मेणबत्ती

जळत होती मेणबत्ती, मंद मंद प्रकाश देवूनी ।

अंधकार भयाण असतां, भोवताली उजेड पाडूनी...१,

बुडत्यासाठी काडीचा आधार, अंधारी भासली तशी प्रकाशीं ।

असूनी ज्योत मिणमिणती, त्या क्षणी वाटला सूर्य आकाशी....२,

वाटत नाहीं मूल्य कुणाला, भरपूर पडल्या प्रकाशाचे ।

मेणबत्तीची ज्योत शिकवी, साधे तत्त्व जीवनाचे....३

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

जळत होती मेणबत्ती, मंद मंद प्रकाश देवूनी ।

अंधकार भयाण असतां, भोवताली उजेड पाडूनी…१,

बुडत्यासाठी काडीचा आधार, अंधारी भासली तशी प्रकाशीं ।

असूनी ज्योत मिणमिणती, त्या क्षणी वाटला सूर्य आकाशी….२,

वाटत नाहीं मूल्य कुणाला, भरपूर पडल्या प्रकाशाचे ।

मेणबत्तीची ज्योत शिकवी, साधे तत्त्व जीवनाचे….३

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Author