वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आपल्या सभोवती अनेक वनस्पती असतात, परंतु त्यांच्या उपयोगाबाबत माहिती नसल्याने आपण त्या वनस्पतींना कचरा समजून बसतो. ह्याच वनस्पतींच्या माध्यमातून औषधी निर्माण करणाऱ्या कंपन्या योग्य उपयोग करून लाखो रुपये कमवितात. ग्रामीण भागात उपलब्ध असणाऱ्या वनस्पतींच्या उपयोगाबाबत, ग्रामीण जनता अनभिज्ञ असल्याने त्याचा जोड-व्यवसायासारखा उपयोग करत नाही. पर्यायाने औषधी खरेदी करतांना अनावश्यक किंमत मोजावी लागते.
सहजतेने उपलब्ध होणाऱ्या वनस्पतींच्या उपयोगाबाबत जनजागृती वाढविली गेली तर ग्रामीण भागात रोजगार निर्मिती सोबतच भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देता येईल. भारतातील शेकडो उपचार पद्धतींपैकी प्रभावशाली एक म्हणजे आयुर्वेदिक उपचार पद्धती होय. आयुर्वेदाला लाखो वर्षांचा इतिहास आहे, हजारो औषधी वनस्पतींच्या उपयोगाबाबत आयुर्वेदात उल्लेख आहे, यापैकीच एक म्हणजे कंटकारी होय. ह्या वनस्पतीच्याबाबत प्राचीन ग्रंथामध्ये पुढील उल्लेख आढळतात-
" वरुणार्तगलशिग्रु मधु शिग्रु तर्कारीमेषश्रुंगी पुतीकनक्तमाल...|| " (सृश्रुत)
" कंटकारीकृतः क्वाथः सकृष्णः सर्वकासहा | " (भैषज्य रत्नावली)
" त्रिकंटक बलाप्या व्याघ्री गुद्नाग रसाधीतम्
वर्चीमूत्र विबन्धध्नं शोथज्वर हरं पयं | " (चरक)
असे विविध उल्लेख असलेल्या ह्या वनस्पतीचे वेगवेगळी नावे आहेत-
कुळनाव- Solanaceae Latin Name - Solanum Virginianum L
संस्कृत नाव- कंटकारी, श्वेता, क्षुद्रा, चंद्रहास, लक्ष्मणा
मराठी नाव- डोर्ली, कंटकारी, जंगली वांगे, रानवांगी
हिंदी नाव- कंटकारी, जंगली बैंगन, वृहती, कटेरी, लघुकाई, भटकटय्या
English Name - Yellow berried night shade. अशी वेगवेगळी नावे आहेत.
सामान्यतः रस्त्याच्या कडेला उकिरड्यावर आढळणारी ही वनस्पती महाराष्ट्र,आंध्रप्रदेश, कर्नाटक,गुजरात, पश्चिमबंगाल (बंगदेश) आदी प्रदेशात प्रामुख्याने आढळते.
रासायनिक घटक- या वनस्पतीच्या पंचांगाच्या राखेत पोटेशियम नाईट्रेट, पोटेशियम कार्बोनेट, पोटेशियम सल्फेट आढळते. पंचांगामध्ये वसा तसेच राळयुक्त पदार्थ व डायोस्जेनीन मिळते. फळांमध्ये सोलसोजेनीन आणि बियांमध्ये पिवळसर रंगाचा १९.३ टक्के तेल आढळते.
उपयोग- विविध आजारांवरील औषध निर्मितीत जसे-डोके दुखी, अपस्मार, नेत्रविकार, दात दुखी, इंद्रलुप्त ( डोक्यावरील केश नष्ट होणे), खोकला, दम, कंठशोथ, क्षयकास, वमन, सर्दीपडसे, मंदाग्नी, पोटाचे विकार, मूत्रखडा, मुत्रकुच्छ (लघवी थांबणे), गर्भपात, गर्भधारणासंबंधी विकार, मिरगी, ज्वर अशा विविध विकारांवरील औषधी निर्मितीत ह्या वनस्पतीचा मोठ्या प्रमाणात वोर करण्यात येते. तसेच संतती नियमनाच्या व जीवनावश्यक औषधी निर्मितीत उपयोग होतो.
ह्या वनस्पतीचे व्यावसायिक तत्वावर उत्पादन घेतल्यास शेतकऱ्यांना अधिक फायधा होऊ शकते. दर एकरी २० ते २२ क्विंटल उत्पादन देणाऱ्या ह्या वनस्पतीची फळे बाजारात ५०० ते ८०० रुपये क्विंटल दराने विकली जातात. अधिक उत्पादन घेण्यासाठी ह्या वनस्पतीचे सुधारित वाणही उपलब्ध आहेत, जसे- आर.एल.एल.-२०, आर.एल.एल.-६ तसेच चनेरजीनम.
दिवसेंदिवस आजारांचे प्रमाण वाढत आहे परंतु त्या प्रमाणात औषधी उत्पादन होत नाही त्यामुळे अवास्तव किंमत मोजून औषधी घ्यावी लागते. ह्या सर्व बाबी टाळण्यासाठी व आर्थिक उन्नती साधण्यासाठी औषधी शेतीचे क्षेत्र वाढणे आवश्यक आहे. शिवाय या प्रयोगाने शेतकऱ्यांचीही उन्नती साधता येईल.
November 12, 2015
मधुपर्णी (स्टीव्हिया) हि एक विलक्षण औषधी वनस्पती असून सध्याच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात वैद्यकीयदृष्ट्या खूपच महत्वपूर्ण ठरत आहे.
ही ऍस्टरेसी कुटुंबातील C वंशातील एक वनस्पती प्रजाती आहे. ती सामान्यतः कॅन्डीलीफ , स्वीटलीफ किंवा शुगरलीफ म्हणून ओळखली जाते. स्टेव्हिया ही ब्राझील आणि पॅराग्वेच्या काही भागात आढळणारी एक कोमल बारमाही वनस्पती आहे जिथे दमट, ओले वातावरण असते. ही वनस्पती मूळची दक्षिण अमेरिकेतील आहे.
July 8, 2025
सिंगापूर हुन येताना श्रीलंकेच्या गॅले बंदरावर क्रु चेंज साठी अर्धा तास थांबून जहाज सौदी अरेबियाच्या बंदरावर निघालं होतं. पहिल्यांदाच 1 लाख टनापेक्षा जास्त कार्गो नेणाऱ्या तेलवाहू जहाजावर जॉईन झालो होतो. यापूर्वीची जहाजे 35 ते 40 हजार टन क्षमतेची होती. त्यांची लांबी 180 मीटर असायची पण आताच्या जहाजाची लांबी 250 मीटर पेक्षा जास्त होती तसेच उंची आणि रुंदी सुद्धा खूपच जास्त होती. एवढ्या मोठ्या जहाजाच्या इंजिन, इतर मशिनरी तसेच पंपिंग सिस्टीम वर यापूर्वी कामाचा अनुभव नव्हता.
October 19, 2019
मराठा असल्याचा अभिमान बाळगण्यात काहीच गैर नाही. पण तो अभिमान बाळगण्या लायक होण्यासाठी प्रत्येक मराठा तरूणाने प्रयत्न करायला हवेत. सद्यस्थितीतील मराठा समाजाला उज्वल भविष्याकडे नेण्यासाठी फक्त आरक्षणाच्या शिडीची गरज नाही तर मराठा समाज खडखडून जागा होण्याची जास्त गरज आहे.
मराठा समाजातील आई आज बर्याaचदा मराठा असल्याचा अभिमान बाळगणार्यां आपल्या मुलाला उपरोधाने म्ह्णते, ’मराठयाचा बाणा आणि डोईवर व्हाणा...
मराठा समाज अधोगतीकडे वाटचाल करीत असल्याचेच हे घोतक म्ह्णावे लागेल. सद्यस्थितीतील मराठा समाजातील एखादी व्यक्ती आहे म्ह्णून तिला काही विशेष अधिकार, मान – सन्मान वगैरे मिळता आहेत अस कोणतही चित्र महाराष्ट्रातील कोणत्याही कानाकोपर्यावत दिसत नाही. आज महाराष्ट्रात जी मराठा समाजाकडून आरक्षणाची मागणी केली जाते आहे हे मराठा समाजाच्या अधोगतीचच लक्षण म्ह्णावे लागेल. कोणत्याही प्रगत देशाच लक्षण काय असावं ? की त्या देशातील आरक्षण क्रमाक्रमाणे कमी होत जावं पण आपल्या देशात तर आरक्षण मागणार्याम समाज गटांच प्रमाण दिवसेन – दिवस वाढत आहे. महाराष्ट्रात ब्राम्ह्ण समाजा खालोखाल मराठा समाज मानला जातो. त्यामुळे पुर्वी त्याखालच्या समाजाकडून मराठा समाजाला मान दिला जायचा पण आता तो दिला जातोच याची खात्री देता येत नाही. आज महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या राजकारणातही मराठा समाजाचा वरचष्मा आहे असं गृहीत धरल तरी मराठा समाजातील चार डोकी पिढ॑यान - पिढ्या राजकारणात आहेत, चार डोकी श्रीमंत आहेत म्ह्णून संपूर्ण मराठा समाज सदन, श्रीमंत अथवा सुखी आहे असं गृहीत धरता येत नाही ना ! समजा असं गृहीत धरल की एकेकाळी मराठा समाज इतर समाजांपेक्षा सदन होता. पण त्या वेळ्च्या आणि आजच्या परिस्थितीत फारच फरक आहे. पुर्वी मराठा समाज राजा होता आता रामागडी झालेला आहे. राजकारण वगैरे क्षेत्र सोडा आणि उद्यागक्षेत्रात डोकावले तर आज मराठा समाजातील किती लोक मोठे उद्योगपती आहेत ज्यांची नावे जागतीक स्तरावर आदराने घेतली जातात. सद्यस्थितीतील मराठा समाज पुढे जात नाही त्याला मराठा समाजाची एक वृत्ती कारणीभूत आहे ती वृत्ती म्ह्णजे खेकडयाची वृत्ती ! एक वर जात असेल तर दुसरा खालून त्याची टांग खेचतो. त्यासाठी मराठा समाज देशातच नव्हे तर जगभरात विनाकारण बदनाम आहे. सरसकट सर्वच मराठा समाज खेकड्याच्या वृत्तीचा असता तर शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य निर्माण करूच शकले नसते. मुळात मराठा समाज म्ह्णजे लढवय्या समाज हिंमतीचे धाडसाचे कोणतेही काम त्याला करायला सांगा तो नक्की करणार पण व्यावसाय म्हटला की त्याचे पाय डगमगायला लागतात. कोणी तरी लिहलय,’ मराठी माणूस व्यावसायात उतरत नाही त्याला त्यांच्या बायका कारणीभूत आहेत. मराठा समाज ही दुदैवाने त्याला अपवाद नाही. मराठा समाजातीला बायकांची नवर्याा उद्योगधंद्यापासून दूर ठेवण्याची वृत्तीही काही अंशी मराठा समाजाच्या अधोगतीला कारणीभूत आहे. मराठा समाजातील मुलींना महिन्याच्या महिन्याला एक रकमी पगार मिळविणारा नवरा हवा असतो. लाखांची उलाधाल करणार्या व्यावसायिक असणार्याग मराठा समाजातील तरूणाला वधू मिळविण्यासाठी वणवण करावी लागते. पुर्वी श्रीमंत असणार्याम मराठा समजाने त्याकाळी बढेजाव पणा करण्यासाठी काही चाली, रूढी आणि परंपरा सुरू केल्या ज्या आजच्या मराठा समाजाला जाचक ठरत आहेत त्यांच नव्याने विचार करायला हवा. आजही मराठा समाजात लग्नकार्यावर अमाप पैसा खर्च केला जातो. प्रसंगी हा खर्च कर्ज काढूनही केला जातो. मराठा समाजाचे सामुहीक विवाह सोहळे क्वचितच पार पाडले जातात. त्यामुळे सद्यस्थितीतील मराठा समाज कर्जबाजारीपणामुळे ग्रस्त झालेला समाजही झालेला आहे. राजे महाराजांचा काळ संपल्यावर मराठा समाजाने ही नाईलाजाने शेती हा व्यावसाय म्ह्णून स्विकारला आणि तेथेच तो फसला. आज ही बराचसा मराठा समाज शेतीवर अवलंबून आहे. लोकसंख्या वाढत गेली तशी प्रत्येकाच्या वाट्याची शेती कमी होत गेली. मग मराठा समाजावर दुसर्याण समाजातील लोकांची चाकरी करणे भाग पडले. तेथे ही कोकणस्थ मराठा समाजाने आपला माराठी बाणा सोडला नाही, होळी गणपतीला गावी जायला सुट्टी नाही दिली तर ते प्रसंगी नोकरीला ही लाथ मारून जातात. मराठा समाजात सारासार विचार करण्याची क्षमताच नष्ट झालेली आहे. मध्यंतरी कोठे तरी वाचनात आले मराठा समाजाचा मुंबईत एक ही हॉल नाही ! खर की खोटं देव जाणे पण जर हे खंर असेल तर ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे. पुर्वी लोकांच्या हिंमतीला, मेहनतीला आणि प्रामाणिकपणाला किंमत होती. पण आज तुमच्या जवळ असणार्याी शिक्षणाला, कलागुणांना आणि त्याहून ही अधिक तामच्या जवळ असणार्याा पैशाला अधिक किंमत आहे. मराठा समाजाला आपला वंश पुढे चालावा याचे भारी कौतुक त्यामुळे त्यांना मुलगा हवा असतो याचा अर्थ ते मुलींचा द्वेश करतात असा नाही पण त्यामुळे त्याचा कौटुबिक पसारा वाढतो आणि त्या वाढलेल्या पसार्यातखाली तो घुसमटून दम तोडतो. अखंड मराठा समाज एकत्र असा कधी आलेलाच नाही सद्यस्थितीतील मराठा समाज तुकड्या तुकड्यात विखुरलेला दिसतो. त्या प्रत्येक तुकड्यातील मराठा समाजाची मानसिकता, विचारसरणी भिन्न – भिन्न आहे. मराठा समाजात अनेक महान व्यक्ती जन्माला आल्या पण मराठा समाजाचा स्वतंत्रपणे विचार करावा असा विचार त्यापैकी एकाच्याही मनाला कधी शिवला नाही. मराठा समाजानेच समाजातील जातीभेद नष्ट व्हावेत म्ह्णून प्रथम पुढाकार घेतला पण आज सर्वांना आरक्षण बहाल करणार्याी माराठा समाजावरच आरक्षण मागण्याची वेळ आलेली आहे. आज महाराष्ट्रात मराठा समाजातील सर्वांनाच एका तराजूत तोलले जात आहे. पण कोणाच्या हे का लक्षात येत नाही मराठा समाज चार भागात विभागला गेलेला आहे. एक राजा- महाराजांच्या थाटात जगणारा मराठा समाज, एक श्रीमंत मराठा समाज, एक मध्यमवर्गीय पांढरपेशा मराठा समाज आणि एक दिन – दलीत गरीब मराठा समाज. एखादा रस्त्यावर राहणारा गरीब मराठा समाजातील आहे म्ह्णून त्याच गरीब असणं आपण अजून किती वर्षे नाकारणार आहोत ? आज मराठा आरक्षणाची मागणी होतेय याचा अर्थ आज मराठा समाजाची सहनशक्ती संपलेली आहे. आता यापुढे होईल तो उद्रेक ! सद्यस्थितीतील मराठा समाज सैरभैर झालेला आहे. त्याला कोणीही वाली उरलेला नाही. खरं म्हणजे मराठा समाजाने स्वतःच्या पायावर स्वतःच धोंडा मरून घेतलेला आहे. मराठा समाज नेहमीच प्रसिध्दी माध्यमांपासून दूर राहिल्यामुळे आज त्यांच्या दुःखाची कोणी दखलच घेत नाही. मराठा आरक्षणाला उचलून धरण्यासाठी प्रसारमाध्यमांनी किती मदत केली हा संशोधनाचा विषय आहे. सद्यस्थितीतील मराठा समाजाचा विकास चारी दिशांनी खुंटला आहे. आजचा मराठा समाज स्वप्ने पाहायचीच विसरून गेलेला आहे. ज्यांच्यात स्वप्ने पाहण्याची क्षमता आहे ते परदेशात स्थिरावता आहेत. पुर्वी मराठा समाजातील तरून छाती पुढे काढून सांगत असत मी मराठा आहे ! पण आज त्याला तस करण्याची लाज वाटते कारण आज मराठा समाजातील लोकांच दखल घेण्याजोग कर्तृत्वच दिसत नाही. आज मराठा समाज शिक्षण क्षेत्रातील आरक्षणामुळे बराच मागे पडलेला आहे. व्यक्तीशः मराठा समाजाच्या म्ह्णाव्यात अशा शिक्षणसंस्था महाराष्ट्रात नाहीत. मराठा समाजातील तरूण – तरूणी फक्त पदवीधर होण्यातच धन्यता मानत आहेत. गेल्या काही दशकात फार प्रसिध्दी लाभलेले मराठा समाजातील चेहरे उद्याल येताना दिसले नाहीत. सद्यस्थितीतील मराठा समाजाच्या हितासाठी