सिंहगड ते रायगड – ट्रेक – भाग ३
Category:
लेखसंग्रहमोहरीच्या पठारावर एका झाडाच्या सावलीत मग आम्ही पैक लंच उघडले आणि जेवणाचा आस्वाद घेतला. मोहरीच्या त्या पठारावर उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत होता. एखाद दुसरे झाड वगळता संपूर्ण पठारावर रखरखाट होता त्यामुळे टेंट मधली जमीन तापली होती. टेंट मधे भट्टी सारखे तापले होते. तरी पण तशा वातावरणात पण काही मंडळीनी झोप काढल्या. मी मात्र टेंट मधे न जाता बाहेरच गप्पा मारीत बसणे पसंत केले.
December 15, 2022