अरुणाचल प्रदेश – उगवत्या सूर्याची भूमी (लँड ऑफ rising sun)

भारताच्या नकाशाकडे पाहीलं, की पूर्वेकडच्या टोकाशी डोंगररांगांमध्ये सामावलेलं एक राज्य आपल्याला दिसतं – अरुणाचल प्रदेश. नावाप्रमाणेच भारतात सर्वप्रथम सूर्य इथेच डोकावतो. सकाळच्या पहिल्या किरणांनी हिमालयाच्या कड्यावर पडलेलं सोनसळी तेज, दऱ्यांमधली धुक्याची चादर आणि शांत डोंगर वेडं वातावरण – प्रवाशाला नकळत मोहवून टाकतं.



अरुणाचल प्रदेश – उगवत्या सूर्याची भूमी /(लँड ऑफ rising sun)

भारताच्या नकाशाकडे पाहीलं, की पूर्वेकडच्या टोकाशी डोंगररांगांमध्ये सामावलेलं एक राज्य आपल्याला दिसतं – अरुणाचल प्रदेश. नावाप्रमाणेच भारतात सर्वप्रथम सूर्य इथेच डोकावतो. सकाळच्या पहिल्या किरणांनी हिमालयाच्या कड्यावर पडलेलं सोनसळी तेज, दऱ्यांमधली धुक्याची चादर आणि शांत डोंगर वेडं वातावरण – प्रवाशाला नकळत मोहवून टाकतं.

ईशान्य भारताचा हा तुकडा केवळ निसर्गरम्य नाही, तर इतिहास, शौर्य आणि अध्यात्माचं अद्भुत संमेलन आहे. चला, जाणून घेऊया काही ठिकाणं जी प्रवास-प्रेमी नी चुकवूच नयेत.

“आमचा तवांग आणि मेघालयचा प्रवास अविस्मरणीय ठरला! कुठे जायचं आणि काय करायचं यासाठी दिलेल्या शिफारसी अगदी अचूक होत्या. त्यामुळे आम्हाला या दोन्ही ठिकाणांचा सर्वोत्तम अनुभव घेता आला. हा प्रवास पूर्णपणे तणावरहित आणि संस्मरणीय ठरला. सूर्य उगवतो म्हणजे काय जणू निसर्गाने स्वतःचं रंगमंच उभं केलंय, हे खरं तर इथेच समजतं.” – स्निग्धा सावंतभोसले (मार्मोरिस स्नेही)

दिरंग – ऑर्किड्सची राजधानी
दिरंगमध्ये पाऊल टाकलं की आजूबाजूला रंगांची उधळण झाल्यासारखं वाटतं. इथे तब्बल ४५० पेक्षा जास्त ऑर्किड्सच्या प्रजाती आहेत. काही दुर्मीळ, काही संकटग्रस्त – पण सगळ्याच मन मोहून टाकणाऱ्या. याशिवाय सफरचंदांची नर्सरी, किवी फार्म, याक रिसर्च सेंटर आणि प्राचीन दिरंग जोंग (किल्ला) यामुळे हे गाव निसर्ग आणि वारसा यांचं सुंदर मिश्रण वाटतं.

सेला खिंड – हिमालयाचं मोतीचंदन
१४,००० फूट उंचीवरची सेला खिंड ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच मोटार मार्ग (Highest Motorable) खिंड आहे. इथलं निळंशार स्फटिकासारखं तलावाचं पाणी आणि चारही बाजूंचं बर्फाच्छादित दृश्य – हे पाहताना मनातलं जग काही काळासाठी थबकून जातं. ही खिंड म्हणजे हिमालयाने जपून ठेवलेला एक अद्वितीय खजिना.

जसवंतगढ – शौर्याचा साक्षीदार
१९६२ च्या युद्धाची आठवण करून देणारं हे ठिकाण. वीर जसवंतसिंह रावत – ज्यांनी तब्बल ७२ तास चिनी सैन्याला थोपवून धरलं, त्यांना मरणोत्तर महावीर चक्र प्रदान करण्यात आलं. त्यांचं स्मारक जसवंतगढ आजही प्रवाशांना सांगतं – “शौर्य अमर आहे.”

बुमला खिंड – सीमा आणि आठवणी
१५,२०० फूट उंचीवर भारत-चीन सीमेवर वसलेली बुमला खिंड म्हणजे इतिहासाचा एक पानच. १९६२ मध्ये इथे झालेल्या प्रखर लढाईने या भूमीचं रूप बदललं. वर्षभर बर्फाने झाकलेली ही खिंड २००६ मध्ये ४४ वर्षांनी पुन्हा व्यापारासाठी खुली झाली. सीमेजवळ उभं राहण्याचा अनुभव प्रवाशाला देशाच्या सीमांचे खरे महत्त्व जाणवून देतो.

माधुरी तलाव – हिमातलं आरसपानी सौंदर्य
बर्फाच्छादित डोंगररांगांमध्ये वसलेला सुंगेस्टर त्सो, ज्याला लोकप्रियतेमुळे “माधुरी तलाव” म्हणतात. कारण? ‘कोयला’ चित्रपटातील माधुरी दीक्षितच्या गाण्यामुळे! शांत तलाव, त्यावर उमटणारी हिमालयाची सावली, आणि आजूबाजूच्या सैनिकांच्या कहाण्या – हे सगळं प्रवासात एक वेगळंच भावविश्व निर्माण करतं.

तवांग – अध्यात्माचं केंद्र

तवांग म्हणजे अरूणाचलचं हृदय.

  • तवांग मठ – आशियातील दुसर्‍या क्रमांकाचा आणि भारतातील सर्वात मोठा मठ. २८ फूट उंच सुवर्ण बुद्ध-मूर्ती इथे पाहताना डोळ्यांत श्रद्धा आणि मनात शांतता उतरते.
  • तवांग युद्ध स्मारक – ४० फूट उंच स्तूपासारखं स्मारक, ज्यावर सोन्याने कोरलेली २४२० शहीदांची नावे आहेत.
  • क्राफ्ट सेंटर आणि स्थानिक बाजारपेठ – इथे मिळणारे हातमागावरचे वस्त्र, कार्पेट्स आणि रंगीत मुखवटे प्रवाशांच्या बॅगमध्ये नेहमीच एक खास आठवण बनून राहतात.

बोमडिला – हिमालयाचं खिडकीतून दर्शन
दलाई लामांच्या मार्गदर्शनाखाली बांधलेला बोमडिला मठ हा २०० हून अधिक बौद्ध भिक्षूंचं निवासस्थान आहे. मठातून दिसणारं बोमडिलाचं विहंगम दृश्य मनात कायमचं कोरलं जातं. इथलं क्राफ्ट सेंटर – रंगीबेरंगी कार्पेट्स आणि लाकडी शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे. उंचावरून दिसणारी हिमालयातील कांग्टो आणि गो रिचेन शिखरं ही या प्रवासाची खरी शान ठरतात.

प्रवासप्रेमींसाठी खास संदेश
अरूणाचल प्रदेश हा केवळ निसर्गाचा खेळ नाही, तर इतिहासाचा धडा आणि अध्यात्मिकतेचं ओंजळभर पाणी आहे. या भूमीवर पाऊल टाकलं की प्रत्येक ठिकाण वेगळी कहाणी सांगतं. सूर्योदयाचा पहिला किरण इथे अनुभवताना मनाला जाणवतं – खरा भारत अजून किती अद्भुत आहे.

लेखिका: नीलम पुजारी
संस्थापक – Marmoris Tours
संपर्क:
+91-+91-8237810590
ईमेल: info@marmoristours.com
वेबसाइट: www.marmoristours.com