(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बांगलादेश, पाकिस्तान,अफ़गाणिस्तानमधील अल्पसंख्याकांची अवस्था आणि भारतीयांची जबाबदारी

    कोणत्याही देशात अनधिकृतरित्या शिरणे, हा फार मोठा अपराध समजला जातो.
    अफ़गाणिस्तान,पाकिस्तान, बांगलादेशात अल्पसंख्याकांचे रक्षण होत नाही. २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकी मध्ये अल्पसंख्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणे गरजेचे आहे. याकरता विधेयकास विरोध करणार्या राजकीय पक्षांवर दबाव टाकून त्यांना अशा नागरिकांच्या हितांचे रक्षण करण्याला भाग पाडायला पाहिजे.

      February 6, 2019


  • शुद्धतेची गोडी

    आपण चव चाखतो ती ग्लुकोजची किंवा फ्रुक्टोजची. नुसत्याच लांबलचक माळेची चव आपल्याला घेता येत नाही. म्हणूनच तर साखरेचा दाणा हा केवळ ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचाच बनलेला असतो आणि त्यात इतर कसलीही भेसळ नसते तेव्हाच आपल्याला ती चांगली गोड लागते. एरवी तिची गोड कमीच होण्याची शक्यता असते.

      April 21, 2011


  • आदिवासींचा डॉक्टर, समाजसेवेचा ध्यास : डॉ. राहुल जोशी

    आदिवासींचा डॉक्टर, समाजसेवेचा ध्यास : डॉ. राहुल जोशी

    काही माणसे आपल्या पदामुळे मोठी होतात, तर काही आपल्या कार्यामुळे लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. डॉ. राहुल जोशी हे दुसऱ्या प्रकारातील व्यक्तिमत्त्व आहेत. वैद्यकीय सेवेसोबतच समाजसेवेची अखंड तळमळ, आदिवासी बांधवांविषयी असलेली आत्मीयता आणि निसर्गाशी असलेले जिव्हाळ्याचे नाते यामुळे त्यांनी अनेकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे.

      July 8, 2026


  • विवोन फोनटेन दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

    विवोन फोनटेनचा जन्म 8 ऑगस्त 1913 ला फ्रांस मध्ये झाला. तिने हळूहळू 1943 मध्ये जर्मन काबिज फ्रांस मधील क्रांतिकारकारकाना मदत करायला सुरुवात केली.जेव्हा एसओई गुप्तहेर संघटनेचे दोन हेर डेनीस आणि बेनजामीन एसओई संघटनेसाठी घातपाती कारवायांसाठी ट्रॉय शहरात आले. बेनजामीन फोनटेन ला भेटला व त्याने तिला कुरियर म्हणून 2 हजार फ्रँक पगारावर ठेवले. आणि नेनेट सांकेतिक नाव दिले. ती संदेश नेऊ लागली व फ्रान्सच्या उत्तरपूर्व भागात घातपाती साहित्य पोहोचवू लागली. त्यात त्याना यश येऊ लागले. 4 जुलै ला त्यानी जर्मनांची 6 गाडीची इंजिने उद्ध्वस्त केली.फोनटेन ने 18 जखमी अमेरिकन वैमानिकांना स्विसमध्ये पळून जायला मदत केली. 1943 साली जर्मनांनी फ्रांस मध्ये घुसखोरी करून एसओई गुप्तचर संस्थेच नेटवर्क उधवस्थ केले.सप्टेंबर 1943 ते नोव्हेंबर 1943 मध्ये एसओई गुप्तचर संस्थेचे सगळे हेर इंग्लंड मध्ये पळून जाण्यात यशस्वी झाले.

    फोनटेनने स्पेशल ऑपरेशन्स एक्सेकयूटीव या ब्रिटनमधील दुसऱ्या महायुद्धात सुरू केलेल्या गुप्तहेर संघटनेत प्रवेश घेतला.व प्रशिक्षण घेतले. तिथून ती फ्रांसला परतली.तिथे ती पुन्हा एसओई संघटनेच्या हेराना मिळाली. तिने आपले सांकेतिक नाव मीमी असे घेतले. कुरियरचे काम करण्याबरोबर तिने फ्रांस हेराना विमानातून शस्त्र उतरवण्यासाठी गुप्त जागा शोधल्या. ती पॅरॅशूटने उतरलेल्या फ्रांस हेराना भेटली. दोस्त राष्टरणी जर्मनव्याप्त फ्रांसमध्ये आक्रमण केले.आणि जर्मनांची अनेक गोदामे उद्ध्वस्त केली. यात फोनटेनची खूप मदत झाली. .पुढे कार्यकर्त्यापैकी ती एकटी वाचली बाकीचे मारले गेले.

    ऑगस्त 1944 पर्यन्त तो जर्मनांच्या ताब्यातून मुक्त होई पर्यन्त ती एकटी लढली.16 सप्टेंबर 1944 ला ती इंग्लंडला गेली. एसओईला दिलेल्या रिपोर्टमध्ये तीने साथीदार मारल्याबद्दल कडवट टिका केली. लंडन मध्ये ती एसओईच्या आपल्या दोन साथीदारासोबत राहिली. त्यानीही एसऑईवर टिका केली. त्यामुळे तिला एसओई कडून कधीही अधिकृत मान्यता मिळाली नाही. महायुद्ध संपल्यावर तिने ड्यूपोंट या फ्रेंच माणसाशी लग्न केले. 9 मे 1996 ला तिचा मृत्यू झाला.

      January 8, 2023


  • रॅन्समवेअर’ म्हणजे नेमकं काय ?

    शुक्रवारचा दिवस हा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी काळा दिवस ठरला कारण आता पर्यंतचा सर्वात मोठा 'रॅन्समवेअर' व्हायरसचा हल्ला शुक्रवारी झाला. भारतासहित जवळपास १०० देशात 'वन्नाक्राय ' या 'रॅन्समवेअर' व्हायरस ने अक्षरशः धुमाकूळ घातला . सायबर सिक्युरिटी फर्म अव्हास्ट ने सांगितले कि जगभरात जवळपास पंचाहत्तर हजार संगणकावर हा हल्ला झाला. शंभराहून अधिक देश या हल्ल्याचे शिकार झाले . या हल्ल्याचा सर्वात जास्त फटका इंग्लड ला बसला . इंग्लडमधील हॉस्पिटल्स आणि टेलिफोन यंत्रणा यामुळे खिळखिळी झाली . अनेक हॉस्पिटल्स मध्ये तर रुग्णांचे ऑपेरेशन आणि अपाईनमेंट देखील रद्द करावे लागले तर अनेक ठिकाणी रुग्णांचा डेटा नससल्यामुळे डॉक्टरांवर कागद पेन घेऊन रुग्णांचा चार्ट तयार करण्याची वेळ आली.

    'रॅन्समवेअर' म्हणजे नेमकं काय ?

    एखाद्या दिवशी तुम्ही तुमचा संगणक किंवा लॅपटॉप चालू करायला जाता आणि त्यावर एक मेसेज तुम्हाला दिसतो कि तुमचा संगणक किंवा लॅपटॉप आम्ही हॅक केलेले असून तुमचा संपूर्ण डेटा तुम्हाला हवा असल्यास स्क्रिन वर दिसत असलेल्या पेमेंट ऑप्शन ला क्लिक करून अमुक इतकी रक्कम ह्या बँक खात्यात पुढील अमुक इतक्या तासात जर ही रक्कम जमा झाली नाही तर तुमचा सर्व डेटा डिलिट होईल. तुमच्या स्क्रीनवर एका बाजूला तुम्हाला दिलेल्या वेळेचे काउंट डाऊन सुद्धा चालू झालेले असते. अर्थात तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपचा संपूर्ण ताबा ह्या हॅकर्स ने घेतलेला असतो. ह्या मेसेजच्या पुढे तुमचा संगणक किंवा लॅपटॉप जातच नाही अर्थात तुमची ऑपरेटींग सिस्टम चालूच होत नाही. ह्या प्रकारच्या सायबर गुन्हेगारीला रॅन्समवेअर असे म्हणतात. ह्या मध्ये कुणीतरी सायबर गुन्हेगार अज्ञात ठिकाणाहून तुमचा संगणक किंवा लॅपटॉप हॅक करतो आणी तुम्हाला खंडणीची मागणी करतो. असे प्रकार जगात अनेक ठिकाणी उघडकीस आलेले आहेत .जगाच्या कुठल्या तरी कानाकोपर्‍यात बसून तुमचा डेटा नष्ट करण्याचे उद्योग हे ‘सायबर भामटे’ करायला लागले.

    काय काळजी घ्यावी ?

    १. सगळ्यात आधी तर तुमच्या संगणक किंवा लॅपटॉप मध्ये चांगला अ‍ॅण्टीव्हायरस असणे तसेच अ‍ॅण्टीव्हायरस नियमित अपडेट असणे आवश्यक आहे.

    २.इंटरनेट वापरताना नेहमी सुरक्षित वेबसाईटलाच भेट द्या. कुठल्याही मोफत भूलथापाना बळी पडुन चुकीच्या वेबसाईटला किंवा अनोळखी लिंकला क्लिक करू नका .

    ३. संगणक किंवा लॅपटॉपची ऑपरेटींग सिस्टमही नेहमी अपडेट असावी कारण अपडेट मध्ये बऱ्याच वेळा काही प्रॉब्लेम्स वर सोलुशन उपलब्ध असते . जसे कि 'रॅन्समवेअर' साठी पॅच मायक्रोसॉफ्ट ने दोन महिन्यापूर्वीच जारी केला होता .

    ४. तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपचा नियमित डेटा कॉपी करून दुसऱ्या हार्ड डिस्कवर ठेवावा म्हणजे तुमचा संगणक हॅक झाला आणि तुमच्या डेटा च्या बदल्यात हॅकर ने तुम्हाला पैसे मागीतले तरी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही .

    स्मार्टफोन ला ही धोका

    संगणकांप्रमाणे स्मार्टफोन ला ही हॅकिंग चा धोका वाढल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. अनेक वेळा तुमच्या स्मार्टफोन वर काही जाहिराती दाखवल्या जातात त्यातील काही जाहिराती ह्या हॅकरने तुम्हाला भुलवण्यासाठी सुद्धा टाकल्या असू शकतात .त्यामुळे अशा जाहिरातीला क्लिक करू नये तसेच एखादे एप तुमच्या स्मार्टफोन वर इन्स्टाल करण्यापूर्वी ते सुरक्षित आहे की नाही हे पाहून घ्या . शक्यतो गुगल प्ले वरून एप इन्स्टाल करा . कुठलीही ए पी के फ़ाइल घेऊन तुमच्या स्मार्टफोन वर इंस्टाल करू नका .

    Free Jio Data च्या नावाने व्हाट्सअप मेसेज मध्ये येणाऱ्या लिंक्स देखील अशाच फसव्या आणि घातक असतात.. फ्री डेटा तर मिळणार नाहीच, पण तुमच्या मोबाईल मध्ये फ्री व्हायरस नक्की येऊ शकतो... तेव्हा असे फुकट मेसेज मधील लिंक ओपन देखील करू नका आणि फॉरवर्ड देखील करू नका...

      May 14, 2017


  • श्री गणेश अवतारलीला ११ – श्री वल्लभेश अवतार

    निर्गुण, निराकार, परब्रह्म, परमात्मा, भगवान श्रीगणेशांचा सर्वाद्य अवतार आहे, श्रीवल्लभेश अवतार. चैत्र शुद्ध द्वितीयेला होणारा हा श्रीवल्लभेश अवतार सगुण-साकार रूपातील सर्वप्रथम अवतार होय.

      September 12, 2019


  • प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग सात

    लॅबची कमाल, रिपोर्ट ची धमाल भाग 3

    लॅबच्या रिपोर्टच्या मागील बाजूला एक वाक्य अजून छापलेले असते.
    Individual laboratory investigations are never conclusive, but should be used along with other relevant clinical examinations to achieve final dignosis.

    त्याचा भावार्थ असा की, आम्ही दिलेले हे तपासणीचे रिपोर्ट हे कदापि अंतिम निदान असत नाही. रुग्ण जी लक्षणे सांगत असतो, त्यातील लक्षणाबरोबर हा रिपोर्ट अभ्यासून पहावा. आणि त्यानंतरच अंतिम निदान करावे.

    याचा दुसरा सरळ अर्थ असा होतो, जिवंत रुग्ण जी लक्षणे सांगतोय ती, निर्जीव यंत्र सांगत असलेल्या रिपोर्टपेक्षा, जास्त महत्वाची असतात. कोणत्याही यंत्रावर पूर्णपणे विसंबून राहू नका. अहो साधा वजन काटाच घ्या ना, चार वजन काट्यावरचे आपलेच वजन वेगवेगळे येते. रेल्वे स्टेशनवरच्या चकाकत्या मशीनमधले वजन वेगळे, बस स्टॅन्ड वरचे वेगळे, रेल्वेच्या ब्रीजवरील एक रूपयातले वजन वेगळे, दवाखान्यातले वेगळे, जीम मधल्या काट्यावरचे वेगळे. असे का होते ? प्रत्येक मशीनमधले हे तांत्रिक दोष असतात. कुणाची स्प्रिंग जुनी असते तर कुणाचा सेल संपत आलेला असतो, कुणाचा बॅलन्स गेलेला असतो, तर कुणाचा पाया पक्का नसतो.
    पण वजन करणाऱ्याचं काय ? त्याचं वजन तर बदलत रहातं ना !

    यंत्र जेवढं मोठं तेवढी त्यातली गुंतागुंत जास्त.

    बरं हे कोण सांगतंय तर, ज्या लॅबमधे आपण तपासणीसाठी जातो, त्या लॅबला असलेली कायदेशीर बंधने सांगत आहेत. जर चुकुन कोणी या दिलेल्या रिपोर्टविरोधात कोर्टात तक्रार वगैरे करायला जाणार असेल तर, त्याचाही काही उपयोग होणार नाही. कारण 'कंडीशन ऑफ रिपोर्टींग'मध्ये आणखी एक वाक्य लिहिलेले असते.
    "This medical dignostic report is not valid for medico legal purposes."

    आहे ना गंमत ?

    आश्चर्य वाटण्यासारखे आणखी एक विधान त्यावर लिहिलेले आढळते...

    It is presumed that....
    हे गृहीत धरले आहे, (काय? )
    The test performed on the specimen belongs to the patients name or identified.
    की, हा रिपोर्ट त्याचा आहे, ज्याचे नाव त्या सॅपलच्या बाटलीवर लिहिलेले आहे, ( म्हणजे त्याचेच असावे, असे वाटते. ) नक्की सांगता येणार नाही, की ते रिपोर्ट त्याचेच असतील.

    दिलेल्या रिपोर्टमधे एवढी संदिग्धता का ? एवढासुद्धा विश्वास ठेवायचा नाही का ?

    मग विश्वास नेमका कोणत्या यंत्रावर ठेवावा ?
    समर्थ म्हणतात,
    "या शरीरासारखे दुसरे यंत्र नाही"

    हे यंत्र ज्याने निर्माण केले, तो परमात्मा
    आणि ज्याच्याकडे शरीर, मन इंद्रियांसह, सांभाळायला दिले, तो अंतस्थ आत्मा, यांच्यावरच ना !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    17.02.2017

      February 17, 2017


  • बदामी केव्ह, कर्नाटकमधील अनपेक्षित क्षण

    कर्नाटकातील बदामी येथील अतिशय उंच आणि अतिविशाल खडकात कोरलेली लेणी पहायला मी आणि सौभाग्यवती जातो काय आणि सर्वात उंच असलेल्या खडकात कोरलेल्या लेण्यांसमोरच्या प्रांगणात निवांत बसलेले डॉ . प्रकाश आमटे आणि सौ. मंदाताई आमटे, दिसतात काय , सगळं अगदी अनपेक्षित आणि तरीही आनंददायक .

      February 10, 2021


  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – १०

    त्वदन्यः शरण्यः प्रपन्नस्य नेति
    प्रसीद स्मरन्नेव हन्यास्तु दैन्यम् |
    न चेत्ते भवेद्भक्तवात्सल्यहानि - स्ततो
    मे दयालो सदा सन्निधेहि ‖ १० ‖

    भक्ताच्या आणि भगवंताच्या आगळ्यावेगळ्या नात्याचे विवेचन करताना आचार्यश्री म्हणतात,
    त्वदन्यः शरण्यः प्रपन्नस्य नेति - माझ्यासारख्या प्रपन्न अर्थात संसारातील दुःखांनी त्रस्तझाल्यानंतर शरण येणाऱ्यांसाठी सुख,शांती, समाधानाच्या प्राप्तीचे आपल्यासारखे अन्य स्थान नाही.
    प्रसीद - त्यामुळे आपल्याला शरण आलेल्या माझ्यावर प्रसन्न व्हा.
    स्मरन्नेव हन्यास्तु दैन्यम् - मी आपले स्मरण केले असल्याने माझे दैन्य दूर करा. माझ्या दुःखाचे शमन करा.
    येथे आचार्य मधील भक्त भगवंतालाच वेगळ्या अर्थाने वेठीला धरतो. तो भगवंताला म्हणतो तुला हे दुःख दूर करणे भाग आहे. कारण त्यात माझाच नाही तुझा देशील फायदा आहे.
    न चेत्ते भवेद्भक्तवात्सल्यहानि:- जर तू असे केले नाही तर तुझ्या 'भक्तवात्सल्य' भावाची हानी होईल. लोक तुला यापुढे भक्तवत्सल म्हणणारच नाहीत. त्यामुळे तुझ्या त्या भक्तवत्सल विशेषणाचा आब राखण्यासाठी का होईना, माझे रक्षण कर कारण मी तुझी भक्ती करीत आहे. त्यामुळे भक्ताचे संरक्षण करणे, त्याचे दुःख निवारण करणे हे जणू काही , हे भगवंता तुझे कर्तव्यच आहे.
    ततो मे दयालो सदा सन्निधेहि - त्यामुळे हे दयासिंधू मला कायम आपल्याजवळ ठेव.
    कारण हे भगवंता तुझ्या चरण कमला पाशी केवळ आणि केवळ आनंद आहे. तिथे माझे दुःख आपोआपच दूर होईल. त्यामुळे मला संनिध म्हणजे चरणकमलां जवळ स्थान दे.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      June 19, 2020


  • वेदसार शिवस्तोत्रम् – ७

    भगवान श्री शंकरांच्या अद्वितीय वैभवाचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात….

      August 20, 2020