शिक्षण की कौशल्य? महत्वाचं काय?
Category:
पॉडकास्टशिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकांतील धडे नव्हे; शिक्षण म्हणजे आयुष्य घडवण्याची, विचारांना दिशा देण्याची आणि माणूस घडवण्याची अखंड प्रक्रिया. अशा या शिक्षणविश्वात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवणारे, नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारे आणि आपल्या असामान्य योगदानासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेले आदरणीय श्री. सुरेंद्र दिघे सर आज आपल्या पॉडकास्टमध्ये उपस्थित आहेत. शालेय अभ्यासक्रमाच्या चौकटीपलीकडे जाऊन विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, सर्जनशीलता, नेतृत्व, सामाजिक जाणीव आणि जीवनमूल्ये रुजवण्यासाठी त्यांनी अनेक प्रेरणादायी उपक्रम राबवले. त्यांच्या शिक्षणाकडे पाहण्याच्या व्यापक दृष्टीकोनामुळे असंख्य विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध झाले आहे.
July 21, 2026