पाझर

वाटते सारे विसरुनी जावे
परी आठव व्याकुळ करते...

श्वासात रुतलीस तूं अशी
तुज उसविणे जीवघेणे असते...

रुधिरातील तुझीच सळसळ
लोचनातुनी अविरत पाझरते...

सांग कसे, तुज भुलुनी जावू
स्मरण तुझेच जगवित असते...

विस्मरणे कां असे इतुके सोपे
अंती सरणीही ते सोबत असते

वि.ग.सातपुते.( भावकवी )

(976654908 )

रचना क्र. २६९

२३/१०/ २०२२



वाटते सारे विसरुनी जावे
परी आठव व्याकुळ करते…

श्वासात रुतलीस तूं अशी
तुज उसविणे जीवघेणे असते…

रुधिरातील तुझीच सळसळ
लोचनातुनी अविरत पाझरते…

सांग कसे, तुज भुलुनी जावू
स्मरण तुझेच जगवित असते…

विस्मरणे कां असे इतुके सोपे
अंती सरणीही ते सोबत असते

वि.ग.सातपुते.( भावकवी )

(976654908 )

रचना क्र. २६९

२३/१०/ २०२२

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →