लेखसंग्रह

गरज ही नवीन कल्पक नाविन्याची [innovation] पण जननी असते.

Category:

 

आपल्याला सर्वांनाच हे माहित आहे की गरज ही शोधाची जननी असते. मला अशा अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागले की जेथे मला पटले की गरज ही नाविन्यपूर्ण कल्पक विचारांची सुद्धा जननी असते. ही कथा अशाच एका कल्पक विचाराची आहे.

  June 28, 2026


युवा-विश्व

प्रिय लतादीदी

Category:

 

शब्दांच्या पलीकडे जायचे असेल तर सूर तुम्हाला सहज नेतात. काही माणसें विचारात असतात, काही माणसें रक्तात असतात, काही माणसे श्वासात असतात. लता रसिकांच्या नसानसात आहे. आमच्या रसिकांच्या दृष्टीने लता मंगेशकर म्हणजे मैलाचा दगड. संगीतातलं एक परिमाण आणि परिणाम. एकेका पिढीचं दैवत माणसेंच असतात. एका पिढीचे तुम्ही दैवत आहात. काही गोष्टीला पर्याय नसतो त्यापैकी तुम्ही आहात.तुमचा काळजाला भिडणारा,हेलावून सोडणारा, अंतर्मुख करणारा, डोळ्यातून अश्रू वाहायला लावणारा आवाज, हीच तुमची शक्‍ती आहे. तुम्ही व्याख्येत न मावणारी स्वरसम्राज्ञी आहात..तुम्ही काहीजणांचे दैवत आजात. तुम्हीअनेकांच्या भिंतीवरील फोटो प्रेम आहात. मनाच्या चौकटीतील एक सुंदर चित्र आहात .एकच गीत अनेक जण गातात, पण हसवायचे, रडवण्याचे सामर्थ्य काही जणांमध्ये असतं, त्यापैकी एक तुम्ही. तुम्ही असे चुंबक आहे,जिथे सर्व विशेषणे आपोआप चिकटतात. गाणं अजरामर करणं तुमच्याडून शिकायला हवं. ये मेरे वतन के लोगो ऐकल्यावर डोळ्यात पाणी येते. पंडित नेहरूंच्या डोळ्यात व आमच्या डोळ्यात पाणी आणलत.

  June 28, 2026


युवा-विश्व

आहे मनोहर तरी गमते उदास

Category:

 

चांगल्या सवयी, चांगले विचार, चांगले संस्कार, चांगलं वळण हे विद्यार्थ्यांचं पुढील आयुष्य मनोहर करतं. केवळ भौतिक बाबतीत मनोहर नको, तर मानसिकतेतही मनोहर हवं. नाती जपणं ही मनोहरी अवस्था आहे. नाती दुरावली की मन उदास होतं. आपली मुलं परदेशात पैसा कमविण्यासाठी जातात हे मनोहर चित्र असलं तरीही पालकांना आपल्यापासून मुलं दुरावल्याची जाणीव उदास करते.

  June 28, 2026


साहित्य - ललित

अभिषेक

Category:

 

राम कथेवर आधारलेल्या भासांचा दोन नाटकांपैकी एक वैशिष्ट्यपूर्ण नाटक म्हणजे अभिषेक. किष्किंधे मध्ये श्रीराम सुग्रीव भेटीपासून श्रीरामांच्या राज्याभिषेकापर्यंतचा कथाभाग या नाटकात साकारलेला आहे. रावणाने सीतेचे हरण केल्यानंतर तिला शोधत भगवान राम सुग्रीवा पर्यंत पोहोचले आहेत. त्यांची मैत्री झाल्यानंतर त्याआधारे सुग्रीव वालीला आव्हान देतो. या दोघांच्या युद्धात श्रीराम वालीला मारतात.

  June 28, 2026


अर्थ पूर्ण हास्य
विनोदी लेखन

अर्थ पूर्ण हास्य

Category:

 

अर्थशास्त्र, करआकारणी, आर्थिक व्यवहार, बँकिंग हे आपल्या दैनंदिन आयुष्यातले अविभाज्य आणि अतिशय महत्त्वाचे घटक असले तरी ते बऱ्याच जणांना नकोसे, कटकटीचे, कंटाळवाणे वाटतात. पण काही प्रतिभावान वल्ली अश्या रुक्ष विषयांबाबतीतही असे काही चटपटीत लिहून, बोलून जातात की ते ऐकल्यावर, वाचल्यावर आपल्या चेहऱ्यावर आपसूक स्मितहास्य फुलते. अश्याच काही प्रसिद्ध, अप्रसिद्ध किंवा अनामिक व्यक्तींच्या खुमासदार, चटकदार ‘अर्थ’पूर्ण वकतव्यांचा फराळ जो आपल्या चेहऱ्यावर हास्य फुलवेल

  June 27, 2026