बैल आणि खेचर
Category:
कथा बाल-साहित्य साहित्य - ललितएक श्रीमंत जमीनदार शेतकरी होता. आपल्या बायका-मुलांसह तो शेतावरच राहात असे. त्याला पशुपक्ष्यांची भाषा अवगत होती. फक्त हे ज्ञान दुसऱ्या कुणाला सांगायचे नाही, असे त्याच्यावर बंधन होते. त्याने ते ज्ञान दुसऱ्या कुणाला सांगितले तर त्याच्या वाट्याला मृत्यू येणार होता. त्यामुळे हे रहस्य त्याने कुणालाच कळू दिले नव्हते. पण या भाषिक देणगीमुळे त्याला पशु-पक्ष्यांच्या भावभावना चटकन समजायच्या. गोठ्यातले वासरू भुकेने व्याकूळ झाल्यामुळे त्याच्या आईचा धावा करते आहे; घोड्याला कंटाळा आला आहे, त्याला चक्कर मारून आणली पाहिजे हे त्याला चटकन कळायचे. मांजरांची भांडणं, कोंबड्यांचा कलकलाट, पक्ष्यांचे गुंजन यातला भावार्थ त्याला समजायचा.
October 22, 2025