वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे यांचा संदर्भ या रथसप्तमीला आहे. भारतात प्रभासपट्टणम, कोणार्क अशी मोजकीच सूर्यमंदिरे आहेत. रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात कशेळी गावातील कनकादित्य या सूर्यमंदिराचा त्यात समावेश आहे. रथसप्तमीचा उत्सव मोठय़ा थाटात साजरा केला जातो.
या मंदिराला ऐतिहासिक पाश्र्वभूमी आहे. मंदिरातील आदित्याची मूर्ती हजार वर्षांपूर्वी सोमनाथनजिकच्या प्रभासपट्टणम क्षेत्रात असलेल्या सूर्यमंदिरातून आणली गेली असावी, असे मानले जाते. या मंदिराबद्दलच्या अनेक दंतकथा प्रचलित आहेत. काठेवाडीतील वेरावळ बंदरातून एक व्यापारी दक्षिणेकडे निघाला होता. त्याच्या जहाजात आदित्याची ही मूर्ती होती. कशेळी गावासमोरून जात असताना ते जहाज एकदम थांबले. अनेक प्रयत्नांनंतरही जहाज पुढे जात नाही हे पाहिल्यावर आदित्याच्या मूर्तीला येथेच स्थायिक होण्याची इच्छा असावी, असा विचार व्यापाऱ्याच्या मनात आला आणि त्याने ती मूर्ती किनाऱ्यावरील काळ्या दगडाच्या खडकातील गुहेत नेऊन ठेवली. ही गुहा आज देवीची गुहा म्हणून ओळखली जाते. गावातील कनकाबाई नावाच्या एका महिलेला या मूर्तीबाबत दृष्टान्त झाला आणि गावकऱ्यांच्या मदतीने तिने ही मूर्ती गावात आणून त्याचे मंदिर बांधले. तेच हे कनकादित्याचे मंदिर.
कशेळीतील गोविंदभट्ट भागवतांचे कुलोत्पन्न वंजश हे मंदिराचे विश्वस्त आहेत. पन्हाळगडच्या शिलाहार राजाने १११३ साली गोविंदभट्ट भागवतांना हा गाव इनाम दिला होता. त्याची माहिती देणारा ताम्रपटही या मंदिरात आहे. कनकादित्य हे जागृत देवस्थान असल्याची ख्याती सर्वदूर असल्याने मुंबई, पुणे, कोल्हापूर, अमरावती, बेळगांव, हुबळी, धारवाड, उज्जन, ग्वाल्हेर, इंदूर येथून अनेक भक्तगण दरवर्षी दर्शनासाठी येत असतात. मुंबईचे शिल्पकार कै. नाना शंकरशेठ यांच्याबद्दलची एक आठवणही या मंदिराशी जोडली गेली आहे. शंकरशेठ यांना मूल होत नव्हते. तेव्हा भा. रा. भागवतांच्या आजोबांनी कशेळीला येऊन कनकादित्याला नवस करण्याविषयी सांगितले. त्याप्रमाणे नानांनी नवस केला आणि त्यानंतर त्यांना पुत्राचा लाभ झाला. त्याची आठवण म्हणून नानांनी मंदिरासाठी भव्य, आकर्षक असा सभामंडप बांधून दिला.
माघ शु. सप्तमी ते माघ शु. एकादशी असे पाच दिवस मंदिरात रथसप्तमीचा उत्सव असतो. त्यावेळी मंदिराचे विश्वस्त कालिकावाडीतील देवीला आमंत्रण देतात. माघ शुद्ध षष्ठीला कालिकावाडीतून कालिकादेवी रात्री नऊच्या सुमारास निघते आणि रात्री बाराच्या सुमाराला कनकादित्य मंदिरात पोहोचते. मग देवीचा मुखवटा कनकादित्याच्या शेजारी ठेवला जातो. दुसऱ्या दिवशी साकळी रथसप्तमीला विधीपूर्वक पूजा करून उत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली जाते. या उत्सवात दररोज कीर्तन, प्रवचन, आरती, मंत्रपुष्प, पालखी, प्रदक्षिणा आणि नाटक अशा कार्यक्रमांची रेलचेल असते. उत्सवकाळात या मंदिराला अवश्य भेट द्यायला हवी.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.लोकसत्ता
January 16, 2017
जगाने एकविसाव्या शतकात प्रवेश केला आहे. एकविसावे शतक विज्ञानयुगाचे, आधुनिक युगाचे ‘ब्रँडनेम’ ठरले आहे. वैज्ञानिक विकासाची शिखरे या युगात मानवी प्रयत्नांसमोर थिटी वाटू लागली आहेत.
July 10, 2005
दिवाळी आणि रांगोळी ह्यांचे अतूट नाते आहे. ह्या रांगोळीचा उगम कधी झाला , कोणी प्रथम रांगोळी सुरू केली ह्याबद्दल खूप कथा सांगितल्या जातात. काही म्हणतात अगस्त ऋषींच्या पत्नींनी , लोपामुद्रानी प्रथम यज्ञाच्या वेळी कोरडी रांगोळी काढली आणि सीतेनी रामासाठी ओली रांगोळी काढली. कोण म्हणतं द्वारका मध्ये कृष्णासाठी रूक्मिणीने रांगोळी सुरू केली .
November 14, 2023
माझी स्वरचित वेंकटेशाची आरती आहे. आम्ही फ़क्त याचे करते आहोत. करविता तो श्री वेंकटेशच आहे याची आम्हास नम्र जाणीव आहे.
June 9, 2021
स्मेरचारुमुखमण्डलां विमलगण्डलम्बिमणिमण्डलां
हारदामपरिशोभमानकुचभारभीरुतनुमध्यमाम् ।
वीरगर्वहरनूपुरां विविधकारणेशवरपीठिकां
मारवैरिसहचारिणीं मनसि भावयामि परदेवताम् ॥ ३॥
आई जगदंबेच्या अतिदिव्य सौंदर्याचे आणि वैभवाचे लोकविलक्षणत्व विशद करतांना भगवान शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
स्मेरचारुमुखमण्डलां- स्मेर शब्दाचा अर्थ आहे दंतपंक्ती किंचित दिसतील अशा प्रकारचे मंद हास्य.
अशा स्मेर हास्याने, चारू म्हणजे अत्यंत आकर्षक मुखकमलाने आई जगदंबा युक्त आहे.
अशा अत्यंतिक सुंदरतम हास्याने युक्त असणार्या, विमलगण्डलम्बिमणिमण्डलां - विमल म्हणजे अत्यंत शुद्ध, स्वच्छ, पवित्र. गंड म्हणजे गालाच्या वर आणि डोळ्यांच्या खाली असणारे, डोळे आणि कान यांच्यामधील उंचवटे.
आई जगदंबेच्या या कपोल प्रदेशावर तिच्या मणी अर्थात विविध रत्न लटकवलेल्या बटा रुळत आहेत. अशा बटांनी अधिकच आकर्षक दिसणाऱ्या,
हारदामपरिशोभमान- मोत्यांच्या असंख्य माळांनी अत्यंत शोभायमान असणाऱ्या,
कुचभार- समस्त विश्वाच्या भरणपोषणासाठी पर्याप्त स्वरूपात विश्व तृप्तीकारक अमृताने भरलेल्या स्तन मंडलाने,
भीरुतनुमध्यमाम् - मध्यभाग अर्थात नाजुक कंबर भंग पावेल की काय? अशी भीती असणाऱ्या, अर्थात आई जगदंबेची कंबर इतकी नाजूक आहे की हार आणि स्तनभाराने ती लचकेल की काय? अशी शंका निर्माण होते, इतकी नाजूक.
वीरगर्वहरनूपुरां- विश्वातील समस्त वीरांचा गर्व ज्या नुपुरांच्या अर्थात त्या पैंजणांनी युक्त असणारी चरणकमले नष्ट करतात अशा,
अर्थात जगातील सर्व वीर जिच्या चरणी शरण येतात अशा, विविधकारणेश्वरपीठिकां- अनेक शंकरांना आपले चरणपीठ म्हणजे पाय ठेवण्याचे साधन समजणाऱ्या,
मारवैरिसहचारिणीं- मार अर्थात कामदेव. त्याचे वैरी म्हणजे भगवान शंकर. त्यांची सहधर्मचारिणी असणाऱ्या,
मनसि भावयामि परदेवताम् - परमदेवता आदिशक्तीचे मी मनाने ध्यान करतो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
May 17, 2020
आज भारतीय संरक्षणक्षेत्रापुढे असणारी आव्हाने, शेजारील राष्ट्रांचा धोका, त्यांची युद्धसज्जता, संरक्षणक्षेत्रावर या देशांनी वाढवत नेलेला खर्च, त्यातुलनेने आपल्याकडे असणारी शस्रास्रांची उणीव, मागे पडत गेलेले आधुनिकीकरण, शस्रास्र आयातीवर होणारा प्रचंड खर्च, त्यामुळे वाढत जाणारी आर्थिक तूट ही सर्व पाश्र्वभूमी लक्षात घेता यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये संरक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतुदीची गरज होती. मात्र प्रत्यक्षात संरक्षणक्षेत्राच्या वाट्याला फारसे काही आलेले नाही.
March 22, 2016
एक मस्तक, हे असत्य वचन निघाल्यामुळे श्रीशंकरांनी कापले असे पुराणात वर्णन आहे. त्या मस्तकाची माळ गळ्यात धारण करणारे. संसारदुःखगहनाज्जगदीश रक्ष- अशा हे भगवान महादेवा ! या गहन संसार रुपी दुःखातून माझे रक्षण करा.
August 10, 2020
१९५० पासून जीवनाची गुणवत्ता आणि त्याची मोजदाद याबाबत मानसशास्त्रात विचारमंथन सुरु आहे. प्रत्यक्षात २००३ मध्ये जॉन फ्लॅनागन या अमेरिकन मानस शास्त्रज्ञाने एक प्रश्नावली सुचवली. समाधान, आयुष्यावरील नियंत्रणाची भावना, सहभाग, बांधिलकी (वचनबद्धता), दैनंदिन जीवनात कामाचा समतोल इत्यादी घटकांबाबत एखाद्याचे व्यक्तिगत आकलन काय आहे, मूल्यांकन काय आहे हे घटक जीवनाची गुणवत्ता मोजण्याच्या प्रक्रियेत महत्वाचे ठरतात.
February 27, 2022
आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या संगीत महत्वाचं असल्याचं आपण समजून घेतलं पाहिजे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी १५ मिनिटं संगीत ऐकल्याने आपण व्याधीमुक्त होऊ शकतो. शांत झोप लागू शकते, झोपेमध्ये शारीरिकच आणि मानसिक शांततेची तसेच विश्रांतीची देखील जरुरी असते.
February 21, 2022
पार्लियामेंटरी स्टॅंडिंग कमिटी ने एक महत्त्वाचे सूचना केली आहे की जे सरकारी नोकरीत प्रवेश करतात त्यांना नोकरीच्या पहिले पाच वर्षे सैन्यात नोकरी करणे अनिवार्य केले जावे.
January 15, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti