अंदमान द्वीपसमूह : भारताचा निसर्गरत्न

अंदमान व निकोबार बेटे हिंद महासागरात, बंगालच्या उपसागराच्या आग्नेयेस पसरलेली आहेत. या द्वीपसमूहात एकूण ५७२ बेटे आहेत, त्यापैकी फक्त ३८ बेटांवरच लोकवस्ती आहे. ह्या ५७२ बेटांमध्ये अंदमान बेटे ३२५ हून अधिक आहेत आणि मुख्यत्वे पर्यटनासाठी प्रसिद्ध. निकोबार बेटे त्यामानाने तुलनेने अलिप्त व तिथे मुख्यत्वे तिथल्या मूळ निवासी लोकांचे वसतयव असल्यामुळे पर्यटकांसाठी खुली नाहीयेत. अंदमान निकोबार बेटांचा समूह उत्तर–दक्षिण ८०० किलोमीटर पर्यंत पसरलेला आहे. येथे उष्णकटिबंधीय हवामान असून वर्षभर ऊन–पाऊस यांचा खेळ चालतो. ऑक्टोबर ते मे – पर्यटनासाठी उत्तम कालावधी आणि जून ते सप्टेंबर – मान्सून; पाऊस जास्त असल्याने, फारसे पर्यटक येत नाहीत.



अंदमान व निकोबार बेटे हिंद महासागरात, बंगालच्या उपसागराच्या आग्नेयेस पसरलेली आहेत. या द्वीपसमूहात एकूण ५७२ बेटे आहेत, त्यापैकी फक्त ३८ बेटांवरच लोकवस्ती आहे. ह्या ५७२ बेटांमध्ये अंदमान बेटे ३२५ हून अधिक आहेत आणि मुख्यत्वे पर्यटनासाठी प्रसिद्ध. निकोबार बेटे त्यामानाने तुलनेने अलिप्त व तिथे मुख्यत्वे तिथल्या मूळ निवासी लोकांचे वसतयव असल्यामुळे पर्यटकांसाठी खुली नाहीयेत. अंदमान निकोबार बेटांचा समूह उत्तर–दक्षिण ८०० किलोमीटर पर्यंत पसरलेला आहे. येथे उष्णकटिबंधीय हवामान असून वर्षभर ऊन–पाऊस यांचा खेळ चालतो. ऑक्टोबर ते मे – पर्यटनासाठी उत्तम कालावधी आणि जून ते सप्टेंबर – मान्सून; पाऊस जास्त असल्याने, फारसे पर्यटक येत नाहीत.

ऐतिहासिक पार्श्वभूमी

अंदमान बेटांचा उल्लेख काही ग्रीक व रोमन प्रवाशांच्या नोंदीत आढळतो. अरब सागरी व्यापाऱ्यांनीही या बेटांना भेट दिल्याचे उल्लेख आहेत. १७८९ मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने प्रथम पोर्ट ब्लेअर जवळ वसाहत सुरू केली. मात्र रोगराई व प्रतिकूल परिस्थितीमुळे ती अयशस्वी ठरली. १८५८ मध्ये ब्रिटिशांनी येथे कारागृह वसाहत स्थापन केली. पुढे याच ठिकाणी बांधले गेले सेल्युलर जेल, जे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक बनले. १९०६ पासून अनेक स्वातंत्र्यसैनिकांना “काळा पानी”ची शिक्षा येथे भोगावी लागली. वीर सावरकर, बटुकेश्वर दत्त, बारिंदा घोष, योगेश चंद्र चटर्जी यांसारखे क्रांतिकारक इथे कैदेत होते. १९४२–४५ या काळात जपानी सैन्याने अंदमान बेटे ताब्यात घेतली होती. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी १९४३ मध्ये येथे “स्वतंत्र भारत सरकारचा” ध्वज फडकवला.

नैसर्गिक सौंदर्य आणि वन्यजीव

अंदमानची खरी ओळख म्हणजे येथील अप्रतिम समुद्रकिनारे. पांढरी शुभ्र वाळू, स्फटिकासारखे स्वच्छ पाणी आणि शांत वातावरण हे या किनाऱ्यांचे वैशिष्ट्य आहे. इथली महत्वाची बीचेस म्हणजे राधानगर बीच (हॅवलॉक आयलंड) : २००४ मध्ये टाइम मॅगझिनने “आशियातील सर्वात सुंदर समुद्रकिनारा” म्हणून गौरवले. सूर्यास्ताचे दृश्य पर्यटकांसाठी अविस्मरणीय.

कार्बिन्स कोव बीच (पोर्ट ब्लेअरजवळ) : स्थानिक व पर्यटक दोघांमध्ये लोकप्रिय. वॉटर स्पोर्ट्स व बोटिंगची उत्तम सोय.

