गुंतवणा-या परंपरा अन्
पंचांग मला दिसत नाही,
केला उपवास नाही तरी
देव माझा रुसत नाही .....
तिथी, वार-मुहुर्ताच्या
अडगळीत मी फसत नाही,
एक दिसाच्या भक्तीसाठी
देव माझा रुसत नाही .......
दलालांच्या जोखडात
कधीच ईश्वर बसत नाही,
दिला छेद परंपरेला तर
देव माझा रुसत नाही .......
तो असतो आमच्यात
आम्हालाच पटत नाही,
दुध तुपाच्या नैवद्यासाठी
देव माझा रुसत नाही .......
नसलो जरी नास्तिक मी
आस्तिक तेवढा दिसत नाही,
घेतलं नाही दर्शन तरी
देव माझा रुसत नाही .....
March 2, 2017
बागेतील तारका-
April 1, 2013
सहवास होता तुझा,
सदोदित साथ देणारा…!
संयम होता तुझा,
माझे बोल झेलनारा…!
जिद्द होती तुझी,
नितांत प्रेम करण्याची…!
तुझ माझ नातं कस्तुरीचं,
एक थेंब सागरात मिसळलेलं….!
एक थेंब सागरात मिसळलेलं….!
– श्र्वेता संकपाळ
August 22, 2018
जाई जुईचं अलगद बहरण
की मंद निशिगंधाच दरवळण,
गुलाबाच टवटवीत होणं की
प्राजक्ताचं दवात ओलं भिजणं..
June 17, 2022
इतकं सारं विस्तीर्ण अवकाश असताना
गरीबांच्या घरीच तेवढं
छपरातून का डोकावून पाहावं
आकाशानं ?
-- श्रीकांत पेटकर
February 28, 2019
ना शरदा चे चांदणे
ना सोनियाचा दिस
घड्याळाचे ओझे हाताला
म्हणून आय् कासावीस!
कमळाच्या पाकळ्यांची
यादवी छ्ळते मनाला
धनुष्य आलयं मोडकळीस
पण जाणीव नाही बाणाला!
विळा, हातोडा आणि कंदीलाला
आजच्या युगात स्थान नाही
डब्यांना ओढण्याइतकी
इंजिनात जान नाही!
मन आहे मुलायम
पण माया कुठेच दिसत नाही
हत्तीवरून फिरणारा
सायकलवर बसत नाही!
कितीही उघडी ठेवा कवाडे
प्रकाश आत जाणार नाही
विसरलेले आठवले तरीही
गवई गीत गाणार नाही!
बंडखोर पक्षांचा थवा
पार्टीसाठी आतूर
कुंपणच खातय शेताला
आणि बुजगावणंही फितूर!
August 11, 2016
गम्मत वाटली प्रथम मजला बहिरा ऐके कीर्तन
अश्रू वाहू लागले माझे नयनी भाव त्याचे जाणून
नियमित येई प्रभूचे मंदिरी श्रवण करी कीर्तन
केवळ बघुनि वातावरण ते तल्लीनच होई मन
सतत टिपत होते मन त्याचे इतर मनांचे भाव
केवळ जाणण्या भगवंताला डोळे आतुर सदैव
रोम रोमातून शिरत होत्या प्रभू निनाद लहरी
संदेश प्रभूचा पोह्चूनी आत्म्यास जागृत करी
होऊन गेला प्रभूमय बहिरा धुंद त्या वातावरणी
ऐकत होता तो शब्द प्रभूचे श्रवण दोष असुनी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 3, 2017
किती रंग या जीवनी पहावे, कितीदा पुन्हा नव्याने जगावे,रोज रोज नवीन ताजे,
दुःख जिवापाड सोसावे,--!!
ठरवलेले नेहमी चुकते,
विपरीत काही घडते,
अगणित अपेक्षांचे ओझे,
इवल्या हृदयाने पेलावे,-?
जे विधायक, ते दूर राहते,
नकारात्मक ते सारे घडते,
आपल्याच जिवाचा बळी
रोज नव्याने पहावे लागते,-!!
मदतीचा हात करता पुढे,
आरोपांना पेंव फुटते ,
आंधळ्या निर्जन आयुष्याला ,
रानावनीची वाट दिसते,--!!
कुणाला आपले म्हणावे,
मन एक ठरवून ठेवते,
बघता बघताअगदी सारे,
कुठेतरी बिनसलेले असते,--!!!
गैरसमजांची तुफान वादळे,
अवती भोवती घोंघावती ,
अलगद घास टिपण्या,
सभोवार तांडव करिती,-!!
शांतता करुणा प्रेम
सहकाराच्या सर्व भावना,
का हरत राहती सारख्या,--
मग जीवन कसे असावे क्षेम,-?
हिमगौरी कर्वे.©
April 23, 2019
प्लास्टिकचा गैरवापर ही आपली क्षुद्र मनोवृत्ती आहे. पर्यटनाच्या नावाखाली तसेच देवदर्शनाच्या नावाखाली अनेकजण, बसेस, खासगी वहानाने जातात. खाणे-पिणे झाल्यावर, जवळपास सर्व कचरा फेकून देतात. त्यात रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, इतर पदार्थ, पेले वगैरे असतात. हे सर्व कचरापेटीत टाकणे त्यांच्या लक्षात येत नाही की हे मुद्दाम होते, हे समजत नाही. एकाने एका ठिकाणी कचरा केला की दुसऱ्याला त्याचा फायदाच होतो. तो त्या ठिकाणी परत कचरा टाकतो. अशा रीतीने कचऱ्याचे ढीग निर्माण होतात, ते ढीग काढण्याकरिता एक यंत्रणा राबवावी लागते.
July 3, 2021
महानगरांच्या नशीबी नसतो भावनांचा ओलावा
निरर्थक धडपड, निर्जीव यांत्रिकता नि पोकळ गिलावा
आजूबाजूला सरपटणाऱ्या हातपायांना येथे नसतो चेहेरा
सारेच शोधतात निवाऱ्याला एक अपुरा कोपरा
भरकटणाऱ्या पतंगागत नसते आयुष्याला दिशा
परिस्थितीच्या काजळीने धुरकटणाऱ्या हाताच्या रेषा
इथे आयुष्ये नाही जगत रेटली जातात आपोआप
लोकलच्या रेटणाऱ्या गर्दीने फलाटावर फेकल्यागत
असाच (आणखी) एकदा सूर्य मावळतो, थकला - भागला
नि निघतो घड्याळ्याच्या ठोक्याबरोबर लगबगीने गलबला
जीव गुदमरवणाऱ्या गर्दीत मिसळून बेकाबू कोलाहलात
जीर्ण शरीरे सरकू लागतात, विटक्या मनाचं ओझं पेलत
थिजत्या आकांक्षांना सोबत घेऊन विझत्या आशेला
आणि कदाचित राखेआडला निखारा उरी जपलेला
घरट्याच्या ओढीनं निघून, प्रवासाच्या शक्तीपाताने शिणून
परततात आयुष्याची चिपाडं, निष्प्राण कलेवर बनून
पूर्ण पिट्ट्या पाडून घेऊन, काळं करुन दिवस पळताना
रात्र सामावे त्यांच्या गुपितांना, पापांना नि दिवसाच्या तापांना
आपापल्या बंदिस्त तुकड्यात, मग निवांत होऊन
अतृप्त आत्मे निजतात गाढ, खूपशी स्वप्ने उशाशी घेऊन
रात्रीच्या कुशीच्या उबेत, क्लांत जीव आश्वस्त निजे
भाळी लावूनी चंद्राचा टिळा, रात्र मग जागे, जोजवे
प्रेमाने थोपटे कपाळी अंकांना देता मंद मंद झोके
रात्र प्रहर - प्रहरांनी पिके, होत जाती रंग फिके
दिवस अस्पष्ट कुजबुजू लागे, झुंजुमुंजु होऊ लागे
काळोखाच्या दाट दडपणाला निर्धाराने सारुन मागे
धास्तावून जीव मग होतो जागा, विखुरली गात्रं गोळा करीत
पुन्हा प्रवासास दिशाहीनतेच्या टोकापासून, टोकापर्यंत
निघतो वेठबिगार पाठी थैली मारुन उत्साहाचा उसना आभास लेऊन
झापडांना ओढून डोळ्यांवर नि नीट जोखडात मान देऊन
पुन्हा होतं चक्र सुरु जगाच्या प्रचंड चरकाचे
पिळायला थेंब शेवटचे, शुष्क जीवनातल्या आशेचे
आणि नेलं जातं वाहून जू इमाने इतबारे जगाच्या अंतापर्यंत
गुलामांच्या असहाय पिढीपासून पुन्हा पुढल्या पिढीपर्यंत
-- यतीन सामंत
October 4, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti