शब्दाची ठिणगी

ठिणगी पडूनी पेटे ज्वाला, आकाशाला जावूनी भिडती
नष्ट करूनी डोंगर जंगल, हा: हा: कार तो माजविती...१

शब्दांची ही ठिणगी अशीच, क्रोधाचा तो वणवा पेटवी
मर्मघाती तो शब्द पडतां, अहंकार तो जागृत होई...२,

सूड वृत्तीचा जन्म होवूनी, वातावरण ते दुषीत होते
संघर्षाचा अग्नी पेटूनी , जीवन सारे उजाड करिते...३,

कारण जरी ते असे क्षुल्लक, विनाश व्याप्ती होई भयकंर
केवळ तुमचे प्रेमळ शब्द, दुष्ट चक्र ते थांबवी सत्वर ….४

-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

ठिणगी पडूनी पेटे ज्वाला, आकाशाला जावूनी भिडती
नष्ट करूनी डोंगर जंगल, हा: हा: कार तो माजविती…१

शब्दांची ही ठिणगी अशीच, क्रोधाचा तो वणवा पेटवी
मर्मघाती तो शब्द पडतां, अहंकार तो जागृत होई…२,

सूड वृत्तीचा जन्म होवूनी, वातावरण ते दुषीत होते
संघर्षाचा अग्नी पेटूनी , जीवन सारे उजाड करिते…३,

कारण जरी ते असे क्षुल्लक, विनाश व्याप्ती होई भयकंर
केवळ तुमचे प्रेमळ शब्द, दुष्ट चक्र ते थांबवी सत्वर ….४

— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

Author