संपूर्ण मराठा समाजाला एकत्र येऊन कार्य करण्याची नितांत आवशकता आहे. फक्त आरक्षण मिळाल्यामुळे मराठा समाजाला चांगले दिवस येतील असे खात्रीने नाही सांगता येणार. सद्यस्थितीतील मराठा समाजाला या परिस्थितीतून बाहेर काढायचे असेल तर प्रत्येकाला माळेतील एक मनी व्हावे लागेल. सद्यस्थितीतील मराठा समाजाची अवस्था बिकट असली तरी मराठा समाजातील तरूणांनी व्यसनांच्या आहारी जाता कामा नये. मराठा समाज हा स्वभवतः सहनशील आहे त्यामुळे आपल्या दुःखाची तो उगडपणे वाच्यता करणार नाही. पण तो भडकला तर त्याला आवरणे शक्य होणार नाही. मराठा समाजातील प्रत्येक घटकाने आता समाजाच्या विकासाच्या दृष्टीने आपल्याला आपल्या परीने काही भरीव कार्य करता येईल का याचा विचार करायला हवा ! जुन्या चाली, रूढी आणि परंपरा ज्या संपूर्ण मराठा समाजात मानल्या जात नाहीत त्या नष्ट कराव्यात. मराठा असल्याचा अभिमान बाळगण्यात काहीच गैर नाही. पण तो अभिमान बाळगण्या लायक होण्यासाठी प्रत्येक मराठा तरूणाने प्रयत्न करायला हवेत. सद्यस्थितीतील मराठा समाजाला उज्वल भविष्याकडे नेण्यासाठी फक्त आरक्षणाच्या शिडीची गरज नाही तर मराठा समाज खडखडून जागा होण्याची जास्त गरज आहे.
लेखक – निलेश दत्ताराम बामणे ( कवी, लेखक आणि पत्रकार ( संपादक – मासिक साहित्य उपेक्षितांचे )
June 8, 2015
साखर तयार करण्याचा सर्वांत पहिला कारखाना भारतात इंग्रजांनी सन १८६८ मध्ये सुरु केला. त्याआधी भारतीय लोकं शुद्ध देशी गुळाचेच सेवन करत होते आणि कधीही आजारी पडत नव्हते.
साखर हे एक प्रकारचे विष आहे जे अनेक रोगांना निमित्त ठरते . हे कसे काय घडते याबद्दल आपण जरा माहिती घेऊ या...
(१) -- साखर बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये गंधकाचा सर्वाधिक वापर केला जातो. गंधक म्हणजे काय तर फटाक्यांमधील मसाला!
(२) -- गंधक हा अत्यंत जड धातू असून एकदा का गंधक शरीरात गेले की ते शरीराबाहेर पडतच नाही.
(३) -- साखर ही कॉलेस्ट्रॉल वाढवते. कॉलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो.
(४) -- साखरेमुळे शरीराचे वजन अनियंत्रित वाढते व त्यामुळे अंगी स्थूलपणा येतो.
(५) -- साखर ही रक्तदाब वाढवते.
(६) -- साखर ही मेंदूला झटका येण्याचे एक मुख्य कारण आहे.
(७) -- साखरेतील गोडपणाला आधुनिक चिकित्सा पद्धतीत सुक्रोज म्हटले जाते. माणसे व जनावरे हे दोघेही सुक्रोज पचवू शकत नाहीत.
(८)-- साखर तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये तेवीस हानीकारक रसायने वापरली जातात.
(९)-- साखर ही मधुमेह होण्याचे एक मुख्य कारण आहे.
(१०) -- साखर हे पोटातील जळजळीचे एक मुख्य कारण आहे.
(११) -- साखर ही शरीरातील ट्राइ ग्लिसराइड वाढवते.
(१२) -- साखर हे पेरेलिसिसचा झटका अथवा लकवा होण्याचे एक मुख्य कारण आहे.
(१३) कृपया आपणास जितके शक्य होईल तितके साखर सोडून गुळाचा वापर करणे सुरू करा.
वरील हितकारक माहिती आपल्या ओळखीची लोकं, आपले मित्र, नातेवाईक आणि इतर गटांना अवश्य पाठवा.
April 10, 2017
हे सर्व ज्या गणेशांच्या कृपेने मिळणार त्यांच्यासाठी आचार्य शेवटच्या ओळीत शब्द वापरतात “एकवर.” अर्थात हे सर्व वर देण्यास एकटे श्रीगणेशच समर्थ आहेत. त्या श्रीगणेशांना सादर वंदन असो.
January 2, 2020
बाहुबली’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशाने ॲनिमेशन तंत्रज्ञानाचाच एक भाग असलेले व्हीज्युअल इफेक्ट्स चे अनेक पैलू भारतीय प्रेक्षकांसमोर नव्याने आले आहेत.
October 28, 2021
देवाला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर भटजी सांगतात, या विड्यावर पाणी सोडा. आणि म्हणा, “तांबूलम् समर्पयामी ।” म्हणजे तू आता जे काही मोदक वगैरे खाल्लेले आहेस, ते पचवण्यासाठी हा तांबूल तुला अर्पण करीत आहे. तांबूल म्हणजे विडा.
July 2, 2017
गाजराचा नेमका उगम कुठून झाला हे काहीच सांगता येत नाही. एक गोष्ट मात्र खरी की, गाजर हे गरिबांचे अन्न आहे. गाजराची बी कुठेही उगवते. व भूक लागली तर लोक गाजर खात असतात त्यामुळे गाजर हे फक्त गरिबांचे अन्न ठरते. जसे आपण आवळा म्हणतो अगदी त्याचप्रमाणे आवळा आणि गाजर हिमालयाच्या पायथ्याशीही मिळते. आवळ्याचे वर्णन स्कंदपुराणात अथवा गरुड पुराणातही मिळते.
December 14, 2023
आज नवरात्रीचा रंग पिवळा
आजचा विषय पिवळ्या रंगाची हळद
आयुर्वेदातील हळद हे एक महत्त्वाचा घटक आहे. हळदीला आयुर्वेदामध्ये " हरिद्रा " म्हणतात. हळदीला आर्थिक, धार्मिक, औषधी व सामाजिकदृष्टया अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. पूर्वी हळद केवळ जंगलात मिळत असे. दक्षिण पूर्व आशियाई देशात तिचे जास्त वास्तव्य आढळत असे. त्या काळात जंगलात आढळणारी हळद भारतात फक्त औषधांसाठीच वापरली जात असे. नंतर तिचा उपयोग रंगकामासाठी होऊ लागला आणि यानंतर मात्र हळदीने मसाल्याच्या डब्यात हळद पावडरच्या रुपाने उडी घेतली. जगाच्या ८० टक्के हळदीचे उत्पादन हे भारतामध्ये घेतले जाते. आणि त्यातील १५ ते २० टक्के हळद निर्यात होते. आपल्या देशात हळदीच्या उत्पादनाचा विचार केला तर आंध्र प्रदेशचा पहिला क्रमांक लागतो. त्यानंतर ओरिसा, तामिळनाडू, आसाम, कर्नाटक आणि त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक येतो. महाराष्ट्रात सातारा, सांगलीमध्ये हळदीचे पीक घेतले जाते. त्यानंतर आता कोकणातील शेतकऱ्यांनीही कोकणात हळदीचे उत्पादन घेऊन दाखविले आहे. हळद म्हटली की राजापुरी हळद या नावाने बाजारात खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे ही हळद राजापूरची आहे, असा समज आजही अनेक लोकांचा आहे, मात्र राजापूरचा आणि या हळदीचा काहीच संबंध नाही. महत्त्वाचे म्हणजे राजापूरमध्ये हळदीचे उत्पादनच घेतले जात नाही. दक्षिण भारतातील हळद ही सेलम म्हणून ओळखली जाते तर महाराष्ट्रातील हळद ही राजापुरी हळद म्हणून ओळखली जाते. सेलम गडद पिवळ्या रंगाची असते तर महाराष्ट्रातील हळद काहीशी फिकी असते, मात्र चवीला राजापुरी अधिक गडद असते. त्यामुळे तिला जास्त मागणी आहे. हळदीचा उपयोग रोजच्या आहारात, औषधांमध्ये, सौंदर्य प्रसाधनांमध्ये, जैविक कीटकनाशकांमध्ये मोठया प्रमाणावर केला जातो. आयुर्वेदात हळदीचे कडू रसम उष्णवीर्य, रुक्ष, ब्रव्य, कृमीहर,असे गुण सांगितले आहेत. औषधी तेल व मलम यामध्ये हळदीचा उपयोग करतात. हळद ही पाचक, कृमिनाशक, शक्तिवर्धक व रक्तशुद्ध करणारी आहे. मूत्रांशाच्या तक्रारीवर व मूतखडयासाठी हळदीचा उपयोग होतो. हळदीचे तेल अँटीसेप्टिक आहे. हळदीचे असे अनेक औषधी गुणधर्म आहेत. शरीराच्या शुद्धीकरणासाठी गरम पाण्यात लिंबू, हळद आणि मध टाकून प्यायला पाहिजे. ओल्या हळदीचा वास अन् चटकदार चव आजारी माणसालाही ताजंतवानं बनवते. हळदीपासून कुंकू तयार करतात. हळदीपासून कुंकू तयार करण्याचे कारखाने अमरावती, पंढरपूर, तुळजापूर, पुणे, नाशिक येथे आहेत. लोकरी, रेशमी, सुती कपडयाला पिवळा रंग देण्यासाठी हळदीचा उपयोग करतात. औषधे, कन्फेक्शनरी उद्योगात हळदीच्या रंगासाठी उपयोग होतो. वॉर्निश उद्योगातही हळदीचा उपयोग होता. हळद पासून सुंगधी तेल काढता येते. हे तेल नारंगी पिवळया रंगाचे व हळदीसारखा सुवास असणारे असते.
