वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल


कोणत्याही व्यक्तीत येणारे शारीरिक आणि मानसिक गुणावगुण हे मातापित्यांच्या अनेक पिढ्यांकडून येतात हे आपल्या पूर्वजांच्या बरोबर लक्षात आले होते. हा निष्कर्ष त्यांनी अनुभव आणि निरीक्षणावरून काढला. विज्ञानीयदृष्ट्या आता अगदी निर्विवादपणे सिद्ध झाले आहे की, आनुवंशिक गुणधर्म हे अपत्यपिढ्यांमध्ये, गुणसूत्रांमुळे म्हणजे क्रोमोसोम्समुळे येतात.
February 26, 2018
कुटुंब म्हटले की अन्न, वस्त्र, निवारा या अगदी प्राथमिक गरजा आल्याच. त्यातील निवार्याची गरज म्हणजे घराची गरज.
घराची म्हणजे चार भिंती, दारं, खिडक्या आणि डोक्यावर छप्पर. खरं तर घराचे किती विविध प्रकार आहेत पण अजूनही घर म्हटलं की बालपणी चित्रकलेच्या वहीत काढलेले समोर चौकोनी भिंत, भिंतीला मधे दार, बाजूला दोन खिडक्या, वर दोन्ही बाजूने उतरते छपर असंच घर डोळ्यापुढे उभं राहातं. हा जणू 'घर' या शब्दाचा सिम्बॉलच.
प्रत्येकाला घर हे सुंदरच हवं असतं. आपली परिस्थिती, आपला आवाका यांच्या बेरीज-गुणाकारात बसणार्या स्वत:च्या एका छानशा घराचे स्वप्न प्रत्येकजण जपत असतो. हे स्वप्न तर पूर्ण झाले.. घर तर झाले पण पुढे काय ?
'आपलं घर' , 'माझं घर' शब्द जरी उच्चारले तरी मनाला केवढा विसावा वाटतो. घर म्हणजे आपलं सर्वस्व. आपण कुठेही बाहेर गेलो, परदेशात गेलो, मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये राहून आलो तरी दोन चार दिवस आनंदात जातात पण नंतर कधी एकदा घरी पोहोचतो ही ओढ निर्माण होते.
पंचतारांकित हॉटेल्सच्या खोल्यांप्रमाणे घरातील खोली इतकी सुसज्ज आणि सजवलेली नसते पण चार दिवस फिरून आल्यावर गादीवर पाठ टेकवताना जो आराम मिळतो तो प्रचंड सुखावह असतो. कारण त्यामागे स्वत:च्या घराची, त्यातील स्थैर्याची भावना आधार देणारी असते. तुमचं साधं जुन्या बांधकामाचं घर असो, वनरुम किचन फ्लॅट असो किंवा मोठा बंगला असो. प्रत्येकाला शेवटी आपलं घरच सुख देतं.
तुमचं घर तुम्हाला दिवस रात्र इतकं सुख देतं मग त्या घराची तुम्ही किती काळजी घेता? आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनक्रमात स्वत:कडे पहायला वेळ नसतो. तरीसुद्धा घर झाडून पुसून स्वच्छ ठेवलेलंच असतं. पण इतकं पुरेसं असतं का? त्यावर तुम्ही म्हणाल "अहो दिवसभर कितीही आवरलं ना, तरी घरातला पसारा संपतच नाही." अगदी योग्य आहे तुमचं हे म्हणणं. पण दिवसभर घर आवरायचंच कशाला? रोजचा अर्धा-एक तास खूप झाला. फक्त त्यासाठी नियोजनाची गरज आहे.
प्रत्येकाला आपलं घर खूप सुंदर हवं असतं. आपण बराच खर्च करून घराला आकर्षक इंटिरिअर करून घेतो. अगदी पैसे खर्च करुन इंटिरिअर केले नाही तरीही आपल्या आवडीनुसार घर सजवता येतेच. घर छान सजवलंय पण ते नीटनेटकं ठेवलेलं नाही.... अस्ताव्यस्त पसारा घरभर पसरलेला आहे.. अशा घरात राहताना निश्चितच प्रसन्न वाटणार नाही.
आपल्या घरात आपणच पसारा करतो आणि मग तो पसारा दिवसभर घरातील एकटी स्त्री आवरत असते. स्त्रिया आजकाल कामानिमित्त बाहेर पडतात. मग घर आवरायला वेळ कुठे मिळणार ? घर वेळेवर आवरलं नसलं तर त्या पसार्यात आयत्यावेळेला महत्वाच्या वस्तू सापडत नाहीत. मग गोंधळ, चिडचिड आणि वेळेचा अपव्यय.... पुन्हा अव्यवस्थितपणाचा शिक्का तो वेगळाच.
हे सगळं टाळण्यासाठी घर आवरायला मिळतो सुट्टीचा एकच दिवस.. तो म्हणजे रविवार ! म्हणजे विश्रांती नाहीच ! उलट बाहेरच्या कामापेक्षा त्यादिवशी घरातलीच कामं करुन जीव थकून जातो. "पण काय करणार? बरं कंटाळा आला म्हणून कामं टाळून चालत नाही. कामं तर सगळी होणं गरजेचं आहे.
मग त्याचं जर आपण छानसं नियोजन केलं तर ? रविवार खरा सुट्टीचा वार होईल. घर नेहमीसाठी प्रसन्न राहील.
-- सौ. निलिमा प्रधान
April 20, 2016
केंद्र आणि राज्य सरकारने गुप्तचर यंत्रणा अधिक भक्कम करून जंगलात लपून बसलेल्या माओवाद्यांच्या टोळ्यांचे तळ उद्ध्वस्त करायला हवेत. माओवाद्यांचे आव्हान मोडून काढण्यासाठी हवी असलेली राजकीय इच्छाशक्ती केंद्र सरकारकडे नाही,ती येणे आवश्यक आहे. प्रश्न आहे की नेमके काय करायला पाहिजे?
March 20, 2014

October 16, 2015
क्रिकेट म्हटले की माणूस सगळे काही विसरून जातो. परंतु हे क्रिकेट काल कसे होते आणि आज कसे आहे हे आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सागू शकतो. परंतु एका शहराचे आणि क्रिकेटचे काय नाते आहे ह्यासाठी शोध घेण आवश्यक ठरते.
August 15, 2021
माझे वडील डॉक्टर होते तसेच काँग्रेसचे पुढारीही होते. काही काळ त्यांनी आमदारकीही भूषवली. मीही डॉक्टर होऊन त्यांची जागा घ्यावी आणि आपल्याला शांत मनाने निवृत्त होता यावे अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे नाटकाची आवड असूनही शाळेत कधी अभिनय केला नाही.
May 5, 2024
आपण लहानपणी ‘येरे येरे पावसा.. तुला देतो पैसा, पैसा ‘झाला खोटा .. पाऊस आला मोठा’ हे गाणे ऐकले होते.आता अनेकदा पैसा खोटा असल्याचा अनुभव येतो.विशेष करून ५०० व १००० या चलनाच्या नोटा तर अनेकदा खोट्या निघू शकतात.
October 22, 2023
जय देवा जय देवा जय मोहिनी देवा
शरण आलो तुजला सुखी मजसी ठेवा ।।
समुद्र मंथन करुनी चौदा रत्ने काढिली
सर्व देवांना ती तु अर्पण केली ।
अम्रुत वाटप करता तंटा बहू झाला
वाटप करणेसाठी मोहीनी रुपे तु आला ।।
रुप बदलून राहू देवासह आला
नजर चुकऊनी अम्रुत प्राशु लागला
नजरेतुन तुझ्या तो नाही सुटला
सुदर्शन चक्रे त्याचा निप्पात केला ।।
शरण येऊनी तुजला भक्ती जे करती
सुखी ठेऊनी त्यांना मुक्ती तु देशी ।
भक्त रक्षिणीया तू धावुनीया आला
नेवासे नगरी तू ऊभा ठाकला ।।
सुरेश काळे
सातारा.
July 26, 2018
हे सर्वांचे आवडते व अत्यंत चविष्ट व पौष्टिक फळ आहे.ह्याच्या अनेक जाती उपलब्ध आहेत वेलची,हिरवी,सालदाटी,मांईडोळची,आंबटी इ.त्यातल्यात्या वेलची अर्थात ह्याला रसबाळी देखील म्हणतात उत्तम मानली जातात.
गरीब,श्रीमंत,वृद्ध,लहान मुल असे सगळ्यांचेच पोषण करणारे हे फळ.ह्याचे पासून शिखरण,पाकातली केळी,गुळातला केळीचा हलवा,केरळ मध्ये तर केळी घालून केलेला बदामी हलवा देखील मिळतो,शेक,केळ्याचे पंचामृत असे अनेक प्रकार केले जातात व ते फार रूचकर लागतात.
हि केळी चवीला गोड थंड शरीरातील वात व पित्त दोष कमी करणारी व कफ वाढवणारी असते.ह्याच सुंदर हिरवा वृक्ष असतो जो अत्यंत पवित्र मानला जातो व सत्यनारायण पुजेला तो वापरतात.
चला मग आपल्या ह्या लाडक्या फळाचे औषधी उपयोग पहायचे ना:
१)सुज आली असता सुजलेल्या भागावर गव्हाचे पीठ व पिकलेले केळे एकत्र कालवून गरम करून बांधावे.
२)वारंवार भस्मक रोगा सारखी भूक लागत असल्यास केळीच्या शिकरणात तूप घालून खावे.
३)स्त्रियांच्या अंगावर पांढरे जात असल्यास पिकलेले केळे+आवळकाठी चूर्ण+ त्याच्या दुप्पट साखर घालून हे मिश्रण दिवसातून एकदा खावे.
४)दम्यामुळे फुफ्फुसे कम कुवत झाली असल्यास एका पिकलेल्या केळ्यात रात्री ३ लवंगे टोचून ठेवावीत व ते रात्रभर झाकून ठेवावे सकाळी अनशापोटी लवंगासह ते केळे खावे व वरून १/२ कप कोमट पाण्यात २ चमचे मध घालून प्यावे ह्याने फुफ्फुसे बळकट व लवचीक होतात.
५)सुका खोकला वारंवार येत असल्यास पिकलेले केळे+१ चमचा मध + १/२ चमचा काळी मिरपुड हे मिश्रण काही दिवस सकाळ संध्याकाळी घ्यावे.
केळी खायचा अतिरेक केल्यास भुक न लागणे व सर्दी होणे अशा तक्रारी होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
December 18, 2016
या वर्षी भाऊबीजेला माझ्या बहिणींनी पतंजली च्या विविध साबणांचे एक कीट मला भेट दिले होते. मी ते साबण वापरतोय. मी जगभरातले साबण वापरले आहेत परंतु पतंजली चे साबण मला आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाला खूप आवडले आहेत. मुलतानी मातीचा साबण तर अप्रतिम.
हे साबण भारतीय आहेत. परंतु ते फक्त भारतीय आहेत म्हणून नव्हे तर त्यांचा दर्जा जगातील अतिशय उत्तम आहे. फक्त भारत नव्हे तर जगभर पतंजलीचे उत्पादने लोकप्रिय होतील. आधी वापरताना भीती वाटत होती पण आता इतर विदेशी कंपन्यांचे साबण कपाटात पडून आहेत.
मी काही पतंजली ची जाहिरात करीत नाही पण मला जे योग्य वाटते ते सर्वांना सांगायला काय हरकत आहे. अनुभव घेवून मगच निर्णय घ्या.
साबणाचा अनुभव घेतल्यावर सुनेनी पतंजलीचे बिस्किटे काल आणली आहेत. अजून चव घेतली नाही. त्याबद्दल नंतर सांगेन.
भारतीय जे जे चांगले आहे ते लोकांपर्यंत पोहोचलेच पाहिजे. बाहेरच्या देशात जेव्हा भारतीय उत्पादने दिसतात तेव्हा मनस्वी आनंद होतो.
चिंतामणी कारखानीस --
29 December 2015
December 29, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti