वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
बऱ्याच घरामध्ये पुर्वीपार पासून आठ दिवसातून एकदा पोट साफ करायला एरंड तेल घेण्याची प्रथाच आहे जणू.चला तर आज आपण ह्या एरंडाची थोडक्यात ओळख करून घेउयात.
ह्याचे २-६ मीटर उंचीचे गुल्म असते,पाने रूंद व खंडीत कडा युक्त असून हाताच्या बोटां प्रमाणे हे पान भासते.ह्याला येणारी फुले एकलिंगी असतात.तर फळ कच्चे असताना हिरवे मऊ व काटे असलेले असते.ह्यात दोन कप्पे असतात.ह्याचे बी द्विदल असते.तर मुळ वरच्या भागात जाड व टोकाला निमुळती होत जाते.
ह्याचे उपयुक्तांग आहे पाने,बीज,तेल व मुळ.ह्याची चव गोड,कडू,तिखट असून हे उष्ण गुणाचे असते.तसेच हे स्निग्ध,तीक्ष्ण,सुक्ष्म,जड असते.एरंड वातकफनाशक आहे.
आता आपण ह्याचे उपयोग पाहू:
१)सुज आलेल्या भागावर एरंडाची पाने गरम करून बांधतात.
२)पोटदुखीत एरंड मुळाचा काढा हिंग व सैंधव घालून देतात.
३)आमवातामध्ये एरंड तेल सुंठीच्या काढ्यासोबत देतात.
४)बाळंतीणीस अंगावर दुध सुटायला एरंड तेलाचा अभ्यंग करतात.
५)पोट फुगले असल्यास एरंडाची पाने व बियांची चटणी गरम करून पोटावर बांधतात.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
August 24, 2017
ह्या दिवसात फेब्रुवारी मार्च महिन्यात काटेसावर हा वृक्ष फुलांनी बहरतो. पेपरमधे फोटोपण येतात. ह्याच्या फुलांचा माझा अभ्यास होण्याचा योग आला.
1995चे डिसेंबर मधे, वयाच्या 49 वर्षी, माझे हातापायाचे स्नायूतील घट्टपणा जाऊन लूज पडले अगदी 80 वयाचे वृध्दासारखे. ह्या आधी मी एक गोष्ट ऐकली होती.
-- एका ट्रक ड्रायव्हरला अपघात होतो म्हणून लोकं त्याला बडवतात आणि तो दुसरे दिवशी मित्रांच्यात येतो, मित्र विचारतात अरे काल तुला एवढा मार बसला आणि तू इथे कसा? त्रास होत नाही का? तो सांगतो कांटेसावरीचे फुल खाल्ले. त्यामुळे त्रास गेला.--
ही 1992 साली ऐकलेली गोष्ट एकदम आठवली. विचार केला मार बसून त्रास होतो तो स्नायुना. म्हणजे हे फुल स्नायुवर काम करते. दैवयोगाने फेब्रूवारी 96 ला आमचे जवळ असणारे काटेसावर फुलले असल्याचे लक्षात आले. मी एक फुल खाल्ले. अतिशय गिळगीळीत लागले तरीपण खाल्ले. रोज एक फुल खात होतो. आठ दिवसांत माझे स्नायुत जोर येऊन पूर्ववत झाले.
ह्यानंतर मी ही फुले सुकवून पावडर करून गोळ्या केल्या. ह्या गोळ्या प्रथम ट्रायल म्हणून श्री आगाशे (वय 82) यांना दिल्या. दुसर्याच दिवशी त्यांचा मला फोन आला. "तुम्ही कसल्या गोळ्या केल्यात ताबडतोब या." मी घाबरलो व सगळी कामे सोडून त्यांच्याकडे गेलो.एवढे तातडीने बोलावले काय त्रास झाला असे विचारले. त्यांनी मला खुर्चीत बसायला लावले. आणि स्वतः उठून चालायला लागले व म्हणाले, "तुमच्या गोळ्यां घेतल्यावर अर्ध्या तासांतच माझी चाल सुधारली आहे बघा." त्याच्या चालीत बरीच सुधारणा होती. ते भरभर चालत होते.
ह्या गोळ्यांचा उपयोग चांगला झाला व होत आहे. ह्या गोळ्यांमुळे स्नायुना फायदा होतो, एनर्जी येते, आजारपणा नंतरचा थकवा जातो, असा माझा व माझेकडील पेशंटचा अनुभव आहे. (पेशंट बघितल्या शिवाय मी औषधे देत नाही) साठ वयाच्या पुढील लोकांना खुप उपयोग होतो. व्हायटल एनर्जी वाढते असा अनुभव आहे.
सध्या ह्या फुलांचा सिझन आहे. शहरात ही झाडे लावली जात नाहीत ( आहेत ती तोडली जातात). ही फुले गोळा करून, सुकवून, मिक्सरमधे पावडर करून ठेवून वापरावी. घरच्यासाठी गोळ्या करणे गरजेचे नाही. ही पावडर पाण्या बरोबर वा मधा बरोबर आवश्यकतेनुसार घ्यावी. फुलांचा गुलकंद पण करता येतो व तो पण उपयोगी पडतो.
फोटो बघण्यासाठी लिंकवर क्लीक करा
http://www.google.co.in/search?site=webhp&tbm=isch&oq=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%87&aqs=mobile-gws-lite.3.0l5&q=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0#imgrc=7vljf1cdu05g1M:
अरविंद जोशी (बी.एस्सी.)
9421948894
February 25, 2017
आपल्या समाजाच्या सर्वच थरात जात इतकी मुरली आहे, की बस्स.! कोणतीही व्यक्ती भेटली आणि तिने आपला परिचय दिला की आपल्या मनात नकळत तिच्याविषयी वेगवेगळी क्यॅल्क्युलेशन्स चालू होतात.
September 4, 2017
पाचेक वर्षे झाली.. जवळपास टीव्ही पाहताच नाही! अगदी खास असं कारण नाही, पण वडिलांच्या हातातला रिमोट माझ्याकडे येता येता टीनेज मुलाच्या हाती गेला, मग बातम्या आणि फुटबॉल मॅचेसच्या मध्ये माझ्या आवडीच्या प्रोग्रॅमचं सँडविच व्हायला लागलं! त्यातच टॅब घेतला होता, त्यावर आवडीचं सगळं हेडफोन कानाला लावला की बघता यायला लागलं..
March 11, 2023
कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात या देवीची ही त्रिगुण रूपे पाहावयास मिळतात. तेथे महालक्ष्मीबरोबरच महाकाली आणि महासरस्वती विराजमान आहे. देवी माहात्म्यातील पौराणिक आख्यायिकेनुसार, महालक्ष्मीनेच तमोगुण आणि सत्त्वगुणांपासून ही दोन रूपे निर्माण केली व त्यांना आपापल्या गुणांनी योग्य असा स्त्री–पुरुषांचा एकेक जोडा उत्पन्न करण्यास सांगितले. त्यातून पुढे विश्वाची व सृष्टीची निर्मिती झाली.
October 15, 2025
‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’, किती साध्या, सरळ, सोप्या भाषेत किती मोठे तत्त्वज्ञान आपल्या संतांनी सांगून ठेवले आहे; परंतु आपल्याला साधी भाषा कळतच नसावी. एकतर आपल्या संतांचे साहित्य इंठाजीत नाही. ते ‘वेल पॉलिश्ड’ नाही.
October 8, 2006
गेले काही दिवस एक इ-मेल इंटरनेटवर धुमाकुळ घालत आहे. Aderoid नावाचा एक तारा पृथ्वीच्या अतिशय जवळ येणार आहे आणि त्यामुळे आपल्याला २१ जून २०१० रोजी आकाशात दोन सूर्य दिसणार आहेत असे ते इ-मेल आहे. हे एक मनमोहक दृष्य असेल आणि असे दृष्य पुन्हा केवळ इ.स २२८७ मध्ये दिसेल असेही या इ-मेल मध्ये लिहिले आहे. मजा म्हणजे इ-मेल पाठवणार्याने २१ जून २०१० च्या आकाशाचे फोटोही त्यात पाठवले आहेत. हा इ-मेल पाठवणारा भविष्यवेत्त्या नॉस्ट्रेडॅमसचा अवतार तर नाही ना?
June 20, 2010
भारतीय समाजातील स्त्रियांवरील वाढते अत्याचार हे चिंताजनक बाब आहे. समाजातील मानसिकता बदलण्यासाठी आणि स्त्रियांना त्यांचे अधिकार देण्यासाठी प्रयत्न होणे अत्यावश्यक आहे. यासाठी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी, शिक्षण, आर्थिक स्वायत्तता, आणि सामाजिक जागरूकता या सर्वांचा समन्वय साधणे गरजेचे आहे.
October 2, 2024
पुराणवाङ्मयात गणेशाच्या अवतारांचा उल्लेख आहे. पुराणें वेदांहून खूपच अर्वाचीन आहेत हें खरें. (पुराणाचा काळ आहे, इ.स. च्या पहिल्या सहस्रखातीक पहिली काही शतकें). परंतु, आधी म्हटल्याप्रमाणें, एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, ती ही की, कालप्रवाहात जनसमूहांमधे अनेक प्रकारची माहिती व ज्ञान पिढ्यान् पिढ्या मौखिक स्वरूपात चालत येते, व नंतरच त्याचा लिखित साहित्यात समावेश होतो. त्यामुळे, हें गृहीत धरायला हरकत नसावी, की पुराणांमधील उल्लेखांच्या खूप आधीपासूनच, गणेशावतारांची संकल्पना व माहिती जनमानसामधे रूढ झालेली आहे.
अवतार घेणें म्हणजे धरतीवर पुनरामन करणें. अर्थातच, गणेशावतार म्हटलें की, गजाननाचे धरतीवर पुन्हापुन्हा आगमन आभिप्रेत आहे. त्या संकल्पनेचा वैज्ञानिक अर्थही आपण शोधायला हवा.
एक महत्वाची शक्यता अशी : अवकाशप्रवासात ‘टाइम-डायलेशन’ होतें. म्हणजेच, पृथ्वीवर अनेक शतकें लोटलेली असली, तरी अवकाशयानातील प्रवाशासाठी फक्त अल्प वर्षेंच गेलेली असतात. (अशी सापेक्ष कालगणना भारतीय परंपरेमधेसुद्धा आहे. मानवाची अमुक-लक्ष वर्षें म्हणजे ‘ब्रह्म्याचे’ एक वर्ष, असें भारतीय परंपरा सांगते.) म्हणजे असें पहा, हा अवकाशयात्री (किंवा त्याची टोळी) एकदा येऊन गेल्यानंतर, पुढील वेळी जेव्हां पृथ्वीवर उतरला असेल, तेव्हां तो स्वत: फक्त थोडीशी वर्षेंच व्यतीत करून आलेला असेल, परंतु पृथ्वीवर मात्र कैक शतकें व अनेक पिढ्या गेलेल्या असतील. त्यामुळे, अवकाशप्रवासी ही व्यक्ती स्वत: तीच जरी असली तरी, पृथ्वीवासीयांना तो नवीन ‘अवतार’ वाटणें स्वाभाविक आहे.
दुसरी एक शक्यता : आपण आणखीही एक अन्य गोष्ट आपण ध्यानात घेऊं. आपण हें पाहिलेंच आहे की, ‘विशालकाय गजानन’ म्हणजे ‘स्पेस-सूट घातलेला अवकाशप्रवासी’ आहे. आतां, एक गोष्ट उघड आहे की, स्पेस-सूट हा एकप्रकारचा ‘युनिफॉर्म’च (गणवेश) आहे. आणि, आपणां सर्वांना ठाऊकच आहे की, गणवेश घातलेल्या सर्व व्यक्ती, दुरून नजर टाकल्यावर ‘एकसारख्याच’ दिसतात. उदाहरणार्थ, पोलिस, फायर-ब्रिगेडवाले, सैनिक, वगैरे. त्यामुळे, आधी व कालांतरानें पृथ्वीवर उतरलेल्या व असा युनिफॉर्म म्हणजे स्पेस-सूट घातलेल्या अवकाशयात्री व्यक्ती जरी भिन्न भिन्न असल्या, तरी बघणार्याना ‘ती एकच व्यक्ती पुन्हा अवतरली आहे’, असे वाटणें सहज शक्य आहे.
हल्लीचे उदाहरण : आपण हल्लीचे एक उदाहरण घेऊन हा मुद्दा अधिक स्पष्ट करू. काहीं दशकांपूर्वी पृथ्वीवासी ‘ऍस्ट्रॉनॉट’ आर्मस्ट्राँग हा चंद्रावर उतरला होता. तेव्हां त्यानें स्पेस-सूट घातलेला होता. आपण त्याची तशा वेशातील, चंद्रावरील छायाचित्रेही पाहिलेली असतील.
समजा, चंद्रावर त्यासमयीं जर कोणी अप्रगत जीव वास करत असते, तर त्यांना आर्मस्ट्राँग हा गजाननासारखा, व आकाशातून उतरलेला, ‘देव’ वाटू शकला असता.
आणि, कांही दशकांनंतर,. किंवा शतकांनंतर, जर दुसरा एखादा, तसाच स्पेस-सूट घातलेला ऍस्ट्रॉनॉट चंद्रावर उतरला, तर तेथील जीवांना तो ‘त्या देवाचा अवतार’ आहे, त्या देवाचें ‘पुनरागमन’ झालें आहे, असेच वाटलें असते.
म्हणूनच, आपल्याला गजाननाच्या अवतारांचा उल्लेख मिळतो ; गजानन अनादि आहे, अनंत आहे, असें मानलें जातें.
विविध अवतारांची भिन्नभिन्न वाहनें :
पुराणांनुसार, गजाननाच्या प्रत्येक अवताराचें वाहन भिन्न आहे. जसें, उंदीर, सिंह, मोर. तें कां, याचाही विचार करायला हवा.
याचें स्पष्टीकरण सोपें आहे. आजही, मोटारींचे वेगवेगळे आकार आपण पाहतोच. तसेंच, फक्त-जमिनीवर पळणारी मोटार, पाण्यात-चालणारी होडी किंवा बोट, व ‘ऍम्फिबियस’ (भूमी व पाणी, दोन्हीवर प्रवास करू शकणारें) हॉवरक्राफ्ट यांचे स्वरूप भिन्नभिन्नच असते.
ज़रासे-वरती, आकाशात प्रवास करू शकणार्या, हवाई-बलून (एअर-शिप), ग्लायडर व हेलिकॉप्टर यांचे स्वरूपही एकमेकांपेक्षा वेगळें असतें. जमिनीवरून टेक्-ऑफ् घेऊन उंच-उंच उडणार्या जेट-विमानांचा आकार अगदीच वेगळा असतो. असेच ‘फ्लाइंग-सॉसर्स’चें होतें आहे. अशा ‘उडत्या तबकड्या’ वस्तुत: अस्तित्वात आहेत की नाहींत, हा एक वेगळाच विषय आहे, परंतु, एक मात्र खरें की, ज्यांना अशी ‘अनआयडेंटिफाइड फ्लाइंग ऑबजेक्टस्’ (UFOs) ‘दिसलेली’ आहेत, ते लोक त्यांच्या आकाराचें भिन्नभिन्न वर्णन सांगतात, जसें, बशीसारखें, चिरूटासारखें, गोळ्यासारखे- गोलाकार (speherical), इत्यादि.
त्याप्रमाणेंच, अवकाशप्रवासी वापरत असलेल्या ‘ग्राउंड-कार्स’चें (पृथ्वीग्रहावरती, जमिनीवर, पाण्यात, किंवा काहीं उंचीवर आकाशातून, प्रवास करू शकणार्या वाहनांचें) स्वरूप कालानुसार किंवा आवश्यकतेनुसार, भिन्नभिन्न असूं शकेल; व त्यामुळे, भूतलवासियांना त्या वेगवेगळ्या प्राण्यांप्रमाणें दिसल्या असाव्यात.
गणपति : विज्ञानयुगीन उकल : गजाननाची विज्ञानयुगीन प्रार्थना, आरती :
गजमुख देव गणपतीची स्तोत्रे, प्रार्थना, नमन, वंदना, आरत्या, हें सर्व आपण वाचलेलें-ऐकलेलें आहे. पण, परग्रहवासी-अवकाशप्रवासी अशा गजाननासाठी जुनी स्तोत्रें इत्यादी कितपत उपयोगी ठरतील ? त्यासाठी, त्याची ही विज्ञानयुगीन नूतन स्तुती, नूतन आरती :
‘व्योमातुन अवतरला गजमुख’
अंतराळ-यायित्राकासारखा धारुन गणवेश
व्योमातुन अवतरला गजमुख, देव-गणाधीश ।। १
सोंडेसम भासतो मुखवटा, ‘प्राणवायु’ पुरवी
संरक्षक अवकाश-कवच त्या तुंदिलतनु बनवी
ध्वनिसंवर्धक मुखाजवळ, जणुं हस्तिदंत एक
शूर्पकर्णसम बशीमधे केंद्रित ध्वनि प्रत्येक
अश्वहीन रथ मूषक भासे, पुच्छ धूम्ररेष ।।
व्योमातुन अवतरला गजमुख देव-गणाधीश ।। २
प्रकाशगतिनें कुठून आला लक्ष-लोक लांघुनी
भूवर कधि, कितिदा अवतरला, नच जाणे कोणी
कोटिकोटि मानव-जन्मांच्या पल्याड कर्तृत्व
मर्त्य जगाला कालातीतच वाटे अस्तित्व
निरर्थ भूत-भविष्या करतो, अवकाशा दास ।।
व्योमातुन अवतरला गजमुख देव-गणाधीश ।। ३
असे हें, कालातीत गजाननाचें, अवकाशयात्री-गण-पतीचे व गणेशाच्या अवतारांचे विज्ञानयुगीन स्पष्टीकरण. वाचल्याबरोबर, लागलीच तें पटो न पटो; पण काहीं अवधीनंतर तें सर्वांच्या विचारांना नक्कीच चालना देईल, अशी खात्री वाटते. काही काळाने, एखाद्या गणेशोत्सवात वरील आरतीचा गजर घुमला तर आश्चर्य वाटायला नको.
-- सुभाष स. नाईक.
मुंबई.
M - 9869002126.
August 5, 2016
August 25, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti