(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ब्रेकअप

    काळजाचं पाणी झालं

    जेव्हा ती माझ्याशी बोलली

    मी तुझ्यावर प्रेम करते

    माझ्यावर तु करशील का ?

    सांग सख्या माझ्यासाठी

    सर्वस्व तुझे देशील का ?

    मी ही तीला हो म्हणालो

    आय लव्ह यू टू म्हणालो

    प्रेमाच्या आणाभाका घेत

    प्रेमाचा प्रवास सुरू झाला

    प्रेमाच्या वर्षावामध्ये

    देह चिंबं भिजू लागला

    दिवसामागुन दिवस गेले

    रात्रीमागुन रात्र गेली

    प्रेमाच्या नशेमध्ये दोन जीव

    जगापासुन अलीप्त झाले

    काळजाचं पाणी झालं

    जेव्हा ती बोलू लागली

    तीच्या माझ्या ब्रेकअप ची

    चर्चा आज सुरू झाली

    ऐक सख्या माझ्यासाठी

    तु मला विसरशील का ?

    मी तीला नाही म्हणालो

    आय लव्ह यू टू म्हणालो

    ती म्हणाली नाही आता

    प्रेम आपले विसरून जा

    दुस-यासाठी मी आता

    संसार माझा थाटला

    दिवसामागुन दिवस गेले

    रात्रीमागुन रात्र सरली

    प्रेमाच्या आठवणीमध्ये

    दोन जीव विभक्त झाले..

    – उमेश तोडकर

      February 21, 2023


  • आस्तित्व

    समोर ये तूं केंव्हा तरी

    बघण्याची मज ओढ लागली

    फुलूनी गेली बाग कशी ही

    बीजे जयांची तूच पेरीली

    कल्पकता ही अंगी असूनी

    दुरद्दष्टीचा लाभ वसे

    अंधारातील दुःखी जनांची

    चाहूल तुज झाली असे

    शीतल करुनी दुःख तयांचे

    जगण्याचा तो मार्ग दाखविला

    सोडूनी सारे वाटेवरी

    आकस्मित तू निघूनी गेला

    आस्तित्वाची चाहूल येते

    आज इथे केंव्हातरी

    तव आशिर्वादे जगतो सारे

    हीच पावती त्याची खरी

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      October 17, 2019


  • अभंग

    सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ।
    कर कटावरी ठेवूनिया ।।
    तुळसीहार गळा कासे पितांबर ।
    आवडे निरंतर हेचि रुप ।।
    मकर कुंडले तळपती श्रवणी ।
    कंठी कौस्तुभमणी विराजित ।।
    तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख ।
    पाहीन श्रीमुख आवडीने ।।

      June 28, 2026


  • तू असा, तू तसा

    तू असा, तू तसा,
    तू कायसा, कायसा,
    अनंत रुपे भगवंता,
    घेतोस कशी रात्रंदिवसा,--!!!

    कधी वाऱ्याचा स्त्रोत तू,
    कधी, खळखळणारे पाणी,
    कधी खोल खोल दरी तू,
    कधी कोकिळकंठी मंजूळगाणी,-!!

    शोधावे कुठे तुला, तळ्याकाठी,
    झऱ्याजवळ का धबधब्यात,
    सोनेरी उन्हात राहशी,
    का डोंगरातील कपारीत,--!!!

    बाळाच्या हास्यात दडशी,
    का अंधारल्या गुहेत,
    प्राण्यांच्या दिमाखी बघावे,
    का पक्ष्यांतील सौंदर्यात,--!!

    जगातील आश्चर्यात पहावे,
    की, माणुसकीच्या ओघात,
    देवघरात असशी का तू,
    का सज्जनाच्या हृदयांत,--!!!

    फुलांतील सौंदर्य, गंध तू,
    की फळातील मधुरपण,
    माणसातील विवेक तू का, त्याच्यातीलच *सूज्ञपण*,

    कुठे कुठे पाहू तुला,
    न पाहताच भासशी तू,
    आहेस अंतरातील खूण,
    नि काळजांतील धून,--!!!

    ©️ हिमगौरी कर्वे.

      March 22, 2020


  • नांव पांडुरंग कसें ?

    (गझलनुमा गीत)

    रंग तुझा सावळाच, नांव पांडुरंग कसें ?

    लक्ष भक्त पाहतात लक्ष तुझे रंग कसे ?

    हात कटीवर ठेवुन विटेवरी स्तब्ध उभा

    रूप तुझें ठायिं ठायिं तरि भक्तांसंग कसें ?

    रौद्र ऊन थंडी वा मुसळी पाऊस असो

    दुर्लक्षुन ऋतु, नामीं वारकरी दंग कसे ?

    नाचतात वैष्णवजन, देहभान विस्मरुनी

    वेड असें लावतोस भक्तांना, सांग, कसें ?

    फक्त स्वानुभवानेंच आकळतें हें मनुजा –

    ‘पांडुरंग’ नाम मना आणतसे झिंग कसे ।।

    दामाजीचा ‘महार’, नाथांचा श्रीखंड्या

    विठुराया, नित्यनवें वठवतोस सोंग कसें ?

    पंढरिच्या भेटीनें भीमा बनते ‘गंगा’

    नवल नसे - अमृत बनती तिचे तरंग कसे ।।

    बह्मांडाहुन विशाल तूं, धूलिकणच मी

    तरि वसशी मम हृदयीं, फेडूं तव पांग कसे ?

    शीश तुझ्या चरण नत, पुरव हेंच मागणें –

    शिकव - ‘जन्ममृत्युचक्र करायचें भंग कसे’ ।।

    -- सुभाष स. नाईक

    पंढरीचा राणा

      July 1, 2017


  • प्रेम झरा

    प्रेम झरा

    नाही गेली अटूनी माया,

    आजही वाहते झऱ्यासारखी,

    उगांच कां तू खंत करशी,

    न होशील मज पारखी ।।१।।

    वाहत असता फुटले फाटे,

    जीवनातील वळणावरी,

    जो तो घेई उचलूनी वाटा,

    नशीबी असेल त्याच्या परि ।।२।।

    कसा राहील 'साठा' आता,

    मनसोक्त ते जाण्या वाहूनी,

    तृप्त करील परी तृष्णा तुझी,

    ओंझळभर घेता पिऊनी ।।३।।

    कुणीतरी आहे पाठीराखा,

    आनंदाने चालत रहा,

    थकूनी जाता देईल पाणी,

    आखंडीत प्रेम झरा ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      November 21, 2017


  • ऋणमुक्त जीवन

    जीवन होते गर्दी मधले, मुंबापुरीचे त्याचे,

    खडतर असती मार्ग सारे, येथील जगण्याचे...१,

    दिवस होता त्याचेसाठी, तारेवरची कसरत

    धावपळ करीत असता, सावध ठेवी चित्त....२,

    जाण होती एकची त्याला, मृत्यू आहे स्वस्त इथे

    सज्ज राही सदैव मनी, स्वागत करण्या त्याते....३,

    ठेवीत होता धन थोडेसे, स्वत:चे जवळी,

    उपयोगी ते पडेल केंव्हां, येत्या संकटकाळी....४,

    लिहून ठेवीले पत्र एक ते, त्याने खिशामाजी

    “ऋणमुक्त जीवन व्हावे, अंतीम इच्छा माझी”......५,

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      February 1, 2021


  • प्रीतभाव

    विसरू कसे , क्षण मी सारे

      July 7, 2021


  • दोघे एका डहाळीवरच झुलू

    दोघे एका डहाळीवरच झुलू,
    निसर्गाचे ,देणे किती पाहू,
    बघ, रसरशीत खाली फळे,
    दोघे मिळून चवीने खाऊ,--!!!

    पक्ष्यांची जात आपुली,
    निसर्गमेवा"आपुल्याचसाठी,
    मानव त्याचा बाजार मांडे,
    निसर्गराजा, फिरवी कांडी,

    एका वृक्षा,-- किती फळे,
    रसाळ,गोड,चविष्ट मधुर,
    तुझ्यासमवेत स्वाद वाढे,
    फळ बने आणखी रुचिर,

    प्रेमसंगत वाढून आपुली,
    एकमेकांचे उष्टे' खाऊ,--!!
    त्यागातच प्रेम असते,
    सखे, दुनियेस दाखवून देऊ,--!!

    दोन "सांसारिक" जीव आपुले,
    करती मधुर रसपाना,--!!!
    निसर्गच लुटून देतो सारे,
    शिकवतोही साऱ्या जगतां,--!!!

    संसार या कैरीसारखा,--
    कच्चा असता चटकदार,
    चाखण्यां मिळती सर्व चवी,
    आंबट, तुरट, गोडसर फार,--!!

    नवीन संसार सुरु होतां,
    फळां, जपावे लागते,
    करतां-करतां,फळ मग,
    कशी संपन्नता आणते,--!!!

    हिरवाकंच रंग संपे,
    जो असतो तारुण्याचा,
    पिवळसर कांतिमान रंग चढे,
    पिकल्यावर तो प्रौढत्त्वाचा,--!!!

    आंबट, तुरट फळ,
    हळूहळू, होई जसे गोड,
    तसेच साथीदार होती कृतार्थ,
    संसारी मिळतां योग्य जोड,--!!!

    फळ संपे दुसऱ्यासाठी,
    बघ त्याचे समर्पण,
    सूचित होई त्यातून प्रिये,
    संसाराचेच उदाहरण,--!!!

    हिमगौरी कर्वे.©

      May 27, 2019


  • मायेचा बाप

    मायेचा बाप
    कष्टकऱ्या धाप
    आम्हाला सुखी माप....१

    कर्तव्य फार
    शिस्तिला हो धार
    लळा अपरंपार.......२

    घराचे छत
    गावात ही पत
    उद्योगी पारंगत.......३

    खर्च मोजून
    जावक योजून
    हौस भरभरून.......४

    समसमान
    वागवतो छान
    शिकविण्यास रान.....५

    अबोल फार
    महान विचार
    झाला नाही लाचार....६

    करू सन्मान
    सदा असो भान
    घरादाराची शान.....७

    हा ताणा बाणा
    भाव मनी जाणा
    हा संसाराचा कणा....८

    -- सौ. माणिक (रुबी)

      December 1, 2019