Elephant Beach

एलीफंट बीच (हॅवलॉक आयलंड) :

स्नॉर्केलिंग व स्कूबा डायव्हिंगसाठी आदर्श. प्रवाळभित्ती अगदी किनाऱ्याजवळच असल्याने नवशिक्यांसाठी उत्तम ठिकाण.

 

Laxmanpur Beach

लक्ष्मणपूर व भरतपूर बीच (नील बेट) :

शांत, स्वच्छ व कमी गर्दीचे. कुटुंब व हनिमून पर्यटकांसाठी आदर्श. अंदमान बेटे “कोरल ट्रायंगल” या प्रदेशाचा भाग आहेत. प्रवाळभित्तीमुळे येथे डझनभर रंगीबेरंगी मासे, समुद्री कासव, शार्क, डॉल्फिन दिसतात. सागरी जीवनाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हे एक स्वर्ग आहे.

बेटांच्या ८६% भूभागावर घनदाट जंगले आहेत. मॅन्ग्रोव्ह वनस्पती , विशेषतः बाराटांग व नील बेट येथे आढळते . वन्यजीव मध्ये प्रामुख्याने समुद्री मगर, जंगली डुक्कर, अंदमान वुडपेकर्स, समुद्री गरुड आहेत. माउंट हॅरिएट, महात्मा गांधी मरीन नॅशनल पार्क अशी राष्ट्रीय उद्याने पण आहेत.

Cellular Jail


सेल्युलर जेल आणि अंदमानचा ऐतिहासिक वारसा

अंदमान बेटांबद्दल बोलताना सर्वप्रथम ज्या ठिकाणाचा उल्लेख होतो ते म्हणजे सेल्युलर जेल. “काळा पानी” या नावाने सर्वत्र ओळखले जाणारे हे ठिकाण भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक दु:खद पण गौरवशाली पान आहे.

पोर्ट ब्लेअर शहराजवळ वसलेले हे विशाल कारागृह १८९६ मध्ये बांधण्यास सुरुवात झाली आणि १९०६ मध्ये पूर्ण झाले. एकूण ७ पंख (Wings) असलेले हे कारागृह “रेडिअल आर्किटेक्चर”च्या पद्धतीने बांधले गेले होते. प्रत्येक पंखात शेकडो एकल कोठड्या (Solitary Cells) होत्या. या कोठड्यांचे बांधकाम असे होते की कैद्यांना एकमेकांशी संपर्क होऊ नये. या कारागृहात ७०० पेक्षा जास्त कोठड्या होत्या.

हे काळा पानी” म्हणजे काय होते हा प्रश्न बरेच जणांना आहे. शिक्षा म्हणून कैद्यांना समुद्र ओलांडून या बेटांवर आणले जात असे. हिंदू समाजव्यवस्थेत “काळा पानी” ओलांडणे म्हणजे जातिभंग मानले जाई. कैद्यांना समाजापासून पूर्णपणे तोडून टाकण्यासाठी ही शिक्षा दिली जात असे. सेल्युलर जेल हे प्रत्यक्षात मानवतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारे यातनास्थळ होते. कैद्यांना कठोर श्रम करायला लावले जात – तेल घोटणे, नारळाची रस्सी बनवणे, विटा पाडणे. अन्न अगदी निकृष्ट दर्जाचे दिले जाई. शिक्षा म्हणून बेभान फटके, बेड्या, कोठडीत कैद अशी अमानवीय वागणूक दिली जाई.

भारतातील असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी या जेलमध्ये यातना सहन केल्या. वीर सावरकर (१९११–१९२१) – दोन जन्मठेपेची शिक्षा भोगणारे पहिले कैदी. त्यांनी येथूनच अनेक लेखन व विचारकार्य केले. अन्य काही नामांकित स्वत्र्यसैनिक म्हणजे बटुकेश्वर दत्त – भगतसिंगांचे सहकारी, ज्यांनी संसदेत बॉम्ब टाकला होता, बारिंद्रकुमार घोष – श्री अरविंदांचे बंधू, योगेशचंद्र चटर्जी, नंदगोपाल, उपेंद्रनाथ बनर्जी आणि असंख्य क्रांतिकारक.

१९३३ मध्ये कैद्यांनी उपोषण सुरू केले. त्यावेळी महावीर सिंह, मोतीलाल शर्मा, मोहम्मद अली यांचा मृत्यू झाला. १९३७ मध्ये पुन्हा उपोषण झाले आणि त्याला संपूर्ण भारतातून पाठिंबा मिळाला. अखेर ब्रिटिशांना दबावाखाली काही कैद्यांना भारतात परत पाठवावे लागले.

१९४२ मध्ये जपानी सैन्याने अंदमान बेटे ताब्यात घेतली. त्यांनी सेल्युलर जेलला लष्करी तळ म्हणून वापरले. या काळात अनेक स्थानिकांवरही अत्याचार झाले. १९४३ मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी येथे येऊन “स्वतंत्र भारत सरकारचा” ध्वज फडकवला आणि भारताचे पहिले मुक्त भूभाग म्हणून अंदमान बेटांचे उल्लेख केले.

chetam saw mill

स्वातंत्र्यानंतर हे कारागृह भारत सरकारने राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन केले. संध्याकाळी होणारा लाइट अँड साऊंड शो हा कार्यक्रम इतिहास जिवंत करतो. प्रकाश व ध्वनीच्या साहाय्याने कैद्यांचे जीवन, स्वातंत्र्यलढा आणि बलिदान सांगितले जाते. इथल्या संग्रहालयातील विविध गॅलऱ्यांमध्ये क्रांतिकारकांचे फोटो, वैयक्तिक वस्तू, दस्तऐवज जतन केलेले आहेत. येथे शहीद झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणींना जपले आहे.

आजही जेव्हा पर्यटक या कोठड्यांत फिरतात, तेव्हा प्रत्येक भिंत, प्रत्येक लोखंडी गज त्यांना त्या काळातील क्रूरतेची आणि शौर्याची आठवण करून देते. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास समजून घेण्यासाठी सेल्युलर जेल ही एक आवर्जून भेट देण्यासारखी जागा आहे.

अंदमानमधील प्रमुख बेटे

अंदमान द्वीपसमूहात शेकडो बेटे असली तरी काही ठराविक बेटे पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरतात. यामध्ये पोर्ट ब्लेअर, हॅवलॉक (आता अधिकृत नाव स्वराज द्वीप), नील आयलंड (शहीद द्वीप), रॉस आयलंड, बाराटांग आणि ग्रेट निकोबार ही ठिकाणे अग्रक्रमाने पाहिली जातात.

samudrika museum

पोर्ट ब्लेअर हे शहर अंदमानची राजधानी आहे आणि प्रशासनिक केंद्र आहे. येथेच विमानतळ, बंदर, सरकारी कार्यालये, हॉटेल्स व संग्रहालये आहेत. इथली पाहण्याजोगी थकणे सेल्युलर जेल – स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान सांगणारे ठिकाण, कार्बिन्स कोव बीच – ७ किलोमीटर अंतरावर असलेला लोकप्रिय समुद्रकिनारा जेथे जेट स्की व स्पीड बोट राईड करू शकता, अँथ्रोपॉलॉजिकल म्युझियम – येथील आदिवासी जमातींबद्दल माहिती, समुद्रिका नॅव्हल म्युझियम – सागरी जीवन व अंदमानच्या इतिहासाचा आढावा, चिडीया टापू – सुरेख सूर्यास्त व पक्षीनिरीक्षण, वंडरूझ नॅशनल पार्क (मिनी झू) – स्थानिक प्राणी व पक्षी. संध्याकाळी सेल्युलर जेलमधील लाइट अँड साऊंड शो नक्की बघा.

havelock island

हॅवलॉक आयलंड (स्वराज द्वीप) हे अंदमानचे पर्यटनाचे हृदय आहे. स्वच्छ निळाशार समुद्र, पांढरे वाळूचे किनारे, प्रवाळभित्ती, स्कूबा डायव्हिंग आणि रिसॉर्ट्समुळे हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. इथली महत्वाची ठिकाणे राधानगर बीच – जगप्रसिद्ध समुद्रकिनारा; सूर्यास्तासाठी आदर्श, एलीफंट बीच – टाइम्स मॅगझिनने आशियातील सर्वात सुंदर बीच म्हणून गौरविलेले आणि स्नॉर्केलिंग व वॉटर स्पोर्ट्ससाठी प्रसिद्ध, कलापत्थर बीच – शांत, फोटोग्राफीसाठी उत्तम, स्कूबा डायव्हिंग सेंटर – निळ्या समुद्राखालील सजीव जगाचा अनुभव.


kalapathar beach

 

Neil Island Shaheed Dweep

नील आयलंड (शहीद द्वीप) हे हॅवलॉकच्या तुलनेत लहान आहे, पण शांत, स्वच्छ आणि रमणीय. गर्दी टाळणाऱ्यांसाठी आदर्श. इथे नक्की पाहावे भरतपूर बीच – स्नॉर्केलिंग व वॉटर स्पोर्ट्ससाठी उत्तम, लक्ष्मणपूर बीच – सूर्यास्तासाठी प्रसिद्ध, सीतापुर बीच – सूर्योदयाचे अप्रतिम दृश्य, नैसर्गिक दगडी कमान (Natural Rock Bridge) – समुद्राच्या लाटांनी घडवलेले अद्भुत दृश्य.

रॉस आयलंड (नेताजी सुभाषचंद्र बोस आयलंड) हे पोर्ट ब्लेअरपासून फेरीने फक्त १५ मिनिटांत जाता येत असलेले एकेकाळी ब्रिटिशांचे प्रशासकीय मुख्यालय होते. आज येथे फक्त भग्नावशेष आहेत, पण त्यातून इतिहास डोकावतो. जुन्या चर्च, रुग्णालय, बॅरॅक्स यांचे अवशेष, हिरवेगार गार्डन व हरणे, दीपगृह आणि जपानी बंकर (दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील) हि इथली प्रमुख ठिकाणे.

Baratang_Island_Mangroves

बाराटांग बेट हे नैसर्गिक आश्चर्यांनी भरलेले आहे. पोर्ट ब्लेअरहून जवळजवळ १०० किमी अंतरावर. आदिवासी संस्कृती, नैसर्गिक चमत्कार आणि साहस यांचे अनोखे मिश्रण. येथे प्रवास करताना जारवा आदिवासी रिझर्व्हमधून जावे लागते. इथली नैसर्गिक आश्चर्य म्हणजे लाइमस्टोन गुहा – चुनखडीच्या प्रचंड गुहा, निसर्गाची अप्रतिम निर्मिती, मड व्हॉल्कॅनो – चिखलातून उफाळून येणारे लहानसहान ज्वालामुखी, भारतातील क्वचित दिसणारे दृश्य, आणि मॅन्ग्रोव्ह सफारी – बोटीतून झाडीच्या वाटा पार करणे रोमांचक. बाराटांग बेटाला जाण्यासाठी एक पूर्ण दिवस राखावा लागतो.

Radhanagar Beach

ग्रेट निकोबार हे भारताच्या सर्वात दक्षिणेकडील टोकाचे बेट आहे. येथे इंदिरा पॉइंट आहे – भारताचे सर्वात दक्षिणेकडील भूभाग. काय पाहावे? इंदिरा पॉइंट दीपगृह – ऐतिहासिक व भौगोलिक महत्त्वाचे, कॅम्पबेल बे नॅशनल पार्क – दुर्मीळ वन्यजीव व पक्षी, निकोबारी संस्कृती – वेगळी जीवनशैली व परंपरा. इतर लहान बेटं मध्ये महत्वाची आहेत विपीन, जॉली बॉय, नॉर्थ बे स्नॉर्केलिंग व पाण्यातील खेळांसाठी लोकप्रिय आणि डिगलिपूर , जिथे अंदमानमधील सर्वात उंच सॅडल पीक येथे आहे.

 

Jolly Buoy Island

अंदमान ला का जावे ?
अंदमान-निकोबार द्वीपसमूह हा केवळ समुद्रकिनारे आणि सुट्टीसाठीचे बेटांचा समूह नाही, तर तो भारताच्या इतिहास, संस्कृती आणि निसर्गसंपदेचा जिवंत खजिना आहे.

सेल्युलर जेल आपल्याला स्वातंत्र्यलढ्याच्या शौर्यकथांची आठवण करून देतो. हॅवलॉक आणि नील बेटे जगातील कुठल्याही उष्णकटिबंधीय बेटांना टक्कर देतील इतके सुंदर आहेत. बाराटांगचे नैसर्गिक चमत्कार आणि रॉस बेटाचे इतिहासाचे अवशेष प्रवाशाला थक्क करतात.

इथे येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला एक वेगळाच अनुभव मिळतो – कधी तो समुद्राखाली रंगीबेरंगी मासे आणि प्रवाळ पाहतो, कधी क्रांतिकारकांच्या यातना आठवून डोळे पाणावतात, तर कधी संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावर बसून अस्ताला जाणारा सूर्य निसर्गाची अनोखी शांती देतो.

आजच्या घडीला अंदमान बेटे भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहेत. येथे पर्यटनामुळे स्थानिकांना रोजगार मिळतो, पायाभूत सुविधा विकसित होतात आणि भारताचा सांस्कृतिक वारसा जगापुढे उभा राहतो.

अखेरीस, असा म्हणता येईल की – अंदमान बेटे ही प्रवाशांसाठी केवळ पर्यटन स्थळे नसून आत्म्याला स्पर्श करणारा अनुभव आहेत. एकाच प्रवासात इथे तुम्हाला इतिहास, निसर्ग, साहस आणि अध्यात्म – हे सर्व मिळून जीवनाला समृद्ध करणारे क्षण मिळतात.