जगाचा खूप विचार केला
की जगायचंच राहून जातं,
प्रश्नांच्या ओझ्यात अडकून
श्वास घेणंच विसरलं जातं.
उद्याच्या भीतीत आज हरवतो,
कालच्या आठवणी टोचतात,
क्षण हातात असूनसुद्धा
तो निसटून दूर पळून जातो.
थांबून जरा डोळे मिटावे,
मनाशी दोन शब्द बोलावे,
उत्तर शोधण्याआधी कधी
जगणंच थोडं जगून घ्यावे.
कारण विचारांनी जग समजतं,
पण अनुभवांनी जगणं उमगतं,
आणि जगाचा खूप विचार केला
की खरंच…
जगायचंच राहून जातं.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे
Author
Post Views: 4