(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • तुझ्यासाठी ग फक्त तुझ्यासाठी

    तुझ्यासाठी ग फक्त तुझ्यासाठी
    माझ्या मेंदूला कंप सुटतात
    हृदयात वेदना रोज होतात...
    तुझ्यासाठी ग फक्त तुझ्यासाठी
    माझे डोळे अश्रूंनी ओलावतात
    माझी स्वप्ने सारी भंगतात...
    तुझ्यासाठी ग फक्त तुझ्यासाठी
    माझे दिवस वाया जातात
    माझे विचार स्वैर होतात...
    तुझ्यासाठी ग फक्त तुझ्यासाठी
    माझ्या क्षणांचे तास होतात
    माझ्या जगण्याचे बारा वाजतात

    कवी - निलेश बामणे ( एन. डी.)

      June 2, 2017


  • तुझ्या असण्याचा मला भास होतो

    vinod_10

      July 30, 2016


  • भाव जाण तू देवा

    कर पडले चरणीं

    भाव जाण देवा ।।धृ।।

    देह झुकला पुढती

    लिनतेनें मान वाकती

    मनाची करूनी एकाग्रता

    भावनेला वाट देतां

    अश्रू दाटले नयनी अंतरीचा दिसे ओलावा १

    कर पडले चरणी भाव जाण देवा,

    प्रथम येई भावना,

    जागृत करते मना

    मनाचा ताबा देहावरी

    तच तुजला प्रणाम करी

    घे प्रभू जाणूनी अत:करणातील ठेवा २

    कर पडले चरणी भाव जाण देवा

    मुखी नाम तुझे घेई

    देह सारा शहारून जाई

    आनंदाची फूटते उकळी

    नाचते मन सर्व काळी

    मनाचा चंचल स्वभाव समजोनी तू घ्यावा ३

    कर पडले चरणी भाव जाण देवा

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      May 5, 2020


  • दृष्टांताची किमया

    निराकार तो असूनी व्यापतो,

    सर्व विश्व मंडळ,

    सूक्ष्मपणातही दिसून येतो,

    करी जगाचा प्रतिपाळ ।।१।।

    दर्शन देण्यास भक्त जणांना,

    धारण करितो रूप,

    तसाच दिसे नयनी तुमच्या,

    ध्यास लागता खूप ।।२।।

    दृष्टांत होणे सत्य घटना ती,

    जीवनी तुमच्या घडे,

    वेड लागता प्रभू चरणाचे,

    सदैव स्वप्न पडे ।।३।।

    कुणामध्येही अस्तित्व दाखवी,

    हीच त्याची किमया,

    परि टिपून घेई खऱ्या भक्ताची,

    दृष्टांताची ही माया ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      March 4, 2021


  • आता तरी लस घे…

    नकोसा झालाय हा करोना
    सहनही होत नाही आणि
    सांगताही येत नाही

    ह्याच्या झळा पार होरपळून टाकतात
    ह्याच्या असण्याने शब्दही शब्दाला गिळून टाकतात

    का हा असा छळतो
    काही कळत नाही
    मन सतत पळ म्हणत
    पण तो काही पळत नाही

    दुःखाच्या घेऊन येतो लाटा
    जगण्याच्या बंद करतो वाटा
    माणूस फक्त करतोय आटापिटा
    पण श्वास मात्र थांबत जाई

    जीवनचक्र मात्र चालू राहणार ,
    उद्याचा दिवस आपणही पाहणार

    विषाणूच तो आता दमलाय
    त्याच्याच मैताचा खेळ मांडलाय
    ठरलाय आता आपला way
    येतोय 1 मे
    आता तरी लस घे...

    -- © मकरंद आपटे 2021

      April 30, 2021


  • असा मी काय केला गुन्हा?

    कुठले नाते? खरे की खोटे?
    काही कळेनासे वाटे !
    बंधने तोडोनी नात्यांची,
    इज्जत गेली पुर्षार्थाची !

    कशी नाही रे शर्म वाटली तुला,
    आपल्याच मुलीची अब्रू लुटतांना?
    जन्मदात्यानेच अब्रू लुटल्यावर,
    समजले मला आईच्या नशिबीचे भोग !
    विश्वासावे सख्या भावावर,
    पण त्यानेही केला कळस सर्वांवर !

    जन्मल्याच केली असतीस हत्या तर,
    निदान अब्रू आली नसती चव्हाटयावर !
    तूटले असते माझे नाते तुमच्या बरोबरचे
    मुलगी आणि बहिणीचे !

    काय माझ्याकडून प्रज्ञापराध झाले,
    ज्याने मी अनाथ आणि पोरकी झाले !
    बेअबृची लक्तरे माझ्या नावापुढे चिकटली,
    आणि जीवनाची घडी विस्कटली !

    देवा हात झाडूदेत स्त्रीची अब्रू लुटणाऱ्यांचे,
    तरच देवा मिळेल तिला खरा ज्ञाय !
    चित्र दिसूदे स्त्रीचा सन्मान करतांना,
    नाहीतर लागेल सर्वांना तिची हाय !

    देवा शिकव सर्व नराधमांना,
    स्त्रीचा मान ठेवायला !
    आणि सुरक्षा देण्याला,
    नाहीतर दिसेल इतिहासाची पुनरावृत्ती होतांना !!

    स्वप्नातही आणू नकोस अशी काळ-वेळ कुणावर,
    नाहीतर निसर्ग कोपेल आपल्यावर !

    जगदीश पटवर्धन

      September 4, 2015


  • ज्ञान साठा

    जमीन खोदतां पाणी लागते, हीच किमया निसर्गाची,

    कमी अधिक त्या खोलवरती, साठवण असे जलाशयाची.....१,

    प्रत्येक जणाला ज्ञान देवूनी, समानता तो दाखवितो,

    अज्ञानाचा थर सांचवूनी, आम्ही आमचे ज्ञान विसरतो.....२,

    एक किरण तो पूरे जहाला, अंधकार तो नष्ट करण्या,

    ज्ञान किरण तो चमकूनी जातां, फूलून येते ज्ञान वाहण्या.....३

    डॉ. भगवान नागापूरकर

    9004079850

    bknagapurkar@gmail.com

      February 19, 2019


  • केवढ्या चालल्या हालचाली

    केवढ्या चालल्या हालचाली तुझ्या

    सांगते खुणवते देहबोली तुझ्या //

    मोहवीते तुझे हसणे लाघवी

    ओळखीच्या मला घालमेली तुझ्या //

    वाट पाहत उगा भटकलो त्या स्थळी

    भेटलो आज त्या पानवेलीं तुझ्या //

    मागुनी येऊनी हात नयनापुढे

    आठवे मागच्या बोलचाली तुझ्या//

    दिसते सारखी 'कौशला ' का बरे ?

    स्फुरते काव्य....... ना काळवेळा तुझ्या//

      February 24, 2019


  • उमलणारी फुले

    चोर पावली येता तुम्हीं, साव असूनी खऱ्या
    फुलराण्या स्वर्गामधल्या, नाजुक नाजुक पऱ्या
    निद्रिस्त जेंव्हा विश्व सारे, संचारी भुमंडळीं
    स्वागता रवि उदयाचे, उमलताती सकाळीं
    चाहुल न ये कुणासी, तुमच्या अगमनाची
    प्रफुल्लतेनें मन देते, पोंच सौंदर्याची
    आकर्शक ते रंग निराळे, खेची फुलपाखरें
    मधू शोषण्या जमती तेथे, अनेक भोवरे
    सुगंध दरवळून वातावरणीं, प्रसन्न चित्त करी
    जागे करीती जगास, चैतन्यमय त्या लहरी
    हास्यमुखानें समर्पण

    होती, प्रभूचे चरणावरी
    क्षणिक असले जीवन सारे, सार्थकी लागते तरी.

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    e-mail - bknagapurkar@gmail.com

    -- डॉ. भगवान केशवराव नागापूरकर

      March 15, 2014


  • स्वप्नांच्या उपवनात नव्हता त्या सुमनांचा वावर

    स्वप्नांच्या उपवनात नव्हता त्या सुमनांचा वावर

    गझल; जाती: समजाती-पद्मावर्तनी-लवंगलता; मात्रा: ८+८+८+४=२८मात्रा

      March 11, 2018