हळदीचे दुष्परिणाम
अनेकदा संधिवाताचे रुग्ण हळदीचे सेवन, ती विना शिजविता करीत असतात. अशा वेळी मात्र ही कच्ची हळद अतिप्रमाणात सेवन केली गेल्याने कालांतराने पचनासंबंधी तक्रारी उद्भवू लागतात. त्याचबरोबर क्वचित पित्त, पोटदुखी अशा समस्या ही उद्भवू शकतात. त्यामुळे हळदीचे सेवन दररोज तीन ग्रामपेक्षा अधिक केले जाऊ नये. हळदीमध्ये ऑक्झेलेट्स मोठ्या प्रमाणावर असल्याने त्याच्या अतिसेवनाने गॉल स्टोन्सची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे ज्यांना गॉल ब्लॅडर संबंधी विकार असतील त्यांनी हळदीचे सेवन योग्य प्रमाणामध्ये करणे अगत्याचे आहे. हळदीच्या अति सेवनाने रक्तदाब अचानक कमी होऊ शकतो. त्यामुळे रक्तदाबाच्या विकारासाठी ज्या व्यक्ती औषधोपचार घेत असतील त्यांनी हळदीचे सेवन करताना ते योग्य प्रमाणात केले जाईल याची खात्री करावी. हळदीच्या अतिसेवनामुळे किडनी स्टोन्सचा धोकाही उद्भवू शकतो. त्यामुळे ज्यांना किडनी स्टोन्स किंवा तत्सम समस्या सतावत आहेत, त्यांनी हळदीचे अतिसेवन टाळावे. गर्भवती महिला आणि नुकतीच प्रसूती झालेल्या महिलांनीही हळदीचे अतिसेवन टाळावे. कच्ची हळद खाण्याऐवजी हळद स्वयंपाकातील पदार्थांमध्ये इतर मसाल्यांप्रमाणे शिजवून खाल्ली जावी. त्याचबरोबर कधी पित्त झालेले असताना किंवा मळमळत असताना हळद सेवन केली जाऊ नये.
आपण जी स्वयंपाकघरात जी हळद बघतो ती विविध प्रक्रिया करून आलेली असते.
हळद कंद काढल्यानंतर त्यावर विविध प्रक्रिया केली जाते. त्यामध्ये हळद कंद शिजविणे, वाळविणे, पॉलिश करणे आणि त्याला पिवळा धमक रंग आणणे, प्रतवारी करणे या प्रक्रिया महत्त्वाच्या आहेत. पारंपरिक पद्धतीमध्ये हळद वाफेवर शिजविली जाते. त्यामुळे हळदीची प्रत चांगली मिळते.
हळदीचे काही पदार्थ
ओल्या हळदीचं रायतं
साहित्य : ओली हळद, लाल तिखट, लिंबाचा रस, गूळ, मोहरी डाळ, मीठ, जिरे, हिंग आणि तेल
कृती : ओल्या हळदीचे ५-६ कंद धुऊन घ्यावेत. त्यांना गाठे असं म्हणतात. कोरडे पुसून किसणीवर किसून घ्यावेत. त्यात मीठ व लिंबू रस घालावा. फोडणीसाठी थोडं तेल गरम करून त्यात लाल तिखट, मोहरी डाळ व जिरे आणि हिंग घालावा. फोडणी थंड झाल्यावर मिश्रणावर पसरवून घ्यावी. गूळ घालून मिश्रण चांगलं हलवून घ्यावं (आवडत असल्यास त्यात तयार आंबा-लोणचे मसालाही घालता येतो.) तयार मिश्रण चांगलं हलवून काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत भरावं.
ओल्या हळदीचं आयतं
साहित्य : ओल्या हळदीचे ५ कंद, प्रत्येकी तीन चमचे गव्हाचं पीठ, बेसन, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, चार हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, एक टेबलस्पून तीळ, दोन ते तीन कोथिंबीर काडय़ा, लसूण-अद्रकाची पेस्ट, किसलेलं खोबरं, आठ-दहा कढीपत्ताची पानं, तेल, मोहरी, जिरे पूड आणि हिंग.
कृती : प्रथम कढईत एक चमचा तेल घालून त्यावर मोहरी, जिरेपूड आणि लसूण-अद्रकाची पेस्ट घालावी. त्यावर धुऊन-किसून घेतलेली ओली हळद आणि कुटून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालाव्या. एक वाफ आली की मिश्रण गॅसवरून उतरवून थंड होऊ द्यावं. मिश्रण थंड झाल्यानंतर त्यात गव्हाचं पीठ, बेसन, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ घालावं. नंतर त्यात तीळ, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली कढीपत्त्याची पानं घालावी. कढीपत्त्याची पानं फोडणीत सुद्धा घालू शकतो. चवीपुरतं मीठ, किसलेलं खोबरं घालून मिश्रणाचा गोळा बनवावा. पोळपाटाला तेल लावून छोटे-छोटे गोळे करून लाटावे व तव्यावर तेल टाकून त्यावर आयते खमंग भाजावे. खमंग आयतं पाहूनच तोंडाला पाणी सोडतं.
ओल्या हळदीची भाजी
साहित्य : एक वाटी ओल्या हळदीचा कीस, अर्धी वाटी कोवळे मटारचे दाणे, एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो, दोन टेबलस्पून तेल, एक तमालपत्र, २-३ लवंगा, २-३ काळी मिरी दाणे, एक चमचा लाल मिरचीचे तिखट, एक टेबलस्पून आले लसणाची पेस्ट, अर्धी वाटी दही, एक चमचा प्रत्येकी जिरे व धने पूड, चवीनुसार मीठ, अर्धी मूठ बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती : गॅसवर एका पॅनमध्ये फोडणीसाठी तेल गरम करा.तेल चांगले गरम झाली की त्यात २-३ लवंग,२-३ काळे मिरे,१ तमालपत्र घाला.चांगले परतून घेऊन त्यात आले-लसणाची पेस्ट आणि बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो घालून पुन्हा एकदा पांच मिनिटे परतून घ्या. नंतर त्यात एक वाटीभर ओली हळद किसून लगेच तो कीस घाला. (आगोदर कीस करून ठेवला तर काळा पडतो) , मटारचे कोवळे दाणे ,दाणे-जिरे पूड व चवीनुसार मीठ दहयात कालवून घाला आणि दोन मिनिटे परतून घेऊन मग अर्धी वाटी पाणी घालून भाजी वाफेवर शिजू द्या.
ओल्या हळदीचं लोणचे
साहित्य : पाव किलो ओली हळद, १५ ग्रॅम आलं, ३ लिंबे, तिखट, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हिंग, फोडणीसाठी मोहरी आणि तेल.
कृती : हळद व आलं किसून घ्या. हळद पिळून पाणी काढून टाका. हळद व आल्याचा किस एकत्र करून त्यात तिखट, मीठ, लिंबाचा रस घाला.वरून हिंग, मोहरीची फोडणी थंड करून घाला.
ओल्या हळदीचे दूध
साहित्य : दूध अर्धा लिटर, ओली हळद २ इंच, वेलची पावङर १/२ टीस्पून, लवंगा २, दालचिनी पावडर १/२ टीस्पून, मध २ टेस्पून, खडीसाखर १ टेस्पून (ऐच्छीक)
कृती : प्रथम दूध गरम होण्यास ठेवावे. दूध गरम झाले की, त्यामधे हळदीचे खोड चेचून अथवा किसून घालावे. पाठोपाठ लवंगा टाकाव्यात. तसेच वेलची पावडर, थोडी दालचिनी पावडर घालावी व दूध पाच मिनिट चांगले उकळू द्यावे. गोड हवे असेल तर आताच खडीसाखर घालावी. आता चांगले उकळलेले दूध ग्लासमघे गाळणीने गाळून ओतावे. वरून मध घालावा व थोडी दालचिनी पावडर भुरभुरावी. गरम-गरम दूध प्यावे.
टिप:- ओली हळद नसेल तर १/२ टीस्पून हळद पावडर वापरावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
October 3, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti