लेखसंग्रह

वाचकांसाठी व्यवस्थापनाचे कोडे

Category:

 

रमेश सकाळी ऑफिसच्या रस्त्यावर होता. ऑफिसला पोचायला त्याला साधारण ४५ मिनिटे लागत असत. बेशिस्त वाहतुकीला तोंड देतादेता ऑफिसला पोचेपर्यंत त्याला निवांतपणे विचार करायला हाच वेळ मिळत असे. एका मोठ्या खूप व्यवसायात [बिझिनेसमध्ये] असलेल्या कंपनीच्या एका व्यवसायाचा तो प्रमुख अधिकारी होता. आज त्याला जरा जास्तच आनंदी आणि समाधानी वाटत होते, कारण काल तो जबाबदार असलेल्या व्यवसायाच्या कामगिरीचे महिन्याचे निकाल बाहेर आले होते. आणि महत्वाचे म्हणजे गेल्या सात वर्षात त्याच्या व्यवसायात प्रथमच इतके चांगले निकाल दिसून आले होते.

  August 28, 2026


लेखसंग्रह

पळणार तरी कोठे? – एक विचार

Category:

 

“आपले दुबईला जाणारे विमान निघण्यासाठी तयार आहे. कृपया, दुबईला जाणाऱ्या प्रवाशांनी द्वार क्रमांक ४ मधून विमानाकडे प्रस्थान करावे.” हरविलेल्या मनःस्थितीत चिरायूने आपली बॅग उचलली, तिकीट हातात घेतले आणि रांगेत सामील झाला. विमानतळाच्या उबदार वातावरणातून बाहेर पडल्यावर तेथील थंड हवेने त्याला पुन्हा एकदा तो अनुभवत असलेल्या सत्याची आठवण करून दिली. विमानाजवळ आल्यावर त्याने स्वतःला पटविले की ‘हेच तर मला पाहिजे होते. इथल्या सर्व समस्यांपासून, निराशेपासून दूर कुठेतरी. स्वच्छ हवा आणि निळे आकाश असलेल्या ठिकाणी. मनातील सर्व दुःख आणि हताशपणा, सर्व आठवणी विसरून जाण्यासाठी.’

  August 26, 2026


लेखसंग्रह

प्रभाव क्षेत्र – लक्ष आणि उपयुक्तता

Category:

 

माझ्यातील उत्साह आणि अधीरता ओसंडून जात असलेले ते दिवस होते. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तर पटक1न मन उद्वीग्न होई अथवा खूप राग येई. अर्थात याच्यामागे दिलेल्या शब्दाप्रमाणे गोष्टी घडवून आणण्याची प्रबळ इच्छा असे. माझ्या वरिष्ठांना पण या स्वभावाची पुरेशी जाणीव होती. याचा परिपाक म्हणजे मला सर्व गोष्टी माझ्या नियंत्रणात असाव्या असेच वाटे. बाह्य कारणांमुळे एखादी परिस्थिती माझ्या नियंत्रणाच्या बाहेर गेली की माझा संयम सहज सुटे.

  August 21, 2026


लेखसंग्रह

तणावमुक्त जगण्याचे इंगित

Category:

 

“आज आसपास पाहता असे आढळून येते की बहुतांश लोक कुठल्याना कुठल्या तणावामुळे त्रस्त आहेत. या सततच्या तणावामुळे नाना प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक व्याधींचा प्रादुर्भाव वाढत आहे. अर्थात प्रत्येक जण आपापल्या परीने उपाय शोधीत असतो. काही वेळा हे उपाय व्यवहार्य वाटत नाहीत म्हणून सोडून दिले जातात. मी सुद्धा या अनुभवातून गेलो आहे. बरीच वर्षे असा त्रास मी पण सहन केला.

  August 19, 2026


लेखसंग्रह

तरुण व्यवस्थापकांची होऊ शकणारी कोंडी

Category:

 

असेच एकदा निलय (माझा एक हुशार तरुण सहकारी) बरोबर गप्पा मारताना कुठल्या गोष्टी आपल्या कह्यात आहेत आणि त्याच्यावर लक्ष कसे केंद्रित करावे हा विषय निघाला. प्रत्यक्ष आयुष्यात काही गोष्टी आपल्या इच्छेप्रमाणे तर काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडत असतात. ज्या मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टीवरील उपाययोजना आपल्या कह्यात नसते अशावेळी त्यांच्याकडे आपल्याला असहायपणे बघावे लागते. अशीच एक परिस्थिती एका मोठ्या कंपनीत काम करणाऱ्या माझ्या एका मैत्रिणीच्या सामोरी आली होती. मी तिच्या त्यावेळच्या मानसिकतेशी पूर्णपणे सहमत होतो कारण काही वेळा मला स्वतःला अशाच परिस्थितीतून जावे लागले होते. मला खात्री आहे काही वाचकांनासुद्धा केंव्हा ना केंव्हा अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागले असणार.

