वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
पिंपळाला भारतीय समाजात मानाचे व पूजनीय स्थान आहे. हिंदू संस्कृतीत, ज्या वृक्षांना ‘तोडू नये’ असा दंडक आहे, त्यापैकी हा एक. अश्वत्थ मारुतीचे (पिंपळाखाली असलेल्या मारुतीचे) मारुतीचे पूजन हितकारी, पुण्यकारक म्हणून वर्णिले आहे. श्रावण महिन्यातील शनिवारी पिंपळाची पूजा करतात. पिंपळ हा पुष्य नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.
November 7, 2021
गेले काही महिने राणे काय करणार, याची चर्चा प्रसार माध्यमांनी अशा वळणावर नेली होती, की जणू राज्यात मोठा राजकीय भूकंपच होऊ घातला आहे. प्रत्यक्षात राणे यांनी मोठा गाजावाजा करून अखेर कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि सोबत आपल्या आमदारकीचा राजीनामाही देऊन टाकला. एक “स्वाभिमान” दुखावलेला कोकणातील नेता आधी शिवसेनेला जय महाराष्ट्र करतो आणि नंतर कॉंग्रेस ला सोडचिठ्ठी देतो. मग भाजपच्या वाटेवर जातो पण रस्ता चुकल्याने अखेर ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ घेऊन स्वतःची वेगळी चूल मांडली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नारायण राणे कोणत्या पक्षात जाणार याकडे लक्ष लागल होत. त्यांनी काल आपली नवीन दिशा जाहीर केली. राणे यांनी ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ असे नाव जाहीर केले.
October 2, 2017

शिटीचा आवाज किती दूरपर्यंत पोचेल हे त्या-त्या परिसरावर अवलंबून असतं. घनदाट जंगलात हा आवाज सुमारे अर्ध्या किलोमीटरपर्यंत पोचतो तर, डोंगराळ भागातल्या काही ठिकाणी तो तब्बल आठ किलोमीटरपर्यंतही पोचू शकतो.
November 22, 2021
September 28, 2010
गुरुस्वरुपात पूजला जाणारा श्रेष्ठ देव म्हणजे श्री दत्तात्रेय होय. म्हणूनच “श्री गुरुदेव दत्त" असा दत्तात्रेयांचा जयघाष केला जाते. श्री दत्तात्रेय हे गुरुतत्त्वाचे आदर्श स्वरुप आणि योग साधनेचे उपास्यदैवत आहे. शैव, वैष्णव आणि शाक्त या निन्ही संप्रदायायत दत्तात्रेयांची उपासना श्रध्देने केली जाते. दत्तात्रेयांमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांची तत्त्वे एकवटलेली आहेत. यामागील रहस्य जाणून घेण्याकरता दत्तात्रेयांची जन्मकथा माहीत असणे आवश्यक आहे. अत्री ऋषी आणि अनसूया यांचे पुत्र दत्तात्रेय होय. अत्री ऋषी हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र चित्रकूट पर्वतावर पयस्विनी नदीच्या काठी त्यांचा आश्रम होता. अत्री ऋषी उग्र तपश्चर्या करत असत. अत्यंत औचित्त्य पूर्ण अशा त्यांच्या या तपोबलाच्या तोजाने कर्दम प्रजापती संतुष्ट झाले आणि आपल्या अनसूया नावाच्या कन्येचा अत्रींशी विवाह लावून दिला. अनसूया ही नावाप्रमाणे असूया रहित होती. तिने तपश्चर्या करून भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले होते. अनुसूया ही पतिव्रता स्त्री होती. तिच्यातपश्चर्येच्या तेजाने आणि पतिव्रत्याच्या बळाने ब्रह्मा, विष्णु, महेश हे तिन्ही देव प्रभावित झाले होते. प्रत्यक्ष इंद्राला देखील आपले स्थान डळमळीत झाल्याची भीती वाटू लागली, आणि त्याने ब्रह्मा, विष्णू, महेश यांना विनवणी केली. तिन्ही देवांनी अनसूयेचे सत्वहरण करण्याचे ठरविले त्याप्रमाणे अत्री ऋषी स्नानासाठी गंगेवर गेले असता अत्री ऋषींच्या आश्रमात तिघेही अतिथी रूपात प्रगट झाले. तिघांनी अनसूयेकडे इच्छाभोजनाची मागणी केली. अनसूयेने अतिथींचे स्वागत करून सर्व स्वयंपाक केला आणि वाढावयास आली असता निघांनी तिला नग्न होऊन वाढ अशी आज्ञा केली. अतिथीच्या इच्छेचा मान राखणे आपले कर्तव्यच आहे, असे मानून त्यांचा अतस्थ हेतूही जाणला. क्षणभर विचार करून अनसूयेने आपल्या पतीचे स्मरण केले आणि अतिथींवर तीर्थाचे सिंचन केले. तत्क्षणीच त्या तिघांचे तीन बालकात रुपांतर झाले. अत्री ऋषी गंगेवरून परत येताच अनसूयेने ती तीन बालके त्यांच्यासमोर ठेवून नम्रमणे म्हटले "स्वामिन् देवेन् दत्तम. ”अत्री ऋषींनी त्यांना “दत्त" असे नाव दिले.
ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांच्या भार्या आपल्या पतीच्या शोधात अत्री ऋषींच्या आश्रमात आल्या. अनसुयेने आपल्या पतीचे रुपांतर बालकात केल्याचे पाहून तिघीही दुःखी झाल्या. त्यांनी अनसूयेला विनवणी केली आणि अनसूयेने तिन्ही बालकांचे पुन्हा त्रिदेवात रुपांतर केले. त्रिदेवांनी आपला पराभव मान्य केला. ब्रह्मा व महेश तपश्चर्या करण्यासाठी अरण्यात निघून गेले. कालांतराने ब्रह्मा चद्र (सोम) झाले आणि महेश दुर्वास झाले. परंतु विष्णु मात्र दत्त रूपात अत्री आणि अनसूयेच्या इच्छेनुसार त्यांच्याजवळच त्यांचे पुत्र म्हणून राहू लागले. ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांचे प्रतीक म्हणून दत्ताने ब्रह्माचा कमंडलू आणि महेशाचा शूल हातात धारण केला. सत्व, रज आणि तम या तीन गुणांच्या या देवता मानल्या जातात.
दत्तात्रेयांनी अत्री ऋषींच्या आदेशानुसार गौतमी नदीच्या काठी शिवोपासना करून योगसिध्दी आणि ब्रह्मज्ञान प्राप्त केले. दत्तात्रेय हे स्वेच्छाविहारी आहेत. माहूर हे दत्तात्रेयांचे शयनस्थान समजले जाते. पांचळेश्वरी ते स्नान करतात आणि कोल्हापुरी भिक्षाटन करतात. दत्तात्रेयांचा निवस सतत औदुंबर वृक्षाखाली असतो. म्हणून दत्तभक्त तेथे बसून गुरुचरित्राचे पारायण करताता. तीन मुखे ही ब्रह्मा, विष्णू महेश या त्रिदवांचे समन्वय दाखविणारी आहेत. या त्रिदेवांचे प्रत्येकी दोन प्रमाणे सहा हात आहेत बह्माच्या हातातील जपमाला व कमंडलू हे सत्तां चे, तपस्व्याचे प्रतीक आहे. विष्णूच्या हातातील शंख आणि चक्र ही आयुधे रज तत्त्वाचे प्रतीक तर महेशाच्या हातातील त्रिशूल आणि डमरू तम तत्त्वाचे म्हणजेच संहाराचे प्रतीक आहे. दत्तात्रेयांचा वेष हा मस्तकावर जटाभार, पायात खडावा, अंगाला विभूती लावलेली, काखेत झोळी लटकविलेली, व्याघ्रांबर परिधान केलेली मूर्ती म्हाणजे दत्तात्रेय अवधूत दिगंबर योगी असल्याचे प्रतीक आहे. दत्तात्रेयांच्या मागे उभी असलेली कामधेनू हे पृथ्वी चे प्रतीक आहे, तर त्यांच्या आजूबाजूला असलेले चार श्वान हे चार वेदांचे प्रतीक आहेत. दत्तात्रेयांची उपासना गुरु स्वरूपाता केली जाते म्हणून ते गुरुदेव आहेत. परमार्थमार्गात गुरुसंस्थेला अतिशय महत्त्व आहे. दत्तात्रेय हे परमगुरु असल्यामुळे सर्व संप्रदायात ते श्रेष्ठ मानले जातात. दत्तसंप्रदाय हा सर्वात महान संप्रदाय मानला जातो. योगशास्त्र मंत्रशास्त्र आणि उपासनाशास्त्र यांचे संवर्धन करण्याचे महान कार्य दत्तसंप्रदायाने केले आहे. उपनिषदकारांनी प्रभू दत्तात्रेयांना विश्वगुरू म्हणून यथार्थपणे गौरविले आहे. दत्तभक्तीचा प्रसार हा जातीभेदातीत, संप्रदायातीत किंबहुना धर्मातीत आहे म्हणूचन महानुभाव, नाथ, वारकरी आणि सतर्थ संप्रदायात दत्तात्रेयांविषयी अत्यंत आदर आणि श्रध्दा आहे. दत्तात्रेय हे विष्णूचे अंश असून अत्री आणि अनसूयेचे पुत्र असले तरी त्यांचा जन्म अयोनिसंभव आहे. भुतप्रेत, पिशाच्यादींचे दत्तात्रेय हे कर्दनकाळ आहेत.
भूतप्रेतपिशाचाद्या यस्य स्मरणमात्रत: ।
दूरादेव पलायंते दत्तात्रेय नमामि तम् ।।
स्मरण करताच प्रगट होणारी द त्त ही देवता आहे. त्यांच्या स्मरणाने वाईट शक्तींचा तात्काळ विनाश होतो असे दत्तावतारी श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी वरील श्लोकातून सांगितले आहे. दत्त म्हणजे देणे. ज्यांनी आपल्या परमभक्ताला सर्व काही दिले आहे. दत्तात्रेयांचे दुसरे नाव अवधूत. म्हणजे, सर्व प्रकृतीविकारांना धुऊन टाकणारा आणि भक्ताला निर्गुणाची अनुभूती देणारा. “दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" दत्तात्रेयांचा साधनमंत्र. दिगंबर म्हणजे दिशा हेच ज्याचे वस्त्र आहे असा, म्हणजेच सर्वव्यापी श्री म्हणजे लक्ष्मी ज्याच्या पायाशी आहे तो म्हणजे श्रीपदा वल्लभ म्हणजे लक्ष्मीचा स्वामी अर्थात साक्षात श्री विष्णू.
अशी ही सर्वव्यापी सर्वत्र संचारी स्मर्तृगामी, युगानयुगे, शतकानुशतके अखिल मानव जातीचा उददार करणारी आणि परमभक्तांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारी जागृत, श्रेष्ठ गुरुदेवता म्हणजे श्री दत्तात्रेय !
-–प्रज्ञा कुलकर्णी, (डोंबिवली)
मो. ९९२०५१३८६६
साभार – गुरुतत्व मासिक, वर्ष ३ रे, अंक ४ था, (अंक २८)
October 3, 2022
1982 सालची गोष्ट. रात्रीचे दोन वाजले होते. ‘मर्लीन टटल’ नावाची वन्य प्राणीशास्त्रज्ञ पूर्व आफ्रिकेत झिंबाब्वेच्या नदीच्या गुडघाभर पात्रात जवळपासच्या वटवाघळांचा शोध घेत होती. तिने एक विचित्र आवाज ऐकला. वास्तविक परिसरात त्यावेळी सिंह, तरस याचे डरकावणे सतत चालू असायचे, जंगली म्हशी उंच गवतात स्वैर धूडगूस घालत होत्या. पण या कोलाहलात एक कर्कश्श आणि अगदी विचित्र आवाज घुमला. मर्लीनने आवाजाचा मागोवा घेतला पण तिला आवाजाचे उगमस्थान नीटसे शोधता आले नाही.
January 7, 2025
स्वशक्त्यादिशक्त्यंत सिंहासनस्थं
मनोहारि सर्वांगरत्नोरुभूषम् |
जटाहींदुगंगास्थिशम्याकमौलिं
पराशक्तिमित्रं नमः पंचवक्त्रम् ‖ ३ ‖
भगवान श्री शंकरांच्या दिव्य स्वरूपाचे वर्णन करताना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
स्वशक्त्यादिशक्त्यंतसिंहासनस्थं- स्वतःची शक्ती अर्थात चैतन्यसत्ता असणाऱ्या आदिशक्ती परांबेच्या सोबत भगवान शंकर आपल्या सिंहासनावर आरूढ असतात.
आचार्यश्री या सिंहासनाकरिता शक्त्यंतसिंहासन असा शब्दप्रयोग करतात. याचा अर्थ ज्यांच्यावर कोणाची शक्ती चालत नाही. कोणाची सत्ता चालत नाही. जिथे अन्य सर्व शक्तींचा लय होतो असे सिंहासन. परमसत्ता.
मनोहारि- अत्यंत आकर्षक अशा, सर्वांगरत्नोरुभूषम् - उरु म्हणजे विपुल, प्रचुर, श्रेष्ठ, मूल्यवान. तशा रत्नांनी बनविलेली आभूषणे ती रत्नोरुभूष. भगवंतांनी सर्व अंगावर अशी आभूषणे धारण केली आहेत.
जटाहींदुगंगास्थिशम्याकमौलिं- या शब्दामध्ये जटा,अहि,इंदु, गंगा, अस्थि, शम्याक आणि मौली अशा शब्दांचे एकत्रीकरण आहे.
जटा म्हणजे तुमच्या वर बांधलेले केस. अहि म्हणजे सर्प. इंदू म्हणजे चंद्र.गंगा. अस्थि म्हणजे नरमुंडक्यांची माला. शम्याक म्हणजे बहाव्याच्या फुलांची माळ. या सगळ्या गोष्टी मौली म्हणजे मस्तकावर, गळ्यात धारण केल्या आहेत असे. यातील गंगा, चंद्र, सर्प या थंड वस्तू , समुद्रमंथनातून निघालेले हालाहल प्राशन केल्याने होणारा भयानक दाह शमविण्यासाठी भगवान धारण करतात.
पराशक्तिमित्रं - पराशक्ती जगदंबेचे स्नेहपात्र. तिच्या सोबत सर्व वेदांतरहस्य उलगडून दाखविणारे.
नमः पंचवक्त्रम् - अशा पंचमुखधारी भगवान श्रीशंकरांना नमस्कार असो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
June 12, 2020
वीणानादनिमीलितार्धनयने विस्रस्तचूलीभरे
ताम्बूलारुणपल्लवाधरयुते ताटङ्कहारान्विते ।
श्यामे चन्द्रकलावतंसकलिते कस्तूरिकाफालिके
पूर्णे पूर्णकलाभिरामवदने मां पाहि मीनाम्बिके ॥ ७॥
आई जगदंबा मीनाक्षीच्या कलारसिक स्वरूपाचे वर्णन करताना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
वीणानादनिमीलितार्धनयने - वीणानादामुळे नेत्र अर्धवट मिटून घेतलेली.
शरीरविज्ञान सांगते की आपल्याला प्राप्त होणाऱ्या संवेदनां पैकी ८३% संवेदना केवळ डोळ्यांनी प्राप्त होतात. त्यामुळे आपल्या लक्षात येईल की अन्य कोणत्याही ज्ञानेंद्रियांनी जेव्हा आपण सुखसंवेदना प्राप्त करतो त्यावेळी त्याचा अधिकाधिक आनंद घेण्यासाठी आपले डोळे आपोआप मिटले जातात.
कानावर येणारे अप्रतिम संगीत असो जिभेवर ठेवलेला रसपूर्ण पदार्थ. अत्तराचा गंध असो की गालावर फिरणाऱ्या मोरपिसाचा स्पर्श. कोणताही आनंद घेताना डोळे आपोआप मिटले जातात. पूर्ण आनंद घेण्याची ती स्वाभाविक प्रक्रिया असते. आई जगदंबा वीणा वादनाचा असा परिपूर्ण आनंद घेत आहे.
विस्रस्तचूलीभरे- केश समूह विखुरलेली. वीणा वादनाच्या तल्लीनतेत मानेला सतत झटके दिल्याने तिची वेणी विस्कटली आहे. केस विखुरलेले आहेत.
ताम्बूलारुणपल्लवाधरयुते- तांबूल भक्षण केल्याने आई जगदंबेचे ओष्ठ पल्लव लालबुंद झाले आहेत. कानाच्या आनंदासाठी वीणा तर रसनेच्या आनंदासाठी आई तांबूल भक्षण करते. ताटङ्कहारान्विते- ताटंक म्हणजे बाजूबंद. हार म्हणजे मोत्याच्या माळा. यांना धारण करून सुंदर दिसणारी.
श्यामे- सावळ्या वर्णाची. शरीरशास्त्राच्या दृष्टीने अति गोरेपण आयोग्य आहे. त्यात सूर्यकिरणांनी प्राप्त होणाऱ्या नैसर्गिक रंग कणांचा अभाव असल्याने, भारतीय संस्कृतीत सावळा वर्ण खऱ्या सौंदर्याचे प्रतीक मानलेला आहे. चन्द्रकलावतंसकलिते- मस्तकावर आभूषण रूपात चंद्रकोर धारण करणारी.
कस्तूरिकाफालिके- भांगे मध्ये कस्तुरी भरणारी.
पूर्णे- स्वतःचाच ठाई परिपूर्ण असणारी. पूर्णकलाभिरामवदने- पौर्णिमेचा पूर्ण चंद्राप्रमाणे मुखकमल असणाऱ्या,
मां पाहि मीनाम्बिके- हे आई जगदंबे मीनाक्षी माझे रक्षण कर.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
May 31, 2020
फिल्म प्रोजेक्टर चा इतिहास मोठा रंजक आहे.
April 28, 2024
उद्यद्भानु सहस्रकोटिसदृशां केयूरहारोज्ज्वलां
बिम्बोष्ठीं स्मितदन्तपंक्तिरुचिरां पीताम्बरालंकृताम् ।
विष्णुब्रह्मसुरेन्द्रसेवितपदां तत्वस्वरूपां शिवां
मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् ॥ १॥
मीन म्हणजे मासोळी. अक्ष म्हणजे डोळे. जिचे डोळे मासोळी प्रमाणे लांब, दोन्हीकडे निमुळते, त्यातही कानाकडे अधिक वाढलेले आणि मध्यभागी विशाल असतात ती मीनाक्षी. मासोळीचे डोळे टपोरे असतात. तसे जिचे नेत्र ती मीनाक्षी.
अशा प्रकारच्या सुंदर नेत्रांनी सुशोभित आई जगदंबे चे नाव आहे मीनाक्षी.
दक्षिण भारतात मदुराई नामक स्थानी देवी मीनाक्षीचे विश्व प्रसिद्ध मंदिर आहे.
या देवी मीनाक्षीच्या वंदनार्थ आचार्यश्रींनी मीनाक्षी पंचरत्नम् आणि मीनाक्षी स्तोत्रम् अशा दोन रचना केल्या आहेत.
या मीनाक्षी पंचरत्नम् स्तोत्रामध्ये आईचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
उद्यद्भानु सहस्रकोटिसदृशां- हजारो कोटी सूर्य एकाच वेळी उगवले तर ते तेज जसे असेल तशी तेजस्वी असणारी. तरीही उगवत्या सूर्याप्रमाणे आल्हाददायक.
केयूर- बाजूबंद
हार- गळ्यात,केसात शोभणाऱ्या मोत्यांच्या माळा.
उज्ज्वलां- अत्यंत तेजस्वी आहेत अशी. त्यांच्या सौंदर्याने अधिकच तेजस्वी दिसणारी.
बिम्बोष्ठीं- पिकलेल्या तोंडल्याप्रमाणे लाल बुंद ओठ असणारी. स्मितदन्तपंक्तिरुचिरां- किंचित् हास्य केल्यामुळे जिची दंतपंक्ती दिसून येत असल्याने अधिकच सुंदर दिसणारी.
पीताम्बरालंकृताम् - दिव्य असा पीतांबर धारण केलेली.
विष्णुब्रह्मसुरेन्द्रसेवितपदां - विष्णू, ब्रह्मदेव इत्यादि महेश्वर, सुरेंद्र अर्थात देवराज इंद्र. त्यांच्यासह समस्त देवतां जिच्या चरणांची सेवा करत असतात अशी.
त
त्वस्वरूपां - परब्रह्मस्वरूप असणारी.
शिवां- अत्यंत पवित्र, भगवान शंकरांची सहधर्मचारिणी.
मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम्- कारुण्य सागर स्वरूप असणाऱ्या अशा देवी मीनाक्षी ला मी सतत वंदन करतो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
May 10, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti