(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्री विष्णू भुजंगप्रयात स्तोत्रम् – ५

    भगवंताच्या अलौकिक सौंदर्याचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात, चमचमणाऱ्या रत्नांनी युक्त असणारी कर्ण कुंडले ज्यांनी धारण केलेली आहेत , अशा भगवान श्री विष्णूंना मी वंदन करतो.

      October 6, 2020


  • स्वस्त, मस्त आणि आकर्षक खेळणं!

    आपल्या देशात ६०-७० वर्षापूर्वी रेडिओ, फ्रीज, टीव्ही, मोटार, फोन या चैनीच्या वस्तू म्हणून पहिल्या व वापरल्या जात होत्या. तसेच ज्याच्या घरात या वस्तू आहेत हे ते स्टेटस्चा भाग समजायचे. त्याकाळी काही तातडीचे काम किंवा निरोप हा तारायंत्राद्वारे पाठविला जात असे परंतू विज्ञान व तंत्रज्ञातील नवनवीन शोधामुळे फोन सेवेत अमुलाग्र बदल होत जाऊन सारेजग माणूस मुठीत ठेवण्याची स्वप्ने बघू लागला. वैज्ञानिक व तांत्रिक बाळावर माणूस अंतराळात ट्रीपला जाण्याची स्वप्ने बघत आहे.

      September 26, 2013


  • श्री भ्रमरांबाष्टकम्- ३

    राजन्मत्तमरालमन्दगमनां राजीवपत्रेक्षणांराजीवप्रभवादिदेवमकुटै राजत्पदाम्भोरुहाम्।
    राजीवायतमन्दमण्डितकुचां राजाधिराजेश्वरीं
    श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये।।३।।

    राजन्- शोभासंपन्न असलेली,

    मत्तमराल- आपल्याच आनंदात डौलत जाणारा मराल म्हणजे हंस.

    मन्दगमनां - त्याप्रमाणे मंद गती ने गमन करीत असलेली.

    राजीवपत्रेक्षणां- राजीव म्हणजे कमळ. त्याचे पत्र अर्थात पाकळी प्रमाणे, ईक्षणा म्हणजे दृष्टी अर्थात डोळे असणारी.

    राजीवप्रभवादि- राजीव अर्थात कमळातून ,प्रभव अर्थात उत्पन्न झालेले. म्हणजे भगवान ब्रह्मदेव. भगवान श्रीविष्णूंच्या नाभीतून निघालेल्या कमळातून भगवान ब्रह्मदेव प्रगटले आहेत. त्यामुळे ज्यांना राजीवप्रभव असे म्हटले आहे. ते ज्यांच्या अग्रभागी आहेत असा सर्व देवांचा समुदाय म्हणजे राजीवप्रभवादि.

    देवमकुटै- अशा सर्व देवांच्या मुकुटांनी राजत्पदाम्भोरुहाम्- पद म्हणजे पाय, अंभोरूह म्हणजे कमळ. राजत् म्हणजे शोभून दिसणारी. अशा सर्व देवांच्या मुकुटांनी जिचे चरणकमल शोभून दिसत आहेत अशी. या सर्व देवता चरणावर मस्तक ठेवत असल्याने, आईचे पाय दिसतच नाही तर या देवांचे मुकुटच दिसतात अशी सुंदर कल्पना आचार्यश्री करीत आहेत.

    राजीवायतमन्दमण्डितकुचां- राजीव म्हणजे कमळ, आयत म्हणजे फुललेले, मंद म्हणजे हळुवार हलणारे, मंडितकुचा अर्थात वक्षस्थल शोभून दिसणारी.

    आई जगदंबेने गळ्यात फुललेल्या कमळाची माळ घातली आहे. आईच्या मंद श्वासाने आणि हृदयाच्या हळुवार हालचालीने, ती माळ मंद हलत आहे. तिने शोभून दिसणारी.

    राजाधिराजेश्वरीं- सर्व राजांचीही महाराणी असणारी.

    श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये- श्रीशैल पर्वतावर निवास करणाऱ्या आई जगदंबा ,श्री भ्रमराम्बेचे मी भजन करतो.

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

      April 5, 2020


  • बुलढाण्यातली मराठी बोली

    नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आणि विदर्भाची राजधानी. नागपूरची मराठी हिंदीमिश्रित आहे. नागपूरहून यवतमाळला आलं की या मराठीचं स्वरूप बदलतं. बुलढाण्यातली मराठी मात्र या दोन्हीपेक्षा आणखीनच वेगळी आहे. बुलढाण्यातल्या बोलीतही हिंदी शब्दांचा सर्रास वापर केला जातो. प्रमाण मराठीपेक्षा इथली बोली फार वेगळी आहे.

      October 17, 2018


  • भारताच्या ‘डेटा’ सुरक्षेकरता ५-जी नेटवर्कमध्ये चीनी कंपन्यांचा प्रवेश थांबवा

    तैवानने नुकतेच सुरक्षेच्या मुद्द्यावरून चिनी कंपनी हुवावे आणि झेडटीईच्या नेटवर्क, मोबाईल व अन्य उत्पादनांवर बंदी घातली. अमेरिका, ब्रिटन, जपान, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाने हुवावे व झेडटीईविरोधात याआधीच अशी पावले उचलली आहेत. १७० देशांत काम करणार्या हुवावेला हा एक मोठा झटका आहे. ट्रम्प प्रशासनाने ‘हुवावे’चा ‘एंट्री लिस्ट’ मध्ये समावेश केला आहे. ‘एंट्री लिस्ट’ ही अशा कंपन्यांची यादी आहे, ज्यांना सरकारी परवानगीशिवाय अमेरिकन कंपन्यांकडून कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान विकत घेता येणार नाही किंवा विकता येणार नाही.

      May 27, 2019


  • मानव जातीचा कर्दनकाळ – एक क्षुद्र मच्छर

    पृथ्वीतलावरील उडणाऱ्या कीटकात सर्वात जास्त वेळ उडू शकणार्‍या कीटक आहे डास. त्याच्या अंदाजे २७०० जाती व पोटजाती आहेत.माणसांमध्ये मुख्यतः मलेरिया, डेंग्यू, हत्तीरोग आफ्रिकन पीत ज्वर, चिकन गुनिया व मेंदूचा दाह हे रोग होण्यास ते कारणीभूत असतात.

      December 2, 2018


  • श्री पुष्पदंत रचित “महिम्न स्तोत्रं”

    एका ऋचा ( श्लोक ) मध्ये कितीतरी गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. ह्यांचा सखोल आभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल कि त्या काळातील ऋषी मुनि प्रत्येक विषयाचा किती साकल्याने विचार करीत होतें.

      March 7, 2012


  • शब्दनाद’ – बारसं..

    अपत्याचं नांव ठेवण्याचा विधी. अपत्य जन्मानंतर जनरली १२ व्या दिवशी हा विधी पार पाडला जातो. आपल्यापैकी बर्‍याच जणांना हा विधी ‘बाराव्या’ दिवशी करतात म्हणून त्याला ‘बारसं’ म्हणतात असे वाटते.

      August 8, 2016


  • श्री कनकधारा स्तोत्रम् – १३

    सम्पत्कराणि सकलेन्द्रिय नन्दनानि साम्राज्यदान विभवानि सरोरूहाक्षि।त्वद्वंदनानि दुरिताहरणोद्यतानि मामेव मातरनिशं कलयन्तु मान्ये।।1१३।।

    मान्ये- हे सगळ्यांना मान्य अर्थात वंदनीय असणाऱ्या आई जगदंबे! सर्वसामान्य मानवच नव्हे तर ईश्वर महेश्वर देखील जिच्या योग्यतेचा सन्मान करतात अशी.

    सरोरूहाक्षि- हे कमलनयने. सर म्हणजे तलाव. त्यात उरुह म्हणजे जन्माला येऊन वर येणारे. अर्थात कमळ. तसे जिचे अक्ष म्हणजे डोळे आहेत अशी.
    येथे केवळ आकाराच नव्हे तर गुणांचाही विचार आहे. ते कमळ जसे भुंग्यांना आकर्षित करते तशी जिची कृपादृष्टी साधकांना आकर्षित करते, अशी.

    त्वद्वंदनानि- तुला केलेली वंदने अर्थात नमस्कार, प्रार्थना.
    कशासाठी करायची ही प्रार्थना? तरीही प्रार्थना अलौकिक फलदायी आहे.
    ही प्रार्थना काय काय देते? याचे वर्णन करताना पूज्यपाद आचार्य श्री म्हणतात,

    सम्पत्कराणि- सकल संपत्तीला उपलब्ध करून देणारी. जिच्या कृपेने बाह्य जगतातील धनसंपत्ती आणि अंतर्मनातील शम,दम इत्यादी षट् संपत्ती, साधकांना प्राप्त होते अशी.

    सकलेन्द्रिय नन्दनानि- सकल इंद्रियांना आनंद देणारी. बाह्य जगतातील पंचकर्मेद्रिये, पंचज्ञानेंद्रिय आणि अंतर्गत इंद्रिय मन अशा अकराही इंद्रियांना आनंद देणारी.
    शब्द, स्पर्श इ. पाचही पद्धतीने प्राप्त होणारे सर्व आनंद प्रदान करणारी. त्या आनंदाला साधनीभूत होणारी साधने प्रदान करणारी.

    साम्राज्यदान विभवानि- आपल्या भक्तांना साम्राज्य दान देण्याचे वैभव असणारी.

    दुरिताहरणोद्यतानि- दुरित अर्थात पाप, वाईट ,अमंगल. त्याचे हरण करण्यास म्हणजे नष्ट करण्यास उद्यत म्हणजे कायम सिद्ध असणारी.
    अशी ही आईची वंदना,

    मामेव- माझ्यावरच, मलाच.

    मातरनिशं - हे माते अनिश अर्थात सतत.

    कलयन्तु- प्राप्त होत राहो.

    अर्थात अशा सर्व अद्वितीय गुणांनी युक्त असणारी ही वंदना सतत करण्याची शक्ती मला प्राप्त होवो.

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

      March 22, 2020


  • ऑक्टोबर २७ – ‘गुणी’ टेलर आणि मुरलीचा दणका

    १९६४ : कसोटी सामन्यांना प्रेक्षणीय, लोकप्रिय आणि निकाली बनविण्यात मोलाचा हातभार लावणार्‍या एका धुरंधर कर्णधाराचा जन्म.

      October 29, 2010