एक दिवस तुझी अन माझी गाठ पडावी

एक दिवस तुझी अन माझी गाठ पडावी
अलवार भावनांची मेळ सहज जुळावी
मन ओढ ओली हळवी तुझ्यात सांज फुलावी
माझ्या मनाची तुझ्या मनाशी वीण जुळावी
हात तू माझा हातात अलगद घेऊनी
अंतरतील दुःखरी नस तुला कळावी
घट्ट मिठीत तुझ्या मी ओथंबून रडावी
तुझ्या मिठीत आर्त व्याकुळ मी मोहरावी
न कसला पाश न जाणिव कसली रहावी
तुझ्या माझ्या स्पर्शात वासना मुळीच न रहावी
परी तुझी भूल मज अलगद क्षणी पडावी
मनाची ओढ अलगद तुझ्या मनाशी जुळावी
नदीकिनारी भेट तुझी अवचित व्हावी
न मी राधा न तू कृष्ण परी वीण गुंतावी
मनाची हाक अलवार तू समजून घ्यावी
हृदयस्थ अंतरीची साद माझी तुला कळावी

-- स्वाती ठोंबरे.



एक दिवस तुझी अन माझी गाठ पडावी
अलवार भावनांची मेळ सहज जुळावी
मन ओढ ओली हळवी तुझ्यात सांज फुलावी
माझ्या मनाची तुझ्या मनाशी वीण जुळावी
हात तू माझा हातात अलगद घेऊनी
अंतरतील दुःखरी नस तुला कळावी
घट्ट मिठीत तुझ्या मी ओथंबून रडावी
तुझ्या मिठीत आर्त व्याकुळ मी मोहरावी
न कसला पाश न जाणिव कसली रहावी
तुझ्या माझ्या स्पर्शात वासना मुळीच न रहावी
परी तुझी भूल मज अलगद क्षणी पडावी
मनाची ओढ अलगद तुझ्या मनाशी जुळावी
नदीकिनारी भेट तुझी अवचित व्हावी
न मी राधा न तू कृष्ण परी वीण गुंतावी
मनाची हाक अलवार तू समजून घ्यावी
हृदयस्थ अंतरीची साद माझी तुला कळावी

— स्वाती ठोंबरे.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →