सारेच आहे प्रभूमय,
अणूपासून ब्रह्मांड होय...१,
ब्रह्मांड भाग तो ईश्वराचा,
आकाश भाग हा ब्रह्मांडाचा....२,
सर्वत्र व्यापले आकाश,
न जाणती त्याचे पाश, ....३,
वायूचा होवून संचार,
जीव जंतू जगविणार....४
वायू असे शक्तीचे रूप,
पेटवी तो प्राणदीप....५,
प्राण आपल्या अंतरी,
तेच असे रूप ईश्वरी....६
जसे शिव आणि शक्ती,
तसे प्राण व वायू असती...७,
बाहेरची वायू शक्ती,
अंतरिच्या प्राणास भेटती....८,
जाता दोन्ही एक होवूनी,
चेतना मिळते जीवनी...९
- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
July 12, 2016
सत्य ! एकमेव हेची जीवनी । पुनरपी जननं, पुनरपी मरणं ।
August 22, 2021
मानव जीवन तुम्हां लाभले, महत् भाग्य ते समजावे
कर्म दिधले पाठी तुमच्या, सद्उपयोगी यांसी करावे....१,
जीवन रेखा मर्यादेतच, ठेवली असती तुमचे हातीं
जाणीव त्याची मनीं असावी, कर्म कार्ये जेव्हां करिती...२,
हाती घेतल्या कार्यामध्ये, एकचित्त तो प्रयत्न व्हावा
काळ केवढा तुमचे जवळी, याचा विचार सतत यावा...३,
कार्ये राहता अपूर्ण अशी, वेळ न उरे तुमचे हाती
अभाव असता योजनेचा, अपयश ते पदरी पडती....४
कार्य व्याप्तीची दिशा असावी, शक्ती साधन काळ बघूनी
जीवन यशाचा आनंद खरा, लुटाल तुम्ही हे ध्या जाणूनी.....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
October 22, 2019
ठिणगी पडूनी पेटे ज्वाला, आकाशाला जावूनी भिडती
नष्ट करूनी डोंगर जंगल, हा: हा: कार तो माजविती...१
शब्दांची ही ठिणगी अशीच, क्रोधाचा तो वणवा पेटवी
मर्मघाती तो शब्द पडतां, अहंकार तो जागृत होई...२,
सूड वृत्तीचा जन्म होवूनी, वातावरण ते दुषीत होते
संघर्षाचा अग्नी पेटूनी , जीवन सारे उजाड करिते...३,
कारण जरी ते असे क्षुल्लक, विनाश व्याप्ती होई भयकंर
केवळ तुमचे प्रेमळ शब्द, दुष्ट चक्र ते थांबवी सत्वर ….४
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 8, 2019
जगता, जगता जगती
अनामिका शोधीत राहिलो..
हितगुज अव्यक्त मनाशी
नित्य मीच करित राहिलो...
वळणा वळणावरुनी
अज्ञाना उलगडीत राहिलो...
नेत्री केवळ ध्यास तुझा
येरझारा घालीत राहिलो...
कधीतरी भेटशील एकदा
भक्तीभावनां जपत राहीलो...
वेडी आशा वेडी आसक्ती
नकळे तुझ्यात मग्न राहिलो
रचना क्र. ९०
२९/७/२०२३
-वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
August 18, 2023
बहूमोल निसर्ग ठेव, निरनिराळे स्वभाव
उमटविती भाव मनावर आमच्या ||१||
चांदण्याची शितलता, मनाची प्रफूल्लता
देहाची आल्हादकता लाभली चंद्राचे ठायी ||२||
नाजूक सहवास, मधूर मिळे वास,
कोमलतेचा भास जाणविला फूलांनी ||३||
रंगाची विविधता, छटाची आकर्षकता,
मनाची वेधता इंद्रधनुष्य देई || ४||
पळण्याची चपलता, फिरण्याची चंचलता,
वेगाची तीव्रता, भासे हरिणाच्या पायी ||५||
प्रवाहाची संथता, पाण्याची खळखळता,
स्वभावाची निर्मलता, समजली नदीमुळे ||६||
शक्तीचे दर्शन, क्रूरता भयान,
निर्दयतेची जाण, दिसली हिंस्त्र पशूत ||७||
जीवनाची प्रेमलता, हृदयातील अक्षरता,
भावनेची कोमलता मातेच्या रुपाने मिळाली ||८||
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
November 5, 2016
काळ्याशार तमांमध्ये,
पाणीही बनते कुट्ट काळे,
रंग खेळती मजेत तिथे,
पंचमीची क्रीडा चाले,--
पिवळसर, सोनेरी, हिरवटसे,
विचरती पाण्यात रांगेने,
बिंदू सारे प्रतिबिंबित कसे,
पाहती डोकावून,उत्कंठेने,--!!!
वाकून खाली सगळे जरासे,---
प्रतिमा आपुलीच न्याहळत,
घेती धडे एकरुपतेचे,--,
पुढे पुढे सरकत,सरकत,
एक दुसऱ्यात असा मिसळे,
एकत्रीकरण जणू कंगोऱ्यांचे,--!!!
विविधरंगी त्यांची दुनिया,
मूळ रंग मात्र एकच असे, विविधतेतून एकता ना,
सर्वकाळी त्यांच्यात दिसे,--!!!
मोहक सुंदर जे अतुलनीय,
बघणारा पाहत राहे, ---
सौंदर्याची दिसता,खाण
निसर्ग अशीच लयलूट करे,--!!!
हिमगौरी कर्वे.©
August 30, 2019
वाटते सारे विसरुनी जावे
परी आठव व्याकुळ करते...
श्वासात रुतलीस तूं अशी
तुज उसविणे जीवघेणे असते...
रुधिरातील तुझीच सळसळ
लोचनातुनी अविरत पाझरते...
सांग कसे, तुज भुलुनी जावू
स्मरण तुझेच जगवित असते...
विस्मरणे कां असे इतुके सोपे
अंती सरणीही ते सोबत असते
वि.ग.सातपुते.( भावकवी )
(976654908 )
रचना क्र. २६९
२३/१०/ २०२२
October 29, 2022
आई अंबाबाई
तू दर्शनाला ये गं
तुझ्या भक्तित लिन मी
मन माझे बावरे गं
सातपुडा डोंगर रांगा
तिथेच तुझी वस्ती गं
थकला हा जीव माझा
दर्शना मी कशी येऊ गं
नवस मला फेडायचा
जोगवा मला मागायचा
गोंधळ तिथे घालायचा
जागर मला करायचा
मन माझे बावरे गं
चुकलं का ,ही भिती गं
आशिर्वच घेण्या तुझे
मनोमनी आतुर गं
मन माझे बावरे गं
-- सौ. माणिक (रुबी)
December 3, 2019
November 20, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti