वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
विनायकानं स्वतःच्या मनाला बजावलं आणि पाठून ढकललं गेल्यानं जाणारा तोल सावरला आणि प्राणांतिक यातना हसत सहन करत कसाबसा बोटीतून होडक्यात आणि होडक्यातून हिंदुस्थानच्या दक्षिण भूमीवर उतरला .
कसंबसं स्वतःला सावरत ,खाली वाकून हिंदुस्थानच्या भूमीवरची माती भाळावर लावली .
June 5, 2023
भारताच्या समुद्रकिनार्यालगत एका सरकारी अहवालानुसार १.४ कोटी कोळी समाज रहात आहेत. यापैकी ४० लाख कोळी बांधव हे समुद्रात मासेमारी करिता जातात असा अंदाज आहे. अडीच ते तीन लाख मासेमारी करणार्या बोटींच्या साहाय्याने ते ही मासेमारी करतात.
December 17, 2016
वेदनेला पुरस्कार दिल्याने वेदना संपत नसते. आयुष्यातील वास्तव नेहमीच आपल्याला खुणावत असते.कोणत्याही क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार मिळवण्यासाठी जात, धर्म ,आर्थिक परिस्थिती, अपंगत्व कधीच आड येत नाही. व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मनात एक कोपरा छंदाचा असतो. आपले छंद ओळखता येणं व ते जोपासणं प्रत्येकाला जमेल असं नाही.
June 9, 2025
एखाद्या मोठ्या यंत्राने दहा लाख किलोग्रॅम म्हणजे एक हजार टन वजनाची वस्तू दहा सेंटीमीटर वर उचलण्यास लागणाऱ्या ऊर्जेची निर्मिती एका सेकंदात केली, तर त्या यंत्राची क्षमता दहा लाख वॅट म्हणजेच एक हजार किलोवॅट किंवा एक मेगावॅट इतकी भरेल. वीजनिर्मिती केंद्रांची क्षमता याच मेगावॅट या एककाद्वारे मोजली जाते.
June 17, 2023
प्रश्न…. समस्या…… अर्जुन ……काल … आजही! अश्मयुगापासून आजपर्यंत आपल्या अचाट बुद्धीमत्तेच्या जोरावर माणसाने खुप प्रगती केली. भौतिक सोयी सुविधांची अनेक साधने निर्माण केली. अनेक अडचणींवर मात केली. पण काही प्रश्न आजही अनुत्तरीतच राहीले.
June 19, 2020
जाणार्या वर्षाला निरोप देताना नवीन वर्षाला आनंदाने सामोरं जाताना , या वर्षांत जे जे धन आपण गमावलं ( माझ्यालेखी धन म्हणजे ही अमूल्य अशी माणसं! ) ते जरूर आठवा , त्यांच्या घरच्यांसाठी दोन हात परमेश्वरापाशी जोडा आणि म्हणा : Happy New Year !
December 31, 2023
पहिली ते आठवीपर्यंत ढकलगाडी आता थांबण्याची सुचिन्हे दिसत आहेत. परीक्षा पुन्हा सुरू करण्याच्या सातत्याने पुढे येणाऱ्या मागणी मुळे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने तावडे यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमली होती. या समितीत तावडे यांच्यासह राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तमिळनाडू या राज्यातील प्रतिनिधींचा समावेश होता. या समितीने आपला अहवाल बुधवारी मंत्रालयाला सादर केला. सध्याच्या परीक्षा पद्धतीत बदल करण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे.
पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा सुरू करण्यात यावी. या परीक्षेत विद्यार्थी नापास झाल्यास त्याला एक महिना उजळणीसाठी देऊन त्याची पुन्हा परीक्षा घेण्यात यावी. पुन:परीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास त्याला पुढील वर्गात प्रवेश द्यावा. मात्र पुन:परीक्षेतही अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आधीच्याच इयत्तेत ठेवण्यात यावे, अशी शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी या बाबतीत पुढाकार घेतला आहे . या बाबतीत शिक्षण मंत्री विनोद तावडे योग्य दिशेनी जात आहेत . गुणवत्तेला पर्याय असूच शकत नाही हे लक्षात आले हे बरेच झाले. अगदी लहान पणा पासून मुलांना तसेच शिक्षकांना आणि पालकांना परीक्षे बाबत बेदरकार बनवणा-या या धोरणाला तातडीने बदलले पाहिजे अशी मागणी अनेक शिक्षक करत होते .
तावडे योग्य दिशेनी जात आहेत. अभिनंदन !!!!!!
-- चिंतामणी कारखानीस
December 31, 2015
अँटी बायोटिक्स हा शब्द माहीत नसलेला मनुष्य आज घडीस सापडणे अवघड आहे! 1930 साली अपघाताने लागलेल्या या शोधाने औषधोपचाराची दिशा बदलली!
मात्र जनक फ्लेमिंग, यांच्या "या अस्त्रा चा वापर जपून करा" या सांगण्याला अक्षरशा हरताळ फासत, मनुष्य आणि प्राण्यावर याचा मारा करण्यात आला! आणि आज सुपर बग्स आणि अँटिबोटिक्स रेजिस्टन्स नावाचा भस्मासुर आपल्या वर उलटू लागला आहे!
हे कसे रोखता येईल!
पेशंट म्हणून जाताना
1) योग्य डॉक्टर/प्याथि निवाडा.
2) डॉक्टर मला लवकर बरे व्हायचे आहे,स्ट्रॉंग औषधे द्या असा बाल हट्ट धरू नका.
3) शरीरातील रोग प्रतिकार शक्तीस थोडा वाव द्या.
4) डॉक्टरांनी अँटी बायोटिक्स लिहिली असतील तर त्याचा कोर्स पूर्ण करा. अर्धवट सोडलेला कोर्स आपणास ड्रग रेजिस्टन्स कडे पावला पावलाने ढकलत असतो.
बॅक्टरीया अर्थात जिवाणू अतिशय हुशार असतो,अँटी बायोटिक्स चे स्वरूप ओळखून त्याच्या कामाच्या पद्धती पाहून आपले स्वरूप बदलतो,
आणि मग पुढील दर खेपेस नवे अँटी बायोटिक या प्रमाणे तो यशाची नवी शिखरे पादाक्रांत करतो !
आताच सापडलेला एक जिवाणू इतका शक्तिशाली निघाला की त्याला सुपर बग हे नाव देण्या वाचून गत्यंतर राहिले नाही.
अजिंक्य मी! अमर्त्य मी! अशी दर्पोक्ती करत आपल्या ला ड्रग रेजिस्टन्स च्या गर्तेत ढकलत जातो!
मागील एका वर्षात 7 लाख लोक अँटी बायोटिक चा प्रभाव न चालल्याने मृत्यू मुखी पडले आणि प्रति जैविकांचा वापर असाच चालू राहिल्यास ही संख्या काही काळात एखाद्या देशाची असणार आहे हे सांगायला ज्योतिषी नको!
सर्व सामान्य माणूस याकरता काय करू शकतो
1) स्वच्छता राखणे.
2) हात धुण्याच्या सवयी लावून घेणे.
3) खाद्य पदार्थाचे स्रोत तपासून पाहणे.
फार्मासिस्ट म्हणून आपली जबाबदारी काय?
1) काउंटर ला कोणतेही अँटी बायोटिक न देणे.
2) योग्य डॉक्टर च्या प्रिस्क्री.वर च औषध विक्री करणे.
3) जुन्या चिट्ठी वर परत परतअँटी बायोटिक्स न देणे.
4) विक्रीचा पूर्ण रेकॉर्ड ठेवणे.
5) अँटी बायोटिक्स च्या सुयोग्य वापरा बाबत पेशंट चे समुपदेशन करणे!
आपल्या येणाऱ्या पिढ्या करता काही सुयोग्य कृती करावी असे वाटत असेल तर फक्त त्यांच्या करता ही औषधे वापरण्यास शिल्लक ठेवा अन्यथा या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत!
November 21, 2016
सुरासम्पुर्णकलशंरुधिराप्लुतमेवच।
दधानाहस्तपद्माभ्यांकुष्मांडाशुभदास्तुमे।।
पूर्वी अवकाशात अंधार होता. काहीच दिसत नव्हते. अशावेळी मंद, हलकं स्मितहास्य करित मातादेवीने ब्रह्मांडाची निर्मीती केली. म्हणून सृष्टीचे आदीस्वरुप दुर्गामातेला मानले जाते. कुष्मांडा या नावाने तिची पुजा करतात. दाहीदिशांवर मातेचा प्रभाव आहे. सूर्याप्रमाणे तिचे तेज असल्याने ब्रह्मांडातील सर्वजीवमात्रांबर, प्रत्येक वस्तुंवर कुष्मांडामातेचे तेज पडते. तिच्या पुजनाने रोगमुक्ती होते. यश,बळ,शोकमुक्तता,आरोग्य प्राप्त होते. या मातेच्या रुपात मातृत्व ओसंडून वाहते. म्हणूनच अत्यल्प साधनेतूनही कुष्मांडा माता प्रसन्न होते.
आष्टभुजा धारण केलेल्या मातेने सातपैकी एका हातामध्ये कमंडलु,मगधनुष्य,बाण,अमृतपूर्णकलश,चक्र,गदा आणि आठव्या हातात जपमाळ आहे. शुक्रवारी चौथी माळ आली. अबोली,तेरडा,अशोक,तिळाची फुले या पासून बनविलेली माळही घटाला अर्पण केली जाते. वास्तविक शुक्राचा रंग तसा पांढरा आहे.पण हा रंग आपण सोमवारी ऊपयोगात आणतो. शुक्र हा प्रेमाचा आणि भोग-विलासाचा कारक असून शुक्राचा प्रभाव आपल्या जीवनसाथीवर असतो. प्रेमाचा रंग आणि शुक्राचा रंग अनुक्रमे लाल अधिक पांढरा यांपासून गुलाबी रंग बनतो. ह्यादिवशी हा रंग कपड्यांच्या माध्यमातून वापरल्यास शुक्राची कृपा होऊन माणसाचे जीवन ऐश-आरामात व्यतीत होते. संपत्तीची वृध्दी होते. गुप्तरोगादीसमस्या दूर होण्यास मदत होते.
यादिवशी ५ वर्षाच्या कन्येच्या रुपात माता असते. तिला रोहिणी असे नामा भिदान आहे. अशा कन्येची देवी स्वरुप मानून पूजा केल्या सराज्य पदप्राप्ती होते. यादिवशी तिला लोण्याचा नैवेद्य दाखविला जातो.
-शुभंभवतु
-- प्रा.गजाननशेपाळ
October 15, 2018
महाराष्ट्राचे जे चार काल्पनिक भाग मानले जातात, त्यात पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भ या भागांचा समावेश केला जातो. या चारीही विभागांत अनेक मान्यवर कवी, साहित्यिक, वाङ्मयकार, वक्ते यांची फार मोठी मांदियाळी आहे. आज सुरेश भट या मान्यवर वैदर्भीय कवि-गझलकार यांच्या कामगिरीचा ताळेबंद मांडताना त्याच विदर्भातल्या कवी अनिल, (आर. रा. देशपांडे), कुसुमताई देशपांडे, ग. ल्यं. माडखोलकर, प्राचार्य राम शेवाळकर, मधुकर केंचे, पु. भा. भावे अशा किती तरी नामवंत साहित्यिक वाङ्मयकारांची नावं नजरेसमोर येतात. या नावांमध्ये ठसठशीतपणानं दिसणारं एक नाव म्हणजे सुरेश भट.
December 27, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti