अनोळखी झालेलो आपण

अंतर वाढलं,
कोणी पावलं मागे घेतली म्हणून नाही,
तर कोणी थांबलंच नाही म्हणून.

शब्द होते,
पण ते पोचायच्या आधीच
त्यांचा अर्थ हरवून बसला.
म्हणून संवाद मेलेला नाही,
पण तो ओळखीचा राहिला नाही.

अनोळखी सहज जवळचे झाले,
कारण त्यांच्याशी अपेक्षा नव्हत्या.
आणि ओळखीचे दुरावले,
कारण अपेक्षाच खूप होत्या.

एकेकाळी नाव पुरेसं होतं,
आता स्पष्टीकरणही अपुरं वाटतं.
आपण भेटतो, बोलतो, हसतो…
पण कुठेतरी
एकमेकांना ओळखणंच विसरलो आहोत.

हे अंतर
नात्याच्या शेवटी नाही,
ते नात्यातच
हळूच रुजत गेलंय.

आणि म्हणूनच कदाचित
आज आपण एकमेकांसमोर उभे असलो,
तरी मनात कुठेतरी जाणवतं
आपण आता
एकमेकांसाठी
अनोळखी झालो आहोत.

•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212

Author