वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आयुर्वेद ही प्राचीन काळातील आणि मध्ययुगीन काळात विकसित पारंपारिक औषधांची एक प्रणाली आहे आणि ती पूर्व-आधुनिक चिनी आणि युरोपियन औषध पद्धतींशी तुलना करता येते. आयुर्वेद ही केवळ रोगांपासून बरे करणारी उपचार पध्दती नसून एक आरोग्यदायी जीवनशैली आहे.
March 21, 2025
आपल्या विश्वाची उत्पत्ती एका शक्तिशाली महाविस्फोटातून झाल्याचा वैज्ञानिक सिद्धांत आहे .हि शक्ती विश्वनिर्मितीच्या पूर्वी पासून अस्तित्वात आहे . म्हणून तिला आदिशक्ती म्हणतात . ती चराचरात सामावलेली आहे यात दुमत असण्याचे कारण नाही . आदिमानवपासून ते आजच्या प्रगत मानावा पर्यंत या शक्तीस या ना त्या रूपात पुजणारे लोक (आस्तिक ,नास्तिक )आहेत . कोल्हापूरची महालक्ष्मी असो , वणीची देवी असो वा तुळजाभवानी असो कि काली ,अनेक भक्त आहेत. अनेकांच्या या ‘देवी ‘ कुलदैवता आहेत .
February 6, 2018
भारतीय संघातून क्रिकेट खेळणे ही ज्यांच्या घराण्याची एके काळी मिराशी बनली होती (असे म्हणण्यासारखी परिस्थिती होती) त्या घराण्यात २४ सप्टेंबर १९५० रोजी मोहिंदरचा जन्म झाला. ‘जिमी’ हे त्याचं लाडाचं नाव. जिमीचे वडील लालाजी आणि जिमीचा भाऊ सुरिंदर हेही कसोटीपटू होते. राजिंदर हा जिमीचा आणखी एक भाऊ. तो प्रथमश्रेणी खेळला.
September 24, 2010
जन्मापासून दिल्लीत रहात असलो तरी महाराष्ट्रात जावेच लागतेच. एकदा नागपूरला गेलो असताना सहज नाक्यावर उभ्या काही तरुणांशी चर्चा केली. बहुतेक मराठी तरुण सरकारी परीक्षांची तैयारी करतच नाही. काही तरुण कालेजचे शिक्षण पूर्ण झाल्यावर, सरकारी नौकरीचा विचार करतात. फार्म भरल्यानंतर ३-४ महिन्यांच्या अर्धवट तैयारीवर, परीक्षा पास करण्याचे स्वप्न बघतात, जे संभव नाही. मग सुमार बुद्धीचे इतर भाषिक परीक्षा पास होतात आणि हुशार मराठी तरुण, पूर्ण व नियमित तैयारी नसल्यामुळे, असफल होतात.
August 25, 2018

सन १९७६-७७मध्ये इस्राएलमधील, भूमध्य सागराजवळच्या एव्हरॉन क्वॉरी या उत्खनन क्षेत्रात सुमारे आठ लाख ते दहा लाख वर्षांपूर्वीच्या अश्मयुगीन वस्तू सापडल्या. या वस्तूंत हरणं, पाणघोडे, गवे, यासारख्या दिसणाऱ्या काही तत्कालीन शाकाहारी प्राण्यांच्या कवटीचे तुकडे, दात, इत्यादी अवशेषांचा समावेश होता. तसंच त्या काळात अस्तित्वात असणाऱ्या एका महाकाय शाकाहारी प्राण्याच्या सुळ्याचे तुकडेही तिथे सापडले. प्राण्यांच्या या अवशेषांबरोबरच तिथे गारगोटीच्या दगडापासून बनवलेल्या विविध साधनांचे तुकडे आढळले. हे तुकडे, दोन सेंटिमीटरपासून ते साडेसहा सेंटिमीटरपर्यंत वेगवेगळ्या लांबीचे होते. हे तुकडे ज्या दगडी साधनांचे होते, त्यातली काही साधनं धारदार होती, तर काही साधनं अणकुचीदार होती.
August 13, 2022
मेरा नाम जोकर’ हा राज कपूर यांचा एक ‘क्लासिक’ चित्रपट. ‘ये दुनिया एक सर्कस है’, असं म्हणत राज कपूर यांनी भारतीय प्रेक्षकांना ‘मेरा नाम जोकर’ चित्रपटात सर्कस दाखवली. हा भारतीय चित्रपट सृष्टीतील पहिला चित्रपट होता कि ज्याला दोन मध्यांतर होते. हा चित्रपट एकूण ४ तास ३० मिनिटांचा होता.
February 20, 2019
कुडा हा लहान पानझडी वृक्ष आहे. त्याचे शास्त्रीय नाव होलॅर्हिना अँटीडिसेंटेरिका: (Holarrhena Antidyscenterica) आहे. फुलझाडापैकी ॲपोसयनेसी Apocynaceae कुळामध्ये कुडा ह्या वनस्पतीचा समावेश होतो.
May 24, 2025
आई जगदंबेच्या अद्वितीय घराचे वर्णन करताना आचार्य श्रींची प्रतिभा या श्लोकात उत्तुंग झेप घेत आहे.
February 18, 2020
संसार टिकायला हवा असेल, तर उठसूठ माहेरचं कौतुक सासरी सांगू नये. माझ्या माहेरी अस्सं होतं, तस्सं होतं. इथपर्यंत ठीक आहे. पण हे सर्व तुमच्याकडे नाहीच आहे, असं सासरला डिवचून सांगण्याची काही आवश्यकता नाही. इथे वाद वाढत जातात. ताण वाढतात. त्याचा परिणाम रोगावस्था.
August 15, 2017
ईश्वराचे नामस्मरण हे मनुष्याने अंगिकारलेले सर्वात प्रभावी माध्यम आहे. नाम घेण्याची परंपरा व ईतिहास फार मोठा आहे. जेव्हा मानव संवाद साधायला शिकला तेव्हापासूनच तो ईश्वर नामात भवतल्लीन होत गेला. या नामानेच मुक्तीपर्यत पोहचलेले अनेक जण आपल्याला दिसतील.
August 12, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti