वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
रग्बी हा खेळ पाश्चात्य देशांमध्ये खेळला जातो. या खेळात शक्तीला अधिक महत्त्व दिले जाते. हा खेळ हळूहळू भारतातही रुजत असून राज्य आणि देशपातळीवरील विविध स्पर्धांमधून गुणी खेळाडू पुढे येत आहेत. अनेक बाबतीत अमेरिकन फुटबॉलशी साधर्म्य राखणार्या या खेळासाठी शक्ती, कौशल्ये आणि चापल्य यांचा त्रिवेणी संगम आवश्यक असतो. आदित्य पागे या उदयोन्मुख रग्बी खेळाडूकडून समोर आलेली माहिती.
December 21, 2010
कोकणातली पत्रकारिता विकसित व्हायची असेल तर इथला पत्रकार आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं गरजेचं आहे. तो पूर्णवेळ पत्रकार असेल याची काळजी वृत्तपत्र मालकांनी घेणं आवश्यक आहे. आणि त्याच बरोबर पत्रकारांनीही केवळ आलेल्या पत्रकांवरून पत्रकारिता करणं सोडून देण्याचीही आवश्यकता आहे.
January 3, 2023
माझे नमन बौद्धाला सत्य अहिंसेच्या देवाला
कोहिनुर हिरा चमकला ह्या विश्वामध्यें ।।१।।
गौतमाचे जीवन बौद्धाचे तत्वज्ञान
दोन्ही असती महान उद्धरुनी नेई जगातें ।।२।।
दाखवोनी जीवनाचे द्वार सांगोनी आयुष्याचे सार
भटकलेल्या व्यक्तींचा आधार बौद्ध होई ।।३।।
बौद्धाचे तत्वज्ञान असे ते महान
नेई उद्धरुन सर्व जनांना ।।४।।
उद्धरुन जाती जे बौद्धास जाणती
शिकवणीची महती बौद्धाने सांगितलेल्या ।।५।।
प्रथम सांगतो जीवन नंतर ऐकवी शिकवण
मात्र करावे आचरण हीच सार्थकता तुमची ।।६।।
गौतमाचा इतिहास काव्यमय कथा त्याची भावमय
ऐकतां मन भरुन जाय कठीण आहे समजण्या ।।७।।
ज्याच्यासाठीं झगडे व्यक्ति तीच जन्मतां त्याचे हातीं
धन सत्ता नि संपत्ति त्याग केला सर्वस्वाचा ।।८।।
सामान्य माणूस सर्वस्व समजे देहास
चिंता त्याची ऐहिक सुखास रात्रंदिनीं ।।९।।
धनाच्या कुणी पाठीं झगडतो कुणी सत्तेसाठीं
घालवी जीवन सुखापोटी ऐश्वर्यास ध्येय समजोनी ।।१०।।
गौतम मोठे नशिबवान राजघराणीं जन्म घेऊन
लोळण घेती सत्ता नि धन गौतमाचे जवळी ।।११।।
कपिलवस्तु नगरी शुद्धोधन राजा राज्य करी
प्रेम होते प्रजावरी पुत्राप्रमाणें ।।१२।।
केली प्रभुवर भक्ति त्याचे आशिर्वाद मिळती
प्राप्त झाली संतती राजा शुद्धोधनास ।।१३।।
बाळाचे तेज दिव्य जन्मता भासले भव्य
अपुर्व चमके भाव त्याचे मुखावरी ।।१४।।
कुणी संबोधती भगवान अवतार विष्णूचा म्हणून
परी निसर्गाचे ते एक देणं ह्यात शंका नाहीं ।।१५।।
मानव रुप घेती ईश्वरी शक्ती असती
ऐसे क्वचित होती ह्या संसारी ।।१६।।
साधू संत जमती कांही भविष्य जाणती
आशिर्वाद बाळा देती सर्व मिळूनी ।।१७।।
हस्त रेखा बघूनी बाळा जन्मकुंडली जागोनी
विस्मित होऊनी जाई ज्योतिषी ।।१८।।
बाळाचे भविष्य निराळे सामान्यांस न कळे
पंचभूताचे जाळे असती त्याचे भवती ।।१९।।
बाळासी मिळे अप्रतीम शक्ति परंतु राजा न बनती
संसाराची येऊन विरक्ति रमुन जाईल वनांत ।।२०।।
न होई राजा नगरीचा राजा बनेल निसर्गाचा
महाराजा तो विश्वाचा अंतरात्म्यावर राज्य करी ।।२१।।
