(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आई-वडिलांना ओळखा

    खूपच रागा रागाने घराबाहेर पडलो... घरी परत जायचेच नाही, या इराद्यानेच!

    आज मला एवढा राग आला होता की रागाच्या भरात पप्पांचे बूट घातले...

    घर सोडले ते मोठा माणुस बनून येईन... आणि तेंव्हाच वडिलांना तोंड दाखवेन... जर मला एक मोटर सायकल घेऊन नाही देऊ शकत, तर कशाला मला इंजीनियर बनवण्याचे स्वप्न बघतात???

    आणि आज मी रागातच पप्पांचे पाकिट पण चोरून आणले होते, ज्याला पप्पांनी कधीही कोणालाही हात लावू दिला नाही.

    मला माहित होते यात नक्कीच पैसे कोणाला देतात याची हिशोब डायरी असणार, मला पण कळू दे किती माल लपून ठेवलाय ते ! त्यामुळेच आईला सांगून कोणालाही हात लावू दिला जात नव्हता?

    खुप मोठे विचार चक्र डोक्यात चालू होते, चालताना मला बूटातुन काहीतरी टोचत असल्याचे जाणवले... बूट काढून पाहिले तर टाचेतुन थोड़े रक्त आले होते, बूटातुन एक खिळा टोचत होता, त्रास तर झाला! पण राग; राग त्रासापेक्षा जास्त होता...

    रागातच पुढे चाललो...

    पुढे गेल्यावर दुसऱ्या बूटातुन ओले ओले जाणवले... रस्त्यावर पाणी सांडलेले होते. उडी मारताना पाणी बूटात आले, बूट पायातुन काढून पाहिले तर बूट खालून फाटलेला होता....

    तरीही रागातच लंगडत लंगड़त बस स्टँडवर आलो.

    पण दुर्दैव... तासभर एकही एस.टी.नव्हती...

    मग वेळ होता म्हणून पप्पांचे पाकिट तरी चेक करून पाहू... पाकिट उघडले त्यात एक चिठ्ठी मिळाली.

    त्याच्यावर लिहिले होते लॅपटॉप साठी ४० हजार रूपये अमुक व्यक्ती कडून उधार घेतले...

    अरे; तो लॅपटॉप तर माझ्यासाठीच पप्पांनी घेतला आहे आणि तो माझ्याकडेच आहे.

    दुसरी एक मुडपलेली चिठ्ठी मिळाली--

    ऑफिस मध्ये काम करताना तुमची आवड काय? आहे ते लिहा असे सांगितले होते...

    त्यावर पप्पानी चांगले बूट वापरायला आवडते...
    असे लिहले होते.

    अरे चांगले बूट??
    परंतु त्यांचे बूट तर फाटलेत...

    आई मागच्या चार महिन्यांपासून पप्पांना सांगते नविन बूट घ्या...

    पण पप्पा प्रत्येक वेळी सांगतात अजुन सहा महिने तरी चालतील हे बूट...

    मग घेऊ, आत्ताच काही गरज नाही...

    मी...
    मी आत्ता समजलो किती चालतील ते अजून.

    एक तीसरी चिठ्ठी मिळाली.

    जुनी गाड़ी दया आणि नवीन गाड़ी घेउन जा...

    आणि ते वाचताच मेंदूला अक्षरश: डोक्यात मुंग्याच आल्या...

    पप्पांची गाड़ी...

    आणि मग मी घराच्या दिशेने धावतच सुटलो...

    आत्ता पायात खिळा पण टोचत नव्हता...

    मी घरी धापा टाकतच पोहचलो तर पप्पा घरी नव्हते आणि त्यांची गाड़ी ही नव्हती...

    मी समजलो पप्पा कुठे आहेत!

    पप्पा तिथेच होते...

    मी धावत जावून जोरात मिठीच मारली आणि पप्पांचा खांदा ओला झाला...

    नको पप्पा नको..
    मला नाही पाहिजे मोटर सायकल...

    बास पप्पा अगोदर तुम्हाला नविन बूट घ्या...

    आणि हो पप्पा,
    आता मला मोठा माणुस व्हायचच आहे...

    तो पण तुमच्यासारखाच....

    पप्पा फक्त तुमच्या सारखाच...

    पुर्ण शोरुममध्ये शांतता पसरली...

    सगळं शांत वातावरण...

    मित्रांनो; आई-वडिलांना ओळखा.

    आयुष्यात कुठेही कमी पडणार नाही... खऱ्या अर्थाने जगा... हेच तर खरं जिवन आहे... आपण सर्व सजिव आहोत याचे भान असू द्या...

    माणूस बनून जगा आणि मानवता हा एकच धर्म पाळा...

    Forwarded Post

    -- Aniket

      November 29, 2016


  • याला जीवन ऐसे नाव भाग २६

    पाणी शुद्धीकरण भाग सहा

    काल काही प्रश्न विचारले गेले त्याची उत्तरे म्हणजेच आजची टीप होऊ शकेल.

    शुद्ध पाणी आता दुर्मिळ होत चालले आहे. आता पाणीच दुर्मिळ होत चालले आहे, असे म्हटले तरी चुकणार नाही.
    यावर्षी पाऊस चांगला झाला पण नियोजनाअभावी निसर्गातून आलेले पाणी तसेच वाया घालवले.

    हेच नभज, आंतरीक्षज, ऐंद्रज म्हणजे ढगातून जन्मलेले, अंतरीक्षातून आलेले किंवा इंद्राने पाठवलेले पाणी, गरज म्हणून शुद्ध स्वरूपातील म्हणून किंवा देवाचे तीर्थ म्हणून त्याचा आदर सन्मान नको का करायला ???? वाराणसीहून गडूमधे भरून आणलेलं गंगाजल आपण आयुष्यभर साठवून ठेवतो. का ? तर अंतिम क्षणी तोंडात शुद्ध गंगाजल पडावे. एवढं याच महत्व, माहिती असून देखील, आमच्या डोळ्यादेखत हे पुण्यप्रदान करणारे तीर्थ, गटारात वाहून चालले आहे.
    हेच शुद्ध पाणी जर योग्य त्या भांड्यात साठवून ठेवले तर ????
    हो मी पावसाचे पाणीच म्हणतोय. सैराट झाल्यानंतर इंग्रजीत सांगितल्याशिवाय कळतच नाही. "रेन वाॅटर हार्वेस्टींग" विषयीच बोलतोय मी
    !

    ग्रंथकर्त्यांनी सुद्धा सांगितले आहे की, आकाशातून पडणारे पाणी जर योग्य प्रकारे साठवले तर त्यावर कोणत्याही संस्कारांची गरज नाही. ते पाणी आपण तसेच्या तसे पुढे नऊ महिने देखील स्नानपानासाठी वापरू शकतो. फक्त बाहेरची घाण साठवलेल्या पाण्यात येणार नाही ना याची काळजी घ्यावी लागेल.

    बोअरवेलचे पाणी मात्र सूर्येंदुपवनम् अदृष्टम असल्याने परत अग्निसंस्कार आदि शुद्धीक्रिया करून पिण्यासाठी वापरावे लागेल. मूळ तत्व विसरले नाही तर काय करायला हवे ते "तो" आपोआपच सुचवित जातो.
    विहीर देखील वरून उघडी असावी. कचरा, पालापाचोळा आत जाऊ नये, यासाठी त्यावर फक्त एखादे आच्छादन असावे.

    पाण्यामधे सोन्याचे नाणे, चांदीची लगड किंवा कल्हई केलेला तांब्या पितळीचा तुकडा टाकून ठेवला तरी चालतो. उकळताना ठेवला तरी चालेल, किंवा नुसताच पाण्यात ठेवला तरी चालेल.फक्त सोने, चांदी, तांबे, पितळ पूर्ण शुद्ध असावे. मग अगदी गंगेतला गोटा असला तरी चालेल.

    शुद्ध पाण्याची पण प्लॅस्टिकची बाटली घेऊन किती ठिकाणी फिरणार ? आणि ते शिळे पाणी किती दिवस पुरणार ? आणि ज्या ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्षच आहे, त्याठिकाणी कसले शुद्धिकरण आणि कसले काय ?

    शक्यतो प्लॅस्टिकच्या बाटल्या, कळश्या, टब, बादल्या वापरू नयेत. त्यापेक्षा स्टील, तांबे पितळीची भांडी चांगली. माती आणि काचेपेक्षा तरी जास्त सुरक्षित सल्ला देतोय ना ! मग या धातुच्या भांड्यांची आतून थोडी स्वच्छता, थोडी मेहनत रोज करावीच लागेल ना !

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021

    02.01.2017

      January 2, 2017


  • फळांची सालही आहे शरीरासाठी उपयुक्त

    अनेकजण फळांची साल काहीच कामाची नाही म्हणत ती फेकून देतात. मात्र, त्यामध्येही भरपूर अँटिऑक्सिडंट आणि पोषक द्रव्ये असतात. तसेच ही साल आरोग्य आणि सौंदर्य वाढवण्यासाठीही फायदेशीर असते.

    जाणून घेऊया फळांच्या सालीचे फायदे..

    संत्रा - संत्र्यामध्ये असलेले फ्लेव्हनॉइड्स कोलेस्टेरॉल कमी करतात. एका अमेरिकन संशोधनानुसार संत्र्याच्या सालीमध्ये ज्यूसच्या तुलनेत २० पट अधिक अँटिऑक्सिडंट्स असतात. केकमध्ये या सालीचा वापर केल्यास चव येते.

    पपई - पपईचा गर टाचेवर चोळल्यास भेगा लवकर बर्‍या होतात. पपईमध्ये भरपूर ‘अङ्क जीवनसत्त्व आणि पापेन नावाचा घटक असतो. यामुळे मृत पेशींपासून मुक्तता मिळते.

    डाळिंब - पोटाशी संबंधित विकार झाल्यास डाळिंबाची साल पाण्यात उकळून घ्या. तसेच त्यात दालचिनीचे काही तुकडेही टाका. थंड झाल्यावर हे
    पाणी प्राशन करा. हे पाणी दररोज तीनवेळा पिल्यास पीडितास फायदा मिळतो.

    सफरचंद - सफरचंदाच्या सालीमध्ये अरसोलिक अँसिड नावाचे रसायन असते. त्यामुळे ही साल एवढी चमकदार असते. सालीसह सफरचंदाचे सेवन केल्यास स्नायूंचा विकास होतो आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. सोबतच रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रित राहते.

    केळी - शोच्या झाडांची पाने चमकदार बनवण्यासाठी केळीच्या सालींचा वापर केला जातो. केळीची साल नैसर्गिक कीटकनाशकाचे आणि खताचे कामही करते. जखम झाल्यावर केळीच्या सालीचा मऊ भाग लावल्यास आराम मिळतो.

    नाशपाती - या फळाच्या सालीमध्ये भरपूर फायबर आणि जीवनसत्त्वे असतात. यामध्ये असलेल्या क्लोरोझेनिक अँसिड अँटिऑक्सिडंट आणि फ्लोरेटिन नावाच्या फ्लेव्होनॉइडमुळे कँसरग्रस्त पेशी पसरत नाहीत. त्यामुळे या फळाचे भरपूर सेवन केले पाहिजे.

    पीच - या फळामध्ये भरपूर पोटॅशियम आणि ‘अङ्क जीवनसत्त्व असते. या फळामुळे त्वचा कोरडी राहते. याच्या सालीत साखरेचे काही दाणे ठेवून चेहर्यावर
    चोळल्याने त्वचेच्या मृत पेशी हटतात आणि चेहरा उजळतो.

    किवी - या फळाच्या सालीमध्ये गराच्या तुलनेत तिप्पट अधिक अँटिऑक्सिडंट्स असतात. तसेच या फळाच्या सालीमुळे अँलर्जी होत नाही आणि प्रतिकारशक्तीही वाढते. हे फळ विषबाधेस जबाबदार असलेल्या स्टेफिलोकोकससारख्या जिवाणूंपासूनही संरक्षण करते.

    (आरोग्यदूत WhatsApp ग्रुपवरुन)

      April 26, 2017


  • स्मरणगाथा : २

    नुकताच मी मॉर्निंग वॉकला जाऊन आलो होतो . आणि भल्या सकाळी दारावरची घंटा वाजली .
    दार उघडलं तर समोर आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातील ओळखीचा शिपाई उभा होता .
    त्याच्या हातात एक कागद आणि गुलाबाचं फूल होतं .

      August 10, 2025


  • जीवनाचे धडे आणि स्वतःशी करार

    इतरांचे आपल्याबद्दलचे मत,निरीक्षण सरळ दुर्लक्ष करावे या वैचारिक समृद्धीपर्यंत मी काही वर्षांपूर्वी पोहोचलो. माझ्यावरील संस्कार, माझे पालक, गुरुजन आणि माझा जीवनप्रवास यांच्याबद्दल कृतज्ञता हा सध्या स्थायीभाव केलाय! बाकीचे शांतपणे कुंपणापलीकडे ठेवतो मी.

      November 4, 2022


  • प्रगल्भ युवा निर्मिती आध्यात्मानेच शक्य !

    एकेकाळी विद्वान व्यक्तीमत्वासाठी जगात प्रसिध्द असणारा आणि देश-विदेशातील लोकांची ज्ञानाची भूक क्षमविणारा आपला भारत देश आज स्वत:च अज्ञानात आणि अंधारात खिचपत पडलेला आहे. तक्षशिला, नालंदा, काशी, पैठण अशी विश्व प्रसिध्द ज्ञानाची विद्यापीठे असणारा आपला भारत देश आज ईतराकडे ज्ञानाची भिक मागतो आहे. 

      October 22, 2019


  • वीजनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या अपारंपरिक पद्धती

    वीजनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या अपारंपरिक पद्धतीत सौरऊर्जा, पवनऊर्जा, सागरीऊर्जा, भूऊर्जा इत्यादींचा वापर वीजनिर्मितीसाठी केला जातो. यातील बहुतेक पद्धती या प्रदूषणापासून मुक्त आहेत.

      June 15, 2023


  • अशी घेतली शंकर महाराजांनी समाधी

    आजही मनोभावे हाक मारली असता समाधी घेतलेले शंकर महाराज समोर उभे राहतात हे खास वैशिष्ट्य आहे. आपली लीला आजही कश्या प्रकारे दाखवतील याचा काही नेम नाही. अनेकांना याचा अनुभव आला आहे. आणि तसे त्यांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवले आहे.

      August 2, 2017


  • जगन्नाथ अष्टकम्- मराठी अर्थासह

    एक एकट्या देवतेची (उदा. हनुमान) किंवा जोडींची (उदा. शंकर-पार्वती, राम-सीता, राधा-कृष्ण,विठ्ठ-रुक्मिणी) मंदिरे आपण सर्वत्र पहातो. परंतु भाऊबहीण यांचे मंदिर क्वचितच दिसते. असे एक मंदिर आहे जगन्नाथपुरीचे कृष्ण-बलराम-सुभद्रा यांचे.

      July 11, 2021


  • “मोले घातले रडाया….”

    एखाद्या व्यत्त*ीचे निधन झाल्यावर त्याच्या आप्तस्वकीयांना दु:ख होणे स्वाभाविक असते. डोळ््यांतील अश्रूंची वाट मोकळी करून हे दु:ख व्यत्त* केले जाते. दु:खाचा तो स्वाभाविक उद्रेक असतो परंतु बरेचदा असेही आढळून येते की, मृत व्यत्त*ीशी कुठलेही भावनिक संबंध नसलेली माणसेही आपल्या न झालेल्या दु:खाचे अतिरेकी प्रदर्शन करीत असतात.

      June 25, 2006