(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मराठी भाषा

     

      February 27, 2014


  • जागतिक निद्रा दिन

    शांत झोप झाल्याने मेंदू ताजा-तवाना राहतो. नियमित कामात मन चांगले लागते. कामावर लक्ष्य केंद्रीत होते. कामं चांगले होतात. म्हणून झोपेची काळजी घेणे आवश्यक आहे. झोप चांगली लागावी म्हणून काही व्यायाम, औषधे सुचवली जातात. झोपेमुळे शरीराचे कार्य चांगल्या पद्धतीने होण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने ६ ते ९ तास झोपणे आवश्यक असल्याचे अनेक मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर सांगतात. स्लीप हायजिन’ पाळणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

      March 19, 2022


  • ग्रंथनिष्ठा

    ग्रंथ विकत मिळतात, ग्रंथनिष्ठा नाही,
    अक्षरांच्या मेळ्यात ज्ञानतृष्णा नाही.

    पानोपानी शब्दांचे दीप उजळले,
    मन उजळण्याची मात्र आज इच्छा नाही.

    वाचूनही न उमजे जीवनाचा अर्थ,
    पुस्तकांच्या राशीने प्रज्ञादृष्टी नाही.

    ग्रंथ झाले शोभेचे घरच्या कपाटी,
    वाचनाच्या साधनेत सातत्यच नाही.

    ज्याने ग्रंथ जगले तोच खरा ज्ञानी,
    नुसती शब्दसंपदा ज्ञानसाधना नाही.

    ग्रंथ विकत मिळतात, सहज पैशांनी,
    ग्रंथनिष्ठा लाभे अंतरी साधनेनी.

    •ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
    मो:- 9011841212

      June 18, 2026


  • अर्थ जीवनाचा

    ऋणानुबंधी! नाते हे गतजन्मांचे
    अलवार, उमललेले जीवाजीवांचे

    जसे दृष्य लोचनी क्षणाक्षणाला
    क्षितीजावरती! मिलन नभधरेचे

    अनाकलनीय! सारेच रूप सृष्टीचे
    अस्तित्व! सप्तरंगलेले दयाघनाचे

    मुक्त खळखळणारी सरिता निर्मल
    तांडव! सरोवरी महाकाय लाटांचे

    अलौकिक! सारीच साक्ष लाघवी
    मनोहारी अवीट नजारे ऋतुऋतूंचे

    मृदगंधी गंधाळुनी जातो जीव सारा
    सरितेचे, निर्मल तरंग सारेच प्रीतीचे

    आत्ममुखता! हाच अर्थ जीवनाचा
    सांगुनी जाते, ते भ्रमण ऋतूचक्रांचे

    सत्यसाक्षी! एकची ते ब्रह्म कृपाळु
    तारणहार! साऱ्या साऱ्या ब्रह्मांडाचे

    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र.१५७.

    २० - ११ - २०२१.

      December 26, 2021


  • तयांना मृत्यूची वाटे भीति

    अस्तित्वशक्तीला बाधा येणें, अति भयंकर घटना ती

    तयांना मृत्यूची वाटे भीति....।।धृ।।

    गरिबीत जगती कित्येक,

    भ्रांत पाडे ती भाकरी एक

    जगण्यासाठीं झगडा देती, तयांना मृत्यूची वाटे भीति....१,

    आरोग्याला धक्का बसतां

    शरिर जर्जर होवूनी जातां

    देह तारण्या धडपड होती, तयांना मृत्यूची वाटे भीति....२,

    समाज रचना बघा कशी,

    लौकिक जाई तो राही उपाशी

    कुणी न दाखवी सहानुभूती, तयांना मृत्यूची वाटे भीति...३,

    प्रवास करिता वाहनातूनी

    अपघात शंका येई मनी

    अवलंबून जे दुजावरती, तयांना मृत्यूची वाटे भीती....४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      October 31, 2019


  • देख तो दिल कि जाँ से उठता है

    प्रेम आणि जळण्याचे एक जळजळीत नाते उर्दू गझलांमध्ये वारंवार दिसून येते. प्रेम म्हणजे उजळणे आणि उजळण्यामध्ये जळणे आलेच. अशा प्रेमात जळून उजळलेल्या व्यक्तींपैकी एक म्हणजे मीर तकी मीर. मीर तकी मीर हा अतिशय दर्दीला शायर म्हणून विख्यात आहे. प्रेमविव्हल जिवांचे वर्णन करण्यात त्याचा हात कुणी धरू शकत नाही. प्रेमात जळालेल्या एका जिवाची कथा मीर या नग्म्यातून मांडतो.

      February 6, 2011


  • सद्‌गुरु

    भटकत जातो वाटसरू ,
    जंगलामधील अज्ञात स्थळी,
    आंस लागते जाण्याकरिता,
    दूरवरच्या दिव्या जवळी ।।१।।

    मार्ग जाण्याचे अज्ञात असूनी,
    निराशेने वेळ दवडितो,
    ध्येय दिसत असून देखील,
    मार्गामुळे अडून पडतो ।।२।।

    अज्ञानाच्या अंधारात ,
    शोधत असतो असेच त्याला
    मार्गदर्शन सद्‌गुरुचे,
    न लाभता ध्येय मिळे कुणाला ।।३।।

    वाट दाखवी सद्‌गुरु ,
    प्रभूचरणी जाण्याचा,
    दुवा साधतो आमच्यामध्ये,
    त्यात एकरूप होण्याचा ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      January 28, 2016


  • एक दिवस तुझी अन माझी गाठ पडावी

    एक दिवस तुझी अन माझी गाठ पडावी
    अलवार भावनांची मेळ सहज जुळावी
    मन ओढ ओली हळवी तुझ्यात सांज फुलावी
    माझ्या मनाची तुझ्या मनाशी वीण जुळावी
    हात तू माझा हातात अलगद घेऊनी
    अंतरतील दुःखरी नस तुला कळावी
    घट्ट मिठीत तुझ्या मी ओथंबून रडावी
    तुझ्या मिठीत आर्त व्याकुळ मी मोहरावी
    न कसला पाश न जाणिव कसली रहावी
    तुझ्या माझ्या स्पर्शात वासना मुळीच न रहावी
    परी तुझी भूल मज अलगद क्षणी पडावी
    मनाची ओढ अलगद तुझ्या मनाशी जुळावी
    नदीकिनारी भेट तुझी अवचित व्हावी
    न मी राधा न तू कृष्ण परी वीण गुंतावी
    मनाची हाक अलवार तू समजून घ्यावी
    हृदयस्थ अंतरीची साद माझी तुला कळावी

    -- स्वाती ठोंबरे.

      December 6, 2021


  • जादू

      April 17, 2012


  • दर्शनाची ओढ

    पांडूरंगाचे दर्शन घेण्या, गेला पंढरपूरी ।
    चुकली नाही कधीही, आषाढी कार्तिक वारी ।।
    आजपरी शरीर दुबळे साथ देईना ।
    मन तजेले दर्शन घेण्या हट्ट सोडीना ।।
    आधार घेऊनी आज कुणाचा गेला पंढरपूरी ।
    भरून आले डोळे त्याचे बघता शिखर मंदिरी ।।
    आशा नव्हती थोडी देखील दर्शन मिळण्या तेथे ।
    अंगणीत जमले भक्त गण नाचत सारे होते ।।
    चार दिवस पडून होता विठ्ठल विठ्ठल गजरी ।
    फिरणे नाही मागे अशी मनीची तयारी ।।
    गेला नाही कण अन्नाचा चार दिवस पोटी ।
    ध्यास लागला मनी एकची त्याच्याच भेटीसाठी ।।
    टाळ मृदुंग विठ्ठल नामी एक रूप झाला ।
    नाचत नाचत प्रभू चरणी येऊन तो पडला ।।
    विलीन झाला अनंतात तो फिरूनी नाही उठला ।
    देह सोडूनी पांडूरंगी चरणी वैकूंठी गेला ।।
    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      January 1, 2018