लेखसंग्रह
मुंबईची महालक्ष्मी, गव्हर्नर हॉर्नबी आणि दादाजी धाकजी
Category:
लेखसंग्रहसात बेटांची मुंबई एकसंध नव्हती. इथे व्यापार वाढूच शकला नसता. सर्वत्र माजलेली दलदल, सुकत घातलेली मासळी, त्यापासून बनविला जाणारा खताचा कुटाणा,अनेक प्रकारचे सरपटणारे प्राणी आणि कीटक, भरतीबरोबर खाऱ्या पाण्याने भरून जाणारी सातही बेटे, सतत चिखल यामुळे इथे जमिनीवरून मोठी वाहतूक करणे शक्य नव्हते.