(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • दोन पेगची मजा

    थोडी थोडी प्या
    घाई करायची नाही
    दोन पेगची मजा
    चार पेगमध्ये नाही

    नको तो हॅंगओव्हर
    दुसरा दिवसही छान
    पिताना राहू द्या
    थोडे तरी भान

    फुकट मिळाली तरी
    जास्त ढोसू नका
    घ्या तुम्हीच काळजी
    नको ते वका वका

    ग्लासकडे लक्ष द्या
    खम्ब्याकडे नको
    मला घरी सोडा
    मित्रांना विनंती नको

    चालता आले पाहिजे
    चालविता आली पाहिजे
    आपल्याच घरी आपल्याला
    जाता आले पाहिजे

    मजा लेना है पिने का
    आठवा पंकज उधास
    प्या थोडी थोडी
    आयुष्यभर प्या झकास

    डॉक्टरनी मनाई करणे
    यासारखी सजा नाही
    दोन पेगची मजा
    चार पेगमध्ये नाही

    -- आम्ही साहित्यिक ग्रुप वरुन

      May 15, 2019


  • क्रौंच पक्षाला मुजरा

    पौराणिक कथा सांगते. क्रौंच पक्षाची जोडी रासक्रिडा करीत असता, निषादाने नेम साधला व एकास घायाळ केले. तो तडपडू लागला. जवळून त्याच वेळी महान ऋषी वाल्मिकी जात होते. ते करुण दृष्य बघतांच त्याच्या तोंडून जे शब्द बाहेर पडले ते पद्य रुपातले होते.

    " मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः
    यत् क्रौंचमिथुनादेकमवधीः काम मोहितम् "
    (जगातले तेच प्रथम पद्यकाव्य समजले गेले.)

    क्रौंच पक्षाला मुजरा

    कारुण्यामधूनी उगम पावला
    आद्य काव्याचा झरा
    वंदन करितो क्रौंच पक्षा
    घे मानाचा मुजरा १

    गमविले नाहीं व्यर्थ प्राण ते
    निषाधबाणा पोटीं
    टिळा लावला काव्येश्वरीनें
    मानानें तुझ्या ललाटीं २

    ह्रदयस्पर्शी जी घटना घडली
    तडफड तव होतां
    कंठ दाटूनी शब्द उमटले
    पद्यरुप घेतां ३

    उगम पावतां काव्यगंगा ही
    वाहू लागली भूलोकी
    वाल्मिकी, व्यास, ज्ञानोबा,तुका
    अशांचे आली मुखी ४

    काव्यप्रवाह हा सतत वाहे
    कितीक जणांच्या शब्दातूनी
    अंशरुपानें काव्येश्वरी ही
    बरसे व्यक्त होऊनी ५
    (कविता)

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

      May 11, 2012


  • तन्मयतेत आनंद – प्रभू

    सतत गुंतलो आहो सारे

    शोध घेण्यास त्या 'आनंदाला'

    युगानूयुगे प्रयत्न होतो

    मिळवण्यासाठींच प्रभूला...१

    बाह्य जगाचे सुख आगळे

    लागले सारे त्याच्या पाठीं

    'देह सुख' अंतीम वाटे,

    खरा 'आनंद' देण्यापोटी...२

    'ज्ञानामध्ये' भरला 'आनंद'

    समजूत झाली ही कांहींना

    लेखक, कवी, साहीत्यिक हे

    पाठ त्याची कांहीं सोडीना...३,

    साधू संत हे थोर महात्मे

    आनंद शोधूती 'विश्रमांत'

    'ध्यान' लावून एक मनानें

    शांत होवूनी डूबती त्यांत...४,

    आनंदची 'मोक्ष' असून

    ध्येय साऱ्यांचे त्याजकडे

    मार्ग सर्वांचे वेगळे असून

    'तन्मयता' खेची प्रभूकडे...५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      September 25, 2020


  • गतकाळ विसर

    विसरून जा भूतकाळ तो, नजर ठेवूनी भविष्यावरी,

    वर्तमानी राहून प्रवाही, जीवन सारे यशस्वी करी....१,

    व्यर्थ होतील प्रयत्न तुझे, उगाळता गत आठवणी,

    खीळ पडेल उत्साहाते, अपयश आले हे जाणूनी...२,

    ज्ञान जगाचे मिळूनी तुला, जन्म जहाला आजच खरा

    अनुभवी नव बालक तूं, वाहून नेई जीवन धुरा...३

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      September 3, 2019


  • अंतःकरणातील वारी

    वारी ही केवळ पावलांची नसते,
    ती आत्म्याने परमात्म्याकडे निघालेली
    निःशब्द, निरंतर यात्रा असते.

    डोक्यावर तुळशीची माळ असो वा नसो,
    ओठांवर नाम असो वा नसो,
    मनात भक्तीचा एक दिवा तेवत राहिला की,
    प्रत्येक वाट पंढरीकडेच वळते.

    कधी अश्रूंची चंद्रभागा वाहते,
    कधी स्मितहास्यच प्रसाद बनतो.
    कधी भुकेल्याला दिलेला एक घास,
    कधी दुःखी मनावर फिरवलेला मायेचा हात,
    याच क्षणांत विठ्ठल
    निःशब्दपणे भेटून जातो.

    अहंकाराचे शेवटचे पान गळून पडते,
    तेव्हाच भक्तीची नवी पालवी फुटते.
    स्वार्थाची धूळ झटकून
    जेव्हा मन अनवाणी चालू लागते,
    तेव्हा प्रत्येक श्वासातून
    "विठ्ठल... विठ्ठल..." असा नामनिनाद दुमदुमतो.

    संसाराच्या वाटेवर
    ऊनही असते... पाऊसही असतो...
    कधी काटे टोचतात,
    कधी पाय रक्ताळतात.
    पण अंतःकरणात उभा असलेला सावळा विठू
    हात धरून चालवत राहतो,
    म्हणून भक्ती कधीच थकत नाही.

    माझ्या हृदयाचे मंदिर व्हावे,
    प्रेमाचा अखंड नंदादीप तेवत राहावा.
    दयेची आरती,
    क्षमेचा गंध,
    सेवेचा नैवेद्य,
    आणि माणुसकीचाच हरिपाठ
    माझ्या जीवनात अखंड घुमत राहावा.

    मला नको वैभव,
    नको कीर्ती, नको मान.
    माझ्या प्रत्येक श्वासात
    फक्त गुंजत राहो तुझेच नाम.

    आणि शेवटचा क्षण जेव्हा येईल,
    तेव्हा डोळे मिटताना
    तुझ्या विटेवरील सावळे रूप दिसावे.
    ओठांवर अखेरचा शब्द
    "विठ्ठल..." असावा,
    आणि आत्म्याची अंतिम वारी
    तुझ्याच चरणी विसावावी.

    कारण...

    ज्याच्या अंतःकरणात विठ्ठल जागा होतो,
    त्याला पंढरपूर गाठण्यासाठी
    रस्त्यांची गरज भासत नाही.

    ज्याच्या हृदयात प्रेम, दया आणि माणुसकी नांदते,
    त्याच्या अंतरी
    रोज आषाढी, रोज कार्तिकी फुलत असते.
    आणि त्याच्या प्रत्येक श्वासात
    अखंड विठ्ठलाची वारी सुरूच असते.
    म्हणूनच...
    अंतरी जेथे विठ्ठल नांदे, तेथेच पंढरी वसे.
    प्रेम, दया, नामस्मरणात, जीवन धन्य होऊन हसे.

    •ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
    मो:- 9011841212

      June 14, 2026


  • आरती ओजस बाळाची

    सुमनांजली या काव्यसंग्रहातून….. 

      May 29, 2012


  • स्वप्न

    भूतकाळाला विसरून,
    वर्तमानात सुधारण्याच्या
    सतत प्रयत्नात असतो डोळस
    रचत स्वप्नांचे मनोरथ !

    डोळसांनी बघितलेली असतात स्वप्न
    त्यांच्या मनातली
    त्यांनी पाहिलेली
    उघडया डोळ्यांनी !

    डोळसांनी जीवनात
    रंगीत, काळं-बेरं, चांगलं-वाईट
    बघितलेलं असतं, अनुभवलेलं असतं
    पण स्वप्नातील वास्तवात नको असतं !

    जन्मताच अंध असलेल्यांची
    ओळखच नसते रंगांशी,
    आकार, उकारांशी,
    चांगल्या वाईटाची !

    त्यांना कधी स्वप्न
    पडत असतील का?
    कसे असतील त्यांच्या
    स्वप्नातील रंग, आकार, ऊकार !

    काय असतील मनोरथ?
    देवा त्यांचे दु:ख त्यांना ठाऊक
    याच जन्मी बघ रे त्यांना
    डोळस होता आलं तर !

    बघूदे त्यांना तुझे चरण,
    अनुभवूदेत तुझे अकारण कारुण्य,
    हे विश्व, हा निसर्ग,
    पुढच्या जन्मी तरी
    नको रे त्यांच्या पदरी अंधार !

    जगदीश पटवर्धन

      August 14, 2015


  • प्राणिमात्रा विषयीं दया

    चाललो होतो मित्रासह सहल करण्या एके दिनीं

    आनंदाच्या जल्लोषात आम्हीं गात होतो सुंदर गाणीं १

    वेगामध्यें चालली असतां आमची गाडी एका दिशेने

    लक्ष्य आमचे खेचले गेले अवचित एका घटनेने २

    चपळाईनें चालला होता काळसर्प तो रस्त्यातूनी

    क्षणांत त्याचे तुकडे झाले रस्त्यावरी पडला मरूनी ३

    काय झाले कुणास ठाऊक सर्व मंडळी हळहळली

    जीव घेणाऱ्या प्राण्यालाही सहानुभूती ती लाभली ४

    अंत:करणीं दया भाव तो असतो ईश्ररी गुणधर्म

    जीवमात्रीं वसला असूनी निर्मितो आपसातील प्रेम ५

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      May 21, 2019


  • निर्धार

    गेले वर्ष असेच गेले.
    शाळेला नाही जाता आले.
    पण या वर्षी मी शाळेत जाणार ग.
    आई मी शाळेत जाणार
    आता या नवीन वर्षात
    मी नक्की जाणारच शाळेत.
    आता करोनाला नाही मुळीच भिणार.
    आई मी शाळेत जाणार ग
    मास्कही बांधणार रोज नाकावर.
    चालणं बसणं खेळणं सारेच अंतरावर.
    पण मित्रांची सोबत नाही सोडणार
    आई मी शाळेत जाणार ग.
    खूप खूप मी आहे शिकणार.
    पुढे पुढे प्रगती मी करणार.
    आता मला कुणीही नाही रोखू शकणार.
    आई मी शाळेत जाणार ग.
    आई मी शाळेत जाणार ग
    -- सौ कुमुद ढवळेकर.

      January 15, 2022


  • खंत मनी ! मी काय प्रार्थू ?

    समजावू कसे या मनाला
    जे शोधिते अजूनही तुला..
    आजही लोचनी रूप तूझे..
    तुझाच ध्यास या जीवाला..
    एकमेकांवरी नि:सिम प्रीती
    तुझी न माझी, जडली होती
    पाहता , पाहताच एकमेकां
    प्रीतीभाव आगळा रुजला..
    नि:शब्दुली ! भाषा मनांची
    अंतरंगी सारीच प्रीतभारली
    कटाक्षी प्रीती, स्मित लाघवी
    जगवित होती तनमनांतराला..
    जरी निर्व्याज ही सत्यप्रीती
    प्रारब्ध्ये दुरावाच हा भाळी
    तुजविण सारे निरर्थ जीवन
    हाच दुर्दैवी शाप जीवाला..
    क्षणक्षण सारे आज हरवले
    त्राणही क्षीण , संथ जाहले
    सांजवेळी साऱ्या आठवणी
    विमनस्क करती जीवाला..
    आज प्रश्न ? मी काय प्रार्थू ?
    ओशाळले जीवन सारे सारे
    घायाळ जाहली जरी स्पंदने
    अंती तुझाच ध्यास जीवाला..

    ©️ वि.ग.सातपुते.(भावकवी)

    रचना क्र. ३७

    दिनांक:- १० - ३ - २०२१

      June 7, 2021