(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आठवण येते

     

      January 7, 2014


  • निर्विकार

    गर्दित रोज दिसतात ओळखीचे चेहरे
    अगदी निर्विकार जणु ओळखच नाही

    न बोलणे, न हसणे, न मान डोलविणे
    जणु कुणीच एकमेका पाहिलेच नाही

    मग्न असती सारेच आपुल्या विचारात
    इथे कुणाचे कुणाला काही पडले नाही

    स्वतःच्या सुखासाठीच जो तो जगतो
    अन्य कुणाचा विचार मना शिवत नाही

    मी भला, माझे भले नको कुणी दूसरे
    आता नाते सहृदयी कुठेच उरले नाही

    भावनां शुष्क कोरडया, रुक्ष नाती सारी
    आता ओलावा अंतरीचा दिसतच नाही

    संवादाविण कां ? जीव हा सुखात जगतो
    सांगावे कसे कुणास हेच कळतच नाही
    ***********

    --वि.ग.सातपुते (भावकवी)

    (9766544908)

    रचना क्र. ३१६

    १/१२/२०२२

      December 13, 2022


  • अतिरेकी सरकार

    जखमा उरांत माझ्या,
    आहेत अजूनी ताज्या,
    शासनकर्त्या नाकर्त्या तू
    हो आता तरी जागा
    गेंडयाच्या तव कातडीची तू,
    कुठवर राखशी नीगा?
    त्यापरीस ह्या हल्ल्यांचा तू
    काढ शोधूनी धागा
    स्फोट मालिका सदाच घडती,
    मुंबापुरीच्या कुशीत,
    निद्रीस्त सुरक्षा तुझी,
    घुसती अतिरेकी वेशीत
    पूरे जाहले नाटक तुमचे,
    समिती-चौकशी--खटल्याचे,
    वरातीमागून धावत येते,
    घोडे तुमचे नित्याचे
    जनतेच्या मग पैशावरती,
    दान वाटिता लाखाचे ,
    कसे कळावे मोल तुम्हांला
    निरपराध्यांच्या मरणाचे?
    ह्याचसाठी कां हुतात्म्यांनी
    रक्त होते सांडिंले?
    स्मरुन त्यांना गिरवा थोडे
    देशभक्तीचे धडे
    गिरवा माणुसकीचे धडे

    -- सौ. अलका वढावकर

      February 13, 2016


  • जीवन गुलाबा परि

    जीवन असावे गुलाबा सारखे,
    सहवासे ज्याच्या मिळताती सुखे ।।१।।

    सुगंध तयाचा दरवळत राही,
    मनास आमच्या समाधान होई ।।२।।

    नाजूक पाकळ्या कोमल वाटती,
    सर्वस्व अर्पूनी गुलकंद देती ।।३।।

    विसरूं नका ते काटे गुलाबाचे,
    बसती लपूनी खालती फुलांचे ।।४।।

    सुखाचे भोवती सावट दु:खाचे,
    जीवन वाटते झाड गुलाबाचे ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      December 10, 2016


  • नाम घेता राघवाचे

    नाम घेता राघवाचे (भक्ती गीत)
    नाम घ्यावे सदा मुखी राघवाचे

    करितो तोची सार्थक जीवनाचे
    भुरळ पडे षडरिपूंची जिवा
    तया नामे लागे अंतरीचा दिवा
    क्षालन होईल वाईट कर्माचे
    नाम घ्यावे सदा मुखी राघवाचे 1

    बळे करिता चित्त कोठे रमेना
    समाधान ते काही केल्या मिळेना
    उठता मनीं वादळ विचारांचे
    नाम घ्यावे सदा मुखी राघवाचे 2

    मन अडले नित्य भव सागरी
    कशा मिळतील सुखाच्या घागरी
    मार्ग न दिसे जीवनी तरण्याचे
    नाम घ्यावे सदा मुखी राघवाचे 3

    तोची जगी असे कर्ता करविता
    शरणची आले तुज भगवंता
    लाभावे भाग्यची मज दर्शनाचे
    नाम घ्यावे सदा मुखी राघवाचे 4

    वैशाली वर्तक
    अहमदाबाद

    आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुप

      February 15, 2024


  • चिऊताई

    चिऊताई चिऊताई भिजतोय गं मी, दार उघड
    तू नको माझ्या घरात,जा कुठेतरी दड
    चिऊताई चिऊताई कुडकुडतोय गं मी, दार उघड
    उठ जा इथून रे, मला नाही सवड
    चिऊताई चिऊताई खिडकीचे तरी कवाड उघड
    खिडकीतून येईल पाणी नकोचं ती धडपड
    चिऊताई चिऊताई मनाचे तरी दार उघड
    मला ऐकायचीचं नाही तुझी बडबड
    चिऊताई चिऊताई मी गेलो, आता तरी डोळे उघड
    येशील तुही कधीतरी बंद दारावर करीत धडधड
    पापपुण्याच्या गाठोड्याची तुझी तूच केलीय बघ निवड
    इथे प्रत्येकालाच प्रत्येकाची कधी न कधी पडते बघ नड!!
    -- वर्षा कदम.

      November 14, 2021


  • कन्या रत्न हे जन्मता

    कन्या रत्न हे जन्मता
    सदा असावे स्वागता
    जाईची रे भासे कळी
    ह्या अंगणामध्ये ती रांगता
    का खुडता रे सुगंधी कळी
    तीचं नशिब असे तीच्या भाळी
    का रक्ताने हात माखता
    घेऊन तो निष्पाप बळी
    आई म्हणजे ईश्वर असे
    मुलीमध्ये तो का न दिसे
    भावी जगाची तीच आई
    उमटते सोनपावलांचे ठसे
    शिवा जन्मला जिजा पोटी
    सावित्री झाली क्रांती ज्योती
    अन्यायाचा करण्यास अंत
    राणीच्या हाती तलवार होती
    येऊ द्या तीला ह्या जगती
    वंशाची समजा पणती
    पाहू द्या हे जग तीला ही
    आनंदाच्या क्षणासंगती
    आकाशी ती घेईल भरारी
    घेईल जिंकून दुनिया सारी
    फक्त एकदा जन्म घेऊ द्या
    करील जादू ती सोनपरी

    कवी - महेश सुखदेव पुंड
    तामसवाडी,ता - नेवासा, जि - अहमदनगर
    मो.नं - 8459043090

      January 13, 2020


  • सहजच सुचलं ते प्रेम………….

    मध्येच तुझी आठवण येऊन स्वतःशीच हसलो मी!
    चातका सारखी तुझी वाट पाहत बसलो मी!
    आज सकाळी न भेटताच निघून गेलीस तू,
    म्हणून स्वतः वरच रुसलो मी!
    तुझ्या डोळ्यातील ओघळणारे मोती,
    ओठांनी टिपतांना का रडलो मी!
    कधी झालं, कसं झालं कळेना मला,
    माझ्याही नकळत तुझ्या प्रेमात पडलो मी!
    प्रेम बीम झूठ आहे असं म्हणताना,
    तुझ्या प्रीतीत बेधुंद हरवलो मी!
    तुझ्या माझ्या रम्य आठवांच्या,
    शांत, शीतल छायेत रमलो मी!
    हेमंत
    ११-१२-२०२२
    --शिरीष बाग

      December 13, 2022


  • हक्क !

    हक्क तुझा,हक्क माझा,
    हक्क याचा अन त्याचाही.....
    पण मला एक सांगा.....
    हक्क कधी हक्काचा आहे का हो...?
    एकदा आसच चालत आसतांनी....
    रस्त्यानं.....!
    अविरत पहात व्हतो....
    वेगवेगळे रूपं....
    ना निरगुण न ही निराकार....
    ते तं होते,
    आंकुचित....,
    अन संकुचितही.....!
    व्याख्याच बदलली व्हती
    हक्कानं आपली....
    सिस्टीममध्ये व्हायरस घुसुनं
    फाईल करप्ट व्हावी
    तसा करप्ट झालता हक्क....!
    अन मंग काय,
    हक्कानं आपलीच संस्थानं तय्यार केली.......
    आपल्याच
    हक्काची......!!!
    स्वतःचीच......
    स्वतःसाठी
    हक्कानं चालवलेली.....!
    हक्कालं वावडं व्हतं....
    गरीबाच्या घामाच,
    भटक्याच्या पालाचं,
    श्रमिकाच्या झोपडीचं
    अन विद्रोहाच्या चोपडीचं...!!!
    हक्क पोचलाच नाही कधी
    रंजल्याजवळ बी आन गांजल्याजवळ बी.....
    ना पालात,ना रानात,
    नाही झोपडीत.....!
    तो तं.....
    आरामात राबतोय......
    संस्थानिकांच्या महालातं.....
    हक्कानं....!!!

    ©गोडाती बबनराव काळे, हाताळा,हिंगोली
    9405807079

      November 14, 2023


  • वैचारिक

    माझ्या भोवताली,
    माणसांचे रान,
    चहूबाजूंना असूनही,
    वाटा सुनसान,--!!!
    टोचे सले असे एकटेपण,--!!

    माझ्या भोवताली,
    नातीगोती किती,
    प्रश्न एकच पडे,
    विचारती किती,--
    टोचे सले असे एकटेपण,--!!

    माझ्या भोवताली,
    मित्रपरिवार किती,
    असंख्य हात निव्वळ,
    फक्त वर ते उठती,
    टोचे सले असे एकटेपण--!!

    माझ्या भोवताली,
    पिके खूप मतांची,
    उपयोगाला येती,
    त्यातील का कधी,--!!
    टोचे सले असे एकटेपण--!!

    माझ्या भोवताली,
    कितीक सहयोगी,
    असते का त्यांना,
    आंच हितचिंतनाची,--?
    टोचे सले असे एकटेपण,--!!!

    माझ्या भोवताली,
    माझे असे किती,
    प्रेम माया कुठली,
    आणावी आपुलकी,--
    टोचे, सले, असे एकटेपण--!!

    माझ्या भोवताली,
    इहलोकातील गर्दी,
    प्रांजळ निर्मळ,
    भावना कोणाची खरी,--
    टोचे सले असे एकटेपण,---!!!!

    हिमगौरी कर्वे.©

      August 6, 2019