ किती उरला वाटते
आता कशाला हव्यास करावा
तसे सारे जगणे मृगजळ वाटते
निरवतेत, स्वांतसुखाय जगावे
तोच एक परमानंद असे वाटते
जन्म, एक भ्रमंती गतजन्मांची
दयाघनाने मुक्त करावेसे वाटते
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. १४५.
२ - ६ - २०२२.
June 14, 2022
झाकोळल्या नभांगणी
कृष्णमेघना अनावर...
जीवा, ध्यास श्रावणी
सरसरसर धारा सुंदर...
वर्षा ऋतू बरसणारा
स्पर्श ओलेता मनोहर...
शब्द गझला अर्थवाही
भावगंधी ओंजळ सुंदर...
चिंबचिंबली पानफुले
झुळझुळतो नाद सुंदर...
अतर्क्य रूप चैतन्याचे
लावण्य रुपडेच मनोहर...
नाचत नाचत येते वर्षा
ओथंबलेले गगन सुंदर....
********
रचना क्र. ७८
२०/७/२०२३
-वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
August 12, 2023
मुलांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी आणि बालरंगभूमीचा आशय परीकथेच्या पुढे नेऊन ती सशक्त करण्यासाठी जगभरात उदयास आलेली 'ग्रिप्स नाट्य चळवळ' सुवर्णमहोत्सव साजरा करत आहे. ग्रिप्स नाट्यचळवळीत योगदान दिलेले जगभरातील रंगकर्मी जर्मनीची राजधानी बर्लिन येथे एकत्र आले आहेत. ग्रिप्स नाट्यचळवळीचा पन्नास वर्षांचा आढावा, मुलांचे भावविश्व आणि नाटक यांवर विचारमंथन; तसेच विविध भाषांतील नाटकांचे सादरीकरण अशा उपक्रमातून ग्रिप्सचा सुवर्णमहोत्सव रंगत आहे. या महोत्सवात पुण्यातूनही काही कलावंत सहभागी झाले आहेत. भारतात ही चळवळ रुजवणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे ग्रिप्सचे विशेष निमंत्रित आहेत.
भारतामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रात ही चळवळ आणली डॉ. मोहन आगाशे यांनी. त्यांनी १९८६ च्या सुमारास पुण्याच्या मॅक्सम्युलर भवनाच्या मदतीने नाटके बसवायला आणि सादर करायला सुरुवात केली. ही चळवळ पुण्यातून देशभर पसरली. साठच्या दशकात कम्युनिस्ट चळवळीच्या प्रभावातून विद्यार्थी चळवळीतून ग्रिप्स चळवळ उदयाला आली. खास मुलांसाठी आणि तरुणांसाठी लिहिलेली नाटके व्हायला लागली. फोकर लुडविंग यांनी त्याची सुरुवात केली. ही नाट्य चळवळ जगभर पसरली. ग्रिप्स चळवळीतील नाटके इतर बालनाटकांप्रमाणे परीकथांवर आधारलेली नसतात, तर खेळाच्या मैदानांची कमतरता, पर्यावरण, अभ्यासातल्या अडचणी या मुलांना भेडसावणाऱ्या विषयांवर ती बेतलेली असतात. मनोरंजनाच्या माध्यमातून मुलांचे विविध प्रश्ना हाताळणे हे ग्रिप्सच्या नाटकांचे वैशिष्ट्य आहे. सध्या पुण्यातले श्रीरंग गोडबोले आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर सध्या बालनाट्यमहोत्सवाची ही चळवळ चालवत आहेत. महाराष्ट्रातले अमृता सुभाष, आनंद इंगळे, उपेंद्र लिमये, गौरी लागू, परेश मोकाशी, रसिका जोशी आणि विभावरी देशपांडे यांच्यासारखे कलावंत या चळवळीने घडविले. 'ग्रिप्स चळवळीला पन्नास वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्ताने जगभरातील रंगकर्मी बर्लिन येथे एकत्र आले आहेत. १५ जूनपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात २८ देशांतील रंगकर्मींचा सहभाग आहे. 'चिल्ड्रन्स राइट' हा महोत्सवाचा मध्यवर्ती विषय असून विविध उपक्रम होत आहेत. नाट्यमहोत्सवासाठी महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या 'जंबा बंबा बू!' या नाटकाची निवड झाली आहे. श्रीरंग गोडबोले आणि विभावरी देशपांडे लिखित आणि राधिका इंगळे दिग्दर्शित या नाटकाचा प्रयोग महोत्सवात होत आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
June 15, 2019
अस्तित्व तुझे सभोवार
सर्वत्र तुझाच स्पर्शभास
वात्सल्य तुझे लडिवाळ
माते तुझाच अंतरी ध्यास.....
तुझ्याच कुशीत स्वर्गसुख
पान्हा, तुझा अमृती घास
तव आशीष कवचकुंडले
आठवे तुझे रूप निरागस.....
सत्य! तुच जननी सृष्टिची
निरपेक्ष तुझाच गे सहवास
आज अंतरी अस्तिव तुझे
मज सावरिते क्षणाक्षणास....
साक्षात, तुच गे देवदेवता
तुझ्या, उदरी ईश्वरीय वास
मातृत्व! एक ब्रह्म शुचिता
लाभते जन्मी भाग्यवंतास....
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २४१
१९/९/२०२२
September 25, 2022
वीटभट्टी फेकं
धूर भकाभका
तिथ खेळती पोरं
चिर्रघोडी धक्का
इळभर वाहती
किरजले खंगार
आयुष्य बाळांचे
फेकलेले भंगार
मजूर फोडती
दगडांच्या बाली
लेकरांची त्यांच्या
मुकी देहबोली
ऊसतोडी माय
झोका बांध शेवरी
कारखानी चिमणी
पाचरट सावरी
रेल्वेच्या पटरी
झोपड्यांची रांग
शिक्षणाचा कोंबडा
कधी देईल बांग?
-- विठ्ठल जाधव.
संपर्क: ९४२१४४२९९५
शिरूरकासार(बीड)
November 29, 2021
जरी, मी नसलो मनकवडा
तरी मी सारे ओळखून आहे
समोरचे हास्य बेगडी नाटकी
मनभाव सारे ओळखून आहे
सत्य असत्य लोचनी तरळते
सद्भावनां! अंतरास सजविते
मन निर्मळ सुखानंदाचा झरा
सारेच मी शब्दात गुंफतो आहे
कां ? उगाच उणेदुणे उसवावे
जे छळते मनास, ते विसरावे
विवेके! सदा जगुनी जगवावे
एव्हढेच आपुल्या हाती आहे
मैत्र! लाभणे, भाग्य भाळीचे
निर्मळ! सुखाचेच प्रीतीप्रांगण
जीवाजीवा, सहजी बिलगावे
जीवनाची, हीच सांगता आहे
--वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
१४ - १ - २०२२.
January 30, 2022
मानव जीवन तुम्हां लाभले,
महत् भाग्य ते समजावे
कर्म दिधले पाठी तुमच्या,
सद्उपयोगी यांसी करावे....१,
जीवन रेखा मर्यादेतच,
ठेवली असती तुमचे हातीं
जाणीव त्याची मनीं असावी,
कर्म कार्ये जेव्हां करिती...२,
हाती घेतल्या कार्यामध्ये,
एकचित्त तो प्रयत्न व्हावा
काळ केवढा तुमचे जवळी,
याचा विचार सतत यावा...३,
कार्ये राहता अपूर्ण अशी,
वेळ न उरे तुमचे हाती
अभाव असता योजनेचा,
अपयश ते पदरी पडती....४
कार्य व्याप्तीची दिशा असावी,
शक्ती साधन काळ बघूनी
जीवन यशाचा आनंद खरा,
लुटाल तुम्ही हे ध्या जाणूनी.....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
May 1, 2021
कृष्ण कमळ –
August 30, 2013
Copyright © 2025 | Marathisrushti