कथा

नागराणीचा मुकुट

Category:

 

एक होता राजा. त्याला एकुलती एक मुलगीच होती. त्या मुलीला त्यानं खूप कोडकौतुक करून वाढविलं होतं. एकदा राजा राजकुमारीला बरोबर घेऊन फिरायला बाहेर पडला. फिरता फिरता एके ठिकाणी त्यांना लोकांची गर्दी जमलेली दिसली. राजा आणि राजकुमारी दोघेही त्या गर्दीत घुसले. बघतात तर एक गारुडीण नागाला खेळवीत होती. एकदा नागाची बांगडी करून ती हातात घाली, तर एकदा कंठीसारखी त्याच्या गळ्यात घाली

  October 5, 2025


कथा

जोजाची गोष्ट

Category:

 

‘जोजा ही एका राजाची मुलगी, पाय घसरून पडलेल्या एका म्हातारीला कुचेष्टेने हसली. तशी म्हातारीने चिडून शाप दिला: ‘तादेव’ नावाचा मृत राजपुत्र तुला पती मिळू दे अन् तुझे खूप हाल होऊ देत !’ बिचारी राजकन्या, तिने म्हातारीची विनवणी केली. तो मृत राजपुत्र कशाने उठेल म्हणून विचारले. तशी म्हातारीने सांगितले की, त्याच्या उशाशी थडग्यात एक मोठे चांदीचे पिंप ठेवलेले आहे, ते जी तरुणी तीन दिवसांत अश्रूंनी भरून टाकील तीच त्याला जीवदान देऊ शकेल व मग त्यांचे लग्न होईल.

  October 5, 2025


कथा

राजा वीरकेतू, चोर आणि रत्नवती

Category:

 

त्रिविक्रमसेन राजा शिंशपवृक्षाकडे आला आणि वेताळाला पूर्वीप्रमाणेच खाद्यांवर घेऊन तो पुन्हा यायला निघाला. तेव्हा खाद्यांवरील शवातील वेताळ त्याला म्हणाला, ‘हे महाराज, तू फार दमला असशील! म्हणून तुझे श्रमपरिहार करण्यासाठी मी एक कथा सांगतो. ती ऐक.’

  October 5, 2025


कथा

भाजीचा प्रताप

Category:

 

एक राजा होता. तो एकदा आपल्या महालाच्या खिडकीपुढं बसला होता. तिथं त्याला रस्त्यावरून एका फेरीवाल्याची आरोळी ऐकू आली.. ‘भाजी घ्या हो भाजी ! चमत्काराची भाजी! भाजी घ्या भाजी!’ राजाला नवल वाटलं. चमत्काराची भाजी म्हणजे कसली भाजी बुवा? त्यानं नोकराला सांगितलं, ‘जा, त्या भाजीवाल्याला बोलाव.’ भाजीवाला आला तेव्हा राजानं त्याला विचारलं चमत्काराची भाजी म्हणालास काय?

  October 5, 2025


कथा

अंशुच मासेमारीची मोहीम

Category:

 

अंशू हा एक विचित्र मुलगा होता. नको ते करण्यात पटाईत होता. एकदा मात्र त्याचा डाव त्याच्याच अंगलट आला. आपण फेकलेल्या जाळ्यात तो स्वत:च फसला.

  October 5, 2025


कथा

हुशार राणी

Category:

 

एक राजा होता. एक दिवस तो शिकारीला गेला. रस्त्यात त्याला एक लाकूडतोड्या भेटला. तो लाकडं गोळा करीत होता. राजाने त्याला विचारले, “तुझं नाव काय आहे?” त्याने सांगितले, हुजूर, माझं नाव बहादुरशाह आहे.”

  October 5, 2025


कथा

मेघ राजा

Category:

 

एक होता मेधी राजा. मोठा भरभक्कम ताजा तवाना. रंगानं काळा. पण मोठा ऐटबाज. मनात आलं की, आभाळात उंच उंच भरारी मारायचा. धावल्या ढगांना पकडायचा. त्यांची मानगूट धरायचा. धक्काबुक्की करायचा. त्यामुळं पाऊस अवचितच पडायचा. माणसं मग, आच्यारी का विच्यारी व्हायची. ते बघून हा असा हसायचा की, दोन पर्वतांची टक्करच जणू झालीय असा दणका उडायचा! त्याच्याजवळ एक छानदार लहान पिशवी असायची. देवानं ती त्याला दिलेली होती. म्हणून ती तो आपल्या केसात लपवून ठेवायचा. पण हा खुशीत आला की, ती एकदम चकाकायची.

  October 5, 2025


कथा

पांढऱ्या अस्वलाची गोष्ट

Category:

 

एक होता तरुण मुलगा. त्याचं नाव ओथुन. तो आइसलँड या बर्फानं भरलेल्या देशात राहत होता. त्याला आई होती. उन्हाळा आला की बर्फ वितळे आणि जहाजं इकडून तिकडं, तिकडून इकडं येऊ-जाऊ लागत. ही जहाजं जाताना येतांना बघून ओथुनला मोठं कुतूहल वाटे की, कुठं बरं ही जहाजं जात असतील, कुठून येत असतील ? आपणदेखील या जहाजातून जाऊन दूर दूर काय आहे, बघून यावं ! एकदा नॉर्वे देशाकडचं एक जहाज आईसलँडला पोचता-पोचता लवकर हिवाळा सुरू झाल्यामुळं बर्फात अडकलं.

  October 5, 2025


कथा

राजा आणि गरीब माणूस

Category:

 

एका गावात एक बुद्धिमान आणि अनुभवी वृद्ध रहात होता. त्याला एक मुलगा होता. एक दिवस त्याने आपल्या मुलास सांगितले, “बेटा, तीन महत्त्वाच्या गोष्टी लक्ष्यात ठेव. एक – कधीही अशा माणसास आपला मित्र करू नकोस. ज्यावर तुझा विश्वास नसेल. दोन – कधीही अशा माणसाकडून कर्ज घेवू नकोस. जो खानदानी श्रीमंत नसेल आणि तीन कधीही कोणतीही गुपित गोष्ट कोणालाही सांगू नकोस मग ती तुझी बायको का असेना.”

  October 5, 2025


कथा

राजाची चूक

Category:

 

एक राजा होता. त्याची एक राणी होती. राणी अतिशय देखणी होती. राज्य भले मोठे होते. प्रजा अतिशय सुखी व गुण्यागोविंदाने नांदत होती. पण राजा निपुत्रिक होता. त्यामुळे राजा-राणी दुःखी होते. त्यामुळे प्रजाही चिंतीत होती. राजानंतर राजगादीवर कोण बसणार? राजा राणी आपल्या प्रजेवर पुत्रवत प्रेम करीत. त्यामुळे राज्यात भांडण-तंटा, चोऱ्या-माय होत नव्हत्या.

  October 5, 2025