(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कांचनार

    कांचनार

    हा मध्यम उंचीचे वृक्ष अाहे.ह्याची त्वचा धुरकट व खडबडीत असून ह्याचे काण्ड सरळ वाढते,पाने एकांतर असून १-२ सेंमी लांब व १.२५-२.५० सेंमी रूंद,द्विखण्ड व अग्रभागी गोल असतात,हृदयाकृती असतात.फुल मोठे,पांढरे,जांभळे,निळे अथवा गुलाबी रंगाचे असते.फळ १५-३० सेंमी लांब व २-२.५ सेंमी रूंद असते.ह्या चपट्या व कडा मुडपलेल्या शेंगा असतात.शेंगेत १०-१५ बिया असतात.

    ह्याचे उपयुक्तांग आहे त्वचा व फुले.ह्याची चव तुरट असते.व ती थंड गुणाची असते व हल्की व रूक्ष असते.कांचनार कफ व पित्तनाशक आहे.

    चला आता ह्याचे औषधी उपयोग पाहूयात:

    १)व्रण धुवायला कांचनारचा काढा वापरतात.

    २)कांजण्या व गोवर ह्यात कांचनारचा काढा शरीरातील उष्णता कमी करायला उपयोगी आहे.

    ३)शरीरावर उत्पन्न होणाऱ्या गाठीवर कांचनार सालीचा काढा सुंठी सोबत देतात.

    ४)शरीरावरील गाठींवर कांचनार ताकात उगाळून लेप करतात.

    ५)गुदभ्रंशात कांचनार उपयुक्त आहे.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    (कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      September 14, 2017


  • संत साहित्यातील जीवन मूल्यें

    मुल्यांमुळेच व्यक्तीला आणि समाजाला मूल्यं आहे. संतांनी दिलेल्या जीवन मूल्यावरंच आज समाजाच्या उरलासुरला डोलारा उभा आहे. देवाच्या अनुपस्थितीत संतांनी समाज घडविला.मूल्य रुजवली ती आजतागायत समाजाचं भलं करत आहेत.संतांनी देवाच्या अस्तित्वाबद्दल ही प्रश्न उपस्थित केले व त्यामुळे पसरणाऱ्या अंधश्रद्धे वरही प्रहार केलेला आहे. संतांचे कोणतेच मूल्य, कोणती शिकवण आजही कालबाह्य झालेली नाही.

      June 22, 2026


  • आजींच पुस्तकांच हॉटेल

    जगामध्ये छंद वेड्या लोकांची काही कमी नाही, जन्माला येणारी व्येक्ती काहीना काही छंद घेऊन येत असते आणि काही छंद तर आश्चर्य वाटेणारे असतात.त्यांचा छंद,त्यांची आवड लोकांच लक्षवेधुन घेत असते,त्यांचा छंद चर्चेचा विषय ठरतो.म्हणून माणसाला काहीना काही चांगला छंद असावा जेणेकरून आपण केलेल्या चांगल्या कामाची कोणीतरी दखल घेतली पाहिजे.माणसाच काम आणि कर्तृत्व लक्षवेधी असेल तर त्यांच्या कामाची दखल निश्चित घेतली जाते.

      December 11, 2023


  • इशारोंको अगर समझो , राज़को राज़ रहने दो

    दिल्लीतील बल्लीमारान भाग म्हणजे एक गजबजलेलं उपनगर.तिथे लाला केवलकिशन सिकंद हे एक सिव्हिल इंजिनिअर आपल्या पत्नी रामेश्वरीसह रहात असत.ते मूळचे पंजाबातील होशियारपूरजवळच्या भारोवाल गावचे.सैलाखुर्द स्टेशनवर उतरून ७ किलोमीटर दूरवर हे गाव

      July 30, 2023


  • काश्मीर एक जाणीव – भाग चार

    एके काळची काश्मिरची राजधानी .
    श्रीनगर ही काश्मिरची राजधानी होण्याअगोदरची नितांतसुंदर राजधानी !
    समृध्दी , सौंदर्य , सौहार्द , सात्विकता यांचे मूर्तिमंत प्रतीक !

      May 4, 2023


  • नियती’ – गोऱ्यांच्या देशात काळा राजा

    15 ऑगस्ट 1947 ला जेंव्हा भारत स्वतंत्र झाला तेंव्हा जर कोणी असे म्हटले असते की भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ब्रिटनचा पंतप्रधान हा भारतीय असेल तर त्या व्यक्तीला त्यावेळी वेड्यात काढले गेले असते. पण नियतीचा खेळ काही वेगळाच असतो.

      January 13, 2023


  • आमच्या मनात तुमच्याविषयी चीड आहे

    सर्व राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते-कार्यकर्ते वेळीच शहाणे झाले नाहीत तर त्यांचं, त्यांच्या पक्षाचं आणि पर्यायाने भारतातील लोकशाही म्हणवल्या जाणाऱ्या राजकीय व्यवस्थेचं भवितव्य अवघड होईल यात मला तरी शंका नाही..!

      December 22, 2017


  • नॅफ्था

    नॅफ्था हे पेट्रोलियम द्रावण साधारणपणे ३० ते १७० अंश सेल्सिअसला ऊर्ध्वपातित होते. खते व पेट्रोरसायने तयार करण्यासाठी इंधन आणि कच्चामाल म्हणून नॅफ्थाचा प्रामुख्याने वापर होतो. नॅफ्थामध्ये पॅराफिनिक, नॅपशॅनिक आणि एरोमॅटिक रसायनांचा समावेश होतो. दोन प्रकारच्या नॅफ्थाची निर्मिती होत असते. एरोमॅटिक अंश जादा असलेल्या नॅफ्थाला ‘हाय एरोमॅटिक (एच.ए.एन.) आणि कमी एरोमॅटिक अंश नॅपथा’ असलेल्या या द्रावणाला ‘लो एरोमॅटिक नॅफ्था’ असे (एल.ए.एन.) संबोधिले जाते.

      February 23, 2023


  • मतदानाची किंमत

    ती दूरचित्रवाणीवर एक जाहिरात आजकाल दाखविली जाते. एरवी या जाहिराती फारशा कल्पक असतात असं नाही. काही तर हास्यास्पदच असतात. पण ही मात्र विचार करायला लावणारी आहे. कोणाच्या तरी नावाचा जयघोष करत लोकांचा एक समूह एका तरुणाकडे येतो. त्यातलाच काळा चष्मा घातलेला एक मध्यमवयीन माणूस पुढं होतो. त्याच्या चेहर्‍यावर एक प्रकारचा मग्रूर आत्मविश्वास आहे.

      April 21, 2011


  • डोकेदुखी दूर करण्याचा घरगुती उपाय

    खायची पानं व एरंडेल तेल
    मायग्रेन किंवा डोकेदुखीचा त्रास सुरू झाला की सारा दिवस कटकटीचा जातो. मग त्यापासून सुटका मिळवण्यासाठी काही औषध-गोळ्या घेण्यापेक्षा खायची (नागवेलीची पानं) आणि एरंडेल तेल हा घरगुती उपाय नक्की वापरून पहा. खायचे पान थंड प्रवृत्तीचे असल्याने डोकेदुखीच्या त्रासापासून आराम मिळण्यास मदत होते. तसेच एरंडेल तेलामध्ये दाहशामक घटक व त्वचेत लगेच झिरपण्याची क्षमता वेदना त्वरीत दूर करण्यास मदत करतात. (एरंडेल तेल- गुडघेदुखीवर रामबाण उपाय)
    हे मिश्रण कसे बनवावे?
    तव्यावर आवश्यकतेनुसार(काही थेंब) एरंडेल तेल गरम करावे. त्यावर खायची पानं पसरून दाबावीत. थोडी चॉकलेटी रंगाची झाल्यानंतर गॅस बंद करावा.पानं थोडी थंड झाल्यावर या पानांनी डोक्याच्या दुखर्यास भागावर शेक द्यावा. डोकेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी थोडे गरम असतानाच या पानाने डोक्याला शेक द्यावा.
    बडिशेपमध्ये कॅल्शियम, सोडियम, आर्यन आणि पोटॅशियम सारख्या खनिजांचा भरणा असतो. यामुळे स्मरणशक्ती वाढवण्यास बडिशेप फायदेशीर ठरते.
    वरील उपाय आपल्या डॉक्टरांना विचारून करावा.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०७१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 14, 2016