जाणवेस निसर्ग सृष्टी बाळाची असेल व्यापक द्दष्टी
न व्हावे राजा कष्टी संकुचित् भाव सोडावा ।।२२।।
सोडूनी स्वतःचा संसार शिरी घेईल विश्वभार
विश्वाचा करील उद्धार तोच एकला ।।२३।।
राजास न पटे हे तत्व न आवडे त्यास हे कवित्व
बाळ त्याचे जीवनसत्व मायेपोटीं खिन्न झाला ।।२४।।
नांव सिद्धार्थ ठेवले उपाय मनीं योजिले
बाळासाठी संकल्प केले ठेवण्या त्यास संसारी ।।२५।।
राजाचा भव्य महाल ऐश्वर्याची रेलचेल
सर्वत्र सुख दिसेल ह्याची घेई काळजी ।।२६।।
दुःखाची छटा नको विरक्तीचा भाव नको
एकांतवास नको ह्याची चिंता राजाला ।।२७।।
सुंदर बागेमधील कोमेजलेले फुल
न पाही सिद्धार्थ मुल ही सुचना सर्वांना ।।२८।।
सिद्धार्थ वाढला विलासांत जीवन ऐश्वर्य कंठीत
लग्न होऊनी पिता बनत संसारांत रमला ।।२९।।
उत्सव राजधानीतील बघण्या सोहळा नगरीतील
प्रथम ठेवले पाऊल सिद्धार्थाने प्रासादाबाहेर ।।३०।।
आयुष्याचा तो क्षण टाकी जीवन पलटून
विधी लिखीत अटळ असोन कुणी न बदले त्यासी ।।३१।।
उत्सवातील जनसागरांत पाही एक म्हातारा नि प्रेत
दुःख दिसे जीवनांत प्रथमच सिद्धार्थाला ।।३२।।
माहीत नव्हते त्यासी दुःखे असती जीवनासी
जर्जर करुनी देहासी मृत्यु येई शेवटीं ।।३३।।
जन्म स्थिति व लय जीवनाचे चक्र होय
निसर्ग चालत राहाय प्रथमची जाणले सिद्धार्थानें ।।३४।।
सरळ मार्गी जीवनांत विस्फोट होऊनी जात
लुप्त असलेल्या ज्ञानांत चेतना जागृत झाली ।।३५।।
रात्रीच्या काळोखांत विज चमकावी आकाशांत
उजेड होई वातावरणांत एका क्षणामध्यें ।।३६।।
तशी ती दुःखद घटना पेटवी सिद्धार्थाची चेतना
लहरी उठती मना जीवनाबद्दलच्या ।।३७।।
नविन प्रकाश पडला मनीं राजपुत्र गेला भांबावूनी
सत्य शोधण्याची आंस ध्यानी संकल्प त्याने केला ।।३८।।
उत्पन्न झाली वैराग्य वृत्ती ऐहिक सुख त्यागती
सोडूनी राज्य आणि संपत्ति जाई निघोनी वनांत ।।३९।।
त्याग केला पत्नीचा सोडला मोह बाळाचा
मार्ग पत्कारी एकांताचा जाई निघूनी अज्ञातस्थळी ।।४०।।
हे सारे अघटित आपण म्हणूं दैवलिखीत
परंतु हे अपूर्व होत सामान्याचे काम नव्हे ।।४१।।
सर्व साधारण धडपडतो ज्याचे साठी जगतो
तेचि सिद्धार्थ लाथाडतो ह्यासी म्हणावे असामान्य ।।४२।।
म्हणूनची सिद्धार्थ युगपुरुष परमेश्वरी अंश
दाखवोनी खरे आयुष्य सुखाचा मार्ग दिला ।।४३।।
सर्वची सोडोनी गेला तो वनीं
एकची विचार मनी जीवनांचे सत्य शोधणे ।।४४।।
निसर्ग रम्य स्थळी बौधीवृक्षाखालीं
तपः साधना केली सिद्धार्थाने ।।४५।।
एकाग्र करुनी मन लावले ध्यान
केले चिंतन अंतरात्म्याचे ।।४६।।
अंन्तर्मुख झाला बाह्य जगा विसरला
सत्यास शोधूं लागला सिद्धार्थ ।।४७।।
अंतर्मनातील सुप्त शक्ति बिंदूप्रमाणें असती
रुप प्रचंड घेती जागृत झाल्याने ।।४८।।
शक्ति असे आत्मबिंदु त्याचा होई परमात्मा सिंधु
भाव बने आनंदु चेतना उद्दीप्त होता ।।४९।।
राग लोभ अहंकार मद मत्सर विकार
षडरिपूंचे रुप भयंकर आत्मबिंदूवर वेष्टन त्यांचे ।।५०।।
संसारातील मायाजाळ त्याचा आत्मबिंदूभोवती गाळ
सुप्त राही ते कमळ चिखलाच्या वेष्ठनामुळें ।।५१।।
फुटावा लागतो अंकुर यावे लागते पाण्यावर
तेंव्हा कमळ दिसणार आनंदमय ।।५२।।
नारळा बाहेरील करवंटी आंत मधुर खोबरेवाटी
तैसी मोहमायाची जळमटी व्यापूनी टाकी आत्मबिंदू ।।५३।।
मोहाचे असतां वेष्ठन आत्म्यासी येई असुद्धपण
मोह आणि आत्मज्ञान दोन्ही नसती एके ठिकाणी ।।५४।।
अग्नि आणि पाणी जाई विरुद्ध दिशेनी
तत्वे वेगवेगळी असोनी निर्गाची ।।५५।।
तैसेची संसारातूनी मायाजाळ दूर करुनी
आत्मतत्वास जाणूनी आत्मशुद्धी करावी ।।५६।।
सिद्धार्थाचे ध्यान काढूनी मायाजाळाचे वेष्ठन
आत्मबिंदूसी होई विलीन ज्ञानाग्नी पेटला चित्ती ।।५७।।
बौद्धी वृक्षाखालीं ज्ञनगंगा मिळाली
अंतर्चेतना जागृत झाली सिद्धार्थाची ।।५८।।
गौतमबुद्ध संबोधले महात्मापद मिळविले
महान तत्व शिकविले बौद्धधर्म स्थापुनी ।।५९।।
बौद्धाचा पाया महान सत्य अहिंसा हे तत्वज्ञान
जाणण्याते करावे ध्यान सार्थक करण्या जीवनाचे ।।६०।।
।। शुभं भवतु ।।
डॉ. भगवान नागापूरकर
१७- १०११-८३
January 17, 2018
गर्भावस्थेत किंवा प्रसूतीच्या दरम्यान माता-बालक मृत्यूचे प्रमाण अन्य देशांच्या तुलनेत भारतात सर्वाधिक आहे. लोकसंख्येच्या मानाने अपुऱ्या वैद्यकीय सुविधा हे त्याचे एक महत्वाचे कारण नक्कीच आहे. त्याशिवाय मुलीचे लग्नाचे वय हा देखील दुसरा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे.
March 24, 2015
भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली.
March 8, 2022
चांगल्या सवयी, चांगले विचार, चांगले संस्कार, चांगलं वळण हे विद्यार्थ्यांचं पुढील आयुष्य मनोहर करतं. केवळ भौतिक बाबतीत मनोहर नको, तर मानसिकतेतही मनोहर हवं. नाती जपणं ही मनोहरी अवस्था आहे. नाती दुरावली की मन उदास होतं. आपली मुलं परदेशात पैसा कमविण्यासाठी जातात हे मनोहर चित्र असलं तरीही पालकांना आपल्यापासून मुलं दुरावल्याची जाणीव उदास करते.
June 28, 2026
या विधानसभा निवडणुकीने विरोधकांच्याच नव्हे तर सत्ताधार्यांच्या ही डोळ्यात अंजन घातले आहे. तुम्ही जनतेला गृहीत धरून त्यांच्या प्रश्नांची हेळसांड करणार असाल तर जनता तुम्हाला घरी बसू शकते, हा संदेश जनतेने मतपेटीतून दिलाय. त्यातील मतितार्थ राजकारण्यांनी समजून घेतला पाहिजे.
October 29, 2019
गेल्या काही दिवसापासून मला करोडो रुपयाची संपत्ती मिळण्याचे डोहाळे लागले आहेत, कोरड्या उलट्या सारख्या येतात. कारण?
1. मला राजस्थान वरून सतत फोन येतो, हमारे पास हमारे पूर्वज्योंका सोना मिला है, जो हमे आधे दाम में बेचना है। आप जोधपूर आकर देख लो, और पसंद आये तो डील पक्का करेंगे. राजस्थान मध्ये याला कोणी मिळत नाही का हे विकण्यासाठी, हा प्रश्न मला नेहेमी सतावत रहातो.
2 आजकाल कोणत्यातरी आफ्रिकेतील देशातील बॉब, जॉन, वगैरे माणसाचा sms दर दोन दिवसांनी येतो. 34 ट्रिलियन डॉलर्स माझ्या खात्यात जमा करण्यासाठी आतुर झाला आहे. कारण माहित नाही. माझा फोन नंबर त्याला कसा मिळाला, हे न उलगडणारे कोडे आहे.
3. युरोपियन बँकेतील मॅनेजर मला इमेल पाठवत राहतो, अभिनंदन या वाक्याने सुरुवात होते, कोणत्या तरी अनामिक माणसाचे 100 कोटी त्यांच्या बँकेत पडून आहेत, त्यातील 20 कोटी युरो, मला ते देऊ इच्छित आहेत, तरी लवकरात लवकर दिलेल्या फोन वर संपर्क साधणे.
4. लहानपणी 9 अंकांची कोडी सोडवा लाखोंची बक्षिसे मिळवा, असे पेपरमध्ये लिहून येत असे, पहिले बक्षीस कार, दुसरे 2 इन 1 रेडिओ. पहिले बक्षीस कधीच लागत नसे. नेहेमी 2इन1 रेडिओचे बक्षीस मिळत होते. 15 पैशाचे कार्ड दिल्ली, जालंधर, आग्रा, याच शहरात पाठवावे लगे. चार दिवसात दुसऱ्या नंबर चे बक्षीस मिळाल्याचे पाकीट येत असे. अभिनंदनाने सुरु होणारे पत्र, पोस्टेजसाठी रु 500 पाठवा म्हणून संपत असे. माझ्या जीवनात अभिनंदनाचा वर्षाव या पत्रापासून सुरु झाला तो आजपर्यंत सुरूच आहे.
5. या शिवाय आजकाल गोड आवाजातील मुलींचे फोन वरचेवर येतात, कोणतेच कागदपत्र न मागता, मला रु 10 लाख कर्ज ज्याला पर्सनल लोन म्हणतात, देण्यास त्या उतावीळ असतात.
6. अश्याच मुलींचे फोन आसान किस्तो पे प्लॉट, विकण्यासाठी येतात, रु 600 पर sq feet, भावाचा प्लॉट, हि बया मला रु 200 च्या भावात देण्यासाठी कासावीस झालेली असते. 2 वर्षात डबल, 3 वर्षात चारपट होणार याची खात्री देते. मला सांगा हिचा महिन्याचा पगार मिळण्याची हि खात्री देऊ शकत नाही, ती मला चारपट पैसे मिळण्याची खात्री देते.
माझा देव वरून हे सर्व पहात असतो, आणि मला करोडपती होण्यापासून वंचित ठेवतो. हे चांगले का वाईट हे संजण्याइतके आपण पण सुजाण आहात अशी मी आशा करतो.
धन्यवाद
विजय लिमये
October 22, 2016
कल्पना मोरपारिया यांचा जन्म ३० मे १९४९ रोजी भवानदास आणि लक्ष्मीबेन तन्ना यांच्या लोहाणा कुटुंबात झाला. लहान वयातच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. १६ वर्षांच्या वयात त्यानी शालेय शिक्षण पूर्ण केले आणि विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी सोफिया कॉलेज फॉर वुमनमध्ये प्रवेश घेतला आणि त्यानंतर १९७० पर्यंत त्यानी रसायनशास्त्रात बी.एससी. पदवी प्राप्त केली.
September 23, 2025
दसरा आणि कोजागिरी पौर्णिमा हे अश्विन महिन्यातील महत्वाचे दिवस. आयुर्वेदाच्या दृष्टीनेही हे दिवस किंवा सण तसेच महत्वाचे आहेत कारण त्यांचा आपल्या स्वास्थ्याच्या दृष्टीने महत्वाचा संबंध आहे.
भाद्रपद महिन्यात गणपतीची धावपळ आटोपते आणि मध्ये १५ दिवस गेले की नवरात्र सुरु होतं .हा बदल होताना वातावरणही बदलत असतं ,पाऊस कमी होऊन हळूहळू परतीचा रस्ता धरतो आणि पिवळेधमक ऊन पडायला सुरुवात होते ,वातावरणात उष्णता जाणवू लागते ज्याला आजच्या आधुनिक भाषेत " ऑक्टोबर हिट" असे म्हणतो.दुपारच्या वेळात चांगलाच उन्हाचा तडाखा वाटायला लागतो .
हे बदल आपल्या शरीरातही काही मोठे बदल घडवून आणतात.पावसाळ्यात पाऊस पडू लागला की नवीन पाणी पचायला तर जड असतेच पण अम्लविपाकी असते म्हणजे शरीरात आंबटपणा वाढवणारे असते ,तसेच दमट ,थंड अशा पावसाळी हवेचा परिणाम म्हणून शरीरात पित्त दोष वाढू व साठू लागतो .पुढे पाऊस थांबून ऊन पडले की ह्या साठलेल्या पित्ताचा प्रकोप होतो म्हणजेच उद्रेक होतो आणि काही विशेष लक्षणे दिसू लागतात .
छातीत जळजळ होणे ,घशात आंबट पाणी येणे,मळमळ होणे ,उलटी होणे ,डोके दुखणे ,अंगावर पित्ताच्या गाठी उठणे ,नाकातून रक्त येणे ,नागीण,डोळे तसेच तळहात ,तळपाय यांची आग होणे ,उष्ण मूत्रप्रवृत्ती होणे ,अंगावर कुठेतरी बेंड उठणे असे अनेक उष्णतेशी निगडीत व्याधी अचानक डोके वर काढतात .
आयुर्वेद हे शास्त्र केवळ आजार बरे करणारे शास्त्र नाही तर आजार होऊच नयेत म्हणूनही ते फार महत्वाचे काम करते ज्याला आजच्या भाषेत " Preventive Aspect " म्हटले जाते.हे बदल नैसर्गिकपणे घडणारच आहेत पण त्यामुळे आपले स्वास्थ्य बिघडू नये म्हणून या दिवसात काय खावे ,प्यावे ,काय पथ्य पाळावे ,कोणती शरीरशुद्धी करावी की जेणेकरून आपले आरोग्य अबाधित राहील या विषयी आयुर्वेद मार्गदर्शन करतो.
वाढलेले पित्त शरीराबाहेर काढून टाकावे म्हणजे व्याधी निर्माणच होणार नाहीत,ह्या साठी या दिवसात म्हणजेच "शरद" ऋतूत विरेचन ही पित्ताची शुद्धि करणारी ,जुलाबावाटे दोष शरीराबाहेर काढून टाकणारी पंचकर्मातील क्रिया करून घ्यावी.
त्याचप्रमाणे रक्तातील दोष ,उष्णता निघून जावी आणि नवीन रक्त तयार व्हावे या दृष्टीने " रक्तमोक्षण " ही शुद्धीक्रियाही वैद्यांच्या सल्ल्याने जरुर करून घ्यावी.यामध्ये ठराविक प्रमाणात रक्त शिरेवाटे बाहेर काढून टाकले जाते.
खाण्यात पित्तशामक पदार्थांचा वापर करावा ,गोड किंवा मधुर रसाचे पदार्थ अधिक असावे .त्यामुळे दूध ,तूप यांचा वापर नियमित करावा.त्यासाठीच दसऱ्याच्या दिवशी आपल्याकडे श्रीखंड ,बासुंदी असे पक्वान्न करायची पद्धत आहे जी अतिशय शास्त्रीय आहे.याच हेतूने कोजागिरी पौर्णिमेला चंद्राच्या शीतल प्रकाशात आटीव दूध थंड करून पिण्याची पद्धत आहे.या पूर्वापार चालत आलेल्या परंपरांचा आपण आदर करायला हवा कारण त्यात शास्त्रीयता लपलेली आहे .उगीचच fad म्हणून एखादी गोष्ट मुद्दाम बदलायचा प्रयत्न करू नये कारण त्यात आपलेच नुकसान आहे .हल्ली कोजागिरीला भेळ आणि दूध किंवा पावभाजी आणि दूध असे काहीतरी चमत्कारिक combination खायची पद्धत रूढ झाली आहे जे विरुद्धान्न आहे.भेळ बनवताना आपण चिंच ,tomato अश्या आंबट पदार्थांचा वापर करतो आणि पावभाजी बनवताना त्यात भरपूर tomato ,लिंबू वापरतो,या नंतर गोड दूध पिण्याने ते सगळेच अम्लगुणाचे होते ,जणू नासतेच आणि मग जळजळ होऊ लागते .त्यामुळे या वर्षी आपल्याकडून अशी काही चूक होणार नाही याची आपण नक्की दक्षता घेऊया.
फळे खाताना डाळिंब नक्की असूद्या .पुढे लक्ष्मीपूजनालाही याच हेतूने सगळ्या पित्तशामक वस्तूंचा वापर सांगितला आहे .साळीच्या लाह्या,डाळिंब आणि बत्तासे !! त्या सगळ्या गोष्टीचा नक्की वापर करूया आणि आपणच आपले स्वास्थ्य रक्षण करूया .
-- वैद्य राजश्री कुलकर्णी
M.D. (आयुर्वेद)
-- `आरोग्यदूत' WhatsApp ग्रुपवरुन
October 13, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti