युवा-विश्व

मोहीम तलाव पुनरुज्जीवनाची

Category:

 

यशोगाथा सार्वत्रिक व सर्व दूर असायलाच हव्यात.पर्यावरण व प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत असतानाच काही व्यक्ती स्वतःच्या प्रतिभेचा वापर करून नवनवीन मार्ग व त्यावर उपाय शोधत आहेत.गोंदिया येथील शालू जगदीश कोल्हे यांच्या प्रयत्नांमुळेच अनेक तलावांनी मोकळा श्वास घेतलाय, त्याचबरोबर ६३ तलावांचे पुनरुज्जीवनही झाले आहे. तसेच शालूताईंनी महिलांना मासेमारी क्षेत्रात आणून या क्षेत्रातील पुरुषांची मक्तेदारी मोडून काढली. यासाठी त्यांनी महिलांना मासे पकडण्यापासून ते बाजारात त्यांची विक्री करण्यापर्यंत आवश्यक ते प्रशिक्षण दिले.निमगाव, मोरगाव अर्जुनी तालुका, जिल्हा गोंदिया येथील शालू जगदीश कोल्हे या गेल्या नऊ वर्षांपासून फीड (FEED) या संस्थेच्या माध्यमातून माजी मालगुजार तलावांच्या पुनरुज्जीवनाचे काम करीत आहेत .या तलावांमधील बेशरमाची झाडे नामशेष झाली आहेत. शालू कोल्हे म्हणतात, “केवळ पाणी आणि माती असणे यास तलाव जिवंत आहे, असे म्हणता येत नाही. जीवविविधता, प्राणी, पक्षी, जनावरांसाठी चारा व लोकोपयोगी वनस्पती जर तलाव परिसरात विपुल असेल तरच तो तलाव जीवनदायक ठरतो.

  July 2, 2026


युवा-विश्व

अंधांची डोळस शाळा

Category:

 

कोथरूड येथील दृष्टिहीनांसाठी, सर्वसमावेशक निवासी’ शाळा एकदा तरी भेट द्यायला हवी अशीच आहे. गांधी भवन, कोथरूड येथे ही शाळा आहे. डोळे असले म्हणजेच यश गाठता येते असे नाही, हे येथील विद्यार्थ्यांकडून व त्यांनी केलेल्या वस्तू पाहून नक्कीच म्हणता येईल. केवळ वस्तूची निर्मिती नव्हे तर विक्री करून अर्थार्जनसुद्धा इथे केले जाते.

  July 2, 2026


युवा-विश्व

अंकनाद

Category:

 

पुस्तकाबाहेरच्या अनेक बार्बीमधून पुस्तकांमधील संबोध स्पष्ट करता येतात, म्हणून पुस्तकाच्या पलीकडे शोध घेणं आवश्यक असतं. पुस्तकातल्या काही गोष्टी मुलांना अभ्यासायला नकोशा वाटतात. गणित या विषयाची काही मुलांना भीती वाटते, तो विषय त्यांना कंटाळवाणा वाटतो आणि म्हणून पुस्तकापासून ते दूर राहातात, अशा मुलांची ही भीती दूर व्हावी म्हणून अंकनाद गणिताची सात्मीकरण प्रणाली, विद्यार्थ्यांची गणिताशी मैत्री घडवते.

  July 2, 2026


South Asia : भारताचे अशांत शेजारी – भाग 2 (चीन)
पॉडकास्ट

South Asia : भारताचे अशांत शेजारी – भाग 2 (चीन)

Category:

 

भारताचे अशांत शेजारी या मालिकेत आज आपण चर्चा करणार आहोत ते चीनबद्दल. भारत चीन यांच्यातील संबंध सध्या प्रचंड प्रमाणात ताणले गेले आहेत. डोकलाम आणि गलवानमधील संघर्षानंतर उभय देशांमध्ये standoff आहे. भारत हा आपला शत्रू नसून प्रतिस्पर्धी आहे आणि आशिया खंडातच भारताला आपल्यापेक्षा मोठं होऊ द्यायचं नाही, ही चीनची महत्त्वाकांक्षा आहे

  July 2, 2026