  August 14, 2026


लेखसंग्रह

अपेक्षेप्रमाणे गोष्टी का घडत नाहीत? – एक विचार

Category:

 

‘हातात असलेल्या संसाधनामधून अपेक्षेप्रमाणे परिणाम घडवून आणणे’ यासाठी व्यावस्थापकांची मुख्यता नेमणूक केलेली असते. जेंव्हा जेंव्हा परिणाम चांगले होतात तेंव्हा सगळा आनंद आणि समाधान असते. परंतू बऱ्याचवेळा परिणाम अपेक्षेप्रमाणे येतातच असे नाही. अशावेळी मात्र व्यवस्थापकांना मनस्ताप आणि टीकेला तोंड द्यावे लागते. प्रत्यक्षात असे मनस्तापाचे प्रसंग खूप जास्त प्रमाणात येतांना दिसतात, असा बहुतेक व्यवस्थापकांचा अनुभव असतो.

  August 12, 2026


लेखसंग्रह

गुणवत्तेची भाषा – quality language

Category:

 

“एकदा या ना आमच्याकडे.” “उद्या भेटूया.” “बरे वाटत नाही आहे.” “गाडी उशीरा पोहोचणार आहे. न्यायला पाठवा कोणालातरी.” “तुला ना शिस्तच नाही” “आपल्या कंपनीचे उत्पादन वाढवायला पाहिजे.” अशी भोंगळ भाषा फारतर साधारण इच्छा किंवा एखादे मत प्रदर्शित करतात. पण ऐकणाऱ्याने नक्की काय करायचे आहे किंवा बोलणाऱ्याची नक्की काय अपेक्षा आहे, हे देवच जाणे. अशी वाक्ये सर्रास कानावर पडतात.

  August 12, 2026


लेखसंग्रह

माहिती आधारित व्यवस्थापन

Category:

 

हल्ली “data” असा शब्द ऐकला की पटकन डोळ्यासमोर software किंवा माहिती तंत्रज्ञान हे जग डोळ्यासमोर येते. प्रत्यक्षात मात्र डेटा म्हणजे कुठलीही संकलित केलेली माहिती जिच्यावर कुठलेही संस्कार / विश्लेषण झालेले नसते. असा डेटा विश्लेषण करण्यासाठी वापरण्यासाठी उपयुक्त ठरतो, ज्यातून पुढे कृती करून अपेक्षित परिणाम घडवून आणता येतात. बहुतेक कंपन्या समस्या सोडविण्याच्या वेगवेगळ्या कौशल्यांचे प्रशिक्षण त्यांच्या कर्मचाऱ्यांना सतत देत असतात. पण त्या शिक्षणाचा पुरेसा उपयोग करून घेतांना दिसत नाहीत. प्रत्यक्षात असे आढळून येते की अगदी क्वचितच डेटाचा उपयोग विश्लेषण करण्यासाठी वापरला जातो.

  August 7, 2026


लेखसंग्रह

एकविसाव्या शतकातील राष्ट्रभक्ती !

Category:

 

पावसाची मंद रिपरिप चालली होती त्यामुळे वाहतूक संथ झाली होती. १५ ऑगस्टचा दिवस असल्याने रस्त्यावर गर्दी जरा कमीच होती. मी ज्या संस्थेमध्ये काम करतो तेथील झेंडा वंदन नुकतेच संपवून घरी निघालो होतो. सुट्टीचा दिवस असूनही लवकर उठावे लागले होते. मी घरातून निघालो तेव्हा माझी मुलेही तयारी करून शाळेला निघाली होती. संस्थेच्या आवारात आम्ही काही तुरळक माणसे जमलो होतो. कुणाच्याही चेहेर्‍यावर प्रफुल्ल भाव नव्हता. आमच्यातील एकाने काहीतरी संदर्भहीन भाषण केले. मग संस्था प्रमुखांच्या हस्ते झेंड्याचे अनावरण झाले.

  August 5, 2026


Uncategorized

माझी पहिली लाडकी खुर्ची

Category:

 

कोणी म्हणेल खुर्ची सारखी खुर्ची, त्यात सांगण्यासारखे काय असणार. राजकारणी लोक ज्या संदर्भात खुर्चीसाठी भांडतात ती खुर्ची ही नव्हे. माझ्या आयुष्यात मात्र एका खुर्चीने मला खूप आराम आणि प्रसिद्धी मिळवून दिली होती.

  July 